सिध्दनेर्ली (वार्ताहर)
सिद्धनेर्ली व सिद्धनेर्ली परिसरात होळीमध्ये पोळी नैवैद्य म्हणुन जाळण्याऐवजी ती गरजूंना द्या असे आवाहन करण्यात आले होते.त्या अनुषंगाने सिद्धनेर्ली व आसपासच्या गावामधुन विविध ठिकाणांवरून नागरिकांनी संपर्क साधुन एकत्र पोळी दान केली.
त्याचबरोबर डी.आर.माने महाविद्यालय माजी विद्यार्थी संघ आणि विवेकवाहिनी कागल यांच्या मार्फत तरुणांनी सयुंक्त असा उपक्रम राबविला.त्याला खुपच उत्तम प्रतिसाद मिळाला.
देवचंद शहा अनाथाश्रम कागल, शाहु साखर कारखाना कागल येथील ऊस तोडणी कामगार व उमेद फाउंडेशन (सांगरुळ) यांना विविध गावातून जमा झालेल्या १०७० पोळ्या दान करण्यात आल्या.तेथील लोकांशी या तरुणांनी हितगुज केलं तसेच अनाथ आश्रम मधील मुलांशी संवाद साधतांना खरा आनंद काय असतो यांची जाणीव या तरूणांना झाली तेथील सेवा सुविधा व इतर मदतीसाठी आम्ही सदैव तत्पर राहु असा विश्वास या तरुणांनी दिला,विवेक पोतदार नितिनघराळ पंकज बंके यांनी सहकार्य केले तसेच बामणी येथील सर्व ग्रामस्थ एकत्रित येऊन होळी हा सन मोठ्या उत्साहाने साजरा करत या सनामध्ये होळी दहनामध्ये पुरणपोळी वाहिली जाते पण ती पोळी जाळुन टाकण्याच्या प्रथेला बगल देत त्या पोळ्या गरजु व्यक्तिंना दान केल्या .असाच एक उपक्रम महिला राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्षा सौ.मनिषा पाटील,अंकुश पाटील,.युवराज पाटील,.सचिन मगदुम,सिंकदर मुजावर,.अमोल शिंदे आणि युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,बामणी यांच्यामार्फत राबविण्यात आला,होळीमध्ये पुरणपोळी न टाकता त्याच पोळ्या एकत्रित साठवुन,कँनाँल बांधकामासाठी बाहेरील राज्यातुन आलेल्या गरजु लोकांना देण्यात आल्या. पोळीचा आस्वाद घेेताना त्यांच्या चेहर्यावरुन एक आनंदाचा उत्साह दिसुन येत होता. अशा पध्दतीने एक आगळा-वेगळा सामाजिक बांधिलकीचा उपक्रम सिद्धनेर्ली परिसरात पार पडला.