उदगीर प्रतिनिधी - गणेश मुंडे
कोरोना विषय जाणीव जागृती व्हावी व लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा परिषद च्या वतीने करडखेल ता उदगीर येथे मीच माझा रक्षक अभियान शुभारंभ जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी गटविकास अधिकारीअंकुश चौहान, शहाजी पाटील तळेगावकर, उपसभापती रामदास बेंबडे,कानुरे संवादतज्ञ उध्दव फड,पी एन ग्रामसेवक,सरपंच दयानंद कसबे, वसंत पाटील,पोलीस पाटील एकनाथ कसबे करडखेल,नरवटे सर सहशिक्षक डी एस बुरले.यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना अध्यक्ष राहुल केंद्रे म्हणाले की कोराना हे देशावर आलेले संकट असुन याचा सामना करण्यासाठी जिल्ह्यातील शासन,प्रशासन व लोकप्रतिनिधी डॉक्टर,स्वच्छता कर्मचारी रात्रंदिवस काम करत आहेत त्यांना आपण सहकार्य केले पाहिजे.यात नागरिक म्हणून आपली जबाबदारी महत्त्वाची आहे. पुढील काळात मीच माझा रक्षक असणं आवश्यक आहे.गावात परीसर स्वच्छता,वैयक्तिक स्वच्छता,हात साबणाने स्वच्छ धुने,मास्कचा वापर करणे,सामाजिक अंतर राखून काम केले पाहिजे.असे म्हणाले या प्रसंगी बोलताना मुख्यकार्यकारी अधिकारी संतोष जोशी यांनी सविस्तर मार्गदर्शन केले व इतनी शक्ती हमे दे ना दाता..हे आत्मबल वाढवणारे गीत सादर करुन ऊर्जा देण्याचे काम केले.मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, गटविकास अधिकारी अंकुश चव्हाण यांनी मीच माझा रक्षक अभियाना च्या निमित्ताने करडखेल,गंगापुर,देवर्जन,तोंडार, सोमनाथपुर या गावांना भेटी देऊन नरेगा,आरोग्य विभाग,स्वच्छ भारत मिशन च्या कामाची पाहणी करून मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संवादतज्ञ उध्दव फड तर आभार प्रदर्शन गटविकास अधिकारी अंकुश चव्हाण यांनी कोरोना कविता सादर करुन केले यावेळी मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते.