Sunday, 26 March 2023

मौजे वडगाव येथे ग्रामपंचायतींच्या वतीने महिला महोत्सवाचे आयोजन


हेरले /प्रतिनिधी 
पारंपारिक व सांस्कृतिक आठवणीना उजाळा देत विविध कलागुणांचे प्रदर्शन आशा विविध उपक्रमाने मौजे वडगाव (ता. हातकणंगले) येथे ग्रामपंचायत व महिला बचत गटांच्या वतीने महिला महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख पाहूण्या म्हणून जि. प. च्या माजी अध्यक्षा शौमिका महाडिक उपस्थित होत्या. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच कस्तुरी पाटील होत्या.
      कार्यक्रमाचा प्रारंभ मान्यवराच्या हस्ते दिप प्रज्वलन करून करण्यात आला. यावेळी कार्यकमाच्या मार्गदर्शिका  व ग्रामसेविका भारती ढेंगे - पाटील यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे व स्पर्धेचे आयोजन करुण विविध कलागुणांचे महत्व पटवून दिले. यामध्ये देशी गायीची ओटी भरण, महिला रक्तदान शिबिर, नेत्रदान चळवळ, पाककला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, वेशभुषा स्पर्धा, गरोदर माता ओटी भरणी, आशा विविध उपक्रमांनी तसेच स्पर्धेमध्ये माता पालकांनी आपला उस्पूर्त सहभाग नोंदवून प्रतिसाद दिला. त्या नंतर बक्षिस वितरण मान्यवरांच्या व उपस्थितांच्या हस्ते पार पडले. हा कार्यक्रम उत्तम रित्या यशस्वी होणासाठी सरपंच कस्तुरी पाटील , उपसरपंच सुनिल खारेपाटणे , ग्रा.पं. सदस्य सुरेश कांबरे, स्पप्नील चौगुले, रघूनाथ गोरड , सुनिता मोरे, सविता सावंत, सुवर्णा सुतार, दिपाली तराळ , डॉ. पंकज पाटील, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका तसेच महिला बचत गटांचे मोठे सहकार्य मिळाले.

फोटो 
महिला महोत्सव कार्यक्रमात देशी गायीची ओटी भरतांना महिला व मान्यवर.

श्री जयभवानी अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि; पेठवडगांवच्या शाखा हेरलेच्या समिती सदस्य पदावर सलीम खतीब व बाळासाहेब थोरवत यांची निवड

हेरले / प्रतिनिधी

  श्री जयभवानी अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि; पेठवडगांवच्या शाखा 
हेरलेच्या समिती सदस्य  पदावर  सलीम खतीब व बाळासाहेब थोरवत यांची निवड नुकतीच झाली आहे. 
   श्री जयभवानी अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी  हेरले शाखेच्या प्रगतीमध्ये सलीम खतीब व बाळासाहेब थोरवत 
यांचे मोलाचे सहकार्य व सहभाग लाभला आहे.या त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची शाखा समिती सदस्य पदी निवड
संस्थेचे चेअरमन विलासराव सलगर व जनरल मॅनेजंर राजकुमार  पोळ यांनी नुकतीच केली आहे. 
    त्यांच्या निवडीमध्ये हेरले शाखा चेअरमन आप्णासो चौगुले, शाखा समिती सदस्य संभाजी भोसले,आप्पासो चौगुले, शाखा मॅनेजंर जगदीश लोळगे, लिपीक अरविंद दिंडे यांचे सहकार्य लाभले आहे.

प्रवीर सिन्हा यांची सीआयआय पश्चिम क्षेत्राच्या अध्यक्षपदी आणि स्वाती सालगावकर यांची उपाध्यक्षपदी निवड.


