Saturday, 30 June 2018

शासनाच्या शाळा बंद धोरणास महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचा तीव्र विरोध

कोल्हापूर / प्रतिनिधी

     मिलींद बारवडे


   शाहू ,फुले, आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात कर्मवीर भाऊराव पाटील आणि बापूजी साळुंखे  यांच्या विचारांच्या शाळा बंद करून शिक्षणाचे कंपनीकरण करण्याचा शासनाचा विचार सुरू आहे पण शासनाच्या या धोरणास  महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचा तीव्र विरोध राहील असे प्रतिपादन महामंडळाचे अध्यक्ष विजयसिंह गायकवाड यांनी केले .

          श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग येथे  जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्यावतीने आयोजित बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षांनी कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष एस. डी .लाड  होते .ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डी .बी .पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती .

        या बैठकीत पवित्र प्रणालीनुसार शिक्षक भरती करण्यापूर्वी २०१२ नंतर नियुक्त केलेल्या अर्धवेळ व पूर्णवेळ शिक्षकांना प्रथमत: मान्यता द्यावी ,शाळांची पटसंख्या कमी झाली तर शिक्षक कमी केला जातो पण पट वाढल्यानंतर वाढीव शिक्षकांची पदे मंजूर  केली जात नाही ती मंजूर व्हावीत ,सन २०१५-१६  संचमान्यतेमध्ये वाढीव विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात शासनाने प्रस्तावित पदे दाखवली पण त्यानंतर मात्र ती दाखवली नाहीत, ती पदे दाखवून त्यास मान्यता द्यावी , शिक्षक  भरतीचे अधिकार शासनाकडे आणि शाळेचे प्रशासन संस्थेकडे या धोरणामुळे शैक्षणिक गुणवत्ता खालावणार असून व  पवित्र पोर्टल हे धोरण सेवाशर्ती नियमावली छेद देणारे असल्याने संस्थाचालकांना ते मान्य नसल्याने त्याचा पुनर्विचार व्हावा  , शिक्षकेतर कर्मचारी भरतीस परवानगी मिळावी ,शासनाच्या अशैक्षणिक धोरणामुळे प्राथमिक पासून पदवीपर्यंत शिक्षणाची होणारी गळचेपी थांबवावी  आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या . तर संस्थाचालक संघटनेची पुणे येथे ४  जुलै रोजी बैठक होणार असून या बैठकीतील निर्णयानुसार कोल्हापूर जिल्ह्यात पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाईल असे व्यासपिठाचे अध्यक्ष एस.डी. लाड यांनी यावेळी सांगितले . तसेच २०  टक्के अनुदानावरील शिक्षक कर्मचाऱ्यांचे ग्रामसेवा ते नागपूर आंदोलनास सक्रिय पाठिंबा , एखादा निर्णय इतर विभागाने घेतला असेल तर तसाच निर्णय कोल्हापूर उपसंचालक  विभागाने ही घ्यावा , आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या शिक्षकांना उपसंचालक आणि शिक्षणाधिकारी यांनी पूर्वग्रहदूषित वागणूक देऊ नये या  ठरावासह आमदार कपिल पाटील यांच्या हॅटट्रीक निवडीबद्दलच्या  अभिनंदनाचा  ठराव यावेळी करण्यात आला .  

        यावेळी वसंतराव देशमुख, जयंत आसगावकर , व्ही. जी .पोवार,  आर. वाय. पाटील, बी. जी .बोराडे , डी.एस. घुगरे ,  प्रभाकर आरडे , सुधाकर निर्मळे , सी. एम .गायकवाड , डॉ. ए.एम. पाटील , एस .के. पाटील, डी .एस .पाटील , बी .बी .पाटील, राजेश वरक ,व्ही.जी .पाटील , जी.एस .बागडी ,उदय पाटील , डी. एस .जाधव ,संदीप पाटील , समीर गायकवाड, भाऊसाहेब सकट,लक्ष्मण कांबरे, गिरीष फोंडे आदीसह तीस संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.आभार व्ही. जी.पोवार यांनी मानले . 

               फोटो 

कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपिठाच्या सभेत बोलताना विजयसिंह  गायकवाड , शेजारी डी.बी. पाटील , एस.डी. लाड , व्ही.जी. पोवार इतर .

Tuesday, 26 June 2018

लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांचे कार्य समाजातील सर्व घटकांसाठी प्रेरणादायी - ऋतुराज पाटील

*"  "*



*कसबा बावडा,दि.२६:* प्राथमिक  शिक्षण समिती कोल्हापूर ची कसबा बावडा येथील  उपक्रमशील शाळा राजर्षी शाहू विद्यामंदिर क्र.११ कसबा बावडा या शाळेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी  २६ जून हा दिवस राजर्षी शाहू महाराजांची जयंती म्हणून साजरा करण्यात आला. युवानेते मा.ऋतुराज पाटील यांच्या हस्ते राजर्षी शाहू विद्यामंदिरच्या प्रांगणात असणाऱ्या शाहू महाराजांच्या प्रतिकृतीला पुष्पहार घालनेत आला.त्यावेळी विद्यार्थांनी छत्रपती शाहू महाराज की जय असा जयघोष केला.त्यावेळी नगरसेविका माधुरीताई लाड, नगरसेवक डॉ. संदीप नेजदार,नगरसेवक अशोक जाधव,मुख्याध्यापक अजितकुमार पाटील,श्रीराम सोसायटीचे व्हाईस चेअरमन मदन जामदार,सामाजिक कार्यकर्ते अभिजीत जाधव,कुंडलिक परीट,प्रशांत पाटील,माजी नगरसेवक अजित पवार,गजानन बेडेकर,विजय बेडेकर,भारतवीर मित्रमंडळाचे कार्यकर्ते राजू चौगले,सचिन चौगले व इतर कार्यकर्ते व्यवस्थापन समिती अध्यक्षा प्राजक्ता शिंदे,उपाध्यक्षा पल्लवी पाटील,रजनी सुतार ,शुभांगी चौगुले,रमेश सुतार आदी उपस्थित होते.

   

    यावेळी युवानेते ऋतुराज पाटील यांच्या हस्ते शाळेतील मुलांना वह्या वाटप तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करणेत आला.त्यात भाषण स्पर्धेतील मयुरी कांबळे,श्रुती चौगुले,मृणाली दाभाडे,अनुष्का साठे,निशिका शिंदे,ऋतुराज कोरवी यांचा गौरव करणेत आला.

   

   सदर प्रसंगी शाळेतील शिक्षक उत्तम कुंभार,सुशील जाधव ,सुजाता आवटी,जयश्री सपाटे,आसमा तांबोळी,शिवशंभू गाटे,बालवाडी शिक्षिका कल्पना पाटील,काळे मॅडम,मंगल मोरे त्याचबरोबर भागातील  पालक व नागरिक आदी उपस्थित होते.

Monday, 25 June 2018

गजाननराव जाधव यांना साप्ताहिक अन्वेषण राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार

हेरले / प्रतिनिधी दि.२५/६/१८


              महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष मुडशिंगी गावचे उपसरपंच गजाननराव जाधव यांना साप्ताहिक अन्वेषण यांनी राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले

        मनसे जिल्हाध्यक्ष उपसरपंच गजानन जाधव यांनी  पदाच्या माध्यमातून गेली सोळा वर्ष मुडशिंगी गावात विकासाभिमुख सामाजिक कार्य करीत गावचा कायापालट केला आहे. त्यांच्या या अतूल्य कार्याबद्दल आमदार उल्हास पाटील यांच्या हस्ते सन्मानपत्र व मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

          फोटो कॅप्शन

साप्ताहिक अन्वेषण यांचा समाजभूषण पुरस्कार गजानन जाधव यांना प्रदान करतांना आम.उल्हास पाटील व इतर मान्यवर

Sunday, 24 June 2018

कन्या शाळा पोर्ले/ठाणेतील मुलींचा प्लॅस्टीक मुक्तीसाठी जागर.


माजगाव वार्ताहर:—दि.२३/०६/२०१८ प्लॅस्टीकमुळे होणारे दुष्परिणाम त्यामुळे होणारे आजार,जनावरांना होणारा त्रास,ओढे,नाद्या, नाले यांना येनारे महापुर,समुद्रामध्ये होणारे प्रदुषण त्यामुळे धोक्यात येणारी समुद्रातील सर्व जीवसृष्टी,मानव जातीला होणारे अनेक आजार या सर्वांवर एकच उपाय म्हाणजे प्लॅस्टीक मुक्ती होय.

