Friday, 29 March 2024

आम्रपाली बनली,नागांव बौद्ध समाजातील पहिली 'डॉक्टर'


हेरले /प्रतिनिधी

 नागाव(ता.हातकणंगले)येथील आम्रपाली संजय कांबळे हिने B.A.M.S. ही पदवी डॉ.दिपक पाटील आयुर्वेदीक कॉलेज ,बोरपाडळे, कोल्हापुर येथुन शिक्षण घेऊन अतिशय कष्टाने मिळवली.
            वडील संजय यांच्या निधनानंतर त्यांची आई आक्काताई यांनी मोठ्या कष्टाने स्वतःचे घर सांभाळले. अनेकदा त्यांनी चारचौघीत आम्रपालीस 'डॉक्टर' करण्यांचे स्वप्न  बोलून दाखवले होते. तेच स्वप्न आज सत्यात उतरले आहे.
                      बारावीला ९०% च्यापुढे मार्क पडून नीट परिक्षेत अपयश मिळाले. नाराज न होता पुन्हा जोरदार अभ्यास करून नीट पास झाली,आणि शेवटी ती B.A.M.S डॉक्टर झालीच.
             वडिलांचा अकाली अपघाती मृत्यु व कौटुंबिक चढ‌उतार यावर मात करीत यश तिने ओढून आपल्या दारात आणले. 

         हे तिचे यश पहायला तिचे वडील आज हयात पाहीजे होते. त्यांच्या जीवनातील हा मौल्यवान क्षण अतिशय आनंदाने साजरा केला असता ,तो आनंद पाहण्याचे चित्रच वेगळे असते.अशा  भावना याप्रसंगी तिने व्यक्त केल्या.
            तिच्या या यशात वडिलांची कमतरता भरून काढणारी ,कणखर व  पाठीशी ठामपणे उभी राहणारी अशी आई आक्काताई,भाऊ सौरव व आजोळ 'अबंप ' चे आजोबा व मामा संतोष व संदीप यांचे अतिशय मोलाचा वाटा आहे.याचबरोबर कॉलेजचे अध्यक्ष डॉ.दिपक पाटील,डॉ.स्वाती पाटील,डॉ. समीर जमादार,डॉ.अमर अभरंगे, डॉ.केदार तोडकर यांचे मार्गदर्शन लाभले. तिच्या या उत्तुंग यशाने तिच्यावर नागाव पंचक्रोशीतुन शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Wednesday, 27 March 2024

लघु उद्योजक निखिल जगन्नाथ पाटील यांना उद्योग भुषण पुरस्कार

हेरले / प्रतिनिधी
येथील लघु उद्योजक निखिल जगन्नाथ पाटील यांना उद्योग भुषण पुरस्कार मिळाले बद्दल सरपंच सौ. पद्मजा करपे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी कमल कौंदाडे, सुजाता पाटील, मंगल शिंदे, मनिषा संकपाळ, हर्षदा यादव, धनश्री खवरे, कोमल समुद्रे, नजिया देसाई,वसिफा पटेल, दिपक यादव, बटील देसाई, नितीन चव्हाण, अमीत शेट्टी आदी उपस्थित होते.
स्वागत, प्रास्ताविक ग्रामविकास अधिकारी ए.वाय.कदम यांनी केले. आभार दिपक यादव यांनी मानले. 
फोटो.....
पुलाची शिरोलीत निखिल पाटील यांचा सत्कार करताना सरपंच सौ पद्मजा करपे. प्रसंगी ग्रामपंचायत पदाधिकारी.

नागाव फाटा येथे वाहतुकीची कोंडी वाढली,वाहतूक नियंत्रक नेमण्याची मागणी!


हेरले / प्रतिनिधी

सध्या पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ चे सहापदरी रस्ता बांधणीचे काम जलद गतीने सुरू आहे. पहिल्या टप्प्यात पुल (ब्रिज) चे काम प्राधान्याने सुरू आहे.त्यामुळे जेथे पुलाचे चे काम सुरू आहे,त्याठिकाणी वाहतूक सेवारस्त्यावरुन सुरु केली आहे. त्याचबरोबर मुख्य महामार्ग व सेवा रस्ता रुंदीकरणाचे कामही सुरू आहे.विशेषतः सांगली फाटा ते शिये फाटा या परिसरात सेवा रस्त्याची रुंदी खडीकरण करून सपाटीकरण करून वाढविण्यात आली आहे. या सेवा रस्यावरून दोन्ही बाजूनी वाहतूक सुरू आहे. या भागातील औद्योगिक वसाहत, शोरूम,ट्रान्सपोर्ट, मार्बल ,फर्निचर दुकाने या ठिकाणी येणाऱ्या वाहनांची वर्दळ प्रचंड मोठी आहे.विशेषतः  सायंकाळी ४ ते ७ वाजेपर्यंत हा रस्ता शिरोली एमआयडीसीतील कंपन्याची  जनरल सकाळची पाळी (शिफ्ट)सुटल्यांतर नागाव फाटा येथील चौकात चारही बाजूनी वाहने येत असल्याने वाहतुकीची कोंडी नित्याचीच बनली आहे. तसेच रस्ता आखूड झाल्याने वारंवार ट्रॅफिक जाम होत आहे.सायंकाळी शाळा सुटल्यानंतर  घरी जाणाऱ्या विद्यार्थ्यांस,पादचाऱ्यांना चालत जाणेही मुश्कील झाले आहे.तसेच सेवा रस्त्यावर सर्वत्र खडी विस्कटलेली आहे.यामुळे गाडी स्लिप होऊन अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.बऱ्याचवेळा नागाव गावचे पोलीस मित्र सागर जंगम हे वेळ मिळेल त्यावेळेस वाहतूक नियंत्रकाची भूमिका बजावून वाहतूक सुरळीत करण्यास मदत करत आहेत. त्यामुळे किमान सायंकाळी वाहन रहदारीच्या वेळी तरी शिरोली एमआयडीसी पोलिस अधिकारी  किंवा हायवे पोलिसांनी वाहतूक नियंत्रक नेमावा,जेणेकरून वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल,अशी मागणी वाहनधारक व स्थानिक नागरिकांच्यातून होत आहे.
फोटो.....
नागाव फाटा येथे वाहनांची झालेली कोंडी.

Saturday, 23 March 2024

वडगाव विद्यालयात गुणवंत महिलांचा सत्कार !

पेठ वडगाव /प्रतिनिधी
वडगाव विद्यालय व जुनिअर कॉलेज वडगाव मध्ये श्रीमती सुशीला देवी मल्हारराव देसाई युवती सचेतना फाउंडेशन तसेच इंडियन वुमेन सायंटिस्टस  असोसिएशन कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त गुणवंत महिलांचा सत्कार करण्यात आला.शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूरचे सेक्रेटरी  जयकुमार देसाई, पेट्रेन कौन्सिल सदस्य  दौलत देसाई, चेअरमन डॉ.सौ. मंजिरी मोरे देसाई यांच्या प्रेरणेतून व मार्गदर्शनातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळ डेळेकर  होते.विद्यालयाच्या पर्यवेक्षिका सौ. आर.आर.पाटील  यांनी कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक केले.कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या गोपाळ कृष्ण गोखले महाविद्यालय  येथील प्राध्यापिका सौ.मंजिरी कामत  व सौ.अंजली  पडवळ  यांनी सौ.एस.एस. चौगुले तसेच सौ.एस. ए.पाटील यांचा सत्कार केला त्यानंतर सौ. मंजिरी कामत  यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करून या संपूर्ण कार्यक्रमाची कल्पना ही संस्थेच्या चेअरमन डॉ. सौ मंजिरी मोरे देसाई यांची होती हे स्पष्ट केले.
या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळ डेळेकर,उपमुख्याध्यापक सुधाकर निर्मळे,पर्यवेक्षिका सौ. आर.आर.पाटील  तसेच विद्यालय व महाविद्यालयातील  शिक्षक,शिक्षिका तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.एस.ए.पाटील यांनी केले.तसेच आभार जी.व्ही मोहिते यांनी मानले.