हेरले / प्रतिनिधी

कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री ( सीआयआय ) पश्चिम क्षेत्राच्या   अध्यक्षपदी टाटा पॉवर कंपनी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ डॉ. प्रवीर सिन्हा यांची आणि उपाध्यक्षपदी व्ही एम सालगावकर आणि ब्रदर प्रायव्हेट लिमिटेड च्या अध्यक्ष श्रीमती स्वाती सालगावकर यांची निवड करण्यात आली.  सन २०२३ - २४ या वर्षासाठी ही निवड झाली आहे. आज झालेल्या  सीआयआय पश्चिम क्षेत्राच्या बैठकीत या निवडी जाहीर करण्यात आल्या. 
वर्ष २०२३-२४ साठी सीआयआय  पश्चिम क्षेत्रातील भारतीय व्यवसायांसाठीची थीम जागतिकीकरणाचा पुढील टप्पा आहे. लवचिक जागतिक व्यापार आणि गुंतवणुकीसाठी सर्वसमावेशक मूल्य साखळी हे याचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. कार्य, कौशल्य आणि गतिशीलतांचे भविष्य, डिजिटल परिवर्तन आणि  आर्थिक पुनर्प्राप्तीसाठी वित्तपुरवठा, आर्थिक सक्षमीकरणासाठी विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहेत.   तसेच ऊर्जा, हवामान बदल आणि संसाधन कार्यक्षमता, तंत्रज्ञान, नवोपक्रम आणि संशोधन आणि विकास या प्रमुख बाबींवर सीआयआय पश्चिम विभाग कार्य करणार आहे. 
यावेळी  संजीव बजाज  सीआयआय, राष्ट्रीय अध्येक्ष. श्री सुनील चोरडिया सीआयआय  पश्चिम विभागाचे मावळते चेअरमन. श्री मधुर बजाज सीआयआय पश्चिम विभागाचे माझी चेअरमन.श्री प्रवीर सिन्हा सीआयआय पश्चिम विभागाचे चेअरमन. 
श्रीमती स्वाती सालगावकर सीआयआय पश्चिम विभागाचे व्हॉइस चेअर पर्सन.श्री सोहन शिरगावकर चेअरमन दक्षिण महाराष्ट्र झोन. श्री अजय सप्रे व्हॉइस चेअरमन  दक्षिण महाराष्ट्र झोन.श्री रवी डोली  महाराष्ट्र स्टेट कौन्सिल सदस्य
इत्यादी उपस्थित होते.

Monday, 20 March 2023

श्री छत्रपती शिवाजी विकास सेवा संस्था हेरलेच्या पंचवार्षिक निवडणूकीत दुरंगी काटा लढत



   हेरले / प्रतिनिधी
हेरले (ता. हातकणंगले) येथील 
श्री छत्रपती शिवाजी विकास सेवा संस्थेसाठी  १३ जागांसाठी दुरंगी लढत होत आहे.संस्थेसाठी मतदानास पात्र सभासद ६२५ आहेत. या निवडणुकीसाठी २६ मार्च रोजी मतदान होऊन त्याच दिवशी निकाल आहे.
   गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत माजी सभापती राजेश पाटील यांनी  १० जागा जिंकून सत्ता प्रस्थापित केली होती. तर विरोधी जवाहर कारखान्याचे संचालक आदगोंडा पाटील यांच्या गटास ३ जागा मिळाल्या होत्या. 
     माजी सभापती राजेश पाटील यांच्या नेतृत्वाखालील सत्तारुढ श्री छत्रपती शिवाजी महाराज स्वाभिमानी आघाडीचे उमेदवार - राजेश पाटील, उदय चौगुले, कपिल भोसले, कृष्णात खांबे, शशिकांत पाटील, सुनील खोचगे, नितीन चौगुले, संजय पाटील, राजेंद्र कदम, स्वप्नील कोळेकर, अशोक मुंडे, शांतादेवी कोळेकर, सुजाता पाटील आदी उमेदवार आहेत. या आघाडीस शिट्टी हे चिन्ह मिळाले आहे.
      जवाहर कारखान्याचे संचालक आदगोंडा पाटील यांच्या नेतृत्वाखालील छत्रपती शिवाजी स्वाभिमानी विकास आघाडीचे उमेदवार आदगोंडा पाटील, अशोक इंगळे, महावीर चौगुले, अर्जुन पाटील, प्रकाश पाटील, भुजगोंडा पाटील, बाळगोंडा पाटील, कृष्णा हवालदार, गोविंद आवळे, भगवान कोळेकर, रियाज जमादार, संगीता उपाध्ये, सुप्रिया चौगुले आदी उमेदवार आहेत. या आघाडीस कपबशी हे चिन्ह मिळाले आहे.
   दोन्ही आघाड्यांनी अर्ज दाखल केल्यापासूनच प्रचारास सुरुवात केली आहे. यामुळे निवडणूक अतिशय अटीतटीची होणार आहे.ही निवडणूक अटीतटीची काटा लढत होत असल्याने या निवडणुकीत कोण बाजी मारणार, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागून राहिले आहे.

Sunday, 19 March 2023

मनोहर सरगर व सुनील नाईक यांची स्वीकृत संचालक पदी निवड

कोल्हापूर प्रतिनिधी : 

कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेच्या तज्ञ संचालक पदी शिक्षक नेते श्री मनोहर नारायण सरगर यांची तसेच शिक्षक समितीचे श्री सुनील तुकाराम नाईक यांची कार्यकारी संचालक पदी एकमताने निवड झाली यावेळी सभापती उमर जमादार उपसभापती कुलदीप जठार ,मानद चिटणीस सुधाकर सावंत खजानिस संजय पाटील संचालक वसंत आडके, लक्ष्मण पोवार,राजेंद्र गेंजगे,भारती सूर्यवंशी,मनीषा पांचाळ,विलास पिंगळे,विजय माळी,प्रभाकर लोखंडे,नेताजी फराकटे,विजय सुतार,तानाजी पाटील,बाळासाहेब कांबळे,उत्तम कुंभार,मंगेश चव्हाण,आदि सदस्य उपस्थित होते.

हेरले हायस्कूल हेरले च्या माजी विद्यार्थ्यांचा १९ वर्षांनंतर स्नेहमेळावा

हेरले / प्रतिनिधी

शाळा, कॉलजचे दिवस संपले की प्रत्येकजण आपआपल्या करिअरसाठी वेगवेगळ्या क्षेत्राकडे धाव घेतो. मात्र, ज्या शाळेमध्ये, ज्या कॉलेजमध्ये आपण शिकलो, लहानाचे मोठे झालो, वेगवेगळ्या भागातील विद्यार्थ्यांबरोबर आपण मैत्रीचे नाते जोडले, ती नाळ मात्र तशीच असते. सर्वांना एकदा भेटावे, एकमेकांशी हितगुज करावे, असे सर्वांना वाटते. मात्र एकोणीस वर्षांचा मोठा कालखंड लोटल्या नंतर  प्रत्येकजण आपआपल्या नोकरीधंद्यात व्यस्त असल्याने ते सहजासहजी शक्य होत नाही. मात्र, ते अशक्यही नसते हे हेरले हायस्कूल हेरले (ता हातकणंगले) या विद्यालयातून २००३-०४  साली उत्तीर्ण होऊन गेलेल्या विद्यार्थ्यांनी दाखवून दिले . आणि तब्बल एकोणीस वर्षांपूर्वीच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला.

      माजी विद्यार्थ्यांचा अनोखा मेळावा रविवारी अनुशाम मंगल कार्यालय येथे  अभुतपूर्व उत्साहात पार पडला.   यामध्ये इंजिनियर,वकील,उद्योजक,उत्कृष्ठ खेळाडू अशा सर्वच क्षेत्रात कार्यरत आहेत.

यावेळी मार्गदर्शक शिक्षक महादेव डांगे,अंबाजी कोळेकर, महंमद आटपाडे,फत्तेलाल देसाई,गोविंद आवळे,सुनंदा पाटील,मोहिनी करमरकर, बी जे पाटील,बी एस पाटील,बी आर हुजरे,उदय पाटील, या सर्वांचा सत्कार करण्यात आला.

       यावेळी सोमनाथ भोसले,सुरज पाटील,कैलास माने,अझर पटेल,सुशांत पाटील,प्रवीण कोरेगावे, विजय पाटील,दिग्विजय जाधव,अजित मुंडे,रुपेश चौगुले, संताजी खाबडे, कैश जमादार, गणेश धुळे,युवराज कोळेकर,रुपेश चौगुले,दीपक कराळे, चंद्रकांत काशीद,अश्विनी मिरजे,वृषाली गडकरी, अनघा जोशी,ज्योती कोरवी, सुप्रिया आलमान तसेच यावेळी अनेक माजी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.प्रास्तविक विजय पाटील, सुत्रसंचालन सुरज पाटील तर आभार कैलास माने यांनी मानले.


फोटो :


हेरले (ता.हातकणंगले)येथील हेरले हायस्कूल हेरले येथे सन२००३-०४ च्या एस एस सी बॅचच्या माजी विध्यार्थ्यांनी १९ वर्षानंतर एकत्र येत स्नेह मेळावा साजरा करण्यात आला.

Saturday, 18 March 2023

सीआयआय महाराष्ट्र राज्य परिषदेच्या अध्यक्षपदी रॉबीन बॅनर्जी



हेरले / प्रतिनिधी
 सीआयआय ( काॅन्फीड्रेशन आॅफ इंडियन इंडस्ट्रीज ) महाराष्ट्र राज्य परिषदेच्या अध्यक्षपदी कॅप्रीहान्स इंडिया लिमिटेड चे अध्यक्ष रॉबीन बॅनर्जी यांची व उपाध्यक्षपदी दालमीया सिमेंटचे कार्यकारी संचालक हकीमुद्दीन अली यांची निवड करण्यात आली. सीआयआयच्या  महाराष्ट्र राज्य परिषदेत या निवडी जाहीर करण्यात आल्या. महाराष्ट्र राज्य परिषदेने २०२२ - २३ या वर्षासाठी " शाश्वतता, नवोपक्रम आणि तंत्रज्ञानाद्वारे सशक्तीकरण वाढ " ही थीम स्वीकारली आहे. यामध्ये लहान आणि मध्यम उद्योगांना समर्थन देणे.  उत्पादन आणि आयटीसारख्या प्रमुख क्षेत्रांच्या वाढीस प्रोत्साहन देणे. तसेच या क्षेत्रात कार्यरत कामगार आणि कर्मचाऱ्यांची कौशल्ये वाढवण्यासाठी विविध उपक्रमांचा समावेश असेल. महिला नेत्यांचे मार्गदर्शन करण्यासाठी सीआयआय भारतीय महिला नेटवर्क सोबत आणि यंग इंडियन्स सोबत  काम करेल असे मत नूतन अध्यक्ष रॉबीन बॅनर्जी व उपाध्यक्ष हकीमुद्दीन अली यांनी व्यक्त केले. 



.........................................................................................

महिलांनी आर्थिक स्वातंत्र्यावर लक्ष केंद्रीत करावे - प्रा. डॉ. विजय ककडे

हेरले /प्रतिनिधी
महिलांनी आर्थिक स्वातंत्र्यावर लक्ष केंद्रीत करावे असे आवाहन सेबीचे राष्ट्रीय संसाधन सदस्य प्रा. डॉ. विजय ककडे यांनी केले. काॅन्फडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री ( सीआयआय ) आणि इंडियन वूमन नेटवर्क ( आयडब्ल्यूएन ) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आर्थिक साक्षरता या विषयावर ते बोलत होते. 
डॉ. ककडे म्हणाले, आर्थिक बाबतीत पती, मुलगा किंवा वडिलांवर अवलंबून राहण्याचा पूर्वीचा जमाना आता गेला. महिलांनी आर्थिक साक्षर झाले नाही तर भविष्यात कठीण प्रसंगांना त्यांना सामोरे जावे लागेल. आणि अशा अनेक घटनाही घडलेल्या आहेत. स्वत:च्या पैशाच्या बाबतीत जागरुगता हवी. महिलांची सर्वाधिक फसवणुक त्यांच्या जवळच्याच व्यक्तींकडून होते. याची दखल घेऊन योग्य काळजी घेतली पाहिजे. महिलांनी आपल्या आर्थिक स्वातंत्र्याची चिंता केली पाहिजे. आपल्या पतीच्या आर्थिक व्यवहारासोबतच वैयक्तिक आर्थिक व्यवहारांवर महिलांनी लक्ष केंद्रीत करायला हवे असे त्यांनी सांगितले. 
यावेळी महिलांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांना डॉ. ककडे यांनी उत्तरे दिली. महिलांनी पेपर गोल्ड, स्टॉक मार्केट, शेअर बाजार, पैसे गुंतवण्याचे ॲप्स, पैसे गुंतवण्यासंदर्भातील समज आणि गैरसमज याविषयीही प्रश्न डॉ. ककडे यांना प्रश्न  विचारले. आयडब्लूएनच्या निमंत्रक गौरी शिरगांवकर यांनी प्रास्तविक केले. 
सोनाली पटेल यांनी आभार मानले.
................
फोटो
कोल्हापूर : सीआयआय मार्फत आयोजित आर्थिक साक्षरता या विषयावरील व्याख्यानास उपस्थित सेबीचे राष्ट्रीय संसाधन सदस्य प्रा. डॉ. विजय ककडे, शेजारी आयडब्लूएनच्या निमंत्रक गौरी शिरगांवकर, सोनाली पटेल व महिला पदाधिकारी  
......................................................................................