  

   यासाठी शासन स्तरावर केलेला कायदा यशस्विरीत्या राबवायचा असेल तर रोजच्या वापरातील प्लॅस्टीकच्या ठिकाणी आपण निसर्ग निर्मीत वस्तु वापरल्या पाहिजेत. याचसाठी.निसर्गमित्र संस्था कोल्हापूर,महावीर काॅलेज कोल्हापूर चे विद्यार्थी,आणि कन्या विद्या मंदीर पोर्ले/ठाणे ता.पन्हाळा जि. कोल्हापूर चे विद्यार्थी व शिक्षक स्टाफ यांच्या संयुक्त विद्यमाने पळसाच्या पानापासुन पत्रावळी बनवण्याची एक दिवसाची कार्यशाळा घेणेत आली.या कार्य शाळेमध्ये पिंपळे येथील गुरव आजींनी प्रात्यक्षिके दाखवली.शिवाजी विद्यापिठाचे सिनेट मेंबर निसर्गमित्र,आदरणिय श्री.अनिल चौगले साहेब यानी मार्गदर्शन केले.निसर्ग आणि सन यांच्या मधील सहसंबंध याविषयी माहिती दिली.वट पौर्णिमेसाठी प्रत्येक मुलीला वडाचे रोप भेट देणेत आले.

   

 कार्यक्रमासाठी सर्पमित्र श्री.दिनकर चौगले साहेब निसर्गमित्र संस्थेचे श्री.पराग केमकर,महावीर काॅलेज चे विद्यार्थी,वन विभाग चे कर्मचारी,शाळेचे मुख्याध्यापक श्री.डी.एस.चौगले सर अध्यापक श्री.जाधव सर,श्री.गणपती मांडवकर सर,श्री.बाजीराव कदम सर,श्री.नामदेव पोवार सर,श्री.प्रकाश पोवार सर,श्री.कोरे सर उपस्थित होते.

निरोगी आरोग्याचा कानमंत्र योगा - शंकर पाटील


माजगाव वार्ताहर:—दि.२१/६/२०१८

कन्या विद्या मंदीर पोर्ले/ठाणे ता.पन्हाळा.जि.कोल्हापूर  शाळेमध्ये २१जून योगा दिवस उत्साहात साजरा करणेत आला.योगा करणेसाठी शाळेतील सर्व विद्यार्थी,गावचे सरपंच आदरणिय श्री.प्रकाश जाधव साहेब,गावचे निवृत्त पी.एस.आय. अधिकारी श्री.शंकर पाटील साहेब,गावचे नागरीक,पालक,शाळा व्यवस्थापण समिती अध्यक्ष श्री.रामराव चेचर साहेब,शाळेचे मुख्याध्यापक श्री.डी.एस.चौगले सर,अध्यापक श्री.काशिराम जाधव सर,श्री.गणपती मांडवकर सर,श्री.नामदेव पोवार सर,श्री.प्रकाश पोवार सर,श्री.बाजीराव कदम सर,श्री.कोरे सर उपस्थित होते.


भावी आयुष्यात हाॅस्पिटलचा खर्च कमी करायचा असेल तर योगा करण्याशिवाय पर्याय नाही.निरोगी शरिरातच निरोगी मन वास करते.तसेच देशाची भावी पिढी सशक्त आणि निरोगी बनवायची असेल तर,योगा करण्याशिवाय पर्याय नाही.असे मत श्री.शंकर पाटील साहेब यांनी मांडले.

सरपंच श्री.प्रकाश जाधव साहेब यांनी श्री शंकर पाटील साहेब यांचा शाल श्रीफळ व फेटा बांधून सत्कार केला.

शाळेचे मुख्याध्यापक श्री.डी.एस.चौगले सर यांनी आभार मानले.

Friday, 22 June 2018

एनसीसी छात्र सैनिकांनी योगासनाची प्रात्यक्षिके करून जागतिक योगदिन मोठया उत्साहात साजरा

हेरले / प्रतिनिधी दि. १८ /६/१८



    पाच महाराष्ट्र बटालियन एनसीसी छात्र सैनिकांनी योगासनाची प्रात्यक्षिके करून जागतिक योगदिन मोठया उत्साहात साजरा केला.

        एनसीसी भवनमध्ये पाच महाराष्ट्र बटालियन एनसीसीचा वार्षिक प्रशिक्षण शिबीर सुरू आहे.यामध्ये ज्युनिअर, सिनिअर डिवीजन व विग्जचे ४५० मुले मुली सहभागी झाले आहेत. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त छात्र सैनिकांना यागाचे ज्ञान होण्यासाठी त्यांच्या समवेत एनसीसी अधिकारी वर्गांनी योगाचे महत्त्व स्पष्ट करीत योगासने सादर केली.

       यावेळी कमांडिंग ऑफिसर कर्नल आर.के. तिम्मापूर यांच्या नेतृत्वाखाली शिबीरातील कार्यवाही झाली. अॅडम ऑफिसर मेजर विश्वनाथ कांबळीमठ एनसीसी अधिकारी , अॅन्थोंनी डिसोजा, राजेंद्र बनसोडे, वर्षा मस्के, प्रशांत पाटील,  सुभेदार मेजर माणिक थोरात, ट्रेनिंग जेसिओ शिवाजी सुपणेकर, सुभेदार अशोक भांबुरडे, बीएचएम बाजीराव माने, सुभेदार हरी गावडे, राजाराम पाटील, सुभाष आढाव आदी अधिकारी वर्ग प्रशिक्षणात सहभागी होता. अशी माहिती  प्रसिध्दीस कर्नल आर.के. तिम्मापूर यांनी दिली आहे.

       फोटो 

पाच महाराष्ट्र बटालियन एनसीसी वार्षिक प्रशिक्षण शिबीरामध्ये छात्र सैनिक योगाची प्रात्यक्षिके करतांना.

Monday, 18 June 2018

पाच महाराष्ट्र बटालियन एनसीसीचे वार्षिक प्रशिक्षण सुरू

प्रतिनिधी दि. १८ /६/१८



    पाच महाराष्ट्र बटालियन एनसीसीच्या वतीने १८जून ते २७ जून वार्षिक प्रशिक्षणास सुरूवात झाली असून सिंधूदुर्ग रत्नागिरी कोल्हापूर आदी तीन जिल्ह्यातील ४५० छात्र सैनिक प्रशिक्षण घेत आहेत.

        दहा दिवसाच्या प्रशिक्षण शिबीरामध्ये मॅप रिडींग, योगाची प्रात्यिक्षिके, फायरिंग, ड्रील, ऑप्टीकल, सांस्कृतिक कार्यक्रम, स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, सामाजिक जागृती, विविध खेळांची, जुडो,कराटे, लाठी काठी आदींचे प्रात्यक्षिके, सिव्हील, एनसीसी , राष्ट्रीय एकात्मता, व्यक्तिमत्व पैलू लेक्चर्स, करिअर गाईडन्स आदी घटकांचे मार्गदर्शन होऊन प्रशिक्षण दिले जाणार आहे. १९ हायस्कूल, १६ कॉलेजचे एकूण ४५० छात्र सैनिक प्रशिक्षण घेत आहेत.

        कमांडिंग ऑफिसर कर्नल आर.के. तिम्मापूर यांच्या नेतृत्वाखाली शिबीरातील कार्यवाही होत आहे. अॅडम ऑफिसर मेजर विश्वनाथ कांबळी, एनसीसी अधिकारी , अॅन्थोंनी डिसोजा, राजेंद्र बनसोडे, वर्षा मस्के, तुकाराम पोवार, सुभेदार मेजर माणिक थोरात, ट्रेनिंग जेसिओ शिवाजी सुपणेकर, सुभेदार अशोक भांबुरडे, बीएचएम बाजीराव माने, सुभेदार हरी गावडे, राजाराम पाटील, सुभाष आढाव आदी अधिकारी वर्ग प्रशिक्षण देणार आहेत. अशी माहिती  प्रसिध्दीस कर्नल आर.के. तिम्मापूर यांनी दिली आहे.

