Saturday, 29 October 2016

लक्ष्मीपूजन

Kolhapur mh9Live Reporter

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी श्रीविष्णूने लक्ष्मीसह सर्व देवांना बळीच्या कारागृहातून मुक्त केले आणि त्यानंतर ते सर्व देव क्षीरसागरात जाऊन झोपले, अशी कथा आहे.
लक्ष्मी, श्रीविष्णु इत्यादी देवता आणि कुबेर यांची पूजा, असा लक्ष्मीपूजन या दिवसाचा विधी आहे.

लक्ष्मीपूजन करतांना एका चौरंगावर अक्षतांचे अष्टदल कमल किंवा स्वस्तिक काढून त्यावर लक्ष्मीच्या मूर्तीची स्थापना करतात. काही ठिकाणी कलशावर ताम्हण ठेवून त्यावर लक्ष्मीच्या मूर्तीची स्थापना करतात. लक्ष्मीजवळच
कलशावर कुबेराची प्रतिमा ठेवतात. त्यानंतर लक्ष्मी आदी देवतांना लवंग, वेलची आणि साखर घालून तयार केलेल्या गायीच्या दुधाच्या खव्याचा नैवेद्य दाखवतात. धने, गूळ, साळीच्या लाह्या, बत्तासे इत्यादी पदार्थ लक्ष्मीला वाहून नंतर ते आप्तेष्टांना वाटतात. रात्री जागरण करतात. आश्विन अमावास्येच्या रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करते आणि आपल्या निवासासाठी योग्य असे स्थान शोधू लागते. जेथे चारित्र्यवान, कर्तव्यदक्ष, संयमी, धर्मानिष्ठ, देवभक्त आणि क्षमाशील पुरुष आणि गुणवती आणि पतीव्रता स्त्रिया असतात, त्या घरी वास्तव्य करणे लक्ष्मीला आवडते.

'ऊं महालक्ष्म्यै च विद्महे विष्णुपत्न्यै च धीमही तन्नो लक्ष्मी देवी प्रचोदयात'

लक्ष्मीपूजनाच्या दिवसाचे महत्त्व !

सामान्यतः अमावास्या हा अशुभ दिवस म्हणून सांगितला आहे; पण त्याला अपवाद या अमावास्येचा आहे. हा दिवस शुभ मानला आहे; पण तो सर्व कामांना नाही; म्हणून या दिवसाला शुभ म्हणण्यापेक्षा आनंदी दिवस म्हणणे योग्य !

‘मध्यरात्री नवीन केरसुणीने घरातील केर सुपात भरून तो बाहेर टाकावा’, असे सांगितले आहे. याला ‘अलक्ष्मी (कचरा, दारिद्र्य) निःसारण’ म्हणतात. एरव्ही कधीही रात्री घर झाडणे वा केर टाकणे करायचे नसते. फक्त या रात्री ते करायचे असते. कचरा काढतांना सुपे आणि दिमडी वाजवूनही अलक्ष्मीला हाकलून लावतात.

|| ॐ श्रीं श्रीं क्लीं श्रीं लक्ष्मी आगच्छ आगच्छ मम मंदिरे तिष्ठ तिष्ठ स्वाहा ||

सांगलीचे नितीन कोळी यांना दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण

जम्मूच्या कुपवाड्यातील
माछिल सेक्टरमध्ये सीमेवर पेट्रोलिंग करणाऱ्या बीएसएफ जवानांच्या पथकावर दहशतवाद्यांनी शुक्रवारी रात्री भ्याड हल्ला केला.
या हल्ल्यात मनजित सिंह आणि नितीन कोळी यांना वीरमरण आलं.
नितीन कोळी मुळचे दुधगाव (ता. मिरज) येथील असून बीएसएफच्या 156 बटालियनमध्ये कार्यरत होते. नितीन कोळी शहीद झाल्याचं कळताच दुधगावात शोककळा पसरली असून गावातील सर्व व्यवहार बंद करण्यात आले आहेत.
गावचे सुपुत्र शहीद झाल्याने गावात दिवाळी न करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.. दिवाळीनिमित्त घरावर लावलेले आकाशदिवे काढण्यात आले आहेत.
मूळ सांगलीतील दुधगावचे असणारे नितीन कोळी 2008 साली बीएसएफमध्ये रुजू झाले होते. ते सध्या बीएसएफमध्ये कॉन्स्टेबल म्हणून सीमेचं संरक्षण करत होते. त्यांच्यामागे पत्नी तसंच चार आणि दोन वर्षांची दोन मुलं असा परिवार आहे.

औरंगाबादमध्ये फटाक्यांच्या दुकानांना भीषण आग 200 दुकानं आगीत खाक

KOLHAPUR MH9LIVE NEWS

औरंगाबादमधील जिल्हा परिषद मैदानात दरवर्षी दिवाळीला फटाक्यांचं बाजार भरतो. यंदाही मैदानात फटाक्यांचे सुमारे 200 स्टॉल्स लागले होते. मात्र आज सकाळी 11.30 च्या सुमारास स्टॉल क्रमांक 49 आणि 50 मध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. परंतु दुकानं लागूनच असल्याने क्षणार्धात आग पसरली आणि सगळी दुकानं आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.अचानक लागलेल्या आगीत दुकानांसह 25 ते 30 चारचाकी, अनेक दुचाकी आणि रिक्षा जळून खाक झाल्या आहेत.फटाके स्टॉलधारकांनी अग्निशमनच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.तर मागणी करुनही अग्निशमन दलाची यंत्रणा मिळाली नाही, असा दावा दुकानदारांनी केला आहे. या घटनेला महापालिका जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला.

नरक चतुर्दशी

kolhapur mh9live news

नरक चतुर्दशी हा दिवाळीच्या दिवसांतील एक दिवस आहे. दर वर्षातील आश्विन कृष्ण चतुर्दशीस नरक चतुर्दशी येते. मध्य प्रदेशात आणि उत्तरी भारतात त्या दिवशी कर्तिक कृष्ण चतुर्दशी असते.या दिवशी पहाटे यमासाठी नरकात म्हणजे आधुनिक परिभाषेत घरातील स्वच्छतागृहात दीपदान करण्याची (पणती लावण्याची ) प्रथा आहे असे मानले जाते.
या दिवशी अभ्यंगस्नानाचे महत्त्व असते. सकाळी लौकर उठून, संपूर्ण शरीरास तेलाचे मर्दन करून, सुवासिक उटणे लावून, सूर्योदयापूर्वी केलेले स्नान म्हणजे अभ्यंगस्नान.
वाग्भट याने रचलेल्या अष्टांगहृदय या ग्रंथात दिलेला श्लोक असा आहे:
अभ्यंगमाचरेतन्नित्यं स जराश्रमवातहा |
दृष्टिप्रसाद्पुष्ट्यायुः स्वप्नसुत्वकत्व दार्ढयंकृत् ||
अर्थ:(थंडीच्या दिवसांत) रोज केलेले अभ्यंगस्नान हे जरा(वृद्धत्व) ,श्रम आणि वात(वातदोष) यांचा नाश करते. ते दृष्टी चांगली करणारे, त्वचेला कांती देणारे तसेच शरीर दृढ करणारे आहे.
रोज असे तेल लावून स्नान करणे शक्य नसल्यास किमान डोक्यास तरी तेल लावून स्नान करावे.
चरकसंहितेत चरकांनी सांगीतल्याप्रमाणे:
मूर्धोSभ्यंगात् कर्णयोःशीतमायु, कर्णाभ्यंगात पादयोरेवमेव |
पादाभ्यंगान्नेत्ररोगान् हरेश्च,नेत्राभ्यंगाद् दन्तरोगाश्च नश्येत् | 
अर्थात: डोक्यास तेल लाउन मर्दनाने कानविकार दूर होतात.कानाचेभोवती,पाळीस मर्दन तसेच कानात तेल टाकण्याने पायांना त्याचा फायदा मिळतो.डोळ्यात गायीचे तूप टाकल्याने आणि डोळ्यास तेलाने (हळुवार) मर्दनाने दातांचे रोग नष्ट होतात.(बदाम तेल,तिळ तेल इत्यादी.)(तीव्र तेले जसे सरसू,करडई इत्यादी वापरू नयेत.)

आख्यायिकI

नरक चतुर्दशी या सणाशी संबंधित नरकासुरवधाची आख्यायिका प्रचलित आहे. या दिवशी कृष्णाने नरकासुराचा वध करून प्रजेला त्याच्या जुलमी राजवटीतून सोडवले. नरकासुराने तप करून ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतले व अवध्यत्वाचा - म्हणजेच कुणाकडूनही वध होणार नाही - असा वर मागून घेतला. त्या वराच्या योगाने त्याने अनेक राजांना हरवून त्यांच्या कन्या व त्या राज्यांतील स्त्रियांचे अपहरण केले. नरकासुराने अश्या एकूण १६,१०० स्त्रियांना पळवून नेले व मणिपर्वतावर एक नगर वसवून त्यात त्यांना बंदी बनवून ठेवले. त्याने अगणित संपत्ती लुटली व अश्याच हावेपोटी त्याने देवमाता अदितीची कुंडले व वरुणाचे विशाल छ्त्रही बळकावले. त्याला मिळालेल्या वरामुळे तो देव, गंधर्व व मानवांना तापदायक झाला होता. अनेक गिरिदुर्गांनी वेढलेले प्राग्ज्योतिषपूर हे नगर त्याची राजधानी होती. ही राजधानी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या खंदकांनी अग्नी, पाणी इत्यादींनी वेढलेली होती. या दुर्जय राजधानीवर कृष्णाने गरुडावर स्वार होऊन चाल केली. कृष्णाने नरकासुराच्या देहाचे दोन तुकडे करत त्याचा वध केला. नरकासुरवधाने देवादिकांना, तसेच प्रजेला आनंद झाला. नरकासुराच्या बंदिवासातील कुमारिकांना त्यांचे स्वजन स्वीकारणार नाहीत, हे जाणून कृष्णाने या १६,१०० कन्यांसोबत विवाह केला व त्यांना सामाजिक प्रतिष्ठा मिळवून दिली. कृष्णाच्या पराक्रमाचे स्मरण म्हणून नरक चतुर्दशी साजरी करतात.


Friday, 28 October 2016

कार मेकेनिकने दुरूस्त केले हेलिकॉप्टर

Kolhapur mh9Live Reporter

महाराष्ट्र गेरेजमध्ये कार दुरूस्तीचे काम सुरू असताना अचानक दोन युवक आले , मिस्त्री तुम्हाला हेलिकॉप्टर दुरूस्त करायचे आहे असे म्हणू लागले , युसुफ मिस्त्रीना वाटले चेष्टा करत असतील मग ते म्हणाले , घेऊन या , करुया दुरूस्त  पण युवकानी पटवुन सांगितले खरोखरच एका बड्या असामीचे हेलिकॉप्टर किरकोळ तांत्रिक कारणाने नादुरूस्त झाले आहे , प्रयत्न करा
युसुफ मिस्त्रीना हेलिकॉप्टरचे कोणतेही ज्ञान नसताना पायलटच्या सांगण्यानुसार कार दुरूस्तीच्या साध्या हत्यारानीच किरकोळ बिघाड होता तो काही मिनिटातच दूर केला , हेलिकॉप्टरच्या उड्डाणामधील अडथळा दूर झाला नाहीतर या कामासाठी मुंबईहुन खास मेकेनिक मागवावा लागणार होता , यामध्ये वेळ व पैसा वाया गेला असता
कोल्हापुर ही पुर्वीपासुनच उद्यमनगरी आहे , येथे हरहुन्नरी अवलिया कारीगर भेटतात त्यात यूसुफ मिस्त्रीची भर पडली आहे , येथील कारीगर कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत फक्त गरज आहे संधी देण्याची !

Thursday, 27 October 2016

सैनिकांना पत्राद्वारे दीपावली शुभेच्छा संदेश -

Kolhapur mh9Live Reporter

सर्वत्र दिवाळीची धामधुम सुरु असताना , ज्यांच्या अमुल्य त्याग , देशरक्षणामुळे आपण दिवाळी आनंदात साजरी करु शकतो अशा भारतीय सैनिकांना
चिमुकल्यानी पत्राद्वारे दिपावली शुभेच्छा सन्देश लिहून पाठवले

सैनिका आम्हा तुजा अभिमान..अशा भावना पत्राद्वारे व्यक्त करत उमेद फौंडेशन सेवा परिवार व विद्या मंदिर आंबर्डे ता शाहूवाडी जि कोल्हापूर  यांनी संयुक्तपणे राबवलेल्या  उपक्रमात चिमुकल्यानी आंबर्डे  गावातील भारतीय  सैनिकांचे पत्ते जमा करून त्यांना दिपावली निमित्त त्यांच्या त्याग व शौर्याबद्दल  अभिमान व्यक्त करणारे ,दिवाळी निम्मित शुभेच्छा देणारे संदेश पत्राद्वारे पाठवले..
त्या पत्रावर त्यांनी नाजूक सुंदर हातांनी  दिपावली संदेश देणारे सुंदर चित्र  रेखाटले..!
यावेळी  विद्या मंदिरआंबर्डे शाळेच्या  मुख्याध्यापिका सौ.चव्हाण मॅडम, बी डी पाटील सर , जेडगे सर, कांबळे सर व प्रकाश गाताडे सर यांनी विशेष परिश्रम घेतले..

‘व्हॉट्स अॅप’ ग्रुपवरील युवकांच्या संकल्पनेतून ‘माणुसकीची भिंत’ कोल्हापुरात साकारली

दिवाळी सण मोठा नाही आनंदास तोटा असे असले तरी काही लोकांकडे परिस्थितिमुळे अंग झाकण्यापुरतेही कपडे नाहीत , हीच गोष्ट खटकली आणि काही युवकांच्या  ‘व्हॉट्स अॅप’वरील एका ग्रुपवरील संकल्पनेतून ‘माणुसकीची भिंत’ कोल्हापुरातील सीपीआर चौकात उभी राहिली.

घरातील चांगले पण वापरात नसलेले कपडे स्वच्छ व घडी करुन या भिंतीवर आणून ठेवले जातात. गरजू त्यांच्या मापानुसार ते घेऊन जातात. गुरुवारपासून सुरू झालेली ही भिंत गोरगरिबांसाठी दिवाळी भेटच ठरते आहे.
प्रसाद पाटील , सुरज पाटील , अमर पाटील यांनी या भिंतीची संकल्पना ‘व्हॉट्स अॅप’वरील एका ग्रुपवर मांडली. त्यास आमदार सतेज पाटील यांनी पुढाकार घेत प्रोत्साहन दिले.
समाजातील मान्यवरांनी पाठिंबा दर्शविला व दोनच दिवसांत शहरात ‘माणुसकीची भिंत’ उभी राहिली.
सकाळी आठपासूनच पहिल्याच दिवशी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत जुने- नवे कपडे, ड्रेस, स्वेटर्स, ब्लेझर्स पॅँट्स, कुर्ते, जीन्स, लहान मुलांचे कपडे, साड्या, कानटोपी, स्कार्फ ‘माणुसकीच्या भिंती’वर आणून ठेवल्या.
कोल्हापुरातील सीपीआर चौकात गुरुवारी ‘माणुसकीची भिंत’ संकल्पनेतून गोरगरिबांना कपड्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी आमदार सतेज पाटील , महापौर अश्विनी रामाणे,  गणी आजरेकर, प्रसाद पाटील , सुरज पाटील , अमर पाटील आणि माणुसकीची भिंत ग्रुपचे सदस्य  उपस्थित होते.हा उपक्रम दि २७ ते ३० ऑक्टोबर पर्यंत सकाळी ८ ते रात्री १० पर्यंत सुरु राहणार असुन करवीरवासियांनी यात उस्फुर्तपणे सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे

!! अष्टविनायक यात्रा !!

Kolhapur mh9Live Reporter

यंदा दीपावली सुटीत पर्यटनाचा आनंद घेणार असाल तर पर्यटन आणि अध्यात्म यांची सांगड असणार्या अष्टविनायक यात्रेचा माहिती असणारा लेख अवश्य वाचा

श्री गणपतीची महाराष्ट्रातील प्रत्येक गावात एक-दोन मंदिरे हमखास पाहण्यास मिळतात. त्या मंदिरांतून श्री गणेशाची हजारो रूपे भाविक अनुभवतात. महाराष्ट्रातील ‘आठ’ ठिकाणच्या श्रीगणेश मंदिरांना, मूर्तींना विशेष महत्त्व आहे. या आठ ठिकाणच्या श्री गणपतीच्या मंदिरांस मिळून ‘अष्टविनायक’ म्हटले जाते.

गणपतीच्या अनेक नावांपैकी एक नाव म्हणजे विनायक; म्हणूनच या मंदिरांचा संच म्हणजे अष्टविनायक. अष्टविनायकांची मंदिरे (स्थळे) महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहेत. गणपती ही विद्येची देवता असून तो, सुखकर्ता ,
दु:खहर्ता आणि रक्षणकर्ता आहे अशी गणेश भक्तांची भावना आहे.


महाराष्ट्रातील असंख्य भाविक अष्टविनायकाची यात्रा करतात. अष्टविनायकाची सर्व मंदिरे ही अंतराच्या दृष्टीने परस्परांच्या जवळ आहेत. साधारणपणे दीड ते दोन दिवसांत ही अष्टविनायक यात्रा पूर्ण होऊ शकते. पुणे जिल्ह्यात पाच (मोरगाव, थेऊर, रांजणगाव, ओझर, लेण्याद्री), रायगड जिल्ह्यात दोन (महड, पाली) व अहमदनगर जिल्ह्यात एक (सिद्धटेक) या ठिकाणी ‘अष्टविनायक स्थाने’ आहेत. या गणपतींपैकी महडचा व रांजणगावचा गणपती हे उजव्या सोंडेचे आहेत. बाकीचे डाव्या सोंडेचे. शास्त्रोक्त यात्रा सुरुवात आणि शेवट मोरगाव आहे

 सर्व गणपतींची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे -


मोरगांव

अष्टविनायकांपैकी पहिला गणपती हा मोरगावचा मोरेश्र्वर. या गणपतीस श्री मयुरेश्वर असेही म्हणतात. थोर गणेशभक्त मोरया गोसावी यांनी येथील पूजेचा वसा घेतला होता. श्री मोरेश्वर गणेशाचे, हे स्वयंभू व आद्यस्थान आहे. प्रत्येक घरात म्हटली जाणारी ‘ सुखकर्ता दु:खहर्ता’ ही आरती श्री समर्थ रामदास स्वामींना याच मंदिरात स्फुरली, असे म्हटले जाते.
जवळच कऱ्हा ही नदी आहे. मंदिरावर अनेक प्रकारचे नक्षीकाम केलेले आहे. श्री मोरेश्र्वराच्या डोळ्यात व बेंबीत हिरे बसवलेले आहेत. या मंदिराच्या भोवती बुरूजसदृश दगडी बांधकाम प्राचीन काळापासून आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात मोरगांव हे ठिकाण आहे. मोरगाव हे पुण्यापासून सुमारे ७० कि. मी. अंतरावर आहे. तर बारामतीपासून ३५ कि. मी. अंतरावर आहे. महाराष्ट्राचे कुलदैवत
जेजुरीचा खंडोबा हा मोरगावपासून अगदी १७ कि. मी. अंतरावर आहे. या तीनही ठिकाणांपासून मोरगांवला जाण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीची सोय आहे.


थेऊर


अष्टविनायकांपैकी थेऊरचा श्री चिंतामणी हा दुसरा गणपती आहे. थेऊरच्या कदंब वृक्षाखाली हे श्री गणेशाचे ठिकाण आहे. भक्तांच्या चिंतेचे हरण करणारा म्हणून याला चिंतामणी म्हणतात. पुण्यातील पेशव्यांच्या घरातील अनेक जण थेऊरला सतत येत असत. पेशवे घराणे खूप मोठे गणेशभक्त होते. थेऊरचा विस्तार हा माधवराव पेशवे यांनी केला. माधवराव पेशव्यांचे निधन थेऊरलाच झाले. यांच्याबरोबर सती गेलेल्या रमाबाई यांची समाधीदेखील या ठिकाणी आहे. मंदिराच्या आवारात निरगुडकर फाउंडेशन निर्मित थोरल्या माधवरावांची स्फूर्तिदायक कारकीर्द दाखवणारे कलात्मक दालन आहे.
थेऊर पुणे- सोलापूर महामार्गाला जोडलेल्या रस्त्यावर, तालुक्यात असून पुण्यापासून हे ३० कि. मी. अंतरावर आहे. पुण्यापासून बसेसची सोय आहे. (थेऊरपासून जवळच ऊरळीकांचनला महात्मा गांधींनी स्थापन केलेले निसर्गोपचार केंद्र आहे.)


सिद्धटेक


सिद्धटेकचा श्री सिद्धिविनायक हा अष्टविनायकांपैकी तिसरा गणपती. हे भीमा नदीवर वसलेले सिद्धिविनायकाचे स्वयंभू स्थान आहे. याचा गाभारा लांबी-रुंदीने भरपूर मोठा आहे. तसेच मंडपही मोठा-प्रशस्त आहे. पुण्यश्लोक
अहिल्याबाई होळकर यांनी जीर्णोद्धार करून मंदिर बांधले आहे. मंदिरात पितळी मखर असून त्याभोवती चंद्र-सूर्य- गरुड यांच्या प्रतिमा आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात हे ठिकाण असून दौंडपासून १९ कि. मी. अंतरावर आहे. तर राशिनपासून २३ कि. मी. अंतरावर आहे.


रांजणगाव


अष्टविनायकांपैकी हा चौथा गणपती. या गणपतीला महागणपती असे म्हणतात. हे
महागणपतीचे स्वयंभू स्थान आहे. पुणे -अहमदनगर मार्गावर शिरूर तालुक्यात हे ठिकाण आहे.
या स्थानासंदर्भात एक दंतकथा आहे ती अशी की :- त्रिपुरासुर या दैत्यास शिवशंकरांनी काही शक्ती प्रदान केल्या होत्या. या शक्तीचा दुरूपयोग करून त्रिपुरासुर स्वर्गलोक व
पृथ्वीलोक येथील लोकांना त्रास देऊ लागला. शेवटी एक वेळ अशी आली की, शिवशंकराला श्री गणेशाचे नमन करून त्रिपुरासुराचा वध करावा लागला. म्हणून या गणेशाला ‘त्रिपुरारिवदे(?) महागणपती’ असेही म्हटले जाते.
अष्टविनायकांपैकी सर्वाधिक शक्तिमान असे महागणपतीचे रूप आहे. श्री महागणपती उजव्या सोंडेचा असून गणेशाला कमळाचे आसन आहे. माधवराव पेशव्यांच्या काळात या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचे इतिहासात आढळते. इंदूरचे सरदार किबे यांनीदेखील या मंदिराचे नूतनीकरण केल्याचा उल्लेख आढळतो. त्यांनी या देवळातला लाकडी सभामंडप बांधून दिला आहे.
हे श्री महागणपतीचे स्थान इ.स. १० व्या शतकातील आहे. श्री गणेशाला दहा हात आहेत आणि प्रसन्न व मनमोहक अशी श्रींची मूर्ती आहे.


ओझर


अष्टविनायकांपैकी ओझरच्या विघ्नेश्र्वर हा पाचवा गणपती आहे. येथील श्रींची मूर्ती लांब रूंद असून अष्टविनायकापैकी सर्वात श्रीमंत गणपती म्हणून श्री विघ्नेश्र्वराला ओळखले जाते. श्रींच्या डोळ्यात माणिक असून, कपाळावर हिरा आहे. अशी प्रसन्न व मंगल मूर्ती असलेला श्रीगणेश विघ्नांचे हरण करतो, म्हणून या गणपतीला विघ्नेश्र्वर म्हणतात. ही गणेशाची स्वयंभू मूर्ती आहे.
मंदिराच्या चारही बाजूंना तटबंदी-बांधकाम असून, मध्यभागी गणेशाचे मंदिर आहे. कुकडी नदीच्या तीरावर असलेले हे मंदिर एक जागृत स्थान आहे. थोरल्या बाजीराव पेशव्यांचे बंधू
चिमाजी अप्पा यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो.
मंदिराच्या परिसरात भाविकांना राहण्यासाठी धर्मशाळेची उत्तम व्यवस्था आहे.
जुन्नर तालुक्यातील हे स्थान लेण्याद्रीपासून १४ कि. मी. वर तर पुण्यापासून ८५ कि. मी. अंतरावर आहे. येथून जवळच आर्वी उपग्रह केंद्र व
खोडद येथील आशिया खंडातील सर्वात मोठी इलेक्ट्रॉनिक दुर्बिण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेला शिवनेरी किल्ला हादेखील जवळच आहे.


लेण्याद्री


अष्टविनायकापैकी सहावा गणपती लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मज. जुन्नर तालुक्यातील जुन्नर लेण्यांच्या समुदायात आणि कुकडी नदीच्या परिसरात डोंगरावर श्री गिरिजात्मज गणेशाचे हे स्वयंभू स्थान आहे. श्री गणेशाची प्रसन्न मूर्ती असून ती दगडामध्ये कोरलेली आहे. मंदिर परिसरातील खडकामध्ये कोरीवकाम, खोदकाम केलेले आहे. पेशवे काळात या मंदिराचा जीर्णोद्धार झाला होता. मंदिरात दगडी खांब आहेत व त्यावर वाघ , सिंह ,
हत्ती असे सुंदर नक्षीकाम केलेले आहे. मंदिरात जाण्यासाठी डोंगरावर सुमारे ४०० पायऱ्या आहेत.
लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मज हा जुन्नरपासून ७ कि.मी. अंतरावर आहे, तर पुण्यापासून सुमारे ९७ कि. मी. अंतरावर हे ठिकाण आहे.


महड


महडचा वरदविनायक हा अष्टविनायकांपैकी सातवा गणपती आहे. हे स्वयंभू स्थान असून त्याला मठ असेही म्हणतात. श्री वरदविनायकाचे मंदिर साधे, कौलारू असून मंदिराला घुमट आहे व त्याला सोनेरी कळस आहे. कळसावर नागाची नक्षी आहे.
या मंदिरासंदर्भात एक कथा प्रसिद्ध आहे. एका भक्ताला स्वप्नात देवळाच्या मागील तळ्यात पाण्यात पडलेली मूर्ती दिसली. त्याप्रमाणे त्या व्यक्तीने शोध घेतला व मूर्ती मिळाली. तीच या मंदिरातील प्रतिष्ठापना केलेली मूर्ती होय. मंदिरात दगडी महिरप असून गणेशाची मूर्ती सिंहासनारूढ आहे व उजव्या सोंडेची आहे. इ.स. १७२५ मध्ये पेशवे काळात हे मंदिर बांधले गेले.
रायगड जिल्ह्यातील महड हे पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर खोपोली - खालापूरच्या दरम्यान आहे.


पाली


पालीचा गणपती हा अष्टविनायकांपैकी आठवा गणपती आहे. या गणपतीला श्री बल्लाळेश्वर म्हणतात. बल्लाळेश्वर गणपतीचे हे स्वयंभू स्थान आहे. मंदिर पूर्वाभिमुख आहे. गणेशाचे कपाळ विशाल असून डोळ्यात हिरे आहेत. मंदिर चिरेबंदी आहे. मंदिरात प्रचंड घंटा असून ती चिमाजी अप्पांनी अर्पण केली आहे.
हे स्थान रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात असून, सुधागड या भव्य किल्ल्याची पार्श्वभूमी व अंबा नदीच्या निसर्गरम्य सान्निध्यात बल्लाळेश्वराचे मंदिर वसले आहे. पालीपासून जवळच उन्हेरचे गरम पाण्याचे झरे व
सरसगड हा प्राचीन किल्ला आहे.
पाली खोपोलीपासून ३८ कि. मी. अंतरावर आहे तर पुण्यापासून १११ कि. मी. अंतरावर आहे. खोपोली - पेण रस्त्यावर पालीस जाण्यास रस्ता फुटतो, तर पनवेल - गोवा या राष्ट्रीय महामार्गावर वाकणपासून पालीस रस्ता जातो.
भाद्रपद महिन्यातील चतुर्थीला या आठही ठिकाणी यात्रा भरते. सर्व जाती-धर्माचे लोक या ठिकाणी येऊन श्रद्धापूर्वक दर्शन घेतात. भाद्रपद शुद्ध चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या काळात श्री गणेशाचा उत्सव सर्वत्र साजरा केला जातो.
अष्टविनायकाच्या आठही ठिकाणी भोजनाची व निवासाची उत्तम व्यवस्था आहे. अष्टविनायक दर्शनासाठी पुणे, अहमदनगर, रायगड या तीन जिल्ह्यांतून प्रवास होतो. निरनिराळ्या रूपांत श्री गणेशमूर्ती आहेत. त्याही कुठे डोंगरात, खडकात, कुठे नदीकाठी आहेत, त्यामुळे अष्टविनायकाची यात्रा करणाऱ्या भाविकाला यात्रेबरोबरच पर्यटनाचाही अनुभव मिळतो.


Wednesday, 26 October 2016

NH4 वर टोपजवळ इंडिकाचा अपघात

Kolhapur Mh9Live Reporter

आज पहाटेच्या सुमारास कोल्हापुरहुन पुण्याच्या दिशेने निघालेल्या टाटा इंडिका कारने [KA 37 M 3094 ] अज्ञात अवजड वाहनाला पाठीमागुन ठोकरल्याने कारचे मोठे नुकसान झाले आहे , हा अपघात NH4 वर टोप या गावाजवळ झाला , पहाटेच्या वेळेस चालकाला झोप न आवरल्याने अपघात झाला असे समजते ,अपघातातील जखमींची नावे कळु शकली नाहीत , ही कार कर्नाटकातील कोप्पल जिल्ह्यातील आहे

Tuesday, 25 October 2016

आनंदवन

KOLHAPUR MH9LIVE  संकलित लेख

बाबांनी कुष्ठरोग्यांसाठी काम करण्याचे ठरविले, त्यावेळी त्यांनी त्या कार्यासाठी सरकारकडे जमीन मागितली होती. १९५१ मध्ये त्यांना सरकारने एक पडीक जमीन दिली. जमीनही अशी की नैसर्गिक साधनसंपत्तीची तिथे बिलकुल कमतरता नव्हती. साप आणि विंचू अगदी विपुल प्रमाणात होते. त्यामुळे सुरवातीला त्यांचा बंदोबस्त हेच एक काम होऊन बसले. पण काहीही नसण्यापेक्षा जमीन मिळाली याचाच आनंद बाबांनी मानला आणि काम सुरू केले. 

१९५१ च्या जूनमध्ये बाबांनी आनंदवनात रहायला सुरवात केली, त्यावेळी त्यांच्याबरोबर एक गाय, कुत्रा, चौदा रूपये यांच्यासह पत्नी साधना व दोन मुले विकास व प्रकाश होती. शिवाय बाबांचे कुष्ठरोगी होतेच. बाबा अतिशय सकारात्मक होते. त्याचबरोबर विजिगीषू वृत्ती त्यांच्यात ठासून भरली होती. म्हणून बाबांनी आपल्या या प्रकल्पाला कोणतेही रूग्णविषयक, रोगविषयक नाव न देता, आनंदवन असे त्याचे नामाभिदान केले. 

मग आनंदवनात आनंद शोधण्यासाठी बाबांनी जोरदार काम सुरू केलं. त्यांना त्यांच्या कुष्ठरोग्यांनीही तितकीच तोलामोलाची साथ दिली. त्यांच्याच अथक प्रयत्नाने या वाळवंटी जागेत हिरवाई वस्तीला आली. ही किमया घडवली ती अपंग म्हणविल्या जाणार्‍या कुष्ठरोग्यांनी. सुरवातीला रहाण्यासाठी बांबूच्या सहाय्याने दोन झोपड्या उभारण्यात आल्या. पण त्याला भिंतीच नव्हत्या. त्यामुळे रात्रीच्या वेळी जंगली प्राणी येण्याची भीती होती. जंगली प्राण्यांपासून रक्षण व्हावे यासाठी आणलेले चारही कुत्रे जंगली प्राण्यांनी एकामागोमाग एक गट्ट्म केले. मग त्यांनी तेथे विहीर खोदण्याचे ठरविले. त्यासाठी लागणारी पुरेशी हत्यारेही त्यांच्याकडे नव्हती. तरीही त्यांनी ते काम शिरावर घेतले आणि पूर्ण केले. 
सुरवातीचे हे दिवस फारच हलाखीचे होते. आर्थिक चणचण प्रकर्षाने जाणवायची. आपल्याला कुणावर अवलंबून रहायला नको, यासाठी प्रयत्न करण्याचे मग बाबांनी ठरविले. मग त्यातून शेतीची कल्पना पुढे आली. आनंदवनाच्या जागेतच ते भाज्या पिकवायला लागले. नंतर बाजरी, ज्वारीची पिके घ्यायला लागले.

पुढच्या तीन वर्षात आनंदवनात आमटे कुटुंबाचा चांगलाच विस्तार झाला. त्यात साठ कुष्ठरोगी आले. त्यांनी मिळून सहा विहरी खणल्या. शिवाय पिके घेण्यासाठी आवश्यक ती जमीन तयार केली. त्यावर पिके व भाजीपाला घेतला जाऊ लागला. पण नंतर एक नवाच प्रश्न उभा राहिला. आनंदवनात तयार झालेली पिके, भाजीपाला गरजेपेक्षा जास्त होऊ लागला. त्यानंतर तो वरोर्‍यात विक्रीसाठी पाठविण्यात येऊ लागला. पण लोक त्याला हात लावायलाच तयार नसायचे. आता काय करायचे? 

          योगायोगाने त्यावेळी आनंदवनात काम करण्यासाठी ३६ देशातील सुमारे पन्नास स्वयंसेवक आले होते. त्यांनी आनंदवनात रहायला, तेथील अन्न खायला सुरवात केल्यानंतर गावातल्या लोकांनाही आश्चर्य वाटले. मग तेही हळू हळू आश्रमात येऊ लागले. तेथील स्वच्छता पाहून तेही भारावले. कुष्ठरोग्यांनी पिकवलेले अन्न खाऊन आपल्याला कुष्ठरोग होणार नाही, हे त्यांनाही पटले आणि त्यानंतर मग आनंदवनाताली शेतमालाला कुणीही नाके मुरडेनासे झाले. 

पुढे कुष्ठरोग बरा झाल्यानंतरही लोक आनंदवनातून जायला तयार नसायचे. ते मग बाबांबरोबरच काम करायला लागायचे. पडेल ते काम करायचे. त्यांच्या सहयोगाने अनेक कामे सुरू झाली. अनेक उत्पादने आनंदवनात तयार व्हायला लागली. त्यामुळे आनंदवन स्वयंपूर्ण झाले. ही स्वयंपूर्णताही एवढी की आनंदवनवासियांना बाहेरून फक्त मीठ, साखर आणि पेट्रोल विकत घ्यावे लागायचे. बाकी सर्व गोष्टींचे उत्पादन तेथेच व्हायचे. त्यामुळे आणखी एक फायदा झाला. विविध उत्पादनात तेथे बर्‍या झालेल्या कुष्ठरोग्यांचा समावेश असल्याने त्यांना आश्रमाबाहेर पडल्यानंतर स्वतःचा उद्योगधंदा सुरू करण्यासाठी मनोबळ मिळाले. 

आनंदवनातील शेतमालाच्या उत्पादनानेच अखेर तेथे शेतकी कॉलेज स्थापन झाले. पुढे अंधांसाठी प्राथमिक शाळा, मूकबधिरांसाठी शाळा आणि एक अनाथालयही सुरू झाले. बाबांच्या या कामामुळेच त्यांना पुढे दिगंत किर्ती मिळाली. परदेशी लोकांनाही या प्रकल्पाला भेट देऊन मदत केली.


कोल्हापुरी लाईट माळा चिनी माळाना भारी

KOLHAPUR MH9LIVE REPORT - ‘चायनीज लायटिंगला कोल्हापुरी ची फाइट’ अशी परिस्थिती या वर्षी दिवाळी बाजारात पाहायला मिळत आहे भारत-पाकिस्तान यांच्यात बिघडलेले संबंध आणि चीनने पाकिस्तानला दिलेले समर्थन या पाश्र्वभूमीवर चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मागणी जोर धरत असताना, संपूर्ण महाराष्ट्रातील  बाजारपेठेत ग्राहकांनी हा मुद्दा गांभीर्याने घेतल्याचे दिसून येत आहे. एरवी दिवाळीला चिनी बनावटीच्या लाईटच्या  तोरणांची खरेदी करणाऱ्यांचा मोर्चा आता कोल्हापूरमध्ये बनलेल्या लाईट  माळांकडे वळला आहे.सोशल मीडियावर चिनी लाइटिंग च्या  तुलनेत कोल्हापुरी लाईट माळा  सरस असल्याची माहिती प्रसारित केली जात आहे. कोल्हापुरी लाईट माळा च्या  या व्यवसायाने कोल्हापूरमधील पाचशेहून अधिक महिलांना घरोघरी रोजगार उपलब्ध झाला आहे. कोल्हापूर येथील पाचगाव, जवाहरनगर येथील महिलावर्ग दिव्यांच्या माळांचे बल्ब जोडणे, पीळ देणे, होल्डर बसविणे, कॅप बसविणे आदी कामे करतात आणि त्यानंतर या माळा विक्रीसाठी विविध शहरांत आणल्या जात आहेत.विजेची बचत
व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून बेळगाव, गोवा, पुणे, ठाणे या ठिकाणी कोल्हापुरी दिव्यांचा प्रसार केला जात आहे. कोल्हापुरी दिवे एलईडी दिव्यांच्या साहाय्याने तयार करण्यात आल्याने विजेची मोठय़ा प्रमाणात बचत होते. कोल्हापुरी दिव्यांच्या माळा पन्नास फूट लांब असून प्रत्येक माळेत शंभर एलईडी बल्ब आहेत. यातील बल्ब खराब झाल्यास दुसरा बल्ब लावता येऊ शकतो, चिनी युज आणि थ्रो लाईट माळांना हा दणका च आहे

Monday, 24 October 2016

अमेरिकेतील यशस्वी मराठी उद्योजक...!!!


Kolhapur mh9Live Reporter संकलित

अमेरिकेतील यशस्वी मराठी उद्योजक...!!!

डॉ.सुहास पाटील..!!!

मराठी लेकांनी नोकरिच्या मानसीकतेमधुन बाहेर पडुन नोकरी व्यवसायाच्या किंवा बिझिनेसच्या मानसिकतेमधे शिरावे या दृष्टिने माझा थोडा फार प्रयत्न चालु आहे. या प्रयत्नाचा एक भाग म्हणुन असे यशस्वी मराठी उद्योजक, की ज्यांची माहिती अजुनपर्यंत लोकांना नाही, शोधुन काढुन त्यांच्या यशोगाथा आपल्यापर्यंत पोचवण्याचा माझा प्रयत्न असतो. मराठी लोकांनी यांच्यापासुन स्पुर्ती घ्यावी व आपल्यामधे तसेच आपल्या मुलाबाळांमधे उद्योग व्यवसायाची मानसीकता निर्माण करण्याच्या प्रयत्नाला सुरवात करावी येव्हडीच माझी माफक अपेक्षा आहे.

डॉ.सुहास पाटील हे अमेरिकेतील एक आघाडिचे, प्रतिष्ठीत व आदरणीय असे भारतीय व त्यातुनही मराठी उद्योजक म्हणुन ओळखले जातात. त्यांनी स्थापन केलेली ' सीरस लॉजीक ' ( Cirrus Logic ) ही कंपनी सिलिकॉन व्हॅलीमधील एक आघाडिची कंपनी म्हणुन ओळखली जाते.
डॉ.पाटील यांचा जन्म 1944 साली जमशेदपुर( झारखंड ) येथे झाला. लहान पणापासुनच त्यांना सायन्सची आवड होती. त्यांच्या वडिलांचा रेडियो रिपेअरींगचा साईड बिझिनेस होता त्यामुळे हे घडले असावे. केमिस्ट्री हा त्यांचा आवडिचा वीषय होता व त्यांनी शाळेत असतानाच घरी एक छोटी केमीकल लॅब पण काढली होती. त्यावेळी त्यांना पॉप्युलर मेकॅनीक हे मासीक फार आवडायचे. या मासिकात काय लिहिले आहे हे समजावे म्हणुन त्यांनी इंग्रजी भाषेचा अभ्यास करुन त्यावर प्रभुत्व मीळविले.

1965 साली आय. आय. टी. खरगपुर येथुन बी. टेक. झाल्यावर ते उच्च शीक्षणासाठी अमेरिकेत आले. 1970 ते 1975 पर्यंत ते एम.आय.टी मधे असिस्टंट प्रोफेसर म्हणुन काम करत होते. मग उटाह युनिव्हर्सिटिच्या इंजिनीयरींग कॉलेजमधे त्यांनी असोसीएट प्रोफेसर म्हणुन काम केले. त्यांनी 1981 साली सॉल्ट लेक सिटी येथे पाटील सिस्टीम्स या कंपनिची स्थापना केली. याच कंपनिचे रुपांतर पुढे सीरस लॉजीक मधे झाले. मग ते सिलिकॉन व्हॅलीत आले. ते अजुन काही महत्वाच्या कंपन्यांचे डाररेक्टर आहेत. तसेच सॅन ओजे ( San Jose ) येथील टेक्नीकल म्युझियमचे डाररेक्टर पण आहेत. हे टेक्नीकल म्युझीयम अमेरिकेतील सर्वोकृष्ट टेक्नीकल म्युझीयमपैकी एक म्हणुन ओळखले जाते.

ते दानशुर म्हणुन पण ओळखले जातात. त्यांनी एम.आय.टी ला 15 लाख डॉलर्सची तेथील स्टाटा सेन्टरच्या उभारणिसाठी देणगी म्हणुन दिले आहेत. तसेच भारतातुन अमेरिकेत आलेल्या लोकांनी उद्योग व्यवसायात शिरावे म्हणुन ते प्रयत्नशील असतात.
शिक्षण क्षेत्रातुन आलेल्या डॉ. सुहास पाटील यांनी अमेरिकेसारख्या पुढारलेल्या देशात यशस्वी उद्योग व्यवसाय उभारुन सर्व भारतियांची, व विशेषतः मराठी माणसांची मान अभिमानाने उंच केली आहे. 

व्हेरीकोज व्हेन्स
















व्हेरीकोज व्हेन्स –
दिवसभर उभे राहून काम करणाऱ्या लोकांच्या पोटऱ्यामधल्या रक्‍तवाहीन्यां सुजतात आणि त्यात रक्‍ताची गुठळया तयार होतात त्याला व्हेरीकोज व्हेन्स असं म्हणतात. पायाकडून ह्रदयाकडे रक्‍त नेणाऱ्या रक्‍तवाहीनींना व्हेन्स किंवा नीला असे म्हणतात. या नीलांमध्ये जागोजागी झडपा असतात. त्या फक्‍त एकाच दिशेने म्हणजे रक्‍त ह्रदयाच्या दिशेने जाईल अशा पध्दतीच्या असतात. काही कारणाने रक्‍त माघारी येउ नये म्हणून ही झडप अशा पध्दतीची असते.  टेलर, रिटेल क्‍लार्क,दुकानात काम करणारे नोकर,पाठीवर पोती वाहून नेणारे हमाल,दिवसभर स्वैपाकघरात उभे राहून काम करणाऱ्या बायका यांना व्हेरीकोज व्हेन्सचा त्रास होतो. कारण त्यांचे रक्‍त गुरुत्वाकर्षणामुळे
पायातच साचून राहते. त्यामुळे तंयांच्या नीलामधल्या झडपा निकामी होतात.म्हणून नीलांमेध्य गुठळया होतात. अशा पेशंटना ई जीवनसत्व दिल्यास व्हेरीकोज व्हेन्सचा त्रास पुष्कळप्रमाणात कमी होतो.

चीनी फटाके अतिशय धोकादायक

KOLHAPUR MH9LIVE REPORTER - चीनी फटाके अविश्वसनीय आणि धोकादायक आहेत , चीनी  फटाक्यांच्या आयातीवर   बंदी घालण्यात आली आहे , चीनी फटाक्यांमध्ये वापरले जाणारे potassium-chlorate. हे एक घातक रसायन आहे , यामुळे श्वसनाचे विकार , दमा , धाप लागणे , खोकला , घास खवखवणे आदी त्रास होतो ,त्याच्या उत्पादन, वापर, ताबा, विक्री इ कोणत्याही chlorate सह मिश्रण मध्ये गंधक किंवा sulphurate असलेली कोणत्याही स्फोटकांवर   1992 पासून  देशात बंदी घालण्यात आली आहे , पण त्याची अंमलबजावणी होत नाही सोशल मीडियावरून सध्या प्रत्येक चिनी उत्पादनांना विरोध केला जात आहे त्यामुळे  चिनी फटाके यंदा दिवाळीत वाजणार नाहीत अशी अपेक्षा ठेवून त्यांवर बहिष्कार घालूया

Sunday, 23 October 2016

सिंधुदुर्गात लाखो मराठ्यांचा विराट सागर

Kolhapur mh9Live Reporter संकलीत वार्ता

सळसळते भगवे झेंडे, भगव्या टोप्या , भगवे स्कार्फ आणि निःशब्द वातावरणात गर्दीचे सारे विक्रम मोडीत काढले . लाखोंच्या संख्येने निघालेल्या या विराट मोर्चात तरुणाई आणि महिलांची संख्या लक्षणीय राहिली . त्यांच्या हातातील विविध फलकांनी आपल्या न्याय्य मागण्या मांडल्या. सकाळी सातपासूनचच शहराच्या विविध ठिकाणांहून सुरू झालेला हा निःशब्द हुंकार साडेबाराच्या सुमारास महाएल्गारात रूपांतरीत  झाला. आणि त्याने कोपर्डी घटनेतील नराधमांवर कठोर कारवाई , मराठा आरक्षणासह विविध मागण्यांची एकमुखी मागणी सुरू केली.रणरागिणी ताराराणींच्या वेशभूषेत मोर्चात सहभागी होणाऱ्यांची संख्याही लक्षणीय होती . मात्र, शोभायात्रेपेक्षा " हेच आमचे प्रेरणास्थान आहे . आम्ही पेटून उठलोय अन्यायाच्या विरोधात आणि न्याय मिळवूनच मागे हटणार , ' असे सांगण्याचाच प्रामाणिक प्रयत्न होता.
डोक्यावर पांढऱ्या , भगव्या टोप्या, हातात भगवे झेंडे, गळ्यात स्कार्फ, साड्या आणि कोपर्डी घटनेची चेहऱ्यावर दिसणारी तिडीक अशा वातावरणात मराठा क्रांती मोर्चातील महिलांचा सहभाग लक्षणीय राहिला . शहरासह जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून मराठमोळ्या माता-भगिनींसह तरुणी लाखोंच्या संख्येने सहभागी झ ाल्या होत्या
सिंधुदुर्गाची लोकसंख्या अंदाज साडेआठ लाख. 34%मराठा समाज आहे आजच्या मोर्चात इत्तर समाजाचे लॉक सामिल होत आपला पाठिंबा दिला.
शहरातील महिलांपेक्षा ग्रामीण भागातील दैनंदिनी जराच वेगळीच . पहाटे उठायचे . दुभत्या जनावरांची देखभाल , चारा - पाण्याची व्यवस्था करायची , धारा काढायच्या आणि शेताची वाट धरायची . आज या कामांना सुटी देत ऐतिहासिक " मराठा मोर्चा 'च्या साक्षीदार होण्यास आतुर झालेल्या महिलांचे लोंढेच्या लोंढे मिळेल त्या वाहनाने शहरात दाखल झाले . पहाटेपासूनच शहराच्या वेशीवर थंडीची तमा न बाळगता दिवसभर लागणारी न्याहरी सोबत घेऊनच त्या वाहनातून उतरल्या. तेथून थेट चालत मोर्चाच्या मार्गावर सहभागी झाल्या .
घराला कुलूप ', चूल बंद करून मोर्चात सहभागी व्हा , या संयोजकांच्या व मराठा कार्यकर्त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत लाखोंच्या संख्येने महिला घराला कुलूप लावूनच मोर्चात उतरल्या. मोर्चात महिला , तरुण अग्रभागी राहिल्या . या महिलांना पुढे जाण्यासाठी वाट करून देण्यापासून ते रस्त्याच्या एका बाजूला त्यांना सहभागी करून घेण्यासाठी स्वयंसेवकांचीही धांदल उडाली.
" ना नेता , ना घोषणा ' असे स्वरूप असलेल्या या मोर्चाबाबत ग्रामीण भागातील महिलांत मोठी उत्सुकता होती . राज्याच्या इतर जिल्ह्यांत निघालेल्या मोर्चाची माहिती त्यांच्यापर्यंत पोचल्याने सिंधुदुर्गच्या मोर्चात कधी सहभागी होतोय , अशाच काहीशा भावना या महिलांच्या चेहऱ्यावर दिसत होत्या . त्यामुळे ग्रामीण भागातून उत्स्फूर्तपणे महिला सहभागी झाल्या . अनेक महिलांच्या कडेवर लहान मूल, हाताचे बोट धरून चालणारी मुलं - मुली आणि ज्येष्ठ महिलांना सांभाळत निघालेल्या तरुण मुलींनी मोर्चा यशस्वी करण्यात मोलाचा सहभाग घेतला आहेङा .
कोपर्डी घटनेतील दोषींना फाशीची शिक्षा व्हावी , मराठा समाजाला आरक्षण मिळावे , ऍट्रॉसिटी कायद्यात बदल करावा , शेतीमालाला हमीभाव मिळावा व शेतकऱ्यांना च मिळावी या मोर्चाच्या मागण्यांचे महिलांच्या हातातील फलक लक्ष वेधून घेत होते . मोर्चात सहभागी झालेल्या महिलांना जागोजागी पाणी, खाऊ , फळे वाटप करणारे पाठबळ देत होते.
सकाळी दहापासून सुरू झालेल्या  फक्त एक मराठा लाख मराठा दिसू लागला.
चारचाकी , दुचाकी, रुबाबदार बुलेटवर भगवा झेंडा , डोक्यावर भगव्या टोप्या घालून , लोक टेम्पो , जीप भरून जथ्याजथ्याने येत होते.साधारण दहाच्या सुमारास सिंधुदुर्गनगरी गजबजू लागली होती. अबालवृद्धांचा सहभाग मोर्चात वेगळीच ऊर्जा निर्माण करीत होता . साधारण अकरा वाजण्याच्या सुमारास मुख्य चौकात गर्दी वाढली . बघताबघता मुख्य चौक भगवा दिसू लागला. बहुतांशी लोकांच्या हातात भगवे झेंडे होते.

सिंधुदुर्गातील मोर्चा " न भूतो न भविष्यति ' असा असेल, अशी वातावरणनिर्मिती गेल्या महिन्याभरापासून जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात सुरू होती . आज प्रत्यक्षात सिंधुदुर्गवासियांना याची अनुभुती आली . " ना नेता , ना घोषणा ' हे राज्यभरातील मोर्चांचे स्वरूप सिंधुदुर्गातही कायम होते .  मोर्चाला अनेक समाजांनी पाठिंबा दिला