Thursday, 21 March 2024

विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग पर्यावरणासाठी करावा -- अनिल चौगुले


कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समितीचे राजर्षी शाहू विद्यामंदिर शाळा क्रमांक 11 बावडा मध्ये होळी दिनाच्या निमित्ताने वनस्पतीजन्य रंग कार्यशाळा संपन्न झाली.
 कार्यशाळेचे प्रमुख व्याख्याते पर्यावरण मित्र अनिल चौगुले यांनी आपल्या परिसरातील फळे भाजा व इतर वनस्पतीजन्य पदार्थापासून कोणकोणत्या प्रकारचे रंग कोणकोणत्या खाद्यपदार्थांमध्ये वापरता येतात व त्यांचे पर्यावरणीय उपक्रम कोणकोणते चांगले असतात हे विद्यार्थी व माता पालक गटांना बचत गटांच्या महिलांना समजावून सांगितले.
 कार्यशाळेचे उद्घाटन शिक्षणाधिकारी श्रीमती अनुराधा म्हेत्रे प्रकल्प शिक्षणाधिकारी कोल्हापूर जिल्हा परिषद व केंद्र मुख्याध्यापक डॉ अजितकुमार  पाटील उत्तम कुंभार शैक्षणिक पर्यवेक्षिका उषा सरदेसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यशाळा सुरुवात झाली होती.
 बचत गटातील महिला माता पालक गटातील महिला व इतर मंत्रिमंडळातील विद्यार्थी व मुलींनी सहभाग उत्स्फूर्तपणे नोंदवला 45 महिलांनी कार्यशाळेमध्ये भाग घेतला होता महिलांना सक्षम करण्यासाठी 21 व्या शतकात विविध उपक्रम व लघुउद्योग उद्योजक सुरू करावेत अशी आवाहन शिक्षणाधिकारी अनुराधा म्हेत्रे यांनी आवाहन केले व विद्यार्थी मित्रांना शुभेच्छा दिल्या 
शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्ष अनुराधा गायकवाड यांनी हा भारत स्काऊट गाईडचा उपक्रम व मुलांच्या पर्यावरणीय उपक्रम अत्यंत उत्कृष्ट व शाळेचे मुख्याध्यापक डॉ अजितकुमार पाटील यांनी व त्यांच्या टीमने उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल सर्व शिक्षक व मुख्याध्यापक यांचे अभिनंदन केले असे उपक्रमांची सध्या महिलांना सक्षम बनण्यासाठी गरज आहे असे त्यांनी प्रतिपादन केले .
कार्यशाळेमध्ये प्राथमिक शिक्षण समितीच्या शैक्षणिक पर्यवेक्षिका उषा सरदेसाई मॅडम यांनी व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य यांनी विशेष सहकार्य केले शालेय मंत्रिमंडळ व शालेय भारत स्काऊट गाईड विद्यार्थी यांनी या कार्यशाळेमध्ये सहकार्य केले.
 या कार्यशाळेचे प्रास्ताविक डॉ केंद्रमुख्याध्यापक अजितकुमार पाटील यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तमेजा मुजावर आसमा तांबोळी विद्या पाटील अक्षरा माने,उत्तम पाटील सुशील जाधव मुख्याध्यापिका कल्पना पाटील सावित्री काळे सुप्रिया माने संध्या चौगुले आदिती बिरणगे गणेश घाडगे यश कांबळे साईराज दाभाडे व आभार उत्तम कुंभार यांनी मानले.

छत्रपती शिवाजी विद्यानिकेतन व ज्यु.कॉलेजच्या विद्यार्थ्यांची शालेय राष्ट्रीय आष्टेडू मर्दानी आखाडा स्पर्धेसाठी निवड

**

हेरले / प्रतिनिधी

 शिवाजी विद्यानिकेतन व ज्यु.कॉलेज व दिशा इंग्लिश मेडियम स्कूल पेठवडगाव या प्रशालेचा विद्यार्थी तन्मय सिद या विद्यार्थ्यांची शालेय राष्ट्रीय मर्दानी आखाडा स्पर्धेसाठी निवड झाली.
     क्रीडा व युवक सेवा संचालनालय,महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,भंडारा यांच्या वतीने घेण्यात आलेल्या शालेय राज्यस्तरीय आष्टेडू मैदानी आखाडा स्पर्धा जिंकल्याने तन्मय सिद याची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली.
स्पर्धेतील प्रशालेचे अन्य यशस्वी विद्यार्थी पुढील प्रमाणे - स्पर्धेतील प्रशालेचे अन्य यशस्वी विद्यार्थी पुढील प्रमाणे - 
*द्वितीय क्रमांक*
 ओंकार पाटील,विराज जगदाळे 
*तृतीय क्रमांक*
 यशवर्धन येवले,प्रथमेश मेथे,  उत्कर्ष पोवार 

या यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र माने,सचिवा सुवर्णा माने यांचे प्रोत्साहन लाभले व जिमखाना प्रमुख आनंद पाटील व प्रशिक्षक बाळासो पाटील,राहुल देवकुळे यांचे मार्गदर्शन लाभले तसेच मिलिटरी इन्स्ट्रक्टर राजेंद्र पाटील,सर्व विभाग प्रमुख, प्रशिक्षक व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

Wednesday, 20 March 2024

महाराष्ट्र शासनाच्या 15 मार्च 2024 च्या संच मान्यता धोरणा विरोधात शैक्षणिक व्यासपीठ तीव्र आंदोलन छेडणार



कोल्हापूर / प्रतिनिधी
      शिक्षक आमदार जयंत  आसगावकर
कोल्हापूर दिनांक --20. - महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने दिनांक 15 मार्च 2024 रोजी शाळांच्या संच मान्यतेचा काढलेला आदेश अन्यायकारक असल्याने या आदेशाविरुद्ध कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचे शिक्षक आमदार माननीय जयंत  आसगावकर यांनी आज प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस येथे झालेल्या शैक्षणिक व्यासपीठाच्या सभेत जाहीर केले ही सभा आमदार जयंत आसगावकर यांचे मार्गदर्शनाखाली व कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष एस.डी.लाड यांचे अध्यक्ष ते खाली संपन्न झाली
15 मार्च 2024 च्या शाळांच्या संच मान्यतेची कार्यवाही महाराष्ट्र शासनाने केल्यास शिक्षण क्षेत्राचे प्रचंड नुकसान होणार आहे एक ते वीस पटाखालील असंख्य शाळा बंद होणार असून हजारो शिक्षक अतिरिक्त ठरणार आहेत तसेच अनेक शाळातील मुख्याध्यापकांची पदे रद्द होणार आहेत शाळांना कला क्रीडा व व्यवसाय शिक्षण देणारे शिक्षक पुरेशा प्रमाणात प्राप्त होणार नाहीत. यामुळे विद्यार्थ्यांचे प्रचंड शैक्षणिक नुकसान होणार आहे म्हणून या आदेशाला शैक्षणिक व्यासपीठाचा विरोध असून हा शासन आदेश रद्द होणे आवश्यक आहे. नाहीतर त्याविरुद्ध कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ लवकरच तीव्र आंदोलन करणार आहे.
या सभेत शैक्षणिक व्यासपीठाच्या अनेक सदस्यांनी आपापली मते व्यक्त करून महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने घेतलेल्या या निर्णयाविरोधात तीव्र नापसंती व्यक्त केली आभार प्राध्यापक सीएम गायकवाड यांनी मानले. 
      या सभेस शिक्षक नेते दादासाहेब लाड,
 डॉ. के.जी. पाटील, प्रा.विनय पाटील,सविता पाटील. सुरेश संकपाळ.  व्ही.  जी.पोवार, बाबासाहेब पाटील, राजाराम वरुटे, खंडेराव जगदाळे, सुधाकर निर्मळे, सुधाकर सावंत, आर वाय पाटील, राजेंद्र पाटील, रवी कुमार पाटील, उमेश देसाई, राजेश वरक,उदय पाटील,, के एच भोकरे, सुदेश जाधव,श्रीधर गोंधळी,प्रभाकर हेरवाडे, प्रसाद पाटील,आर डी पाटील,मनोहर जाधव, संतोष आयरे, अरुण मुजुमदार, श्रीकांत पाटील. सुंदर देसाई, एस.जी.पाथरे,आर बी पाटील, उपस्थित होते.