       फोटो 

पाच महाराष्ट्र बटालियन एनसीसी वार्षिक प्रशिक्षण शिबीरामध्ये मार्गदर्शन करतांना कर्नल आर.के. तिम्मापूर समोर छात्र सैनिक

Sunday, 17 June 2018

शिवशाही बसला पुणे-बेंगलोर महामार्गावर कणेरीजवळ अपघात

चंदगड बोरिवली या शिवशाही बसला पुणे-बेंगलोर महामार्गावर कणेरीजवळ अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटून बस रस्‍त्यालगतच्या कठड्यावर आदळली. प्रत्यक्षदर्शीने सांगितलेनुसार पावसाची बारिक रिपरिप सुरू होती आणि शिवशाही बस भरधाव वेगात होती यावेळी अचानक आडवे काहीतरी आले आणि अचानक  ब्रेक मारल्याने चालकाचे नियंत्रण सुटून अपघात झाला 

त्यात११ जण जखमी झाले आहेत.

जखमींना उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Saturday, 16 June 2018

मौ.वडगाव येथील बालावधूत हायस्कूलमध्ये नवागत विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

हेरले / प्रतिनिधी दि. १६/६/१८



         मौजे वडगाव ( ता. हातकणंगले ) येथील बालावधूत हायस्कूलमध्ये शाळेचा पहिला दिवस हा प्रवेशोत्सव म्हणून साजरा करण्यात आला .

     १५ जून रोजी शाळेचा पहिला दिवस नविन प्रविष्ट  नवागत विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.शालेय पाठ्यपुस्तकेही देण्यात आले यावेळी शाळेचे मुख्याध्यापक संजीव चौगुले माजी उपसरपंच सुरेश कांबरे . ग्रा पं . सदस्य अवधूत मुसळे, अविनाश पाटील , सुनिता मगदूम यांनी आपली मनोगतें व्यक्त करून नवागत विद्यार्थी यांना शुभेच्छा दिल्या . या वेळी पालक विद्यार्थी शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते .

    

    विद्या मंदिर मौजे वडगांव शाळेत पहिल्याच दिवशी साधारण दोनशे नवागतांचे पुष्पगुच्छ, पुस्तके, फुगे, शोभेच्या टोप्या देऊन भव्य दिव्य असे स्वागत शाळेच्या वतीने नुतन मुख्याध्यापक टी. एस. कुंभार यांनी केले. यावेळी नवीन बदली होऊन हजर झालेल्या अध्यापक आर.पी. कुंभार शिक्षक डी.एन. कुंभार ( कोरोची ) एफ.डी. मुल्ला  आर.बी. म्हैशाळे शिक्षीका व्ही.जी. कांबळे , एस.एस. चव्हाण यांचेही स्वागत करण्यात आले.

        यावेळी पि.के. सामाजीक ग्रुपच्या वतीने दोनशे नवागतांना  प्रत्येकी एक पेन देऊन पहिल्याच दिवशी स्वागत केले.प्रास्तविक व स्वागत योगेश पाखले केले. यावेळी उपसरपंच किरण चौगुले, शा. व्य. समिती अध्यक्ष सागर अकिवाटे, सतीश कांबरे, नदिम हजारी तसेच ग्रां.पं.सदस्य अवधूत मुसळे, अविनाश पाटील, माजी उपसरपंच सुरेश कांबरे,  सामाजीक कार्यकर्ते कॉ. प्रकाश कांबरे तसेच शिक्षकवृंद रझिया नदाफ, अविष्कार कांबळे, प्रशांत पाटील, पालक, माता, ग्रामस्थ उपस्थीत होते. आभार अविष्कार यांनी मानले.

   फोटो 

मौजे वडगांव येथे नवागतांचे स्वागत करतांना विरोधी पक्षनेते अविनाश पाटील, अवधूत मुसळे, सुरेश कांबरे

शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे यांच्या जन्मशताब्दी व पर्यावरण दिना निमित्त हजारो बियांचे रोपण

कोल्हापूर प्रतिनिधी. 

शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे यांच्या जन्मशताब्दी व पर्यावरण दिना निमित्त  दि. 16.06.2018 रोजी विवेकानंद ज्युनिअर कॉलेज, आर्टस्/कॉमर्स विभाग स्टाफ यांनी एकत्र येऊन पोहाळे येथील ऐतिहासिक पांडवकालीन लेणी परिसरामध्ये जवळपास एकहजार च्या वर बियांचे रोपण केले. यामध्ये पळस, बहावा, जांभूळ, गुलमोहोर, सीताफळ, करंज या वृक्षांचा समावेश आहे.

या मोहिमे मध्ये महाविद्यालयातील जेष्ठ प्रा. एस. के. पाटील, विभागप्रमुख व NSS जिल्हा समन्वयक प्रा. बी.एस. लाड, प्रा. सौ. पालकर बी.पी, प्रा. शिंदे एस.जी व त्यांचे चिरंजीव , प्रा.जगताप एस. एस, प्रा.सौ.वागवे व्ही. एस, प्रा. सौ. सूर्यवंशी मॅडम, प्रा. धस ए.आर, सौ. प्रियांका धस यांनी उस्फूर्तपणे सहभागी होऊन बियारोपण केले.


बियारोपणानंतर वन भोजनाचा सामूहिक कार्यक्रम झाला. यावेळी पोहाळे येथील विद्यार्थिनी कु. क्रांती बेनाडे व कु. रोहित पाटील यांनी मोलाचे सहकार्य केले.

    पोहाळे गावचे सरपंच व इतर रहिवाशी यांनी ही उपस्थित राहून सहकार्य केले.

पंचगंगा  की  केंदाळगंगा ?


कोल्हापूर प्रतिनिधी - ज्ञानराज पाटील



कोल्हापूर कसबा बावडा ते शिये मार्गावरील पंचगंगा नदी पुलादरम्यान येथील पंचगंगा नदीपात्रामध्ये वाहत आलेले केंदाळ साठून मोठय़ा प्रमाणात पुलाच्या खांबालगत साचले आहे . दिवसेंदिवस या केंदाळाची वाढ होत जावून त्याचा वेढा पाणीउपसा करणाऱया इंटकवेलला पडल्याने पाणीउपस्यावरही त्याचा परिणाम होत आहे . तसेच पाणीही दुर्गंधीयुक्त व काळे झाले आहे .


बारमाही पाणी असणारी पंचगंगा आता प्रदूषणामुळे तसेच पाण्याचा प्रवाह थांबल्यामुळे केंदाळाने आच्छादली गेली आहे. या केंदाळाखाली श्वास गुदमरलेली पंचगंगा नदी प्रदूषणमुक्तीची आर्त हाक देत आहे, पण तिची हाक ऐकण्यास वेळ कोणाला आहे ?  दरवर्षी वाढत्या प्रदूषणामुळे नदीचे केंदाळ वाढतच आहेत. शिरोली एम आय डी सी पुल येथील पंचगंगा नदीच्या पात्राची ही अवस्था म्हणजे प्रदुषणाचे भयाण रुप दाखवत आहे.

Friday, 15 June 2018

सावित्रीच्या लेकिंच्या आयुष्यामधील शाळेतल्या पहिल्या चिमुकल्या पावलांच उत्साहात स्वागत


माजगांव वार्ताहर:—

कन्या विद्या मंदिर पोर्ले/ठाणे या शाळेमध्ये मुलींचा शाळा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करणेत आला.लहान लहान चिमुकलिंना पुस्तके,वही,पेन व पेढे देऊन स्वागत करणेत आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य आदरणीय श्री.प्रकाश पाटील (आण्णा)हे होते.प्रमुख पाहुणे पन्हाळा पंचायत समिती चे सभापती श्री.पृथ्वीराज सरनोबत (साहेब)होते.


आपल्या देशातील मुली सक्षम झाल्या तर भावी पीढी सक्षम होईल,त्यांच्या शिक्षणासाठी आतापर्यंत मदत केलेली आहेच.परंतु या पुढेही लागणारी सर्व मदत करण्यास तयार असलेचे मत श्री.प्रकाश पाटील (आण्णा)यांनी मांडले.कार्यक्रमास सरपंच श्री.प्रकाश रामराव जाधव(साहेब)श्री.शिवाजी चेचर(माजी पंचायत समिती सदस्य),कुमार शाळेचे शाळा व्यवस्थापण समिती अध्यक्ष श्री. संभाजी खवरे,कन्या शाळेचे शाळा व्यवस्थापण समिती अध्यक्ष श्री.रामराव चेचर(साहेब),कुमार शाळेचे मुख्याध्यापक श्री.सावंत सर,कन्या शाळेचे मुख्याध्यापक श्री.चौगले सर,कन्या शाळेचे शिक्षक श्री.जाधव सर,श्री.मांडवकर सर,श्री.प्रकाश पोवार सर, श्री.नामदेव पोवार सर श्री.बाजीराव कदम सर,श्री.कोरे सर उपस्थित होते.आभार श्री.चौगले सर यांनी मानले.

