Saturday, 29 April 2023

मौजे वडगांव तलावातील एक थेंबही पाणी इतर गावांना देणार नाही पाटबंधारे विभागाला ग्रामपंचायतीचे निवेदन


हेरले /प्रतिनिधी 
 मौजे वडगांव ( ता. हातकणंगले) येथील लघू पाटबंधारे अंतर्गत पाझर तलावातून पाण्याचा एक थेंबही इतर गावांना देणार नसल्याचा ठराव ग्रामसभेत केला असून त्याबाबतचे निवेदन ग्रामपंचायत सदस्यांच्या शिष्टमंडळाच्या वतीने पचगंगा पाटबंधारे उपविभाग, कोल्हापूर येथील सहाय्यक अभियंता संदिप दावणे यांना देण्यात आले.
            ग्रमसभेच्या ठरावातील मजकूर असा की, मोजे वडगाव येथील लघूपाटबंधारे अंतर्गत स्थापित असलेला पाझर तलाव हा मौजे वडगाव साठी राखीव ठेवण्यात आला आहे. त्यामधून पिण्याचे पाणी गावासाठी व शेतीसाठी वापर करण्यात येत आहे. सदरचा तलाव १९७२ मध्ये पूर्ण झाला असून त्यासाठी लागणारी जमीन गावातील शेतकऱ्यांनी दिली आहे. तेव्हां पासून त्यामधील पाणी फक्त मौजे वडगाव मधील क्षेत्रांसाठी व पिण्याच्या पाण्यासाठी वापरण्यात येत आहे. भविष्यात लोकसंख्या वाढीमुळे पाणीटंचाई निर्माण होऊ शकते. त्यामुळे सदरच्या तलावामधील पाणी इतर कोणत्याही गांवाने मागणी केल्यास मंजूरी देण्यात येऊ नये त्याचे संपूर्ण अधिकार ग्रामपंचायत मौजे वडगाव यांच्याकडेच राहावेत आशा आशयाचे निवेदन पंचगंगा पाटबंधारे उपविभाग कोल्हापूर येथे दिले असून शिष्टमंडळात  उपसरपंच सुनिल खारेपाटणे , माजी उपसरंपच व विद्यमान ग्रा.पं. सदस्य सुरेश कांबरे, , माजी ग्रां . पं. सदस्य अविनाश पाटील , स्वप्नील चौगुले,रघूनाथ गोरड 'सामाजिक कार्यकर्ते अमोल झांबरे , अमर थोरवत , यांचा समावेश आहे.

फोटो 

पंचगंगा पाटबंधारे उपविभाग, कोल्हापूर यांना निवेदन देतांना ग्रामपंचायत सदस्यांचे शिष्टमंडळ

Friday, 21 April 2023

राज्यस्तरीय सॉप्ट टेनिस स्पर्धेसाठी सानिका पाटीलची निवड


कोल्हापूर /प्रतिनिधी
नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शिये हायस्कूल ज्युनिअर कॉलेज मधील सानिका अनिल पाटील हिची १७ वर्षाखालील राज्यस्तरीय शालेय शासकिय सॉप्ट टेनिस स्पर्धेसाठी निवड झाली .या राज्यस्तरीय स्पर्धा विभागिय क्रीडा संकुल कोल्हापूर येथे होणार आहेत . या विदयार्थीनीला संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय गाडवे ,मुख्याध्यापक के . व्ही .बसागरे यांचे प्रोत्साहन तर क्रीडाशिक्षक संदीप पाथरे , संघटनेचे सचिव आर.बी. पाटील , संदीप खुटाळे यांचे मार्गदर्शन लाभले .

Thursday, 20 April 2023

राजर्षी शाहूच्या विद्यार्थ्यांचे विविध स्पर्धेत यश

कसबा बावडा : 
प्राथमिक शिक्षण समिती महानगरपालिका कोल्हापूर संचलित राजर्षी शाहू विद्यामंदिर शाळा क्रमांक 11 कसबा बावडा विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धेत यश संपादन केले शाळेचे मुख्याध्यापक डॉ अजितकुमार पाटील व उत्तम कुंभार यांनी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

 शाळेचे मुख्याध्यापक डॉ अजितकुमार पाटील यांनी विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धेचा भाग घेतल्यामुळे विविध स्पर्धेत यश संपादन केले आहे.फक्त पुस्तके ज्ञानापेक्षा सामान्य ज्ञान इतर ज्ञान घेणे गरजेचे आहे .मराठी गणित इंग्रजी व सामान्य ज्ञान यांचा अभ्यास ठेवण्यासाठी सातत्याने सराव अभ्यास करणे अत्यंत गरजेचे आहे. दररोज सराव करावाअभ्यासा बरोबर व्यायाम ,ध्यानधारणा,योगासन सुद्धा करण्यात यावा असे आवाहन केले तरच आपली शरीर मन व बुद्धी स्थिर राहणार आहे राहणार आहे व आपण 21व्या शतकाला सामोरे जाण्याचे सक्षम असे नागरिक बनणार आहोत असे मनोगत व्यक्त केले
1.कु.श्रावणी विकास पोवार - *इयत्ता पहिली 90 गुण
2.प्रणित प्रशांत पाटील  - इयत्ता दुसरी  96गुण
3 कु.स्नेहल सुभाष वाघमारे -इयत्ता दुसरी 90 गुण
4 शिवाजी कासे - तायकांदो कराटे गोल्ड मेडल
5.प्रचिता साताप्पा ससाने,ऋणानुबंध परीक्षा १४४ गुण
6.*कु.विरेन विशाल पाटील.   गुरुकुल टॅलेंट सर्च *तालुक्यात चौदावा.240 गुण मिळवून गुणवत्ता यादीत स्थान मिळवले.त्यांना
तमेजा मुजावर,विद्या पाटील, आसमा तांबोळी यांनी मार्गदर्शन केले.

केंद्रशाळा मुख्याध्यापक डॉ. अजितकुमार पाटील.उत्तम कुंभार, सुशिल जाधव, उत्तम पाटील,मिनाज मुल्ला,हेमंतकुमार पाटोळे व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रमेश सुतार,व सदस्य यांचे सहकार्य लाभले.