गणिताची जिज्ञासा वाढवत आहे गणितायन - सुभाष चौगुले

हेरले / प्रतिनिधी
मापनाचा इतिहास मुलांना अधिक समजावा यासाठी दीपक शेटे यांनी उभी केलेली गणितायन लॅब गणिताची जिज्ञासा वाढवत आहे असे उद्गार महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ कोल्हापूर विभागाचे सचिव सुभाष चौगुले यांनी बक्षीस वितरण प्रसंगी काढले .
महाराष्ट्रामध्ये वेगळेपण ठरत असणारी गणितीय गणितायन लॅबच्या उद्घाटन निमित्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते . 
विद्यार्थ्यांना गणिताची गोडी लागावी यासाठी राबवत असलेले उपक्रम हे कौतुकास्पद आहेत असे उद्गार शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ .डी .टी .शिर्के यांनी याप्रसंगी काढले .
प्रथम - श्रावणी शेखर शिंदे
द्वितीय संध्या सचिन लंबे
द्वितीय  सई विश्वास पाटील
तृतीय संस्कृती संतोष चव्हाण
तृतीय  शिवानी विनोद राम
मान्यवरांच्या उपस्थितीत यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला .या स्पर्धेचे नियोजन कौतुक विद्यालयाचे कलाशिक्षक अतुल सुतार यांनी केले परीक्षक शिवराज धनवडे,अभिजीत भिसे, स्वप्निल लंबे यांनी केले . त्यांचाही मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणितांचे संकल्पक डॉ दीपक शेटे यांनी केले .
सूत्रसंचालन राजेद्र पिष्टे यांनी केले.
या प्रसंगी माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. एकनाथ आंबोकर,प्रा .डॉ . एस एच ठकार , प्रा .डॉ . शिवाजी सादळे, शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष सर्जेराव लाड , विलास आंबोळे,उद्योगपती सुधाकर तोडकर, प्राचार्य महानंदा, विजय गायकवाड , माणिक कोरे ,आदी  गणित प्रेमी शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते .

Tuesday, 19 March 2024

हेरले येथे लोकवस्तीत इंडस टॉवर कंपनीचा टॉवर उभारण्यास तीव्र विरोध


हेरले /प्रतिनिधी

     हेरले येथील सिद्धेश्वर नगर,संजय गांधी नगर, वीर हनुमान नगर परिसरात इंडस टॉवर लिमेडेड कंपनीचे टॉवर बांधण्यात येणार आहेत. टॉवर नियमाप्रमाणे हा लोकवस्तीत नसावा त्या टॉवरच्या आसपास शाळा, दवाखाने नसावेत असे नियम असतांना हे सर्व नियम धाब्यावर बसवत इंडस टॉवर लिमिटेड या कंपनीने येथे टॉवर बांधण्याचा घाट घातला आहे.
   या परिसरात उर्दू शाळा, केंद्र शाळा, कन्या शाळा,शाळा नंबर दोन आदी ज्ञानमंदीरामध्ये हजारो मुले शिक्षण घेत आहेत. टॉवर बांधण्यासाठी लागणारे बांधकाम परवाना सर्टिफिकेट व शेजाऱ्यांची मान्यता असलेले पत्र आजवर या टॉवर मालकांनी येथील नागरिकांना दाखवलेले नाही. येथील नागरिकांशी कोणतीही चर्चा केली नाही. हा टॉवर होऊ नये म्हणून येथील नागरिकांनी ग्रामपंचायत व तलाठ्यांना लेखी तक्रारी अर्जावर येथील राहणाऱ्या सर्व नागरिकांनी सहृया करून दिल्यानंतरही त्यांना उत्तर न देता इंडस टॉवर लिमिटेडचे पदाधिकारी येथील नागरिकावर दबाव आणून टॉवरचे बांधकाम सुरू करण्याचे चालू ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. तरी याला वेळीच लगाम लावून टॉवरचे बांधकाम बंद करावे व हेरले येथील गट क्रमांक ७/अ व ७ ब मधील इंडस टॉवर लिमिटेडचे मोबाईल टॉवर बांधकामापासून लोकवस्तीचे अंतर मोजून द्यावे असे लेखी निवेदन गोविंद आवळे व अमिर जमादार यांनी सिद्धेश्वर नगर,हनुमान नगर, राजीव गांधी नगर व समस्त ग्रामस्थ यांच्या वतीने गावकामगार तलाठी यांना दिले आहे.न्याय न मिळाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा येथील समस्त नागरिकांनी दिला आहे.
फोटो 
हेरले: येथील सिद्धेश्वर नगर,संजय गांधी नगर, वीर हनुमान नगर परिसरात इंडस टॉवर लिमेडेड कंपनीचे टॉवर बांधण्यात येणार आहे त्या विरोधात एकत्रित नागरिकांच्या सभेत बोलतांना गोविंद आवळे व अन्य मान्यवर.

Sunday, 17 March 2024

दुध संकलनात मौ.वडगांवची जय हनुमान दूध संस्था हातकणंगले तालुक्यात प्रथम.


 हेरले / प्रतिनिधी

कोल्हापूर जिल्हा सह‌कारी दूध उत्पादक संघ(गोकुळ) च्या ६१ व्या हिरकमहोत्सवी वर्धापनदिना निमीत्त जाहीर करण्यात आलेल्या संपूर्ण कोल्हापूर जिल्हयातील बारा तालुक्यातील प्रथम क्रमांक आलेल्या सर्व संस्थाना गोकुळ चेअरमन अरूण डोंगळे व जेष्ट संचालक विश्वास पाटील यांचे हस्ते रोख रक्कम व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. यावेळी हातकणंगले तालुक्यातील तय हनुमान संस्थेस तालुका प्रथम क्रमांक प्रशस्तीपत्र व बक्षीस देण्यात आले. 
जय हनुमान सहकारी दूध व्याव संस्था  मर्या. मौ.वडगांव या संस्थेचा सन २०२२- २३ मध्ये हातकणंगले  तालुक्यात प्रथम क्रमांक आला. संस्था चेअरमन सतिश चौगुले व्हा.चेअरमन नेताजी माने यांनी चेअरमन अरूण डोंगळे व जेष्ठ संचालक विश्वास पाटील यांचे हस्ते रोख रक्कम व प्रमाणपत्र स्वीकारले.
जय हनुमान सहकारी दूध  व्यावसायिक संस्था मर्या. मौ. वडगांव  ही संस्था सन २००७ ला स्थापन झाली. १७ वर्षात संस्थेने उच्च्यांकी दुध फरक बिल देवून संस्थेचे नांव जिल्हयाच्या कानाकोपऱ्यात पोहचवले आहे. 
सदरची संस्था मार्गदर्शक कै. बाळकृष्ण यादव यांच्या आशीर्वादाने, संस्थापक चेअरमन बाळासो थोरवत, संस्थापक व्हा.चेअरमन व विद्यमान चेअरमन सतिश चौगुले, माजी चेअरमन महादेव शिंदे,नेताजी माने, जयवंत चौगुले यांच्या मार्गदर्शना खाली यशस्वीपणे सुरु आहे.
गेल्या चार वर्षात संस्थेने गाय दुधाला प्रतिलिटर ५ रु व म्हैस दुधास प्रतिलिटर १० रु इतके उच्चांकी दिपावली फरक बिल दिले आहे. संस्थेने सभासदांचा विमा, जनावरांचा विमा, वैरण, बियाणे, चॉपकटर , दुध किटली , दुध अॅडव्हान्स व ३ , १३, २३ या तारखेला दर दहा दिवसांनी गोकुळकडून जमा होणारे दुध बिल  वाटप प्रत्येक सभासदाच्या खातेवर जमा करत आले आहेत, तर संपूर्ण व्यवहार हा कॅशलेश पध्दतीने सुरू आहे. याकामी संस्था सचिव आण्णासो पाटील यांचे मोलाचे योगदान  आहे.