Friday, 17 March 2023

जुनी पेन्शन मंजुर होई पर्यंत बेमुदत संपातून माघार घेणार नाही शैक्षणिक व्यासपीठ व मुख्याध्यापक संघाचा निर्धार.


कोल्हापूर / प्रतिनिधी

१४ मार्चपासून जुनी पेन्शन योजना शासनाने त्वरीत मान्य करावी यासाठी  महाराष्ट्र राज्य शासकिय व निम शासकिय कर्मचारी शिक्षक व शिक्षकेत्तर सेवक समन्वय समिती यांनी सुरू केलेल्या बेमुदत संपातून कोणत्याही परिस्थितीत माघार घेतली जाणार नाही.
असा निर्धार शैक्षणिक व्यासपीठाच्या सभेत व्यक्त करण्यात आला. शिक्षक आमदार प्रा. जयंत आसगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी एस. डी. लाड होते.मुख्याध्यापक संघाच्या विद्याभवन सभागृहात ही सभा संपन्न झाली.
     महाराष्ट्रात सदरचा संप अत्यंत यशस्वीपणे व्यापक प्रमाणात सुरू असतांना यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न काही घटक करत आहेत. म्हणून अशा घटकां विरुद्ध आंदोलन करण्याचा निर्णयही या सभेत घेण्यात आला.
     जिल्ह्यातील काही शाळा सुरु असल्याचे निदर्शनास आले आहे. म्हणून सदरच्या शाळेच्या संस्था चालकांना शैक्षणिक व्यासपीठ व मुख्याध्यापक संघाचे प्रतिनिधी भेटून त्यांना संपात सहभागी होण्याबाबत विनंती करतील. जुनी पेन्शन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांची भविष्यात पेन्शन कमी किंवा बंद होऊ शकते हा धोका लक्षात घेऊन जुन्या पेन्शन योजनेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी संपात सहभागी असलेच पाहिजे असे ठरले. संप मोडून काढण्यासाठी संपात सहभागी झाल्या बद्दल कारवाई करणार अशा प्रकारच्या नोटीसा शिक्षण विभागाने दिल्यास त्यांना कोणतेही उत्तर देऊ नये असे सर्वानू मते ठरले. मध्यवर्ती समन्वय समितीचा संपाबाबतचा निर्णय अंतिम असेल असे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
    या सभेस शिक्षक नेते दादासाहेब लाड, चेअरमन सुरेश संकपाळ, सचिव दत्ता पाटील, राजाराम वरुटे, बी.जी. बोराडे,बाबा पाटील, खंडेराव जगदाळे, सुधाकर निर्मळे, प्रा.सी.एम. गायकवाड, भरत रसाळे,पी.एस. हेरवाडे, शिवाजी माळकर, बी. डी. पाटील, इरफान अन्सारी, अशोक हुबळे, उमेश देसाई, सुधाकर सावंत, राजेश वरक, अनिल चव्हाण, मनोहर जाधव, संदीप पाथरे, वर्षा पाटील मिलींद पांगिरे आदीसह विविध संघटनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
   फोटो 
कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या सभेत मार्गदशन करतांना शिक्षक आमदार प्रा. जयंत आसगावकर अध्यक्ष एस डी लाड शिक्षक नेते दादा लाड, सुरेश संकपाळ अन्य मान्यवर.

Saturday, 11 March 2023

१४ मार्च राज्यव्यापी बेमुदत संपात जिल्हयातील सर्व शाळा सहभागी होणार - कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपिठ



कोल्हापूर /प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य शासकिय व निमशासकिय कर्मचारी, शिक्षक व शिकेत्तर सेवक समन्वय समितीने १४ मार्च पासून पुकारलेल्या बेमुदत संपात कोल्हापूर जिल्हयातील सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा१०० टक्के सहभागी होवून जुनि पेन्शन योजना महाराष्ट्र शासनाला लागू करायला लावणारच असा निर्धार कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपिठाच्या सभेत करण्यात आला. मुख्याध्यापक संघाच्या विद्या भवन येथे संपन्न झालेल्या सभा अध्यक्षस्थानी एस.डी लाड  होते.
              संपात सहभाग घेतला तरी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये म्हणून  इ१०वी व १२वी बोर्ड परीक्षेची सर्व कामे केली जातील पण कर्मचारी मस्टरमध्ये सह्या करणार नाहीत . असा निर्णय सभेत घेण्यात आला.
    सभाध्यक्ष  एस.डी लाड  म्हणाले की सर्व कर्मचारी , मुख्याध्यापक / प्राचार्य  व संस्थाचालक यांनी संपात सहभागी होवून संप १०० % यशस्वी करायचा आहे .
        १४ मार्च रोजी सकाळी ११ वाजता कोल्हापूर शहर व करविर तालुक्यातील सर्व संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक, शिकेत्तर सेवक टाऊन हॉल येथे संग्राम उदयानात जमायचे आहे . इतर तालुक्यातील कर्मचाऱ्यांनी तालुक्याच्या ठिकाणी प्रांत कार्यालयासमोर उपस्थित रहावे असे ठरले.
   या सभेला 
शिक्षक नेते दादासाहेब लाड,सचिव दत्ता पाटील, राजाराम वरुटे , बाबा पाटील, 
खंडेराव जगदाळे, सुधाकर निर्मळे, बी डी पाटील, प्रा सी. एम. गायकवाड , अरुण मुजुमदार, मनोहर जाधव, 
प्रा. आण्णासो बागडी, सुधाकर सावंत, इरफान अन्सारी, राजेश वरक. करण सरनोबत. काकासाो भोकरे. उमेश देसाई, संदीप पाटील. बालाजी पांढरे, शिवाजी माळकर. विलास साठे, सतिश लोहार आदी मान्यवरांसह  शिक्षक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होत.

Wednesday, 8 March 2023

विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न


हेरले /प्रतिनिधी 
 मौजे वडगांव ( ता . हातकणंगले) येथील विद्यामंदिर या प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले शाळेतील अंगणवाडीतील लहान मुलांपासून ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी विविध सामाजिक सांस्कृतिक , धार्मिक ,प्रबोधनपर, तसेच चित्रपटांच्या गितांचे सादरीकरण केले. यावेळी अंगणवाडीतील बालचमूंनी कला सादर करून मंत्रमुग्ध केले . या कार्यक्रमास उपस्थित मान्यवर पालक ग्रामस्थ आदींनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतूक केले.
           यावेळी शिरोली पोलिस स्टेशनचे सपोनि सागर पाटील म्हणाले ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांनी अधिकाअधिक अभ्यास करून शाळेचे नाव उज्वल करावे असे मत व्यक्त करून शाळेतील विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
यावेळी त्यांच्या हस्ते व सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आदी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते  तालूकास्तरिय व जिल्हास्तरिय खेळात प्राविण्य मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थांचा सत्कार करण्यात आला. सपोनि सागर पाटील यांनी शाळेस भेट दिल्याबद्दल त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .तसेच व्यासपीठावरिल सर्वच मान्यवरांचे स्वागत व सत्कार पार पडले.
           यावेळी सरपंच कस्तुरी पाटील , उपसरपंच सुनिल खारेपाटणे , सपोनि सागर पाटील, माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य सुरेश कांबरे ,स्वप्नील चौगुले, रघूनाथ गोरड ,शालेय समितीचे अध्यक्ष संतोष मोरे , मुख्याध्यपक आप्पासो पाटील , रघूनाथ कुंभार, ग्रा. पं . सदस्या सविता सावंत, सुनिता मोरे, सुवर्णा सुतार ,दिपाली तराळ , यांच्यासह शिक्षक पालक विद्यार्थी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक योगेश पाकले यांनी केले सुत्रसंचालन फिरोज मुल्ला यांनी केले तर आभार देवदत्त कुंभार यांनी मानले .

    फोटो 
वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम प्रसंगी गुणवंत विद्यार्थांचा सत्कार करतांना सपोनि सागर पाटील व अन्य
मान्यवर .

