कंदलगाव ता .१
गेल्या पाच महिन्यापासून वारंवार कल्पना देऊनही संबधीत जि.प. बांधकाम विभागाचे या रस्त्याकडे दुर्लक्ष झाले असून काल झालेल्या पावसामुळे या रस्त्यावरील खड्डे नजरेस येत आहेत .
या रस्त्यावरून एम .आय.डी.सी. व हायवेसाठी जाणाऱ्या प्रवास्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याने चार महिन्यापूर्वी स्थानिक नागरीकांतून रस्त्याची डागडुजी व्हावी . अशी मागणी केली होती त्यावेळी संबधीत विभागाचे शाखा अधिकारी यांनी या रस्त्याचे बजेट मंजूर असून पंधरा दिवसात काम सुरू होईल असे आश्वासन दिले होते .
मात्र या आश्वासनाला तीन महिने पूर्ण झालेत तरी कामाला सुरुवात झाली नसल्याने सध्या या रस्त्यावर खड्डयांची संख्या वाढली असून प्रवाशांची कसरत होत आहे .
याबाबत संबधीत विभागाच्या अधिकाऱ्याकडून रस्त्याचे बजेट मंजूर असल्याचे सांगण्यात आले . मात्र अजून टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली नसून हे काम दिवाळीनंतर सुरू होईल असे सांगण्यात आले .
- एक वर्षापासून खड्डयांचा त्रास ....
आर .के नगर मुख्य चौक ते भारती विद्यापिठ पर्यत हा रस्ता खराब झाला असून रस्त्यावरील खड्डयामुळे प्रवाशांना शारीरीक त्रास होत असून गेल्या वर्षापासून हा त्रास नागरीक , प्रवाशी सहन करीत आहेत .
. गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्ठीत हा रस्ता खराब झाला असून या रस्त्यासाठी स्थानिक नागरीक व प्रवाशांकडून रस्ता डागडूजीसाठी मागणी होऊनही दुर्लक्ष होत आहे .
सचिन मांगलेकर - प्रवाशी
फोटो - आर .के. नगर मुख्य रस्त्यावर पडलेले खड्डे .
( छायाचित्र - प्रकाश पाटील )