विद्यमान संचालक मंडळाने संस्थेला जागा खरेदी करून सुमारे २५ लाख रू. इतक्या बजेटची संस्थेची स्वतःची इमारत उभी करण्यात सिंहाचा वाटा उचलला आहे. 
या संस्थेच्या जडणघडणीमध्ये संस्थेचे चेअरमन सतिश चौगुले, व्हा.चेअरमन इंदूताई नलवडे, संचालक बाळासो थोरवत, महादेव, शिंदे, नेताजी माने, रावसो भू.चौगुले, शकील हजारी, सुरेश कांबरे, जयवंत चौगुले,सुभाष मुसळे, महादेव चौगुले, संचालिका जयश्री यादव, जयश्री रजपूत, संस्था सचिव आण्णासो पाटील, कर्मचारी विलास घुगरे, सोमनाथ जंगम, वर्षा कांबळे व दूध उत्पादक, शेतकरी, ग्राहक आदींचे योगदान आहे.
फोटो.....
मौजे वडगाव येथील जय हनुमान दूध संस्थेस प्रशस्तीपत्र व बक्षीस देवून गौरवताना चेअरमन अरचण डोंगळे, संचालक विश्वासराव पाटील व मान्यवर पदाधिकारी.

हेरले (ता.हातकणंगले) येथील अँड. प्रशांत आर. पाटील यांची नोटरीपदी निवड

हेरले /प्रतिनिधी


हेरले (ता.हातकणंगले) येथील अँड. प्रशांत आर. पाटील,  अँड. सुप्रिया कोरेगावे , अँड.सीमा  काशिद, अँड संदीप  चौगुले आदी  चार वकिलांची  नोटरीपदी निवड झाल्याने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
   भारत सरकारच्यावतीने व सुप्रीम कोर्टाचे गाईडलाईन्स नुसार नोटरी अडवोकेट परीक्षा 2023 मध्ये घेण्यात आलेल्या होत्या. या परीक्षेमध्ये एडवोकेट प्रशांत आर. पाटील,एडवोकेट सुप्रिया कोरेगावे, एडवोकेट सीमा काशीद, एडवोकेट संदीप चौगुले या सर्वांची नोटरी एडवोकेट  निवड करण्यात आलेली आहे.

Thursday, 14 March 2024

मनपा न्यू पॅलेस स्कूल मध्ये महिला दिन उत्साहात संपन्न


कोल्हापूर प्रतिनिधी 

मनपा न्यू पॅलेस स्कूलमध्ये महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पतंजली योग शिक्षिका  सामाजिक कार्यकर्त्या सौ. गीतांजली ठोमके, रिटायर प्राध्यापिका सौ. रश्मी ताम्हणकर, सौ ज्योती घाडगे, सामाजिक कार्यकर्त्या  सौ सविता पाटील, शाळेच्या मुख्याध्यापिका   सौ विमल जाधव यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शाळेचा माजी विद्यार्थी गुरु मुगडे याची इंडियन आर्मी मध्ये निवड झाल्याबद्दल शाळेच्या वतीने   सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेतील विद्यार्थिनींनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम उत्कृष्टरित्या सादर केले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ निकिता झोरे, शाळेतील शिक्षिका सौ वैशाली पाटील, सौ पूनम कोळी, श्री सुनील कुरणे, श्री साताप्पा पाटील, श्री अरुण सुनगार, श्री दिपक संकपाळ यांचे अनमोल सहकार्य लाभले.पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Tuesday, 12 March 2024

दीपक शेटे यांनी ‘गणितायन‘मधून नवसंजीवनी दिली - डी. टी. शिर्के

 : नागाव येथे मापनाच्या लँबचे उद्घाटन

हेरले / प्रतिनिधी
अध्यापक डॉ. दीपक शेटे यांनी दुर्मीळ मापनाच्या विविध संग्रहातून नव्या पिढीला मापनाचा इतिहास कळावा, या दृष्टीने उभारलेली गणितायन लँब नवसंजीवनीच आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी केले. 
नागाव (ता. हातकणंगले) येथे सोमवारी सुमारे ३००० पेक्षा जास्त मापने असलेल्या गणितायन लँबच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचे सचिव सुभाष चौगले प्रमुख पाहुणे होते. शिक्षणाधिकारी डॉ. एकनाथ आंबोकर, गणिततज्तज्ञ विलास आंबोळे, सुधाकर तोडकर, प्राचार्या महानंदा घुगरे प्रमुख उपस्थित होत्या.
सुभाष चौगले म्हणाले की, देशातील विविध ठिकाणाहून डॉ. शेटे यांनी दुर्मीळ मापनांचे केलेले संकलन विद्यार्थ्यांना गणित विषयाची जिज्ञासा वाढविणारे ठरत आहे. डॉ. आंबोकर म्हणाले, विद्यार्थ्यांना गणितायनमधील मापनाचा इतिहास जाणून घेण्यासाठी शाळांनी पुढाकार घ्यावा.
राजेंद्र पिस्टे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. विवेक शेटे यांनी आभार मानले. यावेळी शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष सर्जेराव लाड, शिवाजी विद्यापीठाच्या गणित विभागप्रमुख प्रा.डॉ. एस. एच. ठकार, प्रा.डॉ. शिवाजी साबळे, सुजाता शेटे, विजय गायकवाड, सदाशिव दान्ननवर , महादेव दान्ननवर आदी उपस्थित होते


Saturday, 9 March 2024

नागावमध्ये गणितायन लॅबचे उदघाटन


नागाव : येथील अध्यापक डॉ. दीपक शेटे यांनी उभा केलेल्या दुर्मिळ वस्तूंचे संग्रहालय गणितायन लॅबचे उद्या सोमवारी (दि. ११) दुपारी चार वाजता शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या हस्ते  उदघाटन होणार आहे. विद्यार्थ्यांना गणित विषयात आवड निर्माण व्हावी आणि ते समजायला अधिक  सोपं व्हावं या हेतूने या लॅबची उभारणी केली आहे.
      यावेळी प्रकुलगुरू प्रा. डॉ . पी एस पाटील डॉ . कुलसचिव व्ही एन शिंदे शिक्षणाधिकारी डॉ .एकनाथ आंबोकर गणित विभाग प्रमुख प्रा .डॉ . एस एच ठकार डॉ . डी एस घुगरे,सचिव एम ए परीट पाहुणे  तसेच शिक्षण क्षेत्रातील मान्यवर व अधिकारी वर्गांच्या गणित प्रेमी शिक्षक व विद्यार्थी उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार आहे .अशी माहिती गणित संग्रह महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक डॉ. दीपक शेटे यांनी दिली .

स्वच्छ सुंदर शाळांचा आदर्श सर्व शाळांनी घ्यावा - कौस्तुभ गावडे.

कोजिमाशि पतसंस्थेच्या वतीने ' मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा ' पुरस्कार प्राप्त शाळांचा मानपत्र देऊन गौरव.

कोल्हापूर  /प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित केलेल्या 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा'  या  अभियानात तालुका स्तर, व शहर स्तरावर प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त झालेल्या शाळांना कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवक सहकारी पतसंस्थेच्या वतीने मानपत्र ,कोल्हापुरी फेटा,भिंतीवरील घड्याळ या स्वरूपात गौरविण्यात आले. कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघात संपन्न झालेल्या या  कार्यक्रमास प्रमुख पाहुणे स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे सीईओ कौस्तुभ गावडे होते .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  माध्यमिक उपशिक्षणाधिकारी अजय पाटील होते.    

        याप्रसंगी बोलताना  कौस्तुभ गावडे म्हणाले,  'मुख्यमंत्री माझी शाळा ,सुंदर शाळा' या स्पर्धेमध्ये सर्वच शाळांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने आपली शाळा सुंदर बनविण्याचा खूप चांगला प्रयत्न केला. शाळांचे अंतरंग व बाह्यरंग सुंदर बनविण्याबरोबरच उत्तम निकाल, स्वच्छता, बोलक्या भिंती, वृक्षारोपण व नावीन्यपूर्ण उपक्रम अशा सर्वच बाबीत जिल्ह्यातील सर्वच शाळांनी खूप चांगली तयारी करून सहभाग घेतला. या स्पर्धेत तालुकास्तरावर व शहर स्तरावर  क्रमांक आलेल्या शाळांचे मन:पूर्वक अभिनंदन. पुरस्कार प्राप्त शाळांचा आदर्श इतर शाळांनीही घेऊन आपली शाळा सर्व पातळीवर  स्वच्छ व सुंदर बनवावी असा संदेश गावडे यांनी दिला.
    कार्यक्रमाचे अध्यक्ष उपशिक्षणाधिकारी अजय  पाटील म्हणाले, खऱ्या अर्थाने या स्पर्धेमुळे जिल्ह्यातील शाळांना नवचैतन्य प्राप्त झाले आहे. यशस्वी  शाळांना मानपत्र देऊन या शाळांच्या पाठीवर कौतुकाची थाप कोजिमाशि पतसंस्थेने दिली आहे. असे गौरव उद्गार अजय पाटील यांनी काढले.
      उपस्थितांचे  स्वागत व प्रास्ताविक कोजिमाशि पतसंस्थेचे तज्ञ संचालक शिक्षक नेते दादासाहेब लाड यांनी केले.अत्यंत कमी कालावधीमध्ये हा कार्यक्रम आयोजित करून या सर्व शाळांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यात येत आहे. सर्वच पुरस्कार प्राप्त शाळांचे मनःपूर्वक अभिनंदन दादासाहेब लाड यांनी केले.
     यावेळी पुरस्कार  प्राप्त शाळा प्रथम क्रमांक आदर्श गुरुकुल विद्यालय व जुनिअर कॉलेज पेठ वडगाव, द्वितीय रयत गुरुकुल विद्यानिकेतन कुंभोज ,तृतीय डी के टी ई हायस्कूल इचलकरंजी, गगनबावडा तालुका प्रथम माध्यमिक विद्यालय सांगशी,द्वितीय माध्यमिक विद्यालय शेळोशी ,तृतीय दत्ताजीराव मोहिते पाटील माध्यमिक विद्यालय तिसंगी, राधानगरी तालुका प्रथम श्री नागेश्वर हायस्कूल राशिवडे बुद्रुक, द्वितीय श्री किसनराव मोरे हायस्कूल सरवडे, तृतीय आ.नामदेवराव भोईटे हायस्कूल कसबा वाळवे ,पन्हाळा तालुका  प्रथम वारणा विद्यालय वारणानगर, द्वितीय संजीवनी विद्यालय सोमवार पेठ पन्हाळा, तृतीय आ.ब.सरनोबत गर्ल्स  हायस्कूल आसुर्ले पोर्ले ,करवीर तालुका प्रथम आदर्श हायस्कूल भामटे ,द्वितीय श्रीमती बी के पाटील हायस्कूल गिरगाव ,तृतीय आंबूबाई पाटील इंग्लिश मीडियम स्कूल गोकुळ शिरगाव ,शाहूवाडी तालुका प्रथम श्री निनाई माध्यमिक विद्यालय करुंगळे, द्वितीय दत्त सेवा विद्यालय तुरुकवाडी, तृतीय नागेश्वर हायस्कूल  वारूळ, भुदरगड तालुका प्रथम जवाहर हायस्कूल निळपण, द्वितीय श्रीमंत छात्र जगतगुरु विद्यालय मठगाव, तृतीय कुमार भवन पुष्पनगर, शिरोळ तालुका प्रथम देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार हायस्कूल राजापूर, द्वितीय ताराबाई अण्णासाहेब नरंदे हायस्कूल नांदणी ,तृतीय चैतन्य पब्लिक स्कूल अब्दुललाट, कागल तालुका प्रथम सरलादेवी माने हायस्कूल कागल, द्वितीय मळगे विद्यालय मळगे बुद्रुक, तृतीय दूधगंगा विद्यालय धरणग्रस्त वसाहत कागल, कोल्हापूर शहर प्रथम कोल्हापूर पब्लिक स्कूल कोल्हापूर, व्दितीय सेंट झेवियर्स हायस्कूल कोल्हापूर,तृतीय दादासाहेब मगदूम हायस्कूल कोल्हापूर अशा ३८ शाळांना मानपत्र देऊन गौरविण्यात आले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी पाटील यांनी केले. आभार कोजिमाशि पतसंस्था  चेअरमन उत्तम पाटील यांनी मानले.   

         यावेळी मुख्याध्यापक संघ सचिव दत्ता पाटील,विनाअनुदानित शाळा कृती समिती राज्य अध्यक्ष खंडेराव जगदाळे, डी सी पी एस राज्य अध्यक्ष करण सरनोबत,कोजिमाशि पतसंस्था व्हा.चेअरमन श्रीकांत कदम, संचालक बाळ डेळेकर,अनिल चव्हाण, डॉ. डी. एस घुगरे,प्रकाश कोकाटे, राजेंद्र रानमाळे, शरद तावदारे, पांडुरंग हळदकर, दीपक पाटील, श्रीकांत पाटील, सुभाष खामकर, मदन निकम, मनोहर पाटील, राजेंद्र पाटील, अविनाश चौगले, सचिन शिंदे, राजाराम शिंदे, जितेंद्र म्हैशाळे, ऋतुजा पाटील, शीतल हिरेमठ, सीईओ जयवंत कुरडे, डेप्युटी सीईओ उत्तम कवडे, कोजिमाशि पतसंस्था माजी चेअरमन कैलास सुतार, संजय डवर, अरविंद किल्लेदार,सुभाष पाटील तसेच पुरस्कार प्राप्त शाळांचे  मुख्याध्यापक,शिक्षक - शिक्षकेत्तर कर्मचारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो 
कोजिमाशि पतसंस्थेच्या वतीने ' मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा ' पुरस्कार प्राप्त शाळांचा मानपत्र देऊन गौरव प्रसंगी शाळा प्रतिनिधी

Thursday, 7 March 2024

एकविसाव्या शतकातील महिलांचा शैक्षणिक उपक्रमांद्वारे विकास शक्य."डॉ अजितकुमार पाटील, कोल्हापूर

"

एकविसाव्या शतकातील स्त्री ही अबला नसून सबला आहे.कारण स्रियांच्या विकासासाठी व आरोग्यासाठी विचार करणे गरजेचे आहे.भारताच्या एकूण लोकसंख्येच्या ४८% महिला आहेत. त्यांचा विकास आणि सामाजिक-आर्थिक क्षेत्रातील वाढ देखील अर्थव्यवस्थेच्या शाश्वत वाढीसाठी पाऊल निश्चित करते. स्त्री-पुरुष समानतेचे तत्त्व भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावना, मूलभूत अधिकार, मूलभूत कर्तव्ये आणि राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये संरक्षित आहे. भारतातील महिलांना संविधान अधिकृतपणे गुणवत्ता प्रदान करते. महिलांसाठी विविध उपयुक्त कायदे आणि योजना आणि धोरणे बनवून महिलांच्या बाजूने सकारात्मक दृष्टीकोनातून उपाययोजना करण्याचा अधिकारही भारतीय संविधानाने राज्याला दिला आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात असे म्हटले आहे की कुटुंब आणि समाजाचे जीवन आणि आरोग्य सुधारण्यासाठी महिलांसाठी शिक्षण हा एकमेव प्रभावी मार्ग आहे. शिक्षण असलेली स्त्री ही एक शक्तिशाली व्यक्ती आहे; तिच्याकडे तिच्या कुटुंबातील मुलांना शिक्षित करण्याची, प्रभावी निर्णय घेण्यासाठी मार्गदर्शन करण्याची, आर्थिकदृष्ट्या योगदान देण्याची आणि घर आणि समाज दोन्हीच्या सुधारणेसाठी मौल्यवान इनपुट देण्याची शक्ती आहे. देशाच्या लोकसंख्येपैकी जवळपास निम्मी लोकसंख्या स्त्रिया आहेत, जेव्हा 50% लोकसंख्या शिक्षणाशिवाय राहते - एक राष्ट्र अविकसित राहते. सशक्त महिला समाज, समुदाय आणि राष्ट्राच्या विकासात अनेक प्रकारे योगदान देतात.
2011 च्या जनगणनेनुसार, भारतात पुरुष (82.14%) आणि महिला (65.46%) साक्षरतेच्या दरामध्ये खूप मोठी तफावत आहे. कमी महिला साक्षरता दराचा समाजाच्या एकूण वाढीवर आणि विकासावर मोठा नकारात्मक प्रभाव पडतो. महिला शिक्षण हे महिला सक्षमीकरणासाठी मैलाचा दगड आणि यशस्वी धोरण आहे कारण ते त्यांना आव्हानांना प्रतिसाद देण्यास, त्यांच्या पारंपारिक भूमिकेला उत्तेजन देण्यास आणि आधुनिक समाजाच्या अनुषंगाने त्यांची जीवनशैली बदलण्यास अनुमती देते. यामुळे महिला सक्षमीकरणाच्या संदर्भात आपण शिक्षणाच्या महत्त्वाकडे दुर्लक्ष करू शकत नाही. या शोधनिबंधात संशोधक सरकारी उपक्रमांद्वारे महिलांच्या शैक्षणिक विकासाचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न करतील.
अभ्यासाची उद्दिष्टे:
1. स्त्री शिक्षणाची गरज आणि महत्त्व अभ्यासणे.
2. सरकारी उपक्रमांद्वारे महिलांच्या शैक्षणिक विकासाचे विश्लेषण करणे.
3. उच्च शिक्षणात महिलांच्या सहभागास प्रोत्साहन देण्यासाठी सूचना देणे.
संशोधन कार्यप्रणाली:
या अभ्यासासाठी वर्णनात्मक पद्धतींचा अवलंब केला जातो आणि दुय्यम डेटा गोळा केला जातो. या अभ्यासासाठी विविध पुस्तके, संशोधन लेख, मासिके, संशोधन जर्नल, ई-जर्नल, यूजीसीचा अहवाल आणि उच्च शिक्षणाचा अहवाल आणि वेबसाइट्समधून डेटा आणि माहिती गोळा करण्यात आली आहे.
स्त्री शिक्षणाची गरज आणि महत्त्व -
संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात असे म्हटले आहे की, कुटुंब आणि समाजाचे जीवन आणि आरोग्य सुधारण्यासाठी महिलांसाठी शिक्षण हा एकमेव प्रभावी मार्ग आहे. शिक्षण असलेली स्त्री ही एक शक्तिशाली व्यक्ती आहे; तिच्या कुटुंबातील मुलांना शिक्षण देण्याची, त्यांना प्रभावीपणे मार्गदर्शन करण्याची ताकद आहे.
निर्णय, आर्थिकदृष्ट्या योगदान देतात आणि घर आणि समाज दोन्ही सुधारण्यासाठी मौल्यवान इनपुट देतात. देशाच्या लोकसंख्येपैकी जवळपास निम्मी लोकसंख्या स्त्रिया आहेत, जेव्हा 50% लोकसंख्या शिक्षणाशिवाय राहते - एक राष्ट्र अविकसित राहते. सशक्त महिला समाज, समुदाय आणि राष्ट्राच्या विकासात अनेक प्रकारे योगदान देतात.
शिक्षण ही सर्वात महत्वाची शक्ती आहे जी पुरुषत्वाच्या जीवनाची रूपरेषा दर्शवते. हे विचार करण्याची, तर्क करण्याची, योग्य निर्णय घेण्याची आणि भारतातील महिलांचे अत्याचार आणि अत्याचारापासून संरक्षण करण्याची क्षमता देते. भारतासह जगभरातील बहुतांश विकसनशील देशांमध्ये महिलांना अनेकदा शिक्षणाच्या संधींपासून वंचित ठेवले जाते. असे असूनही, भारतातील एकूण लोकसंख्येच्या 48% स्त्रिया आहेत - शहरी भागातील महिला साक्षरतेचे प्रमाण 88.76% पुरुषांच्या तुलनेत 79.11% आहे आणि ग्रामीण भागात 77.15 च्या तुलनेत 57.93% स्त्रिया साक्षर आहेत. % साक्षर पुरुष. 2014 मध्ये, भारताची जीडीपी वाढ 4.6% -5.3% (1ली - 3री तिमाही) दरम्यान होती आणि जर महिला शिक्षित झाल्या आणि आर्थिकदृष्ट्या तितकेच योगदान देऊ लागल्या तर ही वाढीची टक्केवारी लक्षणीयरीत्या सुधारली जाऊ शकते. जगभरातील अनेक सर्वेक्षणे आणि अभ्यासांनी हे सिद्ध केले आहे की मुलांचे आरोग्य, समुदाय कल्याण आणि विकसनशील देशांचे दीर्घकालीन यश आणि यश निर्माण करण्याच्या दृष्टीने महिलांना शिक्षित करणे ही सर्वोत्तम फायदेशीर गुंतवणूक आहे. शिक्षणामुळे मुलीसाठी संधींचे संपूर्ण नवीन जग उघडले जाते, यामुळे तिला जीवनातील विविध समस्यांना सामोरे जाण्याचा, आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होण्याचा, चांगल्या निवडी करण्याचा, कौटुंबिक किंवा समुदायाच्या समस्यांचे योग्य निराकरण करण्याचा, तिच्या हक्कांसाठी उभा राहण्याचा आणि तिच्या मुलांना वर्षानुवर्षे मार्गदर्शन करण्याचा आत्मविश्वास मिळतो. , भारतीय महिलांमधील साक्षरतेचे प्रमाण वाढले आहे आणि भारतातील एका अग्रगण्य वृत्तपत्रातील एका लेखानुसार उच्च शिक्षणासाठी महिलांची नोंदणी 10% (स्वातंत्र्य काळात) वरून 2014 मध्ये 43.8% झाली आहे (http://www.linkfried.com/ महत्त्व- शैक्षणिक महिला- भारत दिनांक 26/11/2015 विचार विद्या 2015 द्वारे). उच्च मधील सरकारी उपक्रम आणि योजनांद्वारे महिलांचा शैक्षणिक विकास