Monday, 11 June 2018

मौ. मुडशिंगी पाणी फाऊंडेशन अंतर्गत पाणी आडवा पाणी जिरवा एक पाऊल हरितक्रांती कडे हा उपक्रम

मौजे मुडशिंगी ( ता. हातकणंगले)

 गावातील युवकांचा सामाजिक सेवेसाठी निःस्वार्थ पुढाकार  घेऊन गावात प्रथमच पाणी फाऊंडेशन अंतर्गत पाणी आडवा पाणी जिरवा एक पाऊल हरितक्रांती कडे हा उपक्रम गावचे प्रथम नागरिक सरपंच मीनाक्षी खरशिंगे यांचे पती प्रकाश खरशिंगे व आबा वरिंगे यांनी श्रमदानास सुरूवात करून युवा पिढीस श्रमदान चळवळीत कार्यान्वीत केले आहे. 

                  पाणी म्हणजे जीवन पाण्याविना मनुष्य अथवा ही  सृष्टी जिवंत राहू शकत नाही. नेहमी गावामध्ये उन्हाळ्यात  पाण्याची खुप टंचाई भासते. गावातील आया-बहिणींना पाण्यासाठी वणवण फिरावे लागते. हे कुठेतरी थांबायला पाहीजे म्हणून पाणी फाऊंडेशन अंतर्गत पाणी आडवा पाणी जिरवा या उपक्रमात संघर्ष युवा मंच सर्व सदस्य व पदाधिकारी यांनी नि:स्वार्थपणे श्रमदान केले. याचा फायदा असा झाला की श्रमदान करणा-यांची संख्या २ वरून ४०च्या वर गेली.संघर्ष युवा मंचचे सर्व सदस्य भूमीहीन असताना केवळ गावच्या पाणी प्रश्न सोडवण्यासाठी गेली महिनाभर संघर्ष युवा मंच चे १०च्या वर सदस्य आपल्या सोयीनुसार ३ते४ तास श्रमदान करतात. 

                     संघर्ष युवा मंचचा पुढाकार व बौध्द समाजातील तसेच गावातील युवकांच्या सहकार्यातून गेली कित्येक वर्षे गाळ भरून साचलेली दु:ष्काळ विहीर गावच्या मुलांना पोहण्यासाठी गाळमुक्त केली आहे. यासाठी जिल्हा परिषद सदस्या डॉ. पद्माराणी राजेश पाटील यांचे विषेश सहकार्य लाभले. तसेच या मंडळामार्फत गेली ६वर्षे शैक्षणिक,सामाजिक,सांस्कृतिक,क्रीडा अशा विविध स्तरावर संघर्ष सामाजिक बहुउद्देशिय संस्था आपल्या कामाचा ठसा उमटवत आहे.

अशा उपक्रमासाठी गावातील सर्व तरूण मंडळे,ग्रामस्थ व राजकीय लोकांचे नेहमी सहकार्य असते.

सेवानिवृत्ती निमित्त  वाय. व्ही. चौगुले यांचा सत्कार

हेरले / प्रतिनिधी दि. ११/६/१८


शासनाचा मूल्यांकन स्वेच्छाधिकार शासन निर्णय शिक्षणक्षेत्राला घातक आहे याविरुद्ध आंदोलनाचा इशारा जेष्ठ शिक्षणतज्ञ डी.बी.पाटील यांनी दिला.

         श्री.प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस येथे कोल्हापूर जिल्ह्यातील मुख्याध्यापकांच्या सभेत ते बोलत होते.कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अधीक्षक वाय.व्ही.चौगुले यांच्या सेवानिवृत्ती निमित्त सत्कार करणेत आला.

         डी.बी.पाटील पुढे म्हणाले शाळा तुकडी ४ वर्षानंतर शासनाचे मूल्यांकन करणे,याद्या जाहीर करणे,अनुदान देणे हा हक्क आहे पण शासनाचा मूल्यांकन स्वेच्छाधिकार कायदा कर्मचाऱ्यांचा हक्क हिरावून घेणारा आहे.या शासन निर्णयाला हद्दपार करण्यासाठी शिक्षणक्षेत्रातील सर्व घटकांनी एकत्र येवून लढा उभा करण्याचे आवाहन केले.

       शैक्षणिक व्यासपीठाचे सभाध्यक्ष एस.डी.लाड यांनी संघटनांनी अनेक वर्षे संघर्ष करुन मिळविलेले हक्क शासन मोडीत काढत आहे.त्याविरुद्ध उभे राहावे असे स्पष्ट केले.महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे उपाध्यक्ष व्ही.जी.पोवार यांनी राज्यातील अनेक तुकड्या मुल्यांकनास पात्र होवून अनुदान मिळणे गरजेचे असतानाही अद्यापि मूल्यांकन केले नाही यासाठी शासनावर दबाव आणून कृतीकार्यक्रम निश्चित करण्यात आला.महाराष्ट्र राज्य विनअनुदान संघटनेचे उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांनी अनुदानाचा पुढील टप्पा शासनाने देणे बंधनकारक असतानाही शासनाने जाहीर केले नाही यासाठी आंदोलनाचा पुढील टप्पा जाहीर केला.एस.के.पाटील(तुरंबे) यांनी जिल्ह्यातील वेतनेत्तर अनुदानाची माहिती सांगितली.

       मुख्याध्यापक संघाचे अधीक्षक वाय.व्ही.चौगुले यांनी ३४ वर्षे उत्कृष्ट सेवा केल्याबद्दल डी.बी.पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करणेत आला.स्वागत व प्रास्ताविक कोल्हापूर जिल्हा विभागाचे मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष आर.वाय.पाटील यांनी केले.यावेळी जिल्ह्यातील मुख्याध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.ए.आर.पाटील यांनी आभार मानले.

       फोटो 

सेवानिवृत्त  वाय. व्ही. चौगुले यांचा सत्कार करतांना जेष्ठ शिक्षणतज्ञ डी.बी. पाटील व अन्य मान्यवर

गेल कंपनी विरोधात मौ.वडगांव ग्रामस्थांची तक्रार

हेरले / वार्ताहर

    

       दि. ६ /६/१८

  गेल इंडिया कंपनीस पाईप उचलण्यासाठी विरोध व ग्रामसभेच्या ठरावाचे उल्लंघन करून कंपनीस बेकायदेशीररित्या पाईप उचलण्याचे पत्र देणाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी दाखल होऊन त्यांना अपात्र ठरवावे असे लेखी निवेदन विरोधी पक्षनेते अविनाश पाटील यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांना दिले आहे.

      लेखी निवेदनातील आशय असा की, सन २०११ साली ग्रामपंचायत मौजे वडगांवकडे गेल इंडिया लि. कंपनीने दाभोळ बेंगलोर गॅस पाईप लाईनच्या आय.पी. स्टेशन संदर्भात जागा मागणी केली होती. सदर अनुषंगाने गावकऱ्यांशी चर्चा करून मौजे वडगांव मधील गावसभा दि. १३ ऑगस्ट२०११ ठराव क्र. ४९ ( ३ ) ने गावातून आय.पी. स्टेशनकडे जाणारा पाणंद रस्ता खडीकरण / डांबरीकरण करून देणे, प्राथमिक शाळा आवारकंपौंड करून देणे,   ग्रामपंचायत कार्यालयाचा दुसरा मजला बांधून देणे, या निकषाने सदर गेल इंडिया कंपनीला ६५ आर जमिन दिलेली आहे.

        सदर जमिन दिले नंतर २o११पासून गेल कंपनीने पोकळ आश्वासन देऊन मागील ग्रामपंचायत कमिटीसह आज अखेर पोकळ आश्वासने दिली आहेत. कंपनीस दिले गट क्र. ५१२ क्षेत्र सोडून ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात शिल्ल्क राहिलेल्या पाईपा ठेवल्या आहेत. सदर कंपनीचे काम संपले नंतर शिल्लक राहिलेल्या गॅस पाईप कंपनीकडून बेंगलोरला नेणेसाठी कंपनीची धडपड चालू आहे.परंतू सर्व गावकऱ्यांनी व ग्रामपंचायतीच्या बहुसंख्य सदस्यांचा सदर पाईप हालविणेस विरोथ दर्शविला असून कोणत्याही परिस्थितीत पाणंद रस्ता व इतर मागण्याची पुर्तता होत नाही किंवा त्यासंदर्भात प्रशासकिय ठोस कागद हातात येत नाही तोपर्यंत सदर पाईप न हालवू देण्याचा निर्णय करण्यात आला.

