सैनिक टाकळीत नवा आदर्श
.....
नो पी.एम.केअर,नो सी.एम.केअर,सैनिक टाकळी टेक केअर
सध्या संपूर्ण जगभरात कोरोनाचा प्रार्दुभाव होत आहे.आपला देश,आपले राज्य आणि आपले गाव बऱ्यापैकी सुरक्षित राहिले ते लॉक डाऊनमुळे.
रोगाची कारणे आणि उपाय लक्षात घेवून सगळ्यांना घरात बसावे लागले आहे. सण,समारंभ रद्द करून शासनाला मदत केली जात आहे.आपण पी.एम.केअर,सी.एम. केअर ला मदत दिली जात असल्याचे ऐकले असेल.पण, सैनिक टाकळी येथील इ.३ री मध्ये शिकणाऱ्या चिमुरडीने चक्क गावच्या केअर फंडासाठी रक्कम दिली आहे.
सैनिक टाकळी येथील माजी सैनिक व प्रसिद्ध वैद्य आनंदराव पाटील यांची नात कु.गायत्री अमर पाटील हिचा वाढ दिवस आजपर्यंत मोठया उत्साहात साजरा होत आलाय. पण यंदा वाढदिवस रद्द केला आणि येणारा खर्च ग्राम पंचायतीच्या स्वच्छता कर्मचाऱ्याच्या पगारासाठी दिला.
सैनिक टाकळीमधील ग्रामस्थांच्या सुरक्षेसाठी कु.गायत्रीचे वडील अमर पाटील स्वतः ग्रामस्थांचे प्रबोधन करत आहेत तर आई सौ.राजश्री या सैनिक टाकळी प्राथमिक आरोग्य केंद्रात आशा म्हणून काम करत घरोघरी महिलांच्या आरोग्याची विचारपूस करत फिरत आहेत.
सध्या या कुटुंबाच्या सेवेबरोबरच कु.गायत्रीने दिलेल्या योगदानाचे कौतूक होत आहे.