भारतातील शिक्षण: महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग आणि नोंदणी सुनिश्चित करण्यासाठी विविध योजना आणि प्रकल्प तयार करण्याचा उच्च शिक्षण विभागाचा नेहमीच प्रयत्न असतो. म्हणून, उच्च शिक्षणातील लैंगिक अंतर कमी करणे हा एक फोकस क्षेत्र आहे. देशात उच्च शिक्षणासाठी महिला विद्यार्थ्यांच्या नोंदणीत अभूतपूर्व वाढ झाली आहे. स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या एकूण नोंदणीच्या 10% पेक्षा कमी असलेल्या मुलींच्या नोंदणीचा ​​हिस्सा 2012-13 या शैक्षणिक वर्षात 44.89% पर्यंत वाढला आहे. पुरुष आणि महिला दोघांसाठी GER कडे वाढता कल आहे. 2010 ते 2013 या कालावधीत GER मधील लैंगिक अंतर देखील कमी झाले आहे. (MHRD अहवाल 2014-15 प्रकरण 13 भाग-2) राज्यातील एकूण नोंदणीची टक्केवारी म्हणून महिला नोंदणी केरळमध्ये सर्वाधिक आहे (58.94) त्यानंतर आणि मध्य प्रदेशातील सर्वात कमी (36.39). एकूण नोंदणीपैकी 44.89% महिला आहेत जे सकारात्मक लक्षण आहे आणि सक्षमीकरणाबाबत सूचित करते. (AISHE-2012-2013) MHRD च्या विविध योजना:
ओपन अँड डिस्टन्स लर्निंग (ODL) मोडद्वारे महिलांचे उच्च शिक्षण:
मुक्त आणि दूरस्थ शिक्षण प्रणाली ही एक अशी प्रणाली आहे ज्यामध्ये शिक्षक आणि विद्यार्थी एकाच ठिकाणी किंवा एकाच वेळी उपस्थित असणे आवश्यक नाही आणि ते शिकवण्याच्या आणि शिकण्याच्या पद्धती आणि वेळेच्या बाबतीत लवचिक आहे.
युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन (यूजीसी) युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन (यूजीसी) साठी महिला शिक्षण हे प्राधान्य क्षेत्र आहे, जे युनिव्हर्सिटी एज्युकेशनच्या उद्देशाने संचालित करणारी प्रमुख सर्वोच्च संस्था आहे: आयोगाने उच्च शिक्षणात मुलींची नोंदणी आणि प्रोत्साहन देण्यासाठी अनेक योजना सुरू केल्या. UGC द्वारे चालवल्या जात असलेल्या अशा योजना थोडक्यात खालीलप्रमाणे आहेत:
1) विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये डे केअर सेंटर्स:
सुमारे तीन महिने ते सहा वर्षे वयोगटातील मुलांसाठी, जेव्हा त्यांचे पालक (विद्यापीठ/महाविद्यालयीन कर्मचारी/विद्यार्थी/विद्वान) दूर असतात तेव्हा त्यांना मागणीच्या आधारावर विद्यापीठ प्रणालीमध्ये डे केअर सुविधा प्रदान करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
ii) उच्च शिक्षणासाठी अविवाहित मुलीसाठी पदव्युत्तर इंदिरा गांधी शिष्यवृत्ती
शिक्षण:
या योजनेचा उद्देश अशा मुलींना शिष्यवृत्तीद्वारे उच्च शिक्षणासाठी समर्थन देणे आहे जे त्यांच्या कुटुंबातील एकुलते एक मूल आहेत आणि त्यांना लहान कौटुंबिक नियमांचे पालन करण्याच्या मूल्यांची ओळख करून देणे, 30 वर्षांपर्यंतच्या मुलींना पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची वेळ केवळ पात्र आहे. योजनेंतर्गत उपलब्ध शिष्यवृत्तीसाठी स्लॉटची संख्या 1200 p.a आहे. शिष्यवृत्तीची रक्कम @ Rs.3100/- प्रति महिना आहे.
iii) महाविद्यालयांसाठी महिला वसतिगृहे बांधणे:
UGC महिलांचा दर्जा वाढवण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आणि समाजाच्या विकासासाठी संभाव्य उपलब्धतेचा उपयोग करण्यासाठी तसेच लिंग समानता आणि महिलांचे समान प्रतिनिधित्व आणण्यासाठी विशेष योजनेद्वारे वसतिगृहे आणि इतर पायाभूत सुविधा पुरवत आहे 'बांधकाम' महिलांच्या वसतिगृहांची'. विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये महिलांच्या अभ्यासाचा विकास: या योजनेत नवीन महिला अभ्यास केंद्रे स्थापन करण्यासाठी तसेच विद्यापीठ महिला अभ्यास केंद्रांना बळकट आणि टिकवून ठेवण्यासाठी विद्यापीठांना मदत करण्याची योजना आहे.
iv) उच्च आणि तांत्रिक शिक्षण घेण्यासाठी अविवाहित मुलीसाठी पदव्युत्तर इंदिरा गांधी शिष्यवृत्ती:
या योजनेचा उद्देश अशा मुलींना शिष्यवृत्तीद्वारे उच्च शिक्षणासाठी समर्थन देणे आहे जे त्यांच्या कुटुंबातील एकुलते एक मूल आहेत आणि त्यांना लहान कौटुंबिक नियमांचे पालन करण्याची मूल्ये ओळखणे देखील आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशाच्या वेळी 30 वर्षांपर्यंतच्या मुलीच पात्र आहेत. योजनेंतर्गत उपलब्ध शिष्यवृत्तीसाठी स्लॉटची संख्या 1200 p.a आहे. शिष्यवृत्तीची रक्कम @ Rs.3100/- प्रति महिना आहे.
iv) महिलांसाठी पोस्ट-डॉक्टरेट फेलोशिप:
पीएच.डी. असलेल्या बेरोजगार महिला उमेदवारांसाठी ही योजना लागू करण्यात आली आहे. प्रगत अभ्यास आणि संशोधन करण्यासाठी महिला उमेदवारांच्या प्रतिभावान प्रवृत्तीला गती देण्याच्या उद्देशाने त्यांच्या संबंधित विषयातील पदवी.
v) विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये महिलांच्या अभ्यासाचा विकास: ही MHRD योजना नवीन महिला अभ्यास केंद्रे स्थापन करण्यासाठी तसेच विद्यापीठ महिला अभ्यास केंद्रांना विद्यापीठ प्रणालीमध्ये वैधानिक विभाग म्हणून स्थापित करून त्यांना बळकट आणि टिकवून ठेवण्यासाठी विद्यापीठांना मदत करते. ते इतर घटकांमध्ये नेटवर्क करण्यासाठी त्यांची स्वतःची क्षमता सुलभ करण्यासाठी देखील जेणेकरून ते महिला शिक्षणासाठी एकमेकांना सहकार्य करत असतील तसेच एकमेकांशी समन्वय साधतील. कृती आणि दस्तऐवजीकरणापर्यंत अध्यापन आणि संशोधनाद्वारे ज्ञानाचे अनुकरण आणि ज्ञानाचा प्रसार करणे ही या केंद्रांची प्राथमिक भूमिका आहे.
उच्च शिक्षणात महिलांच्या सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी सूचना :
1. भारतातील आणि ग्रामीण भागातील महिलांसाठी कौशल्याभिमुख उच्च शिक्षणाची निर्मिती करा आणि दुर्गम, ग्रामीण आणि आदिवासी भागात अधिक महिला शैक्षणिक संस्था आणि संस्था आणि 2. शिक्षण धोरणाची रचना अशा प्रकारे केली आहे जेणेकरून उच्च शिक्षणात महिलांचा सहभाग वाढेल. संस्थांमध्ये आणि बाहेर लैंगिक छळ थांबवा आणि अशा घटनांसाठी विविध कायदे आणि कायदेशीर कारवाई करून योग्य ती कारवाई करा.
3. आर्थिक पाठबळासाठी उच्च आणि तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या महिला विद्यार्थ्यांना कमी व्याजासह बँक कर्जाची व्यवस्था. महिलांच्या आर्थिक सहाय्यासाठी उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये शिकणाऱ्या महिलांसाठी स्टायपेंड, शिष्यवृत्ती आणि फेलोशिपची तरतूद करते.
4. आजच्या युगात पुरुषाभिमुख समाजाचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. हे निःसंशयपणे स्वावलंबी आणि स्वतंत्र होण्यासाठी उच्च शिक्षणात महिलांचा सहभाग वाढवण्यास मदत करेल.
उच्च शिक्षण हे आर्थिक सुरक्षेचे नवीन उद्घाटन म्हणून ओळखले जाते. विशेषतः मुली आणि महिलांसाठी सुरक्षारक्षक संधी. भारतात महिलांचे उच्च शिक्षण आवश्यक आहे कारण सुशिक्षित महिलांमध्ये प्रचंड आत्मविश्वास असतो आणि कुटुंब आणि समाजासाठी योग्य वेळी योग्य निर्णय घेतात. सुशिक्षित स्त्रिया समाज आणि राष्ट्र या दोन्हींच्या कल्याणासाठी आणि समृद्धीसाठी सकारात्मक पद्धतीने योगदान देतात. निर्णय घेण्याच्या महत्त्वाच्या पदांवर महिलांचा समावेश होतो. ते समाज आणि तिच्या कुटुंबाच्या विकासासाठी आणि वाढीसाठी सर्वांगीण निर्णय घेतात.त्यामुळे स्त्री ही एकविसाव्या शतकातील एक सक्षम आव्हाने पेलणारी ठरणार आहे.