   परंतू गेल इंडिया कंपनीस पाईप उचलण्यास हरकत नसल्याचे पत्र सरपंच, उपसरपंच ग्रामपंचायत मौजे वडगांव यांनी दिले आहे.दिलेले पत्र हे ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामविकास अधिकारी यांना विश्वासात न घेता परस्पर दिले असून सदर पत्र हे बेकायदेशीर आहे. तरी ग्रामस्थ व लोकप्रतिनिधी यांच्या भावनेचा विचार करून ग्रामस्थांच्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय पाईप उचलण्यास विरोध आहे. सदर पत्र हे ग्रामपंचायत गावसभा दि. ८ मे२o१७ रोजीच्या ग्रामसभेचे उल्लंघन करून दिले आहे. तरी त्यांच्यावर फौजदारी दाखल करून त्यांची चौकशी करून त्यांना अपात्र कराव अशी मागणी सीईओ यांच्याकडे केली आहे.  या लेखी निवेदनावर विरोधी पक्षनेते अविनाश पाटील, ग्रा.पं. सदस्या सुनिता मगदूम, माधुरी सावंत, सरिता यादव, मायावती तराळ यांच्यासह ५८ शेतकरी व ग्रामस्थांच्या सह्या आहेत. निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख, तहसिलदार हातकणंगले, सपोनि एमआयडिसी पोलीस ठाणे, ग्रामपंचायत मौजे वडगांव, व्यवस्थापक गेल इंडिया कंपनी लि.

        फोटो 

गेल कंपनी विरोधात मौजे वडगांव ग्रामपंचायतीचे विरोधी पक्षनेते अविनाश पाटील व ग्रा.पं. सदस्यासह शेतकरी व ग्रामस्थ लेखी निवेदन सीईओ डॉ. कुणाल खेमणार यांना देतांना.

ग्रामपंचायत कामगार संघ कोल्हापूर शाखा हातकणंगले तालूका कर्मचारी यांच्या वतीने प्रलंबीत मागण्या बाबत निवेदन आणि आंदोलन इशारा

हेरले / प्रतिनिधी दि. ११/६/१८


    ग्रामपंचायत कामगार संघ कोल्हापूर शाखा हातकणंगले तालूका कर्मचारी यांच्या वतीने प्रलंबीत मागण्या बाबत गटविकास अधिकारी अरविंद धरणगुत्तीकर  व पंचायत समिती हातकणंगले  यांना विविध मागण्यासंदर्भात लेखी निवेदन देण्यात आले.

       लेखी निवेदनातील आशय असा की, सर्व कर्मचाऱ्यांना किमान वेतन मिळावे, सुधारीत राहणिमान भत्ता रुपये २८०० प्रमाणे लागू करावा, ग्रा.पं.कर्मचाऱ्यांना दि ०७  तारखेपर्यंत पगार मिळावा,प्रा.फंड व सेवा पुस्तके अघ्यावत करणे कामी कॅम्प लावावा, ग्रा.पं.कर्मचाऱ्यांना जनरल विमा ग्रा. पं. मार्फत उतरवणेत यावा,३५ टक्के रक्कम पगारपोटी ग्रा. पं.खातेवर शिल्लक ठेवावी, ग्रा. पं. कर्मचारी यांना जि. पं. चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांप्रमाणे रजा व सुटया मिळाव्या,गटविकास अधिकारि यांचे सहिने ग्रा. पं.कर्मचारी यांना ओळखपत्र देणेत यावे,सर्व कर्मचारी यांची ऑनलाईन पेमेंट माहिती भरणे व त्यामधील तृटी दूर करणे,१० टक्के प्रस्ताव देणे, ग्रा. पं.कर्मचारी यांना दोन जोड़ी कपड़े व स्वच्छ्ता कामगार यांना हॅण्ड क्लोज व बूट देणे, जे कोणी ग्रा.पं. कर्मचारी सेवा निवृत्व झाले असतील त्यांना प्रा. फंड देणे, ग्रॅज्युवेटी देणे, व सन २००७ पासून विशेष महगाई भत्ता लागू केला नसेल तर तो फरकासहित देणे .

   वरील सर्व मागण्याची पुर्तता तात्काळ करनेत यावी अन्यथा तीव्र आंदोलन करनेत येईल असा इशारा लेखी निवेदनाद्वारे हातकणंगले तालूका ग्रामपंचायत संघ यांनी दिला आहे. 

     यावेळी जिल्हा सचिव कॉ बबन पाटील ,केरबा डोबांळे,कृष्णा कुंभार, रणजीत खाबडे, संजय खाबडे, मारुती कोळी, तानाजी कांबळे, प्रदीप हिरवे आदी पदाधिकारीसह तालूक्यातील कर्मचारी मोठया संख्येंनी उपस्थित होते.

      फोटो 

हातकणंगले गटविकास अधिकारी अरविंद धरणगुत्तीकर यांना लेखी निवेदन देतांना हातकणंगले ग्रामपंचायत  संघ पदाधिकारी.

Saturday, 9 June 2018

शाळापुर्व तयारीसाठी पदाधिकार्‍यांची धडपड.


  माजगाव वार्ताहर:—

पोर्ले तर्फ ठाणे येथील जिल्हा परीषदेच्या कुमार व कन्या शाळेंचा सुरु होणार्‍या सन २०१८/२०१९या शैक्षणिक वर्षासाठी कोणत्या योजना व कोणते उपक्रम राबवायचे यासाठी आढावा बैठक घेणेत आली.या बैठकीच्या अध्यक्षस्थानी सरपंच आदरणीय श्री.प्रकाश रामराव जाधव हे होते. 

सुरवातीला सर्व शिक्षकांचे गुलाब पुष्प देवुन स्वागत करणेत आले.शाळेच्या सद्य स्तिथीवर चर्चा करणेत आली व भविष्यात आणखी शैक्षणीक दर्जा वाढवण्यासाठी काय करता येईल याबद्दलच्या प्रत्येक मुद्यावर सविस्तर चर्चा करणेत आली. 

बैठकीला कुमार विद्या मंदीर पोर्ले चे शाळा व्यवस्थापण समितीचे अध्यक्ष श्री.संभाजी बापू खवरे व कन्या विद्या मंदीर पोर्ले चे शाळा व्यवस्थापण समितीचे अध्यक्ष श्री.रामराव चेचर साहेब यांनी मार्गदर्शन केले.तसेच प्राथमिक शिक्षक समिती.पन्हाळा चे अध्यक्ष श्री.गणपती मांडवकर यांनी मार्गदर्शन केले.

या आढावा बैठकतून जिल्हा परीषदेच्या शाळाबद्दल पदाधिकार्‍यांच्या मनामध्ये असलेली तळमळ दिसून आली.

बैठकीसाठी दोन्ही शाळेचे शिक्षक श्री.सी.डी.सावंत सर,श्री.गवळी सर,श्री.गुरव सर,श्री.गणपती मांडवकर सर,श्री.हिंदुराव काशीद सर,श्री.चौगले सर,श्री.प्रकाश पोवार सर,श्री.नामदेव पोवार सर,श्री.बाजीराव कदम सर,श्री.उबाळे सर,श्री.कांबळे सर उपस्तित होते.आभार श्री.मांडवकर सर यांनी मानले,

Wednesday, 6 June 2018

दिपक शेटे सरांची गणित लॅब - अवघड गणिताला आकर्षक आणि सोपे बनवण्यासाठी योगदान

प्रतिनिधी सतिश लोहार      

  

नागाव ( ता. हातकणंगले ) कोल्हापूर  गणितासारख्या अवघड विषयात विविध युक्त्या वापरून विद्यार्थ्यांना अतिशय सोप्या पद्धतीने गणिताची आवड निर्माण करणारे अवलिया म्हणूनच *श्री दिपक शेटे यांनी आपली ओळख निर्माण केली आहे. सद्या ते आपल्या " गणित लॅब " मुळे चर्चेत आहेत. *


गणितीय वस्तूंचा मोठा संग्रह त्यांनी आपल्या घरी केला आहे. यामध्ये गणिताशी निगडित विविध मोजमापे, दिडशे वर्षाचे पितळी कॅलेंडर, विविध नाणी, दिशादर्शके, द्रव - धातू यांची अती सुक्ष्म मोजमापे, सॅडो घड्याळ, घटिका, अभियांत्रिकी महाविद्यालय फार पुर्वी वापरली जाणारी विविध उपकरणे याचा मोठा साठा त्यांनी गोळा केला आहे. यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यात फिरुन त्यांनी आपला अमूल्य वेळ आणि पैसा खर्च केला आहे. व्यक्तीला विविध छंद असतात. पण गणिताचा छंद जोपासणारे दुर्मिळ आहेत. 


