पट्टणकोडोली :- शिरीष आवटे पट्टणकोडोली तालुका हातकणंगले येथील श्री विठ्ठल बीरदेव देवस्थान यांचे मार्फत को रो ना (covid 19) मा. मुख्यमंत्री सहाय्यता निधी ला एक लाख पंचवीस हजाराची मदत करण्यात आली आहे.
सध्या कोरोना या महाभयंकर संसर्गजन्य व्हायरस ने जगाला वेढलेले आहे समाजातील विविध घटक, खेळाडू, उद्योजक हे आपापल्या परीने मदतीसाठी पुढे येत आहेत त्यामुळे विठ्ठल-बिरदेव देवस्थान पट्टणकोडोली यांनी ही देश हित डोळ्यासमोर ठेवून सहाय्यता करण्याचे ठरवले.व
korona या संसर्गजन्य आजार समुळ नष्ट करण्यासाठी आपल्या सरकारला मदत म्हणून आपण ही खारीचा वाटा उचलावा या हेतूने ₹ १२५००० (एक लाख पंचवीस हजार रुपये) इतकी रक्कम लोकनियुक्त सरपंच सौ. विजया अरुण जाधव व ग्रामविकास अधिकारी यांचेकडे सुपूर्द केली.यासाठी तलाठी महेश नागरगोजे व हुपरी पोलिस स्टेशन चे API राजेंद्र म्हस्के यांचे सहकार्य लाभले. यावेळी समस्त पुजारी धनगर समाज, श्री विठ्ठल बीरदेव देवस्थान मानकरी, पुजारी, ग्रामस्थ ग्रामपंचायत पदाधिकारी हे उपस्थित होते.