मौजे वडगांव येथे सुतार पाणंद रस्त्याचा शुभारंभ


हेरले ( प्रतिनिधी )

 मौजे वडगाव (ता. हातकणंगले) येथील गावविहिरी कडून जाणाऱ्या सुतार पाणंद रस्त्याच्या कामाचा शुभारंभ सरपंच कस्तुरी पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
          गावातील सुतार पाणंद रस्ता प्रचंड खराब झाला होता. त्या रस्त्यावरिल शेतकऱ्यांना त्याचा प्रचंड त्रास होत होता. याबाबत त्या परिसरातील शेतकऱ्यानी व ग्रामपंचायतींच्या वतीने माजी आमदार अमल महाडिक यांच्याकडे पाणंद रस्ता दुरुस्ती साठी निधी मागितला होता. माजी आमदार अमल महाडिक यांनी निधी देण्याबाबत शेतकऱ्यांना आश्वासन दिले होते. त्याबाबत ग्रामपंचायतीच्या वतीने कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर या पाणंद रस्त्यासाठी १० लाखाचा निधी दिला असून या रस्त्याचा शुभारंभ सरपंच कस्तूरी पाटील , उपसरपंच सुनिल खारेपाटणे , माजी सरपंच रावसो चोगुले, दत्त सोसायटीचे माजी चेअरमन श्रीकांत सावंत, हनुमान दुध संस्थेचे संस्थापक चेअरमन बाळासो थोरवत , यांच्यासह विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या पाणंद रस्त्यांचा शुभारंभ झाल्याने त्या परिसरातील शेतकऱ्याच्या मधून समाधान व्यक्त होत आहे.
             यावेळी माजी सरपंच सतिशकुमार चौगुले , माजी उपसरपंच व विद्यमान ग्रां. प . सदस्य सुरेश काबरे, रघूनाथ गोरड , स्वप्नील चौगुले, सविता सावंत, दिपाली तराळ , सुनिता मोरे, अविनाश पाटील , प्रकाश चौगुले, जयसिंग चौगले , देवगोडा पाटील, आदगोंड पाटील , मधुकर आकिवाटे, यांच्यासह शेतकरी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फोटो 
सुतार पाणंद रस्त्याच्या शुभारंभ प्रसंगी सरपंच , उपसरपंच , विविध संस्थांचे पदाधिकारी व मान्यवर

Wednesday, 19 April 2023

विद्यार्थ्यांनी कष्टाचे सातत्य कायम राखावे-- -- शंकर यादव


कोल्हापूर दिनांक- 19 शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांनी ज्याप्रमाणे शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली, अभ्यास व सराव केला. तसाच अभ्यास आपण जीवनभर करत रहा असा सल्ला प्रशासनाधिकारी श्री शंकर यादव यांनी कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या गुणगौरव व सत्कार समारंभ प्रसंगी  आव्हान केले. कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेच्या वतीने महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी राज्य व जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये यशस्वी स्थान प्राप्त केले अशा विद्यार्थ्यांचा, त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षक मुख्याध्यापकांचा तसेच विविध गुणवंत सभासदांचा सत्कार यावेळी शाहू स्मारक भवन येथे करण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानी पतसंस्थेचे सभापती उमर जमादार होते.
 श्री यादव पुढे म्हणाले, महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या शाळांच्या लौकिकात भर घातलेली आहे. गुणवत्तेमध्ये राज्यांमध्ये महापालिका प्रथम स्थानी असून सातत्याने दरवर्षी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची संख्या ही वाढत आहे .अनेक शाळांच्या मध्ये शिक्षक सुट्टी न घेता सातत्याने विद्यार्थ्यांचा अभ्यास आणि सराव घेत आहेत त्यामुळे हे यश मिळाले असून याचा परिणाम महापालिकेच्या शाळा त्यामध्ये विद्यार्थी संख्या वाढण्यास झालेला आहे. हे अभ्यासाचे सातत्य विद्यार्थ्यांनी कायम राखावी व भविष्यामध्ये आपलं नाव उज्वल करावे असे मार्गदर्शन त्यांनी केले व पतसंस्थेच्या सर्व संचालकांनी विद्यार्थ्यांच्या सत्काराचे आयोजन केले त्याबद्दल सर्व संचालकांना धन्यवाद दिले. यावेळी पतसंस्थेच्या कामाचा आढावा तसेच पतसंस्था राबवत असलेल्या विविध उपक्रमांची आणि योजनांची माहिती सुधाकर सावंत यांनी दिली .यावेळी सभासदांच्या पाल्यांचा व गुणवंत सभासदांचा सत्कार ही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी संजय पाटील, वसंत आडके, राजेंद्र गेजगे, लक्ष्मण पवार ,भारती सूर्यवंशी ,मनीषा पांचाळ, विजय माळी,  नेताजी फराकटे,प्रभाकर लोखंडे, प्रदीप पाटील, सुनील नाईक, उमेश देसाई, मंजीत भोसले, संजय कडगावे , उत्तम कुंभार सुनील पाटील आदि संचालक व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होते. यावेळी आभार प्रदर्शन उपसभापती कुलदीप जठार यांनी मांडले सूत्रसंचालन रावसाहेब कांबळे व स्वाती खाडे यांनी केले.