नागाव  ( ता. हातकणंगले ) या ग्रामीण भागात प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी शिक्षण पूर्ण केले. संख्याशास्त्र या विषयात मास्टर ऑफ सायन्सचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. बी. एड. करुन एका खासगी शिक्षण संस्थेत ते गणित आणि विज्ञानचे शिक्षक म्हणून गेली अठरा वर्षे कार्यरत आहेत. हे करत असताना त्यांचे शिक्षणही सुरू आहे. डिप्लोमा इन काॅम्प्यूटर प्रोग्रॅमिंग आणि डिप्लोमा इन स्कूल मॅनेजमेंट करुन आता ते एमए एज्युकेशन करत आहेत. 

गणिताशिवाय एकही दिवस जगणे हे कोणत्याही वयोगटातील व्यक्तीसाठी अशक्य आहे. असे असताना विद्यार्थ्यांना सर्वात अवघड असणारा विषय म्हणजे गणित. असे का ? याचा शोध घेण्याचा प्रयत्न दिपक शेटे यांनी केला. विशेष म्हणजे याचे उत्तरही त्यांना गणितातच मिळाले. विद्यार्थ्यांना विविध गणितीय उपक्रमातून गणिताची गोडी लावली. यासाठी त्यांनी ' किल्ली भुमितीची ' आणि ' जीवनातील गणित ' या स्वलीखित नाटकांवर विद्यार्थ्यांना सादरीकरण करायला लावले. अंकवेल, गणितीय नियम व सूत्रे आणि गणित कोष ही त्यांची गणिता विषयी आवड निर्माण करणारी पुस्तके विद्यार्थ्यांनप्रमाणे पालकांनाही आकर्षित केल्याशिवाय रहात नाहीत. त्यामुळेच दिपक शेटे हे गणित जगतात आणि जगवतात असे म्हटले जाते. गणिताची महाराष्ट्र राज्यात सर्वात मोठी लॅब करण्याचा त्यांचा मानस आहे. विद्यार्थ्यांमध्ये गणिताची आवड निर्माण करण्यासाठी त्यांनी आपले आयुष्य समर्पित केले आहे. हे त्यांना आणि त्यांच्या गणित लॅबला प्रत्यक्ष भेट दिल्यानंतर लक्षात येते. *महाराष्ट्रात जुन्या मापनाची सर्वोत्तम लॅब करण्याचा मानस आहे . लॅब करण्यासाठी माझे कुटुंब व मित्रपरिवार चे सहकार्य लाभले असे आपल्या मनोगतात  श्री दिपक शेटे यांनी व्यक्त केले. 

मौ. वडगांव शिवसेनेच्या शहर प्रमुख सुरेश कांबरे यांचा गेल इंडिया कंपनीच्या विरोधात आंदोलनाचा इशारा

हेरले / प्रतिनिधी दि. ५/६/१८


   गेल इंडिया प्रायव्हेट लिमीटेड कंपनीने ग्रामसभेच्या ठरावा नुसार गाव ते आयपी स्टेशन रस्ता, शाळेचे कंपाऊंड, ग्रामपंचायतचा वरचा मजला आदी कामे केले नंतरच गॅस पाईप उचलणेत यावी. ही कामे कंपनीने न केलेस पाईप उचण्यास शिवसेनेचा तीव्र विरोध असे लेखी निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांना मौजे वडगांव शिवसेना शहर प्रमुख सुरेश कांबरे यांनी दिले आहे.

      लेखी निवेदनातील आशय असा की,मौजे वडगांव ( ता. हातकणंगले) येथे गेल इंडिया कंपनीचे सब स्टेशन असून त्यांना लागणाऱ्या गॅस पाईपचा गट नं. ५१२मध्ये साठा करून ठेवलेला आहे. सदरच्या गॅस पाईप नेणेसाठी गेल इंडिया कंपनीचे अधिकारी व कर्मचारी येऊन क्रेन व कंटेनरच्या साह्याने पाईप नेणेचा प्रयत्न केला होता. परंतू ग्रामपंचायत व गेल इंडिया कंपनीचे अधिकारी यांच्याबरोबर केलेल्या चर्चेमध्ये व दिलेल्या ठरावामध्ये रस्ता व अन्य विकासकामे करणेचे ठरले होते.परंतू गेल्या ८ वर्षात कोणत्याही कामाची ठोस अशी पूर्तता केली नसल्यामुळे गावातील लोक एकत्र येऊन पाईप उचलू न देता कर्मचाऱ्यांना पिटाळून लावले होते.

             तसेच सदरची पाईप न उचलणे बाबत दि. ८ मे२०१७ रोजी ग्रामसभेमध्ये एकमताने ठराव मंजूर केला होता. परंतू ग्रामसभेच्या ठरावाचे गावातील काही स्वयंमघोषीत कारभारी व ठराविक ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी वैयक्तिक लाभा पोटी व ढपला पाडण्याच्या वृत्तीने दि. ८ मे२०१७ . च्या ग्रामसभेच्या ठरावाचे उल्लंघन करून ग्रामपंचायच्या लेटरहेड वरती तसेच ग्रामपंचायतीच्या कोणत्याही प्रोसेडिंग वहीमध्ये व दप्तरी नोंद न करता व काही सदस्यांचा विरोध असतांना वरचे वर दि. २१ मे२o१८ रोजी पाईप नेणस हरकत नसलेबाबतचा दाखला कंपनीला दिला आहे. त्यामुळे सदर दि. ८ मे२o१७च्या ग्रामसभेच्या ठरावाचे उल्लंघन केले असून त्यांचेवर कायदेशीर कारवाई करणेत यावी. सदर पाईप नेणेसाठी येणाऱ्या अधिकारी, कर्मचारी तसेच गावातील नागरिक एकत्र आल्यास वादावादी होऊन उद्रेक होण्याची शक्यता आहे.

      त्यामुळे सदरची पाईप  रस्ता व अन्य व विकासकामे झाले शिवाय उचलणेत येऊ नयेत सदरची गॅस पाईप जबरदस्तीने अथवा बळाचा वापर करून उचलल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. तसे झाल्यास सर्वस्वी जबाबदारी ग्रामपंचायतीची राहील. त्यामुळे सदरची गॅस पाईप रस्ता व अन्य विकासकामे झाले शिवाय प्रशासनाने परवानगी देऊ नये अन्यथा शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन करण्यात येईल. अशी माहिती प्रसिद्धीस शिवसेना शहर प्रमुख सुरेश कांबरे यांनी दिली.

    लेखी निवेदनाच्या प्रती जिल्हा पोलीस प्रमुख , सपोनि एमआयडीसी शिरोली पोलीस ठाणे, व्यवस्थापक गेल इंडिया. प्रा.लि. यांना देण्यात आल्या आहेत.

        फोटो 

मौजे वडगांव शिवसेनेच्या वतीने शहर प्रमुख सुरेश कांबरे गेल इंडिया कंपनीच्या विरोधातील लेखी निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांना देतांना शेजारी शेतकरी.

