Saturday, 31 December 2022

डिस्ट्रिक्ट रिपोर्टर्स वेल्फेअर असोसिएशनचे पुरस्कार जाहीर

 सुधाकर काशीद यांना जीवनगौरव 

डॉ. योगेश जाधव व नाबार्डचे माजी अध्यक्ष यशवंत थोरात यांची प्रमुख उपस्थिती

 कोल्हापूर / प्रतिनिधी

  कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर्स वेल्फेअर असोसिएशनतर्फे देण्यात येणारे विविध पुरस्कार आज जाहीर करण्यात आले. असोसिएशनच्या विशेष बैठकीत या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.  मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशन ही ग्रामीण भागातील विविध माध्यम समूहांच्या प्रतिनिधींची संघटना आहे. पत्रकारितेमध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या पत्रकारांचा या संघटनेमार्फत विविध पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. 
दैनिक पुढारीचे चेअरमन व समूह संपादक डॉ. योगेश जाधव, नाबार्डचे माजी अध्यक्ष यशवंत थोरात व 
प्रा. शिवाजीराव भुकेले यांच्या हस्ते आणि संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले, प्राचार्य डॉ. विराट गिरी व बी. न्यूजचे कार्यकारी संपादक ताज मुलाणी यांच्या प्रमुख उपस्थितीत  हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. 
अतिग्रे ( ता. हातकणंगले ) येथील संजय घोडावत विद्यापीठाच्या सभागृहात रविवारी ( ता. ८ जानेवारी ) सकाळी दहा वाजता या पुरस्कारांचे वितरण होणार असल्याचे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुधाकर निर्मळे यांनी सांगितले. 
    सन २०२१ - २०२२ या वर्षासाठी जाहिर झालेले मुख्य पुरस्कार पुढीलप्रमाणे :  सुधाकर काशीद 
( दै. तरुण भारत ) यांना जीवनगौरव,  प्रा. रवींद्र पाटील ( दै. सकाळ ) यांना जिल्हा उत्कृष्ट पत्रकार, मोहसिन मुल्ला ( दै. पुढारी ) यांना इलेक्ट्रॉनिक मीडिया, दीपक घाटगे ( दै. नवराष्ट्र ) यांना आदर्श आवृत्तीप्रमुख, संतोष बामणे ( दै. पुढारी ) यांना जिल्हा उत्कृष्ट सेवा व तानाजी पाटील ( एस. न्यूज ) यांना जिल्हा उत्कृष्ट छायाचित्रकार / कॅमेरामन पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. 
   उत्कृष्ट तालूका पत्रकार पुरस्कार पुढील प्रमाणे :  
शिरोळ - मनोज शिंदे ( दै. पुढारी ), संतोष तारळे ( दै. लोकनेता ), हातकणंगले - नंदकुमार साळोखे ( दै. तरुण भारत ), शिरीष आवटे ( दै.पुढारी ), आजरा -सचिन चव्हाण ( एसबीएन न्यूज ), भुदरगड - संतोष भोसले ( दै. सकाळ ), गजानन देसाई ( दै. लोकमत ), गडहिंग्लज - रवींद्र हिडदूगी 
( दै. लोकमत ), निपाणी - संभाजी माने ( दै. तरुण भारत ), चंदगड - बाबासाहेब मुल्ला ( सा. न्यूज लाईफ ), शाहूवाडी -  संजय जगताप ( दै. महासत्ता ), पन्हाळा - रवींद्र पाटील ( दै. पुढारी ) व शिवाजी पाटील ( दै. तरुण भारत ), करवीर - विश्वनाथ गोविंद मोरे ( दै. तरुण भारत ), कागल - कृष्णाजी शेटके ( दै. तरुण भारत ) व राजू चव्हाण ( फोटोग्राफर ), राधानगरी - पी. जी. कांबळे ( दै. तरुण भारत ), गगनबावडा - महादेव कांबळे ( स्पिड न्यूज लाईव्ह २४ )असे आहेत. 
यावेळी उपाध्यक्ष अभिजित कुलकर्णी, सचिव सुरेश पाटील, खजानीस नंदकुमार कुलकर्णी, अतूल मंडपे,  रविंद्र पाटील, सतिश पाटील, सुरेश कांबरे आदी उपस्थित होते. 
...................................................................................................

Thursday, 29 December 2022

हेरले (ता हातकणंगले) येथे कौतुक विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

हेरले /प्रतिनिधी

हेरले:-
हेरले (ता हातकणंगले) येथे कौतुक विद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. दीपप्रज्वलन आजी आजोबा व सस्थापक अध्यक्ष विश्वास पवार  व शिंदे सर याचे हस्ते श्रीपळ वाढवून उदघाटन  यांच्या हस्ते करण्यात आले.

      यावेळी कौतुक विद्यालयाचे अध्यक्ष विश्वास पवार  म्हणाले अभ्यासक्रमातील शिक्षण घेत असतानाच विद्यार्थ्यांनी आपल्या अंगभूत सुप्त गुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमांमध्येही सहभाग घेणे आवश्यक आहे.

      कौतुक विद्यालयाच्या प्रत्येक इयतेतील मुलांनी पारंपारीक सांस्कृतिक गीत, चित्रपटातील गीतांवर नृत्ये सादर केली, एकपात्री व नाटीकाही सादर केल्या. अत्यंत उत्साहात नृत्यांची परीपूर्ण तयारीने चिमुरड्यांनी नृत्यांचा अविष्कार सादर केला.

या प्रसंगी संचालक  शिंदे  सुनील भोसले, मुख्याध्यापक ए . एन. पाटील विभाग प्रमुख के. ए. खतीब व शिक्षक शिक्षकेत्तर पालकवर्ग उपस्थित होते.

      फोटो 

हेरले येथील कौतुक विद्यालयाच्या विदयार्थी सांस्कृतिक कार्यक्रमात कला सादर करतांना.

Tuesday, 27 December 2022

माझी शाळा येथील शिक्षकांवर प्राणघातक हल्ला करणा-याना त्वरीत अटक करा - जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ


कोल्हापूर / प्रतिनिधी
दोन दिवसात हल्लेखोरांना अटक झाली नाही तर कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालये बंद ठेवून   जिल्हाधिकारी कार्यालयावर  पालक व शिक्षक यांचा भव्य मोर्चा काढण्यात येईल असा इशारा कोल्हापूर शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष एस. डी लाड यांनी दिला.आज  मुख्याध्यापक संघाच्या विद्याभवन येथे झालेल्या  कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या सभेत 
अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
  स्व. मीरासाहेब मगदूम यांनी स्थापन केलेली माझी शाळा ही अत्यंत उपक्रमशील व विद्यार्थ्यांवर उत्तम संस्कार करणारी असून या शाळेतील संजय सुतार या शिक्षकांवर काल प्राणघातक हल्ला करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याचा कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ तीव्रपणे निषेध करत आहे व हल्लेखोरांना त्वरीत पोलीसांनी अटक करून त्यांच्यावर तातडीने खटले दाखल करावेत अशी मागणी आज झालेल्या कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या सभेत करण्यात आली. 
    माझी शाळा येथील संजय सुतार या शिक्षकांवर झालेला प्राणघातक हल्ला कोल्हापूरच्या शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणारा आहे.असे प्रकार होत राहिल्यास शिक्षकांच्यामध्ये भितीचे वातावरण निर्माण होऊन त्यांचेकडून अध्यापनाचे कार्य व्यवस्थित होणार नाही. म्हणून हल्लेखोरांना त्वरीत पकडून त्यांच्यावर गुन्हे दाखल केल्यास शिक्षण क्षेत्रातील भितीचे वातावरण नष्ट होईल, हल्लेखोरांना अटक करण्याच्या बाबतीत राजकीय हस्तक्षेप होऊ नये, जिल्हा पोलिस प्रमुखांच्या कार्यालयावर विद्यालयातील विद्यार्थी पालकांचा मोर्चा नेण्यात यावा, शाळा महाविद्यालयांच्या सभोवताली उपद्रव करणाऱ्या टोळक्यांचा बंदोबस्त करावा, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना लेखी निवेदन द्यावे, शिक्षकांच्या सुरक्षिततेसाठी शिक्षण विभागाने पावले उचलावीत अशा विविध प्रकारच्या सूचना सभेत शैक्षणिक संघटनांच्या पदाधिका-यांनी केल्या.
    या सभेस शिक्षक नेते दादा लाड, भरत रसाळे, डॉ. डी एस घुगरे, खंडेराव जगदाळे, प्रा. सी. एम. गायकवाड, प्रभाकर हेरवाडे, शिवाजी माळकर, इरफान अन्सारी, सुधाकर निर्मळे, मिलींद बारवडे, काकासाहेब भोकरे,राजेश वरक, संतोष आयरे, सुधाकर सावंत, उमेश देसाई, जगदीश शिर्के, राजेंद्र कोरे,दत्तात्रय जाधव आदीसह विविध शैक्षणिक संघटनेचे पदाधिकारी व माझी शाळेतील संस्थेचे पदाधिकारी व शिक्षकवृंद उपस्थित होते.
      
हल्लेखोरांना त्वरीत अटक करण्यात यावी या विषयी शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीने बुधवार दि. २८ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता  शाहुपुरी पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात येणार आहे. तरी कोल्हापूर शहर व लगतच्या सर्व शाळा महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेत्तर सेवकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले.


     फोटो 

कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या सभेत बोलतांना अध्यक्ष एस डी लाड शिक्षक नेते दादासाहेब लाड व अन्य मान्यवर

Wednesday, 21 December 2022

हेरले (ता. हातकणंगले) येथील ग्रामपंचायत निवडणूकीत तिरंगी लढतीत स्वाभिमानी शेतकरी ग्रामविकास आघाडीचे राहुल शेटे सरपंचपदी विजयी

हेरले /प्रतिनिधी
हेरले (ता. हातकणंगले) येथील ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत तिरंगी लढत होऊन माजी सभापती  राजेश पाटील यांच्या स्वाभिमानी शेतकरी 
ग्रामविकास आघाडीचे सरपंच उमेदवार राहुल महावीर शेटे यांनी राजर्षी छ. शाहु  ग्रामविकास आघाडीचे
महमंदबख्तियार बालेचाँद जमादार यांच्यावर अटीतटीच्या लढतीत १३ मतांनी विजय संपादन केला. 
  या विजयासह स्वाभिमानी शेतकरी 
ग्रामविकास आघाडीचे सरपंचपदासह ६ ग्रामपंचायत सदस्य निवडून आले.
माजी सभापती राजेश पाटील,माजी सभापती डॉ. पद्माराणी पाटील, मुनीर जमादार, प्रा. राजगोंड पाटील, माजी उपसभापती अशोक मुंडे, कपिल भोसले यांनी आघाडीचे नेतृत्व करीत निवडणुक हाताळली.
   माजी सरपंच बालेचाँद जमादार व जवाहर साखर कारखान्याचे संचालक आदगोंडा पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी छ. शाहु  ग्रामविकास आघाडीचे ११ ग्रामपंचायत सदस्य निवडून आले आहेत.
  माजी ग्रामपंचायत सदस्य अमरसिंह वड्ड यांच्या नेतृत्वाखाली युवा लोकजनशक्ती गाव विकास आघाडीचे सरपंच पदाचे उमेदवार स्वतः होते. त्यांनी पॅनेल करून  तिरंगी लढत दिली. मात्र त्यांना स्वतःसह सर्वच सतरा जागांवर अपयश आले. मात्र त्यांनी या आघाडीच्या माध्यमातून गावांमध्ये तिसरा पर्याय आहे हे त्यांनी दाखवून दिले.

            
   सरपंचपदाच्या उमेदवारांना मिळालेली मते
१)अनिल उपाध्ये - ४४७
२) महमंदबख्तियार जमादार - ३२४३
३) अमर वडु - १०३२
४) राहुल शेटे - ३२५६ - विजयी
५) नोटा - ५८
झालेले एकूण मतदान - ८०३६ 

    विजयी उमेदवार
हिरालाल कृष्णा  कुरणे,सुशीला सुभाष परमाज,बानू अस्लम खतीब,मनोज मलगोंडा पाटील,वनिता अशोक खाबडे,रंजना मानसिंग माने,विजय रवींद्र भोसले,गीतांजली सुभाष चौगुले, अर्जुन कृष्णात पाटील, अमीन हिम्मत बारगिर,शुभांगी राहुल चौगुले,राकेश सर्जेराव जाधव,सविता बाळगोंडा पाटील,महमंदबख्तियार बालेचाँद जमादार ,अमित आदगोंडा पाटील,निलोफर इब्राहिम खतीब,उर्मिला प्रकाश कुरणे आदी विजयी झाले.
हेरले गावामध्ये दोन्ही ग्रामविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत आनंदोत्सव साजरा केला.

Tuesday, 20 December 2022

मौजे वडगाव येथील ग्रामपंचायत निवडणुकीत जय शिवराय ग्रामविकास आघाडीचा विजय

हेरले /प्रतिनिधी
मौजे वडगाव येथील ग्रामपंचायत निवडणुकीत जय शिवराय ग्रामविकास आघाडीच्या लोकनियुक्त सरपंच सौ. कस्तुरी अविनाश पाटील यांचेसह आठ सदस्य विजयी झाले व सत्ताधारी संयुक्त ग्रामविकास आघाडी व मौजे वडगाव ग्रामविकास आघाडी यांचा पराभव करून सत्तांतर घडवले.
येथील ग्रामपंचायत निवडणुक सत्ताधारी संयुक्त ग्रामविकास आघाडी, जय शिवराय ग्रामविकास आघाडी व मौजे वडगाव ग्रामविकास आघाडी अशी तिरंगी लढत झाली होती. 
यामध्ये जयशिवराय आघाडीच्या लोकनियुक्त सरपंच पदी सौ. कस्तुरी अविनाश पाटील या ११९ मतांनी विजयी झाल्या.व  आठ सदस्य विजयी झाले. तर सत्ताधारी संयुक्त आघाडीचे तीन सदस्य विजयी झाले.
जय शिवराय आघाडीचे विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे:-
सौ. सुवर्णा श्रीकांत सुतार, स्वप्नील रावसाहेब चौगुले, सौ.  दिपाली दयानंद तराळ, सौ.सविता तानाजी सावंत, सुनिल सर्जेराव खारेपाटणे, सुरेश मनोहर कांबरे, सौ.सुनिता दगडू मोरे, रघुनाथ यशवंत गोरड, 
सत्ताधारी गटाचे नितीन संभाजी घोरपडे, सौ. मधुमती सचिन चौगुले, सौ.अश्विनी संतोष आकीवाटे.
निकाल घोषित होताच विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी जल्लोष केला.

Friday, 16 December 2022

हेरले गावासाठी १५ कोटी रुपयांची विकास कामे पूर्ण.'मी नाही बोलत, माझे काम बोलते - माजी सभापती राजेश पाटील


कोल्हापूर / प्रतिनिधी

हेरले गावामध्ये जिल्हा परीषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पाच वर्षात पंधरा कोटी रुपये पेक्षाही जास्त विकास निधी मंजूर करून विकास कामे पूर्ण केली आहेत. गावाचे रुपडे पालटून शहराचे रूप विकास कामांच्या माध्यमातून गावास प्राप्त झाले आहे. 'हे मी नाही बोलत माझे काम बोलते'. असे प्रतिपादन माजी सभापती राजेश पाटील यांनी केले. ते हेरले ( ता. हातकणंगले ) येथील ग्रामपंचायत समोर आयोजित स्वाभिमानी शेतकरी ग्रामविकास आघाडीच्या ग्रामपंचायत निवडणूकीच्या प्रचारसभे प्रसंगी बोलत होते.
    माजी सभापती राजेश पाटील पुढे म्हणाले,प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी ७ कोटी ५० लाख , गाव तलाव सुशोभिकरणासाठी १ कोटी ८० लाख रुपयांचा निधी,  वाढीव नळ पाणी पुरवठा योजनेसाठी २ कोटी रुपयांचा निधी
आदी विकास कामांचा निधी मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे. कन्या शाळेची ७ खोल्यांची ५० लाखाची इमारत पूर्णत्वास येत आहे. या विकास निधीसह  अन्य  विविध  विकास कामाची ध्येय पूर्ती साध्य करायची आहे. ग्रामपंचायत १९२७ साली स्थापन झाली. स्थापनेपासून माझ्या पाटील घराण्यातील माझे पणजोबा, आजोबा , वडील यांनी  सरपंच पदाच्या माध्यमातून गावाचा विकास केला आहे. त्यांचीच परंपरा आम्ही जपून गेली पंधरा वर्षे गावाचा विकास करीत आहोत. या निवडणूकीत जनतेने आम्हास लोकनियुक्त सरपंच पदासह १७ ग्रामपंचायत सदस्य उमेदवारांना निवडून देऊन सत्ता द्यावी. २०२२ ते २०२७ पर्यंत पाच वर्षात विकास कामाचा डोंगर रचून ग्रामपंचायतीचे शतक महोत्सवी वर्ष साजरे करूया असे आवाहन माजी सभापती राजेश पाटील यांनी हेरले गावातील मतदार बंधू भगिनींना केले. ते हेरले ( ता. हातकणंगले ) येथील ग्रामपंचायत समोर आयोजित स्वाभिमानी शेतकरी ग्रामविकास आघाडीच्या ग्रामपंचायत निवडणूकीच्या प्रचारसभे प्रसंगी बोलत होते.
   जिल्हा परिषद महिला व बालकल्याण समितीच्या माजी सभापती डॉ. पद्माराणी पाटील म्हणाल्या, माजी सभापती राजेश पाटील यांनी गेल्या पंधरा वर्षामध्ये ग्रामपंचायत इमारत,अंतर्गत रस्ते, गटर्स, नळपाणी पुरवठा योजना, नविन बालवाड्या इमारती, घरकुल योजना, ग्रामस्थांसाठी वैयक्तिक लाभार्थ योजना, शाळांच्या इमारती दुरुस्ती, समाज मंदिर दुरुस्ती व रंगरंगोटी,मागास वर्गिय समाजांना कार्यक्रमांसाठी भांडी व इतर वस्तू भेट योजना, आदी सार्वजनिक विकास कामांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी  ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मंजूर करून आणला आणि गावची  विकास कामे पूर्णत्वास आणली. म्हणून ' मी नाही बोलत माझे काम बोलते' हे घोषवाक्य आम्ही सिद्ध करून दाखविले आहे. म्हणून गावची जनता आमच्या आघाडीच्या पाठीशी असल्याने आमच्या आघाडीचा विजय निश्चित असल्याचे स्पष्ट केले.
     या प्रचार सभेमध्ये स्वाभिमानी शेतकरी ग्रामविकास आघाडीचे लोकनियुक्त सरपंच पदाचे उमेदवार राहुल शेटे यांनी ई ग्रामपंचायतीच्या माध्यमातून व नविन आधुनिक विविध तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ग्रामस्थांना सर्व सोयी सुविधा घर बसल्या कशा प्राप्त होतील या कार्याचा संकल्प जाहिर करून विविध विकास कामे करण्याचे बळ देण्यासाठी बहुमोल मतदान करून आघाडीस निवडून देण्याचे आवाहन केले.
     स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे हातकणंगले तालुका सरचिटणीस मुनीर जमादार म्हणाले, पंचायत समितीच्या माध्यमातून गावातील पाणंद रस्त्यांच्या विकासासाठी लाखो रुपयांच्या निधी मंजूर करून आठ पाणंद रस्त्यांचे मुरुमीकरन केल्याने शेतकऱ्यांची वाहतूकीची व्यवस्था झाली आहे. गावातील शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी आपली स्वाभिमानी शेतकरी ग्रामविकास आघाडी कशी प्रयत्नशील आहे ते स्पष्ट केले.
        प्रा. राजगोंड पाटील व माजी उपसभापती अशोक मुंडे यांनी पुढील पाच वर्षात गावांमध्ये माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणाची सोय करून गावातील मुलांना उत्तमोत्तम शिक्षण देण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचा निर्धार केला. या प्रसंगी चेअरमन निलोफर खतीब, वंदना चौगुले,पोपट चौगुले,प्रा. प्रभूदास खाबडे, माजी सरपंच रियाज जमादार, माजी उपसरपंच विजय भोसले, संदीप चौगुले, माजी ग्रामपंचायत सदस्य  मज्जिद लोखंडे, संजय खाबडे, आदींनी विरोधकांचा खरपूस समाचार घेत स्वाभिमानी आघाडीस विजयी करण्याचे आवाहन केले. या वेळी ॲड. राजू पाटील, कपील भोसले, स्वप्नील कोळेकर आदी मान्यवरांसह १७ ग्रामपंचायत सदस्य उमेदवारसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन सुरेश चौगुले यांनी केले.
   फोटो 
हेरले : स्वाभिमानी शेतकरी ग्रामविकास आघाडीच्या प्रचार सभेत बोलतांना माजी सभापती राजेश पाटील शेजारी अन्य मान्यवर.

Thursday, 15 December 2022

खेळातूनच सक्षम विद्यार्थी घडणार आहेत.-- वृक्षप्रेमी सरदार पाटील

 

प्राथमिक शिक्षण समिती महानगरपालिका कोल्हापूर संचलित राजश्री शाहू विद्यामंदिर शाळा क्रमांक 11 कसबा बावडामध्ये आंतरशालेय स्पर्धा घेण्यात आल्या.शाळेचे केंद्रमुख्यध्यापक डॉ अजितकुमार पाटील यांनी स्वागत व प्रास्तविक केले.
 आजच्या स्पर्धेमध्ये लिंबू चमचा, कबड्डी, लंगडी,रिले,9,11,14 वर्षे वयोगटात स्पर्धा घेण्यात आल्याप्राथमिक शिक्षण समितीचे प्रशासनाधिकारी एस के यादव यांच्या प्रेरणेने व शैक्षणिक पर्यवेक्षक उषा सरदेसाई, विजय माळी, बाळासाहेब कांबळे,क्रिडा निरीक्षक सचिन पांडव यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेचे उद्घाटन कसबा बावडा वृक्षप्रेमी ग्रुपचे अध्यक्ष सरदार पाटील ,पोलीस हवालदार कृष्णात पिंगळे ,सामाजिक कार्यकर्ते सचिन चौगले, अध्यक्ष दीपक भोसले,राजू चौगले, राहुल आळवेकर ,सामाजिक कार्यकर्ते संजय लाड ,अनिल सुतार, संतोष गायकवाड, अमृता चौगले, मधुकर पोवार,संजय पोवार यांच्या प्रमुख उपस्थितीत शालेय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन जोरदारपणे झाले.
शालेय स्पर्धेमध्ये गणेश घाटगे यांनी क्रीडा शपथ घेतली 9 11 14 वयोगटातील विद्यार्थ्यांचे प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक तीन क्रमांक विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले ज्येष्ठ शिक्षक उत्तम कुंभार ,सुशील जाधव उत्तम पाटील ,आसमा तांबोळी, तमेजा मुजावर, विद्या पाटील ,बालवाडी मुख्याध्यापिका कल्पना पाटील, मदतनीस सावित्री काळे यांनी सहकार्य केले

 कार्यक्रमासाठी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष रमेश सुतार, अनुराधा गायकवाड ,दिपाली चौगुले, नीलम पाटोळे, वर्षा दाभाडे, इलाई मुजावर इत्यादी शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य उपस्थित होते आभार जान्हवी ताटे ने मांडले

Sunday, 11 December 2022

सद्गुरु निरंजन महाराज आश्रम, मौजे वडगांव यांच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

हेरले /प्रतिनिधी

 सद्गुरु निरंजन महाराज आश्रम, मौजे वडगांव यांच्या वतीने गुरुवार दि. १५ डिसेंबर रोजी श्री सद्गुरु निरंजन महाराज यांच्या २५ वी पुण्यतिथी व शारदामाता जयंती निमित्त आश्रमामध्ये दोन दिवस विविध धार्मिक  कार्यक्रमाचे आयोजन केले आहेत.

   बुधवार, दि. १४ रोजी सकाळी ९:०० ते १२:०० ज्ञानेश्वरी अध्याय १२. पारायण व चिंतन मार्गदर्शक: ह.भ.प. वेदांताचार्य उदयशास्त्री महाराज, गोटखिंडी
 सकाळी १० ते २ मोफत वैद्यकीय शिबीर निदान व मार्गदर्शन (साई कार्डीयाक सेंटर, कोल्हापूर.) रात्री ०८:०० ते ११:०० एकतारी भजन- श्री. दत्तात्रय कुंभार व सहकारी, घालवाड, कोल्हापूर
   गुरुवार, दि. १५ रोजी सुर्योदय ७:०६ वा.'श्री' चे पादुकांना अभिषेक
सकाळी ८:०० ते ९:००नोंदणी व चहापान सकाळी ९:०० ते ११:००: भजन श्री भजनी मंडळ, हेरले ,सकाळी ११:०० ते १२:०० प्रवचन: परमार्थभूषण ह.भ.प. श्री. नारायण एकल,
दुपारी १२:०० ते १२:०५ : श्री सद्गुरु निरंजन महाराज पुण्यतिथी सोहळा  श्री शारदामाता जयंती : फोटोपूजन व पुष्प अर्पण महाराज, जोगेवाडी.
दुपारी १२:०५ ते ०१:००: प्रवचन: ह.भ.प. श्री. मधुकर पाटील महाराज, कावणे, कोल्हापूर
दुपारी १० ते १:१५ आर्शिवचन गुरुवर्य श्री. शामनाथ बत्ते महाराज, इचलकरंजी -
दुपारी १:१५ ते १:३० सत्कार समारंभ स्वामीभक्त श्री नंदुआण्णा माणगांवकर, शिरोळ,दुपारी १:३० ते ३  महाप्रसाद
दुपारी ०३:०० ते ५:०० भजन : श्रीधर महिला भजनी मंडळ, कोल्हापूर.
यांच्या अमृत हस्ते, ५:०० ते ६:०० प्रवचन: ह.भ.प. श्री. अनंत कुंभार महाराज, बुधगाव, सांगली.
६:०२: सुर्यास्त व आरती
या कार्यक्रमास सद्भक्तांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन श्री सद्गुरु निरंजन महाराज चॅरिटेबल ट्रस्ट, मौजे वडगांव 'ट्रस्टच्या वतीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे  केले आहे.

Tuesday, 6 December 2022

मुरगुड विद्यालय ज्युनिअर कॉलेजच्या संघाची जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेसाठी निवड