Sunday, 16 April 2023

हेरले येथे पाणंद रस्त्याच्या कामाचे उदघाटन

हेरले /प्रतिनिधी

हेरले (ता. हातकणंगले) येथील 
नदीकडील गडकरी व बारगीर पाणंद  रस्ता व सवळ पाणंद रस्ता या रस्त्यांच्या मुरुमीकरणासाठी १० लाख रुपये विकास निधी माजी आमदार अमल महाडिक यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झाले असून पाणंद रस्त्याच्या कामाचे उदघाटन करण्यात आले.
   या उद्घाटन प्रसंगी सरपंच राहुल शेटे, उपसरंपच 
महंमदबख्तीयार जमादार ,श्री छत्रपती सोसायटीचे व्हा. चेअरमन कपिल भोसले,संचालक कृष्णात खांबे,चंद्रपभा सोसायटीचे संचालक जयसिंग गडकरी ग्रामपंचायत सदस्य मनोज पाटील,राजू देसाई,अल्ताफ बारगिर,सरदार सय्यद,अशोक कोळेकर,सुनील मोहिते, बशीर  बारगिर,ठेकेदार अमोल कळमकर व शेतकरी सभासद उपस्थित होते.
     फोटो 
हेरले येथे पाणंद रस्त्यांच्या कामाचे श्रीफळ वाढवून उद्घाटन करतांना शेतकरी सरदार सय्यद  सरपंच राहुल शेटे कपिल भोसले आदीमान्यवरासह शेतकरी

मौजे वडगाव येथील जय हनुमान दुध संस्थेच्या चेअरमनपदी सतिशकुमार चौगुले तर व्हा.चेअरमनपदी इंदूबाई नलवडे


हेरले /प्रतिनिधी )
 हातकणंगले तालुक्यातील मौजे वडगांव येथील पंचक्रोशीत दुग्ध व्यावसाय क्षेत्रात नाव लौकिक असणाऱ्या जय हनुमान सह. दुध संस्थेची सन २०२३ ते २०२८ या साला करिता पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एन.पी. दवडते व सहाय्यक म्हणून आण्णासो पाटील यांनी काम पाहीले .
             यावेळी नवनिर्वाचित संचालक मंडळाची बैठक होऊन सतिशकुमार चौगुले यांची चेअरमनपदी तर इंदुबाई नलवडे यांची व्हा.चेअरमनपदी सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी माजी चेअरमन जयवंत चौगुले, माजी उपसरपंच सुरेश कांबरे , जीवन चौगुले,यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
           यावेळी नुतनपदाधिकाऱ्यांचा निवडणूक निर्णय अधिकारी एन. पी . दवडते यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी संचालक मंडळ बाळासो थोरवत , महादेव शिदे, सुभाष मुसळे, रावसो चोगुले, महादेव चौगुले, शकिल हजारी, नेताजी माने, जयश्री यादव, जयश्री रजपूत , यांच्यासह मान्यवर कर्मचारी उपस्थित होते. सस्थेचे सचिव आण्णासो पाटील यांनी आभार मानले.

Friday, 14 April 2023

मौजे वडगांव येथे 'आनंदाचा शिधा' वाटप



हेरले ( प्रतिनिधी )

 मराठी नववर्ष गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरातील नागरीकांच्या साठी राज्यातील शिधापत्रिका धारकांना फक्त १०० रुपयांत 'आनंदाचा शिधा' देण्याची घोषणा शिंदे - फडणवीस सरकारने केली होती.
            या योजनेचा लाभ आंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटूंबातील शिधापत्रिका धारकांना मिळणार असून यामध्ये १०० रुपयांत शिधापत्रिका धारकांना १ किलो रवा , १ किलो हरभरा डाळ, १ किलो साखर, तसेच १ लिटर पामतेल , या ४ वस्तूंच्या किटचे वाटप मौजे वडगाव (ता. हातकणंगले) येथील श्री दत्त विकास सेवा संस्थेच्या रास्त भाव धान्य दुकानांमध्ये उपसरपंच सुनिल खारेपाटणे व ग्रा. पं . सदस्य सुरेश कांबरे यांच्या हस्ते व संस्थेतील पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या किटचे वाटप करुण शुभारंभ करण्यात आला.
           यावेळी अँड . विजयकुमार चौगुले, व्हा.चेअरमन महालिंग जंगम, विलास सावंत, मधुकर आकिवाटे , शिवाजी जाधव, सेल्समन अमोल झांबरे यांच्यासह शिधापत्रिका लाभार्थी उपस्थित होते.

फोटो 
आनंदाचा शिधावाटप शुभारंभ प्रसंगी उपसरपंच सुनिल खारेपाटणे , ग्रां . पं . सदस्य सुरेश कांबरे, सेल्समन अमोल झांबरे व लाभार्थी

हेरले (ता. हातकणंगले) येथे महाराष्ट्र शासनाच्या महाराजस्व अभियानांतर्गत येणारी विस्तारीत समाधान योजना कार्यक्रम

हेरले /प्रतिनिधी

केंद्रीय शाळा हेरले (ता. हातकणंगले) येथे महाराष्ट्र शासनाच्या महाराजस्व अभियानांतर्गत येणारी विस्तारीत समाधान योजना राबविणेत आली. या कार्यक्रमाकरीता शासनाच्या महसूल, ग्रामविकास, आरोग्य, कृषी, शिक्षण, परिवहन, सामाजिक वनीकरण, सहकार व पशुसंवर्धन इत्यादी विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन हेरले गावचे सरपंच राहूल शेटे, हातकणंगले तालुक्याचे निवासी नायब तहसिलदार दिगंबर सानप व उपसरपंच बख्तियार जमादार यांचे हस्ते करणेत आले. 
   या कार्यक्रमांतर्गत उपस्थित नागरिकांना शासनाच्या विविध विभागांमार्फत राबविणेत येणाऱ्या लोकापयोगी योजनांची माहिती देणेत आली तसेच खालीलप्रमाणे सेवा पुरविणेत आल्या.
  महसूल विभाग :- 7 / 12 वाटप - 50, वारसा नोंद-5, ए. कु. पु. कमी- 1, लक्ष्मीमुक्ती योजनेअंतर्गत अर्ज स्विकारणेत आला. उत्पन्नाचे दाखले 10, विभक्त रेशनकार्ड-1, फेरफार उतारे-10
  उपस्थित अधिकारी :- हेरले मंडळ अधिकारी श्रीमती बेळणेकर , तलाठी हेरले- एस्. ए. बरगाले, कोतवाल-  महंमद जमादार व हेरले मंडळातील इतर तलाठी व गाव कोतवाल.
   आरोग्य विभाग:-  NCD कार्यक्रमांतर्गत 108 लाभार्थ्यांची बिपी व शुगर तपासणी केली. 14 लाभार्थी हायपरटेन्शन व 6 लाभार्थी शुगर संशयीत आढळून आले.
 आयुषमान भारत हेल्थ आयडी कार्ड (ABHA) योजनेअंतर्गत 122 लाभार्थ्यांचे ABHA कार्ड तयार केले व 144 लाभार्थ्यांना NCD पोर्टलला कार्ड लिंक करुन वाटप केले.उपस्थित कर्मचारी :- श्रीमती जोसना वाडकर (CHO),  आर. बी. पाटील (MPW), श्रीमती आर.एच. मुलाणी (ANM), श्रीमती एल. डी. जाधव (ANM)
    पुरवठा विभाग : 1) नवीन, दुबार व नुतनीकरण केलेली रेशनकार्ड-16 , रेशनकार्डमध्ये नाव कमी /वाढविणे 21
उपस्थित अधिकारी:- पुरवठा अधिकारी  एस्. एम्. पजारी
   निवडणूक विभाग:- मतदार यादीत नवीन नाव नोंदणी – 9 मतदार यादीतील दुरुस्ती व मतदान ओळखपत्र नुतनीकरण-5 उपस्थित अधिकारी :- श्रीमती शोभा कोळी निवडणूक नायब तहसिलदार, श्रीमती सुवर्णा खाबडे बिएलओ, श्रीमती सुषमा भिमराव कुरणे बिएलओ, श्रीमती शमशाद हसन देसाई बिएलओ हेरले
   आधार सेवा केंद्र :- आधार नोंदणी व दुरुस्ती-27
उपस्थित कर्मचारी:- सं. आ. मुंगळे
   सामाजिक वनीकरण :- उपस्थित नागरिकांना सामाजिक वनीकरण विभागामार्फत विविध योजनांची माहिती दिली. तसेच सरपंच हेरले यांनी ग्रामपंचायत हेरले मार्फत केल्या जाणाऱ्या वृक्ष लागवडीकरीता सामाजिक वनीकरण विभागामार्फत सहकार्य मिळण्याबाबत मागणी केली. उपस्थित अधिकारी :- व्ही. एन. खाडे (स.व.सेवक)
     परिवहन विभाग :- परिवहन विभागामार्फत ज्येष्ठ नागरीक, महिला व विद्यार्थी यांचेकरीता राबविणेत येणाऱ्या विविध योजनांची माहिती उपस्थित नागरीकांना देणेत आली. सरपंच हेरले यांनी हेरले, मौजे वडगांव ते पेठ वडगांव या मार्गावरती महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरीता एस.टी.चालू करणेबाबत निवेदन दिले.उपस्थित अधिकारी :- संपत पाटील वाहतूक नियंत्रक
    महावितरण विभाग :- उपस्थित नागरीकांना नविन विज जोडणी, नावात बदल तसेच वीज बिलाबाबत असणाऱ्या विविध समस्या याबाबत मार्गदर्शन केले.
उपस्थित अधिकारी :- संदीप खंडू कांबळे (कनिष्ठ अभियंता महावितरण)
    कृषी विभाग :- कृषी विभागामार्फत ग्रीन हाऊस, विविध शेतकी अवजारे, ठीबक, शेततळे, खते तसेच बि-बियाणे व सेंद्रीय शेती याबाबतचे शासनाचे मिळणारे अनुदान व राबविणेत येणाऱ्या विविध प्रोत्साहनपर योजना याबाबत उपस्थित शेतकरी व नागरीक यांना माहिती देणेत आली.
उपस्थित अधिकारी :-  राहुल पाटील कृषी सहायक हेरले, सचिन आलमान कृषी सहायक
    ग्रामविकास विभाग :- शासनाच्या रमाई, पंतप्रधान निवास योजना, पाणंद रस्ता व सांडपाणी निचरा, रस्ते बांधणी, अपंग कल्याणाकरीता असणाऱ्या विविध योजनांची माहिती देणेत आली. उपसरपंच  बख्तीयार जमादार यांनी हेरले येथील लाभार्थ्यांना रमाई व पंतप्रधान निवास योजनेचे अनुदान वेळेवर उपलब्ध होत नसलेबाबतची बाब उपस्थित अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिली. अशी माहिती प्रसिध्दीस पत्रकाद्वारे तलाठी एस. ए. बरगाले यांनी दिली.
    फोटो
हेरले :कार्यक्रमाचे उद्घाटन करतांना सरपंच राहूल शेटे, हातकणंगले तालुक्याचे निवासी नायब तहसिलदार दिगंबर सानप, उपसरपंच बख्तियार जमादार डॉ. राहुल देशमुख आदी मान्यवर

Tuesday, 11 April 2023

राष्ट्रीय सरपंच संसद (MIT) संस्थेकडून मौजे वडगाव दत्तक

     हेरले / प्रतिनिधी  
राष्ट्रीय सरपंच संसद 
( M।T ) या संस्थेकडून हातकणंगले तालुक्यातील मौजे वडगाव गाव दत्तक घेत असल्याची माहीती संस्थेचे महाराष्ट्राचे मुख्य समन्वयक   योगेश दादा पाटील, यांनी दिली. ते मौजे वडगांव येथे ग्रामपंचायत कार्यालयात भेटी दरम्यान बोलत होते . तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच कस्तुरी पाटील होत्या .
             ते पुढे म्हणाले की,शिक्षण, संशोधन, आणी नवनवीन संकल्पना यातून चांगले जग घडवणे हे MIT समूहाचे उद्धिष्ट आहे. देशाच्या सर्वांगीण ग्राम विकास प्रक्रिये मध्ये लोक प्रतिनिधींची भूमिका फार महत्वाची आहे. राज्यातील सर्व लोकप्रतिनिधींचे राजकीय स्वरूपात संघटन करून विविध उपक्रमांचे अभ्यासपूर्वक संयोजन करून त्यांना सहकार्य करणे हे राष्ट्रीय सरपंच संसदचे उद्धिष्ट आहे. याचं दरम्यान सर्व मान्यवारांनी विद्या मंदिर मौजे वडगाव येथे ही भेट देऊनआत्मीयतेने शाळेविषयी माहिती घेतली. 
           यावेळी राष्ट्रीय सरपंच संसद च्या सर्व पदाधिकारी यांचा ग्रामपचायत सदस्य यांचे कडून पुष्पगुच्छ व शाल श्रीफळदेऊन सत्कार  करणेत आला. यावेळी संस्थेच्या पश्चिम महाराष्ट समन्वयक भक्तीताई जाधव, सहसमन्वयक प्रकाशदादा महाले , जिल्हा अध्यक्ष रवि पाटील , लोकनियुक्त सरपंच कस्तुरी  पाटील, उपसरपंच सुनील खारेपाटणे, ग्रा. पं. सदस्य सुरेश कांबरे,स्वप्नील चौगले, रघुनाथ गोरड, सविता सांवत , सुनिता मोरे, सुवर्णा सुतार, दिपाली तराळ ,गणेश मोरे ,आण्णासाहेब तोरस्कर,अमर थोरवत, हर्षवर्धन घोरपडे, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते . स्वागत व प्रास्ताविक अविनाश पाटील यांनी केले तर आभार सुरेश कांबरे यांनी मानले.

फोटो कॅप्शन
राष्ट्रीय सरपंच संसदच्या पदाधिकारी यांनी मौजे वडगांव ग्रामपंचायतीस भेटी प्रसंगी मान्यवर.

छत्रपती शिवाजी सोसायटीच्या चेअरमन पदी अशोक मुंडे तर व्हा. चेअरमन पदी कपिल भोसले यांची निवड.


हेरले / प्रतिनिधी

हेरले (ता. हातकणंगले) येथील राजकीय दृष्ट्या महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या
 श्री छत्रपती शिवाजी विकास सेवा संस्थेच्या नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणूकित श्री छत्रपती शिवाजी महाराज स्वाभिमानी आघाडीने १३-० धुव्वा उडवत विजय संपादन केला होता.विजयी संचालक मंडळाच्या पहिल्या सभेत निवडणूक निर्णय अधिकारी मिलींद ओतारी यांनी काम पाहिले.या सभेत चेअरमन पदी अशोक मुंडे तर व्हा चेअरमनपदी कपिल भोसले यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
          यावेळी आघाडीचे नेते माजी सभापती राजेश पाटील, माजी चेअरमन उदय चौगुले, कृष्णात खांबे, शशिकांत पाटील, सुनील खोचगे, नितीन चौगुले, संजय पाटील, राजेंद्र कदम, स्वप्नील कोळेकर, शांतादेवी कोळेकर, सुजाता पाटील आदी संचालक उपस्थित होते.नवनिर्वाचित चेअरमन व्हा.चेअरमन यांचा सत्कार करण्यात आला.सचिव नंदकुमार माने, रवी मिरजे, अमित नाईक, अक्षय इंगळे यांचे सहकार्य लाभले.

शेतकरी हितासाठी प्रयत्नशील राहणार

   गत ५ वर्षात शेतकरी सभासद हिताचे निर्णय सभासद यांनी दाखवलेले प्रेम व  विश्वास याची पोच पावती म्हणून 
श्री छत्रपती शिवाजी महाराज स्वाभिमानी आघाडीला मतदारांनी भरघोस मताधिक्याने निवडून दिल्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करतो व शेतकरी सभासद मतदारांचा विश्वास पात्र राहून शेतकरी हितासाठी आमचे चेअरमन व्हा.चेअरमन व संचालक प्रयत्नशील राहणार आहेत.

  राजेश पाटील माजी सभापती
पॅनेलं प्रमुख श्री छत्रपती शिवाजी महाराज स्वाभिमानी आघाडी

     फोटो कॅप्शन
हेरले : नुतन चेअरमन अशोक मुंडे व व्हा.चेअरमन कपिल भोसले यांचा सत्कार करताना माजी सभापती राजेश पाटील व माजी चेअरमन उदय भोसले.

विद्यार्थ्यांनी शालेय ज्ञानाचा वापर देशासाठी करावा.-- मा अनिल म्हामाणे


कसबा बावडा-
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध शालेय उपक्रम व सहशालेय उपक्रम राबवण्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या मनपा राजर्षी शाहू विद्यामंदिर क्र.११ मध्ये वार्षिक पारितोषिक समारंभ उत्साहात संपन्न. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे निर्मिती फिल्मचे निर्माते,प्रकाशक मा अनिल म्हमाणे, केंद्रमुख्याध्यापक डॉ अजितकुमार पाटील,प्राथमिक शिक्षण समिती कडील शैक्षणिक पर्यवेक्षक बाळासाहेब कांबळे,  विजय माळी,उषा सरदेसाई, प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील,तज्ञ संचालक व माजी अध्यक्ष प्राथमिक शिक्षक संघ मनोहर सरगर, पुरोगामी शिक्षक संघाचे अध्यक्ष विलास पिंगळे, शिक्षक समिती अध्यक्ष संजय पाटील, सचिन पांडव क्रिडा निरीक्षक प्राथमिक शिक्षण समिती मनपा कोल्हापूर,उत्तम कुंभार,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रमेश सुतार,अनुराधा गायकवाड इत्यादी विविध मान्यवर उपस्थित होते. 
       कार्यक्रमाची सुरुवात महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व प्रतिमेला पुष्पहार घालून करण्यात आली.

 सन 2022_2023 या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी जे विविध शालेय, सह शालेय उपक्रम आयोजित करण्यात आले होते त्या उपक्रमामध्ये क्रमांक मिळणार्‍या विद्यार्थ्यांना पारितोषिक व प्रशस्तिपत्र वितरण सोहळा संपन्न झाला.. या कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रमेश सुतार, उपाध्यक्षा अनुताई दाभाडे व सदस्य तसेच भागातील सामाजिक कार्यकर्ते, प्रतिष्ठित नागरिक व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.  या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे केंद्रमुख्याध्यापक डॉ श्री अजितकुमार पाटील यांनी केले.
शाळेचे केंद्र मुख्याध्यापक डॉ अजितकुमार पाटील यांनी आवाहन केल्याप्रमाणे शाहू ग्रंथालयात प्रत्येक मित्रांनी एक पुस्तक भेट देण्यासाठी आणावे या आवाहन म्हणून प्रमुख पाहुणे अनिल म्हमाने यांनी 51 पुस्तके शाहू ग्रंथालयात भेट दिली तसेच प्राथमिक शिक्षण संघाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी 11 पुस्तके व मनोहर सरगर यांनी 11 पुस्तके भेट दिलीत
 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता सातवीच्या विद्यार्थिनी कल्पना मैलारी व  जान्हवी ताटे, यांनी केले. या कार्यक्रमासाठी शाळेतील ज्येष्ठ शिक्षक उत्तम कुंभार सर, मीनाज मुल्ला मॅडम, उत्तम पाटील सर, सुशील जाधव सर, आसमा तांबोळी मॅडम, तमेजा मुजावर मॅडम, विद्या पाटील मॅडम,बालवाडीच्या मुख्याध्यापिका कल्पना पाटील मॅडम, सावित्री काळे मॅडम तसेच सेवक हेमंतकुमार पाटोळे,यांनी विशेष प्रयत्न केले. कार्यक्रमाचे आभार अदिती बिरणगे यांनी मानले.

Monday, 10 April 2023

सामाजिक क्रांतीचा अग्रदूत - महात्मा जोतिबा फुले

 

लेख -  डॉ.अजितकुमार पाटील, 
( पीएच डी मराठी साहित्य )


विद्येशिवाय सामाजिक क्रांती अशक्य आहे, हा महत्त्वाचा सिद्धांत लक्षात घेऊन महात्मा जोतीराव फुले यांनी अज्ञान-अंधःकारात हजारो वर्षे खितपत पडलेल्या दीन-दलितांच्या व स्त्रियांच्या शिक्षणाला सर्वश्रेष्ठ स्थान दिले. भावी मातांच्या शिक्षणासाठी प्रथम त्यानी पुण्याच्या बुधवार पेठेत तात्यासाहेब भिडे यांच्या वाड्यात १८४८ साली मुलींची शाळा सुरू करून स्त्री-शिक्षणाच्या नव्या युगास आरंभ केला. पाठोपाठ पुणे येथेच वेताळ पेठेत म्हणजेच सध्याच्या अहिल्याश्रमात महार-मांग मुलांसाठी शाळा चालू केली. सुमारे १५० वर्षांपूर्वीच्या पुण्याचा विचार केल्यास सनातन्यांचा बालेकिल्ला होऊन राहिलेल्या या पुण्य नगरीत यां घटना घडाव्यात हे सनातन्यांच्या दृष्टीने महापाप होते. त्यांच्या देवांच्या व धर्माच्या विरुद्ध हे सर्व होते. कलियुग आले. आता कल्पित देवांचा कोप होणार, अशी कोल्हेकुई भट भिक्षुक सनातन्यांनी चालू केली. परंतु जोतीरावांनी यास भीक घातली नाही. जोतीरावासारख्या एका भारतियाने या देशात धर्मांध, प्रस्थापित व सर्वेसर्वा असलेल्या भिक्षुक- शाहीविरुद्ध हे जे दिव्य केले त्यास तत्कालीन इतिहासात तोड नाही खोट्या देवाच्या आणि धर्माच्या नावाखाली दीन-दलित व स्त्रिया यांच्यावर प्रदीर्घकाळ या देशात अन्यात होत होता. ज्यांना कुत्र्यामांजरा- इतकीसुद्धा किंमत नव्हती त्यांना शिक्षणाची संजिवनी देऊन माणसात आणण्याचे आणि 'माणूस' म्हणून जगण्याचा हक्क प्राप्त करून देण्याचे महान क्रांतिकार्य फुल्यानी आरंभिले. यामुळे आधुनिक भारतात नवयुगाला आरंभ झाला. असे म्हणणे यथायोग्य आहे.

म. फुले यांना समाज क्रांतिकार्यात झोकून घेण्याची प्रेरणा अनेक प्रसंगातून मिळाली. अशा प्रकारची दिव्य प्रेरणा घेणारे त्यांचे संवेदनाक्षम मन होते. ते आजच्यासारख्या प्रस्थापित, सुखवस्तू व स्वार्थी लोकांसारखे बोथट नव्हते. एका ब्राह्मण मित्राच्या लग्नाच्या वरातीमधून आनंदाने व ऐटीने चालणारे जोतीराव एकाएकी वरातीमधून निघून गेले. ब्राह्मण मित्राची जरी वरात असली तरी जोतीरावासारख्या एका शूद्राने सर्वांत मागे न राहता इतर ब्राह्मणांबरोबर चालावे हा मक्तेदार सनातनी ब्राह्मणांचा घोर अवमान होता. त्यांनी जोतीरावास सुनावले व सर्वांत मागे जाण्यास सांगितले समुद्राला पौर्णिमा अमावास्येला जसे उधाण यावे तशी त्यांच्या मनात प्रचंड खळबळ माजून राहिली. हा मानवजातीचा घोर अवमान त्यांना सहन होण्यासारखा नव्हता. एक माणूस दुसऱ्या माणसापेक्षा श्रेष्ठ किंवा कनिष्ठ कसा असू शकेल ? कोणत्या धर्मात ही भोंगळ शिकवण आहे. याचा त्यांनी सर्व धर्मग्रंथ अभ्यासून शोध घेतला. परंतु तसे त्यांना कोणत्याच धर्मग्रंथात आढळले नाही. हा भट भिक्षुकांचा बनाव आहे हे त्यांच्या पक्के लक्षात आले. शूद्रातिशूद्र आणि स्त्रिदास्या- विरुद्ध त्यांनी बंडाचे निशाण फडकावले. हजारो वर्षांपासून चालत आलेल्या सामाजिक व मानसिक गुलामगिरीविरुद्ध लढा देण्यासाठी त्यांनी रणशिंग फुंकले. यामुळे आधुनिक भारताच्या सामाजिक क्रांतीचा आरंभ झाला. सामाजिक क्रांतीच्या नव्या पर्वाची ही गंगोत्री होय.
जोतीरावांच्या समाजक्रांतीचा आलेख काढावयाचा झाल्यास शूद्रातिशूद्र, स्त्री-समाज, शेतकरी, शेतमजूर, गिरणी कामगार, अनिष्ठ रूढींना बळी पडणारे स्त्री-पुरुष आणि न्हावीसुद्धा त्यांच्या समाज सुधारणा कार्यक्षेत्रात आलेले आहेत हे विशेष होय. तळागाळातील बहुसंख्य समाज शिक्षित व जागृत झाल्याशिवाय स्वातंत्र्याला काही अर्थ नाही, असे त्यांचे मत होते. आज देशातील सुमारे ७० टक्के समाज निरक्षर व अज्ञानी असल्यामुळे आपली लोकशाही कशा पद्धतीने चालू आहे याचा कटू अनुभव आपण घेतच आहोत. सुधारणेच्या प्रत्येक क्षेत्रात त्यांनी जे विचार मांडले त्याप्रमाणे ते कृतीत आणले. उक्तीप्रमाणे कृती करणारा हा १९ व्या शतकातील एकमेव महात्मा म्हणावा लागेल.
      जय हिंद!

Sunday, 9 April 2023

भारतीय संस्कृती आणि समाज

डॉ अजितकुमार पाटील.( पीएच डी ,मराठी साहित्य )

संस्कृती आणि समाज हे मानवतेच्या विकासाचे दोन स्तंभ आहेत. मानव हा एक समाजशील प्राणी आहे. समाजाअभावी त्याचे जीवन व विकास याची कल्पनाच येत नाही. संस्कृती हे व्यक्तीचे जीवन उन्नत करण्याचे एक साधन आहे.जन्मापासून ते मृत्यूपर्यंत जे संस्कार केले जातात त्यालाच संस्कृती म्हणतात. "संस्कृती ही जीवन जगण्याची एक पद्धत आहे. शेकडो वर्षापासून तिचा समाजावर प्रभाव आहे. ज्या समाजात आपण जन्म घेतो ,ज्या समाजात व्यस्त रहाते, त्या समाजाची संस्कृती हीच व्यक्तीची संस्कृती असते. 
टायलरच्या मते, " सर्व व्यवहार प्रतिमानांच्या समग्रतेला संस्कृती म्हणतात. संस्कृती हा सामाजिक आविष्काराचा अभिनव परिणाम आहे. "

संस्कृती ही काही स्थिर वस्तू नसून एक निरंतर विकास पावणारी प्रक्रिया आहे. समाजाच्या मान्यता, मानवतावादी आदर्श, मूल्यांचे संघटन आहे. वेळोवेळी होणाऱ्या परिवर्तनांना आत्मसात करीत तिचा प्रवाह चालू असतो. संस्कृतीच्या या प्रवाहाला रोखणे हास्यास्पद ठरेल. आज जग सतत बदलत आहे.कारण हे विज्ञान युग आहे. परिवर्तनापासून समाज दूर राहू शकत नाही. संस्कृती सदैव नवी सभ्यता आणि नव्या मान्यतांच्या शोधात असते. समाज बदलत असतो. ज्या समाजाने या बदलांची अपेक्षा केली त्यांचे पतन झाले याला इतिहास साक्षीदार आहे. संस्कृती आपणास उदार करते. आंतरिक शक्तीला जागृत करण्याची प्रेरणा व प्रोत्साहन देते. ती आपणास सर्व मानवतावादी गुणांना स्वीकारण्याची प्रेरणा देते. ज्यामुळे आपण श्रेष्ठ जीवन जगू शकू, परोपकार करू शकू, शांती मिळवू शकू. धर्माप्रमाणे आचरण करु शकू या संस्कृतीचा स्वीकार करूनच आपण सुसंस्कृत व भारताचा आदर्श नागरिक बनू शकतो.

संस्कृती आणि समाज परस्परावलंबी असतात. संस्कृतीनुसारच समाजाची जीवनशैली विकसित होते. जर समाज उन्नत झाला तर संस्कृतीची ध्वजा फडकेल. जर समाज पडला तर संस्कृती लुप्त होईल. तिचे नामोनिशाणही राहणार नाही. म्हणूनच संस्कृतील समाजाचा अंतरात्मा मारले जाते. संस्कृतीची निर्मिती शेकडो युगांच्या प्रक्रियेनंतर होत असते. मानव जी काही आध्यात्मिक, वैज्ञानिक,सामाजिक, भौतिक,सांस्कृतिक, तात्त्विक प्रगती करतो त्याचा सबंध आपल्या संस्कृतीशी असतो. प्राचीन काळापासून आपण जी जीवनपद्धती स्वीकारली आहे.ती जीवनशैली मानवाच्या विकासाचा परिचय करून देणारी ठरत असते.म्हणून भारतीय संस्कृती ही जिवंत संस्कृत आहे. ती अजरामर आहे. ती सतत निरंतर चालत राहण्याचा संदेश देते. आपण आपल्या प्राचीन परंपराही सोडल्या नाहीत व आधुनिकतेच्या उपयुक्ततेलाही नाकारले नाही.म्हणजे च आपण व आपले विचार हे राष्ट्र घडविण्यासाठी, देश प्रगती करण्यासाठी सतत झटत असतो.

समाज आणि संस्कृती दोन्ही मानवासाठीच आहेत. दोन्ही मिळूनच परिपूर्णत करू शकतील व आजच मानवी परिपूर्ण बनेल, दोघांच्या समन्वयाच्या प्रयत्ना एक असा भारत बहुजन हिताय बहुजन सुखाय'चा
 विवेकी संदेश मानवतेच्या दृष्टीकोनातून समाजाला मार्गदर्शक ठरेल यात शंका नाही.