पंचगंगा नदी बचाव आंदोलन माजी खासदार निवेदीता माने यांचे हेरले येथे उपोषण 


हेरले / प्रतिनिधी  दि. ५/६/१८


पंचगंगा ही आमची जीवन दायिनी होती पण मानवी चुका मुळे आज ती नदी विषकन्या झाली आहे. शासनाने शहरी जनतेच्या आरोग्याबरोबर ग्रामीण भागच्या जनतेच्या आरोग्यबाबत निर्णय घ्यावा शासनाला जाग आणण्यासाठी ग्रामीण जनतेचे आरोग्य जपण्यासाठी पंचगंगा बचाव कृती समितीचे समन्यवक  धैर्यशील माने यांच्या  नेतृत्वाखाली  जनतेने सहभागी व्हावे,   भविष्यात रस्त्यावरची लढाईसाठी सज्ज राहावे असे आवाहन माजी खासदार निवेदीता माने यांनी  केले.हेरले ता हातकणंगले येथे  उपोषण दरम्यान त्या बोलत होत्या.      पंचगंगा नदी बचाव कृती समितीच्या वतीने १ जून पासून सुरु झालेल्या या लढयाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून नदीकाठच्या  गावामधे साखळी उपोषणाद्वारे शासनाला जाग आणण्यासाठी ग्रामस्थ एकवटले जात आहेत.हेरले येथील ग्रामस्थ,सर्वपक्षीय पदाधिकारी यांनी आंदोलनास प्रतिसाद दिला.

     यावेळी माजी जिप सदस्य बबलु मकानदार,रुकडी सरपंच रफीक कलावंत,अमोलदत्त कुलकर्णी ,अमोल मोहीते ,ग्रामपंचायत सदस्या निलोफर इब्राहीम खतीब, रिजवाना पेंढारी ,  ग्राम.सदस्य रणजीत इनामदार,सतीश काशिद,राहुल शेटे,गंगाराम आवळे,सामाजीक कार्यकर्त्या निलोफर अझरुद्दीन खतीब ,शरद निंबाळकर यांनी मनोगत व्यक्त केले.

     साखळी उपोषण प्रसंगी अनिल बागडी,राजु कचरे,विनोद वड्ड ,इब्राहीम खतीब,,राजु चौगले ,अकबर मुजावर ,आप्पासाहेब थोरवत यांचेसह ग्रामस्थ मोठ्याप्रमाणात उपस्थित होते.



    फ़ोटो

 हेरले येथे पंचगंगा प्रदूषणमुक्ति प्रसंगी माजी खासदार निवेदीता माने तसेच साखळी उपोषणास बसलेले ग्रामस्थ व महिला.

‘डॉ. पूनावाला’ स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घेतला दुबर्इ सहलीचा आनंद


पेठ वडगांव : येथील डॉ. सायरस पूनावाला इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी  दुबर्इला भेट देऊन  शैक्षणिक सहलीचा मनमुराद आनंद घेतला. विद्यार्थी वर्गाला आंतरराष्ट्रीय शिक्षणाबरोबर अन्य देशातील, संस्कॄती, दळणवळण,  शिक्षण,  त्यांचे राहणीमान, हवामान, भौगोलिक स्थिती या गोष्टींचा अभ्यास करता यावा या हेतुने आंतरराष्ट्रीय दर्जाची सहल आयोजित करण्यात आली होती. ही सहल 7 दिवसांची होती. या अंतर्गत विद्यार्थी वर्गाने व पालकांनीही या सहलीचा मनसोक्त आनंद घेतला.

सहलीच्या पहील्या दिवशी पेठ वडगांव ते मुंबर्इ व मुंबर्इ ते दुबर्इ असे प्रस्थान करण्यात आले. दुबर्इमधील सर्वात मोठया माॉलला भेट देण्यात आली. त्यामधील खरेदीचा आनंद वियार्थ्यांनी घेतला. मॉलमधील आकर्षक वस्तुंनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. त्यानंतर दुबर्इतील अॅक्वेरेम होमला भेट देण्यात आली  त्यामध्ये ३३,००० हून जास्त प्राणी असलेल्या हया अक्वेरेममध्ये शार्कसह अन्य माशांचाही समावेश होता. त्यानंतर अंडरवॉटर  झू व जगातील सर्वात उंच इमारत बुर्जखलीफा पाहीली. या इमारतीच्या 124 व्या मजल्यावरून संपूर्ण शहरावर एक नजर टाकली असता संपूर्ण शहर विहंगम दिसत होते. या इमारतीच्या असण्याने दुबर्इची एक वेगळीच ओळख झाली आहे.

सहलीच्या दुसया दिवसाची सुरूवात ही दुबर्इ शहरातील मुख्य ठिकाणे, प्रसिद्ध वस्तुसंग्रहालये व गार्डन याने झाली , यानंतर वाळवंट सफारी करण्यात आली. जगातील सर्वात उंच हॉटेल  बुर्ज अल अरबला भेट देण्यात आली ,  तद्नंतर बीच सफारीचा आनंद घेतला. प्रसिद्ध झय्यद रोड जो सात  मुख्य शहरांना / विभागांना जोडला जातो तेथेही भेट देण्यात आली. दुबर्इ संग्रहालयाला भेट देऊन  सर्वात जुनी इमारत कशी असू शकते हे पाहता आले.  वाळवंट सफारीचा वाळूमधील अनुभव विद्यार्थी व पालकांना अनुभवता आला. ऍटलांटीस हॉटेल  जे कॄत्रिमरित्या बनवलेल्या इसलॅन्डचा  एक महत्वाचा भाग पाहून दुबर्इ विकासाचा आलेख अनुभवता आला.

तिसया दिवसाची सुरूवात ही बॉलीवूड पार्क व मोशन गेटला भेट देऊन  झाली. बॉलीवूड पार्कमध्ये अभिनय व्यवस्था, अभिनय स्टंटस, अभिनयाचे विविध प्रकार याची माहीती घेवून प्रत्यक्ष अनुभव ही घेतला. त्यानंतर दुबर्इ मोशन गेटला भेट देण्यात आली. यामध्ये ऍनिमेशन, कोलंबिया पिक्चर्स, लायनगेट या गोष्टीनी सर्वांना आकर्षित केले. एकंदरीत या स्थळांना  भेटी देताना मनातील आनंद व्दिगुणीत होत होता. सहलीच्या चौथ्या दिवशी बुर्जखलिफाला भेट दिली.  दुबर्इ मॉलला भेट देवून औद्योगिक स्थानांचीही माहीती घेतली तदनंतर ढोह कुइस या ठिकाणी जावून मनमुराद आनंद लुटला. पाचव्या दिवशी अबूधाबीला भेट देण्यात आली व तदनंतर तेथील परिसर पाहून डोळ्याचे खरोखर पारणे फिटले. दुबर्इतील या शैक्षणिक सहलीमुळे वियार्थ्यांच्या ज्ञानात आधिक भर पडली. आंतरराष्ट्रीय शैक्षणिक सहलीने एक वेगळाच अनुभव मिळाला  असे अभिप्राय विद्यार्थी व पालकांनी व्यक्त केले.

या सहलीसाठी 26 विद्यार्थी व पालक गेले होते.  या आंतरराष्ट्रीय सहलीच्या उपक्रमासाठी संस्था अध्यक्ष श्री गुलाबराव पोळ  संस्था उपाध्यक्षा श्रीमती विजयादेवी यादव यांचे प्रोत्साहन तर स्कूलच्या अध्यक्षा व संस्था सचिव सौ. विद्या पोळ संचालक डॉ. सरदार जाधव व प्राचार्या सौ. स्नेहल नार्वेकर यांची प्रेरणा मिळाली.

Friday, 1 June 2018

रत्नागिरी महामार्ग शेतजमिनीची मोजणी हेरले व मौ.वडगांव शेतकऱ्यांनी बंद पाडली

हातकणंगले/ प्रतिनिधी

                     


सलीम खतीब


   रत्नागिरी-सांगोला महामार्गाच्या सर्वेक्षणाच्या कामातंर्गत शेतजमिनीची मोजणीचे काम हेरले व मौजे वडगांव शेतकऱ्यांनी बंद पाडले. 

    यावेळी ग्रामपंचायतीमध्ये माजी सभापती राजेश पाटील व शेतकरी मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. 30 मे रोजी भूमी संपादन अधिग्रहनसाठी अधिकारी शेतजमिन मोजणीसाठी लव्याजम्यासह आले होते. त्यांना लोकशाहीच्या मार्गाने या मोजणीला विरोध करत,शेतकऱ्यांच्या भावना शासनापर्यंत कळाव्यात म्हणून,या मार्गाला शेतकऱ्यांच्या विरोध असल्याचे निवेदन भूमिअभिलेख अधिकारी अमोल क्षीरसागर व  भारतीय राष्ट्रीय राज्य महामार्ग  कोल्हापूर प्राधिकरण अधिकारी आर. डी .काटकर यांना माजी सभापती राजेश पाटील उपसरपंच विजय भोसले ,व  मौजे वडगांव सरपंच काशिनाथ कांबळे, अॅड. विजय चौगुले, रावसाहेब चौगुले  शेतकऱ्यांच्या वतीने देण्यात आले.

