दोषी विरुध्द कार्यवाहीची मागणी
प्रतिनिधि - आरिफ़ पोपटे
कारंजा तालुक्यातील पोहा येथून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या तुळजापूर येथील धरणात प्राथमिक आरोग्य केंद्रात मिळणा-या कॅल्शियमच्या शेकडो गोळ्यांच्या स्ट्रिप फेकून देण्यात आल्या असून ह्या गोळ्या याठिकाणी कोणी आणून टाकल्या हे समजले नाही .पोहा प्राथमिक केंद्रांतर्गत येणा-या तुळजापूर धरणात अज्ञाताने कॅल्शियमची कमतरता भासत असल्यास वापरल्या जाणाऱ्या व गरोदर महिलांना कॅल्शियमच्या वाढीसाठी उपयुक्त ठरणा-या शेकडो स्ट्रिप फेकून दिल्याने गोरगरीब जनतेला न वाटता हा साठा मुदत संपल्यामुळे धरणात नष्ट करण्याच्या उद्देशाने टाकण्यात आला आहे. एकीकडे गरीबांना मोफत औषधी उपलब्ध व्हावी यासाठी सरकार पाहिजे ते प्रयत्न करत असताना ते लोकांपर्यंत न पोहोचता कशाप्रकारे औषधी गोळ्या रुग्णांना वाटप न करता फेकून देतात याचा हा जिवंत पुरावाच म्हणावा लागेल, याकडे जिल्हा आरोग्य यंत्रणेने लक्ष घालून वेळीच अज्ञाताचा शोध घेवून कार्यवाही करावी अशी मागणी जनतेतून होत आहे.