Sunday, 29 October 2017

वाचलेच पाहिजे असे काही महत्वाचे


डॉक्टर कितीपण पैसा लागु दे पण पेशंटला वाचवा हे वाक्य सर्रासपणे भावनेच्या भरात बोलले जाते पण याचाच गैरफायदा घेतला जातो.

खाजगी प्रायव्हेट हाॅस्पिटल मध्ये कार्यरत असणाऱ्या डाॅक्टर्सना दरमहा दीड लाख इतके वेतन देण्यात येते. परंतू त्या सर्व डाॅक्टर्सना टारगेटस् अर्थात लक्ष दिली जातात. त्यांना सांगितले जाते की, जर त्यांना नोकरीवर  राहायचे असेल तर त्यांनी किमान  3 लाख रूपयापर्यंतच्या चाचण्या (Tests) आणि स्कॅन करण्याबाबत रूग्णांना भरीस घातले पाहिजे आणि दरमहा किमान  25 रूग्णांना (पेशंटना) ऑपरेशन करण्यास भाग पाडले पाहिजे.

अर्थात  हे सर्व  धर्मादाय (चॅरीटी) व सरकारी रूग्णालयात होत नाही.

बहुतांश मल्टीस्पेशालिटी व कार्पोरेट खाजगी हाॅस्पिटल्समध्ये अनावश्यक  शस्त्रक्रिया (Unwanted surgeries) आणि धोक्याच्या व जोखमीच्या अकाली (Premature)  मोतीबिंदू शस्त्रक्रिया(Risky Premature Cataract Surgeries) केल्या जातात. तात्पर्य  हे की खाजगी हाॅस्पिटलमध्ये भयावह वातावरण  अनुभवास येते.

यास्तव तुम्ही कधीही आपले वैद्यकीय विमा कार्ड (Medical Insurance Card) दाखवून  म्हणून नका "डाॅक्टर तुम्ही खर्चाची अजिबात काळजी करू नका. कृपा करून मला वाचवा."
जर ते डाॅक्टर तुम्हाला विचार करण्याची संधी देण्यापूर्वीच घाबरंवून सोडत असतील तर तुम्ही लागलीच सावध झाले पाहिजे आणि त्या हाॅस्पिटलमध्ये दाखल (अॅडमिट) नाही झाले पाहिजे.

जर डाॅक्टरांचे तुम्हाला ऑपरेशन करण्याचा एकमेव सल्ला दिला असेल किंवा वैद्यकीय प्रक्रीया करण्याबाबत सांगितले असेल तर कृपया घाई करू नका. थोडे थांबा सेकंड ओपिनियन घ्या यासाठी Google वर फक्त second opinion म्हणून सर्च करा

https://www.webmd.com/health-insurance/how-to-ask-for-second-opinion.

https://stanfordhealthcare.org/medical-clinics/surgery-clinic/patient-resources/second-opinion.html

https://www.betterhealth.vic.gov.au/health/servicesandsupport/second-opinions

https://medisensehealth.com/second-opinion

तुमच्याकडे जे मेडिकल रिपोर्ट असतील ते रिपोर्ट   त्या वेबसाईटवर पाठवा किंवा medical@medisense.
meor वर पाठवा ज्या ठिकाणाहून तुम्हाला व्दितीय मत (Second Opinion) तज्ञ डाॅक्टरर्सच्या पॅनलचे प्राप्त होईल.  विशेष म्हणजे ही सेवा रुग्णांसाठी पूर्णतः मोफत आहे. रूग्णांसाठीची ही मोफत सेवा भारतातील मोठ्या 21 शहरांमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये  मेंगलोर, बेंगलोर, पुणे, मुंबई, चेन्नई, हैद्राबाद या शहरांचा समावेश आहे.