    यावेळी राजेश पाटील म्हणाले, नागाव टोप पासून राष्ट्रीय महामार्ग क्र ४ हा अवघ्या काही किलोमीटर च्या अंतरावर असून या ठिकाणी चोकाक जवळ हा महामार्ग जोडला जाणार आहे.तेथून शिरोली सांगली फाटा हे अंतर थोड्या प्रमाणात असून महामार्गाच्या माध्यमातून राज्य शासन जाणीव पूर्वक शेतकऱ्यांच्या पोटावर  पाय आणण्याचे प्रयत्न करत आहे.म्हणून या मार्गाला तीव्र विरोध असल्याचे संघितले.कोणत्याही परिस्थित हा महामार्ग होऊ देणार नाही यासाठी शासनाने याचा गाभीर्याने विचार करावा अन्यथा उग्र आंदोलन छेडण्याचा ईशारा  दिला.

 हेरले येथील गटनंबर१५७७क,१५५९,१५६०,१५६४,१५६३,१८६२,१८६३,१८६१,१८६०,१८६७,१८७१,१८७२,१८७०,१८६८,१८६९,३९३,३९४,३९९,४००,३९०,४०१,५९,६३,६६,६७,६९,७३,७४,७२ व ७१ या गट नंबर   मधील शेती प्रस्थापित असल्याचे समजते.अल्प भूधारक शेतकरी या शेतीवर अवलंबून आहे.त्यामुळे येथील  शेतकऱ्यांचे चरितार्थ ह्या शेतीवर अवलंबून आहे.ही शेती ह्या महामार्गा मध्ये अधिग्रहण करण्यात आली तर  येथील   शेतकऱ्यांचे  उदरनिर्वाहचे साधन नष्ट होणार आहे. त्यामुळे शेतकरी आणि त्यांचे कुटुंब उघड़यावर पडण्याची भीती  निर्माण होत आहे. 

    मौजे वडगावमधील गट नंबर २२ मधील ८५७ गुंठ्यांची बागायती शेतीची मोजणीची नोटीस २६ मे रोजी १०० शेतकऱ्यांना तात्काळ देऊन २८ मे रोजी रूकडीचे भूमिअभिलेख अधिकारी सोनबा निगडे सहकाऱ्यासह मोजणीस आले होते. तेंव्हा अॅड. विजय चौगुले, रावसाहेब चौगुले, अविनाश पाटील, स्वप्नील चौगुले, बाजीराव थोरवत यांनी सर्व शेतकऱ्यां सोबत या मोजणीस विरोध केला. या महामार्गामध्ये ४० विहीर, ६० कुपनलिका जातात. तसेच तोकडीच जमिनीमुळे काही शेतकरी भुमिहीन होऊन अनेक शेतकऱ्यांची उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होणार असून जिने मुश्किल होणार आहे. जिरायती शेतीमध्ये कर्जे काढून पाणी पुरवठा माध्यमातून शेती ओलीताखाली आल्याने या प्रकल्पातील बहुतांश बागायती शेती झाली आहे. या प्रकल्पामुळे शेतकरी वर्ग भिकेकंगाल होणार आहे.असे लेखी निवेदन संबधित अधिकाऱ्यांना देऊन या महामार्गास कायमचा विरोध दर्शविला. या वेळी शेतकरी वर्ग मोठ्या संख्येनी उपस्थित होता.

   निवेदनाच्या प्रती माहितीसाठी, जिल्हाअधिकारी,उपजिल्हाअधिकारी(भूसंपदान)क्र ६कोल्हापुर,  उपमहाप्रबंंधक तथा प्रकल्प निर्देशक परियोजना कार्यालय इकाई भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कोल्हापूर, उपविभगिय अधिकारी इचलकरंजी विभाग, तहसीलदार हातकणंगले,तालुका कृषि अधिकारी हातकणंगले, वन क्षेत्रपाल  हातकणंगले, उपअ भियंता सार्वजनिक बांधकाम विभाग हातकणंगले,गाव कामगार तलाठी,  यांच्याकडे पाठिविल्या आहेत.

    यावेळी  माजी सभापती राजेश पाटील,माजी उपसरपंच संदीप चौगुले,उपसरपंच विजय भोसले,  पोपट चौगुले,सुभाष चौगुले ,अशोक चौगुले,सुनील पाटील,राजगोंड पाटील, दादासो चौगुले,माणिक लाड, प्रकाश चौगुले,नितिन पाटील, संतोष खोत,गुंडु परमाज,प्रमोद माने, सतीश काशिद व शेतकरी उपस्थित होते.

                    चौकट


रत्नागिरी सांगोला राज्य महामार्गा मध्ये अल्प भूधारक शेतकऱ्यांच्या जमीनी जात असल्यामुळे त्यांच्या रोजी रोटी चा प्रश्न निर्माण झाला असून जर शासनाने जबरदस्ती करत बळ जबरीने या जमीनी शेतकऱ्यांच्या पासून हीरावुन घेण्याचा प्रयत्न केल्यास गोफन आणि लगोरी घेऊन आंदोलनात सहभगी होतील असा गर्भित ईशारा  शेतकऱ्यांनी दिला.

       फ़ोटो 

हेरले गावचे शेतकरी व माजी सभापती राजेश पाटील लेखी निवेदन भूमिअभिलेख अधिकारी अमोल क्षीरसागर व  भारतीय राष्ट्रीय राज्य महामार्ग  कोल्हापूर प्राधिकरण अधिकारी आर डी काटकर यांना देताना शेजारी अन्य शेतकरी

बँडमिंटन पट्टू प्रेरणा आळवेकर हिची आशियाई बँडमिंटन स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड 

हातकणंगले/ प्रतिनिधी दि. १/६/१८

        सलीम खतीब

   बँडमिंटन पट्टू प्रेरणा शिवाजी आळवेकर हिची आशियाई बँडमिंटन स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे.

   बालेवाडी पुणे येथे झालेल्या आशियाई बँडमिंटन स्पर्धेसाठी घेण्यात आलेल्या निवड चाचणी स्पर्धेत पार्वती हायस्कुल वडगणेची बँडमिंटन खेळाडू प्रेरणा शिवाजी आळवेकर हिची आशियाई बँडमिंटन स्पर्धेसाठी अंडर एटीन इंटर स्कुल भारतीय संघात निवड झाली.यापुर्वी तिने इंटरनॅशनल स्कुल बँडमिंटन स्पर्धेत भारतीय संघातून खेळताना चौथा क्रमांक मिळवला होता.ती सध्या दहावी मध्ये शिकत आहे.तिला प्रशिक्षक तिमिर आरवारे सांगली,केदार नाडगोंडे,तन्मय करमरकर,अक्षय मनवाडकर,महेश जाधव,अनिल जाधव या प्रशिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

   पालकमंत्री नाम. चंद्रकांतदादा पाटील यांच्या बहुमोल आर्थिक सहकार्याने प्रेरणाने यश मिळवले आहे.आजपर्यंत प्रेरणाने आपली बहीण ऋचा आळवेकर व श्रुती साखळकर यांच्यासमवेत महाराष्ट्र संघातून खेळताना सुवर्णपदक मिळवले आहे.तसेच प्रेरणाने वैयक्तिक कास्यपदक मिळवले आहे.इंटर स्कुल स्पर्धेत उत्कृष्ट यश संपादन केले आहे.भारतीय मुलींमध्ये तिची रँक पाचवी आहे.आज ती उदयोन्मुख खेळाडूसाठी नावाप्रमाणेच प्रेरणा ठरली आहे.तसेच कोल्हापूरची खेळाडू दाक्षायणी पाटील हिने अंडर टेन मध्ये बँडमिंटन स्पर्धेत आंतरजिल्हा अकरा जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे.

   आज प्रेरणा व ऋचा या आळवेकर भगिनींची प्रेरणा घेऊन आज कोल्हापूरमध्ये दाक्षायणी पाटील,तन्मय कोरगांवकर,भार्गव कारीकर,आर्यन पंडीत,आर्यन चौगुले,करणसिंह पाटील,विराज थोरात,अक्षय शेळके तसेच श्रुती साखळकर,समृद्धी पोवार इ.खेळाडू कसून सराव करत आहेत.बँडमिंटन असोशियन कोल्हापूरचे पदाधिकारी यांचे मार्गदर्शन लाभले.