Friday, 3 March 2023

हेरले उरूसानिमित्त दि. ८ मार्च ते ११ मार्च पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन


हेरले / प्रतिनिधी

           हेरले (ता. हातकणंगले) येथील हिंदू व मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडवणाऱ्या हजरत पीर माॅसाहेब, हजरत पीर जबरबेग साहेब, हेरले यांच्या उरूसनिमित्त विविध धार्मिक व मनोरंजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
 बुधवार दि.८ मार्च रोजी संदल( गंधरात्र). व रात्री ९-०० वाजता मोहसीन चिस्ती कवाल पार्टी बेंगलोर, व शाबिरा कवाल पार्टी बेळगाव हा कार्यक्रम होणार आहे. 
  गुरुवार दि.९ रोजी रात्री ९-०० वाजता रेखा पाटील कोल्हापूरकर यांचा लोकनाट्य तमाशा व पहाटे देवास गलेफ असा कार्यक्रम होणार आहे.
 शुक्रवार दि. १० रोजी सारेगमपा ऑर्केस्ट्रा कोल्हापुर, यांचा कार्यक्रम होणार आहे. 
   या विविध मनोरंजन कार्यक्रमांचे उद्घाटन महिला व बालकल्याण समितीच्या माजी सभापती पद्माराणी राजेश पाटील, माजी पंचायत समिती सदस्या मेहरनिगा मुनीर जमादार, माजी सभापती राजेश पाटील, जवाहर साखर कारखाना संचालक आदगोंडा पाटील,
सरपंच राहुल शेटे, उपसरपंच 
महंमदबक्तीयार जमादार, स्वाभिमानी शेतकरी संघटना सरचिटणिस मुनीर  जमादार,माजी सरपंच झाकीर देसाई, माजी सरपंच रियाज जमादार, एपीआय अस्लम खतीब आदी मान्यवरांसह  उद्योगपती, कॉन्ट्रॅक्टर, माजी, आजी ग्रामपंचायत सदस्य,समाजिक कार्यकर्ते, पत्रकार, विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी, तरुण मंडळांचे पदाधिकारी यांचीही प्रमुख उपस्थित असणार आहे. तरी हेरले परिसरातील नागरिकांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन उरूस कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.

माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांना शिवाजी विद्यापीठाने शिक्षणशास्त्र विषयातील पीएच.डी.

हेरले / प्रतिनिधी

   कोल्हापूर जिल्हा परिषदेतील माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांना शिवाजी विद्यापीठाने शिक्षणशास्त्र विषयातील पीएच.डी. घोषित केली. कोल्हापूर जिल्हा परीषद माध्यमिक शिक्षण विभागाचे अधिकारी यांच्या वतीने डॉ. एकनाथ आंबोकर यांचा सत्कार कार्यक्रम संपन्न झाला.
 सत्कार समारंभ प्रसंगी माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. एकनाथ 
आंबोकर म्हणाले 'निम्न प्राथमिक स्तरावरील मराठी व इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील पुनर्रचित अभ्यासक्रम अंमलबजावणीच्या सद्य:स्थितीचा तौलनिक अभ्यास' या विषयावर  प्रबंध सादर केला होता. गारगोटीतील आचार्य जावडेकर शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. रामचंद्र बेलेकर यांनी मार्गदर्शक केले. प्राचार्य डॉ. आय. सी. शेख, डॉ. नीलमा सप्रे, डॉ. पुष्पा वासकर, डॉ. सर्जेराव चव्हाण यांचेही  सहकार्य लाभले. या यशाबद्दल जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण तसेच जिल्हा परिषदेतील खातेप्रमुख यांनी आंबोकर यांचे अभिनंदन केले.
   सत्कार सभारंभ प्रसंगी माध्यमिक शिक्षण विभागाचे उपशिक्षणाधिकारी गजानन उकिर्डे, दिगंबर मोरे, भिमराव टोणपे, आर. व्ही. कांबळे, चंद्रकांत ओतारी, अर्चना पाथरे, रत्नप्रभा दबडे,सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक अजय पाटील, अधिक्षक प्रकाश नलवडे,मदन जाधव पुनम ठमके, कल्पना पाटील, अश्विनी पाटील सुर्यकांत निलेश म्हाळुंगेकर अभिजीत बंडगर नितीन खाडे अजिंक्य गायकवाड उत्तम वावरे मारूती पाटील सुनिल मिसाळ नसिम खान निर्मला शेळकंदे गौरव बोडेकर सचिन आंबेकर शिवाजी पोवार आदी मान्यवरांच्या उपस्थित सत्कार समारंभ संपन्न झाला.
     फोटो
कोल्हापूर जिल्हा परीषद माध्यमिक शिक्षण विभागाचे अधिकारी डॉ. एकनाथ आंबोकर यांचा सत्कार करतांना उपशिक्षणाधिकारी आर व्ही कांबळे चंद्रकांत ओतारी अधिक्षक प्रकाश नलवडे आदीसह अन्य अधिकारी.