आदर्श गुरुकूल विद्यालय व ज्युनिअर कॉलेज पेठ वडगाव शाळेला मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या उपस्थित शिक्षणमंत्री मा. दीपकजी केसरकर यांच्या हस्ते २१ लाखाचे बक्षीस

हेरले /प्रतिनिधी

मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा अभियान २०२३- २०२४ स्पर्धेत कोल्हापूर विभागातून प्रथम

 पेठ वडगाव: मंगळवार दि.५ मार्च, २०२४ रोजी टाटा सभागृह, नरिमन पॉईंट , मुंबई येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत 'मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा अभियान २०२३- २०२४ स्पर्धेचे पारितोषिक समारंभ मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे ,शिक्षणमंत्री मा. दीपकजी केसरकर यांच्या उपस्थितीत अत्यंत आनंदात व दिमाखात झाला. या स्पर्धेत आदर्श गुरुकुल विद्यालय व ज्युनि. कॉलेज,पेठ वडगाव या शाळेस कोल्हापूर विभागात प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या उपस्थित शिक्षणमंत्री मा. दीपकजी केसरकर यांच्या हस्ते रू. २१ लाख, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. दत्तात्रय घुगरे , मुख्याध्यापिका सौ. महानंदा घुगरे , पर्यवेक्षक शरद जाधव, प्रशासक संतोष पाटील , विद्यालयाचे इतर शिक्षक व विद्यार्थी प्रतिनिधींनी यांनी स्विकारला . या स्पर्धेत राज्यातून   १ लाख ३ हजार ३१२ शाळा सहभागी झाल्या होत्या. यामध्ये ६४ हजार ३१२ शासकीय शाळा आणि ३९ हजार खाजगी शाळांचा समावेश होता.

विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात यश संपादन करावे.- मा अशोक पोवारमा.उपसभापती प्राथमिक शिक्षण समिती,कोल्हापूर


*मनपा.  राजर्षी शाहू विद्यामंदिर क्रमांक 11 कसबा बावडा , कोल्हापूर*  

   *मंगळवार  दि. 5 मार्च 2024 रोजी आमच्या शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन व विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला. 
प्रमुख पाहुणे म्हणून *मा.श्री. अशोक पोवार मा.उपसभापती प्राथ.शिक्षक समिती  यांचा सत्कार व स्वागत *मुख्या.डॉ श्री. अजितकुमार पाटील* यांनी  गुलाबाचे रोप देवून केले, शैक्षणिक पर्यवेक्षक विजय माळी यांचे स्वागत उत्तम कुंभार यांनी केले ,तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रमेश सुतार यांचे स्वागत उत्तम कुंभार यांनी केले, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष अनुराधा गायकवाड यांचे स्वागत सौ. आसमा तांबोळी  यांनी केले, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य दिपाली चौगुले यांचे स्वागत कल्पना पाटील, यांनी केले, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य दिपाली दाभाडे यांचे स्वागत मीनाज मुल्ला यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्कृती पवार या विद्यार्थिनीने केले. यानंतर क्रीडा स्पर्धा ,चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा या विविध स्पर्धेतील विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सर्टिफिकेट देऊन गौरव करण्यात आला.याच बरोबर  पोषण आहार वाढणारे अमृता कांबळे यांचा सत्कार मुल्ला मॅडम यांनी केला.
 शाळेला देणगी देणार पालक ठोंबरे यांचा सत्कार  विजय माळी साहेब  यांनी केला.
  _______*****______
  कार्यक्रम प्रसंगी प्रभागातील माजी नगरसेवक सुभाष बुचडेसो , अध्यक्ष रमेश चौगले,शाळा व्यस्थापन सदस्य,सर्व पालक वर्ग , जरग नगर शाळेचे शिक्षक मनोहर सरगर,किशोर शिनगारे, जोतिबा बामणे,टी आर पाटील,तुकाराम लाखे,मयूर दाभाडे,संतोष दाभाडे,अजय बिरणगे,राजेंद्र चौगले, जीवन कल्याण शाळेचे  शिक्षक टी.आर. पाटील सर,श्री.गोरख वातकर उपस्थित होते. त्यांचे स्वागत श्री. उत्तम कुंभार सर यांनी केले. 
प्रमुख पाहुणे व शैक्षणीक  पर्यवेक्षक यांच्या हस्ते दातृत्ववान पालकांचा व विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.यानंतर केंद्रमुख्याध्यापक डॉअजितकुमार पाटील यांनी शाळेची गुणवत्ता दाखवण्यासाठी PPT सादर केली.
  यावेळी 
 🎤🎤 या कार्यक्रमाचे *सूत्रसंचालन सहा.शिक्षिका सौ. आसमा तांबोळी ,सौ गौरी रणदिवे व सौ.प्रियंका कोळी त्याचबरोबर पायल पाटील ,कादंबरी पांढरबले,भक्ती सिसाळ मॅडम* यांनी केले.
  उपस्थितांचे आभार बालवाडीच्या मुख्याध्यापिका कल्पना पाटील  यांनी मानले.
इ.2 री च्या विद्यार्थ्यांनी *गणेश वंदना* करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
 इ.1 ली ते 7 वीच्या सर्व विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या *मराठी गाण्यांचा कलाविष्कार* सादर केला. प्रमुख पाहुणे, इतर मान्यवर, पालक मराठी गाण्यांच्या गजरात भारावून गेले.
   अशाप्रकारे शाळेचे मुख्याध्यापक डॉक्टर
 श्री.अजितकुमार पाटील यांच्या प्रेरणेने ,सर्व शिक्षक स्टाफ यांच्या मार्गदर्शनाखाली, प्रमुख पाहुणे,पालक, सामाजिक कार्यकर्ते,विद्यार्थी यांच्या उपस्थितीत शाळेचे *वार्षिक स्नेहसंमेलन* उत्साहात व जल्लोषात संपन्न झाले. सदर कार्यक्रमासाठी  कार्यक्रमासाठी सुशील जाधव, तमेजा मुजावर,   मिनाज मुल्ला , विद्या पाटील, बालवाडी मुख्याध्यापिका कल्पना पाटील,सेविका सावित्री काळे, सेवक  हेमंतकुमार पाटोळे व सर्व विद्यार्थी उपस्थित होते .

Friday, 1 March 2024

मनपा एस्तर पॅटन प्राथमिक शाळा क्रमांक 73 कनान नगर कोल्हापूर येथे मराठी भाषा गौरव दिन साजरा

 
कोल्हापूर प्रतिनिधी 
दिनांक 27 फेब्रुवारी 2024 

 मनपा एस्तर पॅटन प्राथमिक शाळा क्रमांक 73 कनान नगर कोल्हापूर येथे मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. यावेळी मनपा कोल्हापूरचे अतिरिक्त आयुक्त माननीय केशव जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाधिकारी प्राथमिक शिक्षण समिती श्री. एस  के.यादव साहेब यांच्या प्रेरणेतून आजच्या दिवसाचे औचित्य साधत इयत्ता पाचवी स्कॉलरशिप परीक्षेत राज्यस्तरावर आपले गुणवत्ता सिद्ध करून इस्त्रो पाहिलेल्या विद्यार्थीनी  कुमारी वसुंधरा सावंत आणि कुमारी ज्ञानेश्वरी साळुंखे यांचा विशेष सत्कार व मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. या कार्यक्रमास सदरहू आती उच्च बुद्धिमत्ता धारक विद्यार्थिनींनी मनपा एस्तर पॅटन प्राथमिक शाळेतील इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांशी *स्पर्धा परीक्षा व मी* या विषयावर सुसंवाद साधला बाल चमूच्या अनेक प्रश्नांना हसतमुखाने त्यांनी उत्तरे दिली व उपस्थित सर्व पालक शिक्षक भागातील नागरिक विविध संस्थांचे पदाधिकारी व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य , अध्यक्ष यांची मने जिंकली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक शिक्षिका प्रियांका चौगले यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रभारी मुख्याध्यापक श्री आर जी कांबळे सर यांनी केले आयोजनांमध्ये टेंबलाईवाडी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री विलास पिंगळे सर, वर्ग शिक्षक श्री उमेश गाताडे सर ,श्री प्रभाकर लोखंडे सर यांचे विशेष सहकार्य लाभले.