आपणापैकी काही जणांना वरील अनुभव अगदी ताजा अनुभवास आला असेल. डाॅक्टरांनी ऑपरेशनचा खर्च लाखो रूपयात सांगितला असेल. आपण पैशाची जुळवणी करण्यात मग्न असाल, टेन्शनमध्ये असाल तर वरील वेबसाईटवर मोबाईल  क्रमांकावर काॅल करून मार्ग काढू शकता किंवा निर्देशित  संकेतस्थळावर भेट देवून  मार्ग  काढू शकता.

कृपया सर्वाना माहिती जरूर पाठवा.

Friday, 27 October 2017

पेट्रोल पंपवाल्यांची लबाडी - एका ग्राहकाला आलेला धक्कादायक अनुभव -------


" दिनांक ३ अॉक्टोबर, यात्रेवर रवाना होण्याआधी, सकाळी दहाच्या सुमारास ठाण्यात एका पेट्रोल पंपावर कार मध्ये डिझेल भरताना, कर्मचा-यास ,पाईप लिव्हर  अॉटोलॉक करून टैंक फुल्ल करण्याची सूचना दिली. त्यानेही लिव्हर अॉटो लॉक केला व जरासा बाजूला झाला. तेवढ्यात डिझेल भरणे सुरू असताना, त्यांचा मुकादम आला व काहीही न बोलता त्याने लिव्हर तीनदा थोडा थोडा दाबून सोडला. हे मी आरशातून पाहिलं. उतरलो. त्याला विचारलं.. अॉटोलॉक डिझेल भरणे चालू असताना तीनदा लिव्हर कशासाठी दाबला ? तो चाचरला... मग उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला... मी त्याला खडसावून विचारले पण बाकीचे कर्मचारी लगेच त्याच्या मदतीस आले. मला पुढे जायचे असल्याने, मी आवरते घेतले. नंतरच्या आठवड्यात दोन तीन वेळा  एच पी / बीपी पंपावर डिझेल कर्मचा-यांंना खोदून खोदून विचारले की डिझेल भरताना लिव्हर खेचून नक्की काय करतात? पण त्यांनीही माहित नाही अशीच संदिग्ध उत्तरे दिली.
आज पुण्यात शेल पेट्रोल पंपावर डिझेल भरताना... तिथल्या कर्मचा-यास बोलते केले.... त्याने तत्काळ उत्तर दिले
..सर, आमच्याकडे असे कधीच होत नाही. पण लिव्हर खेचल्याने डिझेल थांबते पण बिलाचे आकडे चालूच राहतात. अशा रितीने शे दिडशेचा फायदा, कर्मचारी मालकाला करून देतो.

या बाबीवर आणखी कोणी प्रकाश पाडू शकल्यास, धन्यवाद.

डिझेल/पेट्रोल भरले जात असताना लिव्हर एक दोन वेळा जरी खेचला तरी,  रिडींग सुरूच राहते. नुकसान ग्राहकाचे होते.

आपण सावध असावं.... सुरू केल्यानंतर, पुन्हा लिव्हर खेचायचा नाही अशी सूचना द्यावी. लक्ष ही ठेवावे.

प्रश्न शे दीडशे रूपयांचाच . पण आधीच प्रशासन डिझेल /पेट्रोल साठी आपल्याला नाचवतय, त्यावर हा भुर्दंड का सोसायचा?  आपल्याकडे वेळही नसतो. वादविवादासाठी. "

म्हणून  जनहितार्थ. सोशल मीडियावरुन साभार.

Tuesday, 24 October 2017

10 रुपये ते 12 हजार कोटी जेट एयरवेजचे मालक नरेश गोयल यांची अचंबित करणारी कथा


भारतात व जगात विमानसेवा पुरवणारी जेट एअरवेज ही स्वदेशी कंपनी तर तुम्हाला माहितच असेल. पण, या कंपनीच्या संस्थापकाबद्धल कदाचित खूपच कमी लोकांना माहिती असेल. नरेश गोयल हे या कंपनीचे चेअरमन. जे एक सक्सेस व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाते. एकेकाळी सायकल खरेदी खरण्यासाठीही पैसे नसलेला हा माणूस आज एका विमान कंपनीचा मालक आहे. जाणून घेऊया या व्यक्तिमत्वाबद्धल...