         जय हिंद !
डॉ अजितकुमार पाटील,
) पीएच डी मराठी साहित्य )

विधानपरिषदेसाठी " ग्रामपंचायत " लोकप्रतिनिधीना मतदानाचा अधिकार मिळावा, हेरले ग्रामपंचायतीच्या वतीने ठराव

हेरले / प्रतिनिधी

    विधानपरिषदेसाठी ग्रामीण भागातील 
" ग्रामपंचायत " या महत्वपूर्ण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लोकप्रतिनिधीना मतदानाचा अधिकार मिळावा अशी मागणी हेरले ग्रामपंचायतीच्या वतीने
लोकनियुक्त सरपंच राहुल शेटे यांनी ठरावाद्वारे  केली आहे.महाराष्ट्रातील पहिलीच ग्रामपंचायत विधानपरिषदेला ग्रामपंचायत सदस्यांना मतदानाचा अधिकार मिळावा अशा मागणीचा ठराव करणारी आहे अशी माहिती सरपंच राहुल शेटे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली.
     ठरावातील आशय,सरपंच यांचे परवानगीने आयत्यावेळी घेण्यात येणारे विषय विषय नं. ८ : ग्रामपंचायत सदस्य यांना विधानपरिषदेला मतदानाचा अधिकार मिळणे बाबत. ठराव नं. ४९ : वरील विषयावर चर्चा करत असता चर्चेअंती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माधमातून नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सभापती यांना विधान परिषदमध्ये मतदान करता येते, याच पार्श्वभूमीवर " ग्रामपंचायत " ही घटनात्मक दृष्ट्या स्थानिक स्वराज्य संस्था आहे. सर्वात जास्त प्रमाणात लोक प्रतिनिधी हे ग्रामपंचायत स्तरावर आहेत. ग्रामपंचायतीला ग्रामीण भागात देशाच्या विकासाचा केंद्र बिंदू म्हणून संबोधले जाते. त्याच बरोबर घटनेच्या नियमानुसार या गोष्टीचा आढावा घेवून ग्रामीण भागात कार्यरत असलेल्या " ग्रामपंचायत " या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून विधानपरिषदेमध्ये महसूल विभागवार सदस्याची संख्या वाढवावी त्यामुळे सर्व समावेशक ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थेला न्याय व हक्क मिळेल, म्हणून ग्रामपंचायतीतील सर्व सदस्य यांना विधान परिषद मध्ये मतदान करण्याचा अधिकार मिळावा अशी सर्व सदस्यांची मागणी आली असल्याने  मुख्यमंत्री  यांना या ठरावाने ग्रामपंचायतीतील सर्व सदस्य यांना विधान परिषद मध्ये मतदानाचा अधिकार  मिळावा अशी मागणी करण्यात यावी अशा मागणीचा ठराव करण्यात आला सूचक :  मनोज मलगोंडा पाटील व अनुमोदक : राकेश सर्जेराव जाधव आदी आहेत. हा ठराव ग्रामविकास अधिकारी बी. एस. कांबळे व सरपंच राहुल शेटे यांच्या सहीने सर्वानुमते मंजुर करण्यात आला.

Friday, 7 April 2023

श्री हनुमान देवस्थान ट्रस्ट हेरले (ता. हातकणंगले) यांच्या वतीने श्री हनुमान जन्मोत्सव साजरा

हेरले / प्रतिनिधी
 श्री हनुमान देवस्थान ट्रस्ट  हेरले 
(ता. हातकणंगले) यांच्या वतीने 
श्री हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला. श्री हनुमान जयंती विविध धार्मिक कार्यक्रमांनी  थाटामाटात व भक्तीपूर्ण वातावरणात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
  बुधवारी रात्री श्री भजनी मंडळ यांच्या वतीने गुंडोपंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. गुरुवार पहाटे पाच वाजता  पुजारी राजू गुरव, वसंत गुरव, गुंडोपंत गुरव यांनी पूजा, मंत्रपठन, पुष्पाजंली अर्पण करून व अभिषेक  भूपाल रुईकर, नंदकुमार माने, विजय कारंडे, संतोष भोसले  यांच्या हस्ते घालून धार्मिक कार्यक्रम संपन्न होऊन सकाळी हनुमान जन्मोत्सोव सोहळा संपन्न झाला. 
   फुलांनी सजविलेल्या पालखीमध्ये हनुमतांची मुर्ती व गदेची पूजा करून 
श्रीहनुमान मंदिररास तीन प्रदक्षिणा घालण्यात आल्या. 'श्री रामभक्त हनुमान की जय' या जयघोषात  पालखी सोहळा संपन्न झाला. दुपारनंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. या सोहळ्यात हनुमान भक्त मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्याने मंदिर परिसरात मोठी गर्दी झाली होती. रांगेन जाऊन भक्तांनी दर्शन घेतले.
       या हनुमान जयंती सोहळ्याच्या कार्यक्रमाचे संयोजन  भुपाल रुईकर, विजय कारंडे , संतोष भोसले, नंदकुमार माने, विजय पाटील, पांडुरंग शिंदे, अमोल कारंडे, पांडुरंग डांगे, दत्ता भोसले, सुनील कारंडे, बाळ चौगुले, जयसिंग गडकरी, मंदार गडकरी आदींनी केले.
    

Thursday, 6 April 2023

जय हनुमान दुध संस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध



हेरले / प्रतिनिधी  

मौजे वडगाव (ता. हातकणंगले) येथील मौजे वडगाव तसेच पंचक्रोशीमध्ये दुग्ध व्यावसाय क्षेत्रामध्ये अल्पावधीत नाव लौकिक प्राप्त केलेल्या जय हनुमान सह. दुध व्याव . संस्थेची पचवार्षिक निवडणूक बिनविरोध करण्यात आली. संस्थेच्या पंचवार्षिक निवडणूकीत संचालक मंडळाच्या ११ जागासाठी ११ जणांचे अर्ज शिल्लक राहिल्याने हनुमान दुध संस्थेची निवडणूक बिनविरोध झाल्याची माहीती निवडणूक निर्णय अधिकारी एन. पी. दवडते यांनी दिली.
        नुतन बिनविरोध झालेले संचालक मंडळ असे : बाळासो थोरवत , सतिशकुमार चौगुले, सुभाष मुसळे, महादेव चौगुले, रावसो चौगुले , महादेव शिदे, नेताजी माने, शकिल हजारी, जयश्री यादव, इंदूबाई नलवडे, जयश्री रजपूत, यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एन. पी. दवडते व सहाय्यक म्हणून संस्थेचे सचिव आण्णासो पाटील यांनी काम पाहिले.