कोल्हापूर / प्रतिनिधी

कागल येथे संपन्न झालेल्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत खो खो क्रीडा प्रकारात 19 वर्षाखालील मुलींच्या गटात मुरगुड विद्यालय जुनियर कॉलेज मुरगुड च्या खेळाडूंनी विजेतेपद पटकावले या संघाची जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेसाठी निवड झाली आहे. 
     यामध्ये अनुराधा शिंदे, अनुष्का तहसीलदार, अरुणा रेपे, उत्कर्षा पाटील, गायत्री मसवेकर, दिपाली गुरव, मृण्मयी खराडे, विशाखा कांबळे, शर्वरी मगदूम, सरिता लोहार, सरिता कळमकर ,सृष्टी पाटील या खेळाडूंचा समावेश आहे या खेळाडूंना क्रीडाशिक्षक व्ही. आर. गडकरी यांचे मार्गदर्शन तर शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूरचे सचिव प्रा. जयकुमार देसाई अध्यक्ष शिवानीताई देसाई, उपाध्यक्ष शिवाजीराव सावंत, चेअरमन मंजिरी देसाई मोरे, युवा नेते दौलतराव देसाई कोजीमाशीचे जेष्ठ संचालक बाळ डेळेकर  प्राचार्य एस. आर. पाटील, उपप्राचार्य एस. पी. पाटील, उपमुख्याध्यापक एस. बी. सूर्यवंशी, पर्यवेक्षक एस. एच. निर्मळे यांचे प्रोत्साहन लाभले.
 
फोटो...

मुरगुड... मुरगुड विद्यालयाच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झालेल्या संघासमवेत प्राचार्य एस. आर. पाटील उपप्राचार्य एस. पी. पाटील क्रीडा शिक्षक व्ही. आर. गडकरी.

Sunday, 4 December 2022

केंद्रस्तरीय क्रिडा स्पर्धेत केंद्रीय प्राथमिक शाळा हेरलेचे घवघवीत यश


हेरले / प्रतिनिधी
शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी मौजे वड‌गाव (ता. हातकणंगले)येथे घेण्यात आलेल्या केंद्रस्तरिय क्रिडा स्पर्धेत केंद्रिय प्राथमिक शाळा हेरलेच्या वि‌द्यार्थ्यांनी विविध क्रिडा प्रकारात पदकाची लयलूट करीत घवघवीत यश मिळवले. 
  दि. 30 नोव्हेंबर व १ डिसेंबर या कालावधीत झालेल्या  स्पर्धेत  विद्यार्थ्यांनी लहान गट आणि मोठ्या गटात उल्लेखनीय कामगिरी केली. या स्पर्धेत मोठा गट सांघिक स्पर्धा कबड्डीत प्रथम विजेता ठरत तालुकास्तरीय सर्वेक्षण पात्र ठरला. सांघिक खो-खो मोठा गट द्वितीय क्रमांक, मोठा गट लांब उडीत आदर्श कटकोळे याने द्वितीय क्रमांक पटकावला, मोठा गट 200 मी धावणे आर्यन लोहार द्वितीय क्रमांक पटकाविला, कुस्ती   ४५ कि. वजनी गटात प्रवर्तक हाबळे याने प्रथम क्रमांक पटकावत तालुक्याच्या स्पर्धेसाठी पात्र ठरला. तर लहान गटाने सांघिक खो-खो प्रकारात द्वितीय क्रमांक पटकावला.  ५० मी. धावणेमध्ये रुद्र खोत याने प्रथम क्रमांक पटकाविला,१०० मीटर धावणे मध्ये रूद्र खोत याने द्वितीय क्रमांक पटकाविला,२५कि. वजनी गटात कुस्तीत अनुकल्प डोरले याने द्वितीय क्रमांक मिळवला.
 केंद्रशाळा  शाळेत शाळा व्यवस्थापन समिती व पालक, मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित कौतुक कार्यक्रमामध्ये विविध बक्षीसे देऊन या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.
  या स्पर्धेसाठी मुख्याध्यापक  रावसाहेब चोपडे, शिक्षक सय्यद , कोरे ,  प्रेरणा चौगुले, निगार कराडे,  जी. एम लोंढे ,  पूनम चव्हाण  यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले. या यशाबद्दल विद्यार्थी व शिक्षकांचे पालकांमधून कौतुक होत आहे.
      फोटो 
हेरले केंद्रिय प्राथमिक शाळेचे  केंद्रस्तरिय क्रिडा स्पर्धेत घवघवीत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत मुख्याध्यापक रावसाहेब चोपडेसह शिक्षकवृंद