श्री सद्गुरु निरंजन महाराज आश्रम मौजे वडगांव ( ता. हातकणंगले) येथे सोमवार दि. 3 जुलै रोजी व्यासपूजा गुरुपौर्णिमानिमित्त आश्रमामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सुर्योदय ६:०७ वा. : 'श्री' चे पादुकांना अभिषेक,सकाळी ८:०० ते ९:००: नोंदणी व चहापान,सकाळी ९:०० ते ११:०० : भजन : श्री भजनी मंडळ, हेरले, तबला साथ शौकत गुरुजी हेरले,
सकाळी ११:०० ते ११:३० प्रवचन परमार्थभूषण ह.भ.प. श्री. नारायण एकल महाराज जोगेवाडी,सकाळी ११:३० ते १२:१५ प्रवचन ह.भ.प. श्री. गुरुवर्य मधुकर महाराज पाटील कावणे
दुपारी १२:१५श्रींचे पादुकांना बेल व फुले अर्पण,दुपारी १२:१५ ते १:१५ प्रवचन ह.भ.प.सद्गुरु श्री. श्रीपाद दि. भडंगे महाराज,श्री सद्गुरु हरयेनमः महाराज संस्थान सोलापूर,दुपारी १:१५ ते ३:३०: महाप्रसाद
दुपारी ३:३० ते ५:१५
: भजन श्री. सुधाकर ठाणेकर व सहकारी इचलकरंजी,सायंकाळी ५:१५ ते ५:३०चहापान,सायंकाळी ५:३० ते ६:३० प्रवचन ह.भ.प. श्री. विठ्ठल पाटील महाराज (तात्या) (शिरोली पुलाची)
सायंकाळी ६:३० ते ७:००: आशिर्वचन प. पू. सद्गुरु श्री आदिनाथ महाराज
सायंकाळी ७:१९ वा.: सुर्यास्त व आरती
श्री सद्गुरु निरंजन महाराज आश्रमामधील या सर्व कार्यक्रमाचा सद्भक्तांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन श्री सद्गुरु निरंजन महाराज चॅरिटेबल ट्रस्ट, मौजे वडगांव यांच्या वतीने करण्यात आले आहे.