पटटण कोडोली :- (शिरीष आवटे) पट्टणकोडोली ता. हातकणंगले येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.
संपूर्ण देश कोरोना या विषाणूच्या विरोधात लढत आहे़ कोरोनाग्रस्त रुग्णांना रक्ताची कमतरता भासू नये यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शाहु महाराज कला व क्रीडा मंडळ पटटण कोडोली यांच्या वतीने आंबेडकर भवन पटटण कोडोली या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते़. 85 जणांनी रक्तदान करीत शिबिरात सहभाग नोंदविला़.यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
शिबीरास संजीवन रक्तपेढी कोल्हापुर यांचे सहकार्य लाभले़.रक्तदान करण्यासाठी या ठिकाणी आलेल्या तरुणांच्या आरोग्याची विशेष काळजी शिबिरात घेण्यात आली़ शिबिरात वारंवार सॅनीटायझर याचा वापर करुन उपस्थितांचे हात निर्जंतूनीकिरण केले जात होते़ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित अंतर आणि स्वच्छता बाळगत 85 रक्तदात्यांनी रक्तदान केले . मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वआरोग्यमंत्री यांनी अलीकडेच रक्तदान शिबिरांची आवश्यकता बोलून दाखविली होती. राज्यात रक्ताचा तुटवडा होण्याची शक्यता असल्याने रक्तदानाचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले होते. त्याला प्रतिसाद देत पट्टणकोडोली येथील अनोख्या रक्तदान शिबिराचे आयोजन केले
.त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंसिंगबाबतही विशेष काळजी घेतली जात होती. दोन रक्तदात्यांमध्ये सुरक्षित अंतर ठेवण्यात येत होते शिवाय, स्वच्छतेची विशेष खबरदारी घेतली जात असल्याचे शाहूमहाराज कला क्रिडा मंडळाच्या वतीने अध्यक्ष यांनी सांगितले.शिबीर राबवण्यासाठी मंडळातील सभासदांनी विशेष परिश्रम घेतले.