नवी दिल्ली : विमानसेवा पुरवणारी जेट एअरवेज ही कंपनी तर तुम्हाला माहितच असेल. पण, या कंपनीच्या संस्थापकाबद्धल कदाचित खूपच कमी लोकांना माहिती असेल. नरेश गोयल हे या कंपनीचे चेअरमन. जे एक सक्सेस व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाते. एकेकाळी सायकल खरेदी खरण्यासाठीही पैसे नसलेला हा माणूस आज एका विमान कंपनीचा मालक आहे. जाणून घेऊया या व्यक्तिमत्वाबद्धल...

नरेश गोयल यांची कहाणी सुरू होते पंजाबमधील संगरूर इथून. संगरूर येथे २९ जुलै १९४९ मध्ये नरेश गोयल यांचा जन्म झाला. एका दागिणे व्यापाऱ्याच्या पोटी जन्म घेतलेल्या नरेश यांच्या बालपणाचा सुरूवातीचा काळ चांगला गेला. पण, त्यांच्यासाठी हा काळ फार दिवस टिकला नाही. वयाच्या ११ व्या वर्षी त्यांच्या वडिलांचे निधन झाले. वडीलांच्या जाण्यानंतर घरात गरीबी आली. घरावर कर्जाचा डोंगर साचला. सर्व वस्तू विकल्या गेल्या. अगदी रहायलाही घर राहिले नाही. त्यामुळे त्यांनी आपल्या कुटूंबियांसोबत आपला मुक्काम निनिहालला हालवला. तिथेही गरीबीने त्यांची पाठ सोडली नाही.

राहण्याचे ठिकाण बदललने म्हणून घरची स्थिती बदलली नाही. घरातून शाळेपर्यंत जाण्यासाठीही त्यांच्याकडे पैसे नसत. त्यामुळे गोयल यांना शिक्षणासाठी अनेक मैल पायी चालत जावे लागे. सोबतची मुले सायकलवरून शाळेला जात. पण, सायकल घेण्याइतकेही त्यांच्या आईकडे पैसे नसत. शाळेला जात असताना आपण चार्टर्ड अकाऊंटंटचे शिक्षण घ्यावे आणि पटकन नोकरीला लागावे असे त्यांना वाटत असे. त्यासाठी त्यांनी एका कॉलेजमधून बीकॉमपर्यंतचे शिक्षण घेतले.

१९६७मध्ये ग्रॅज्यूएशन पूर्ण केल्यानंतर नरेश यांनी आपल्या मामाच्या ट्राव्हल एजन्सीत काम करणे सुरू केले. त्या कंपनीत ते लेबनीज एयरलाइन्ससाठी काम करत होते. या कामाचे त्यांना १० रूपये मिळत असत. महिन्याचे एकूण ३०० रूपये व्हायचे. साधारण ७ वर्षांपर्यंत हा प्रवास राहिला. ७ वर्षांनतर त्यांनी नरेश यांनी स्वतंत्र व्यवसाय सुरू केला. पण, त्यांनी पुन्हा मोठ्या कंपन्यांसोबत चांगल्या पदांवर नोकरी करण्यासाठी सुरूवात केली. यात त्यांना इराक एअरवेजसाठी पीआर म्हणून काम करण्याची संधी मिळाली. तसेच, त्यांनी रॉयल जॉर्डियन एअरलाइनसाठी रीजनल मैनेजर, मिडल ईस्टर्न एअरलाइन्स कंपन्यांसाठी भारतीय कार्यालयातून तिकीट, रिजर्व्हेशन, सेल्स अशा अनेक पदांवर काम केले.

या मोठ्या विमान कंपन्यांसोबत काम करताना त्यांन लोकांच्या आडचणी लक्षात आल्या. मग त्यांनी या अडचणी सोडविण्यासाठी स्वत:च विमानकंपनी सुरू करण्याचा निर्णय घेतला.  कंपनी सुरू केल्यावर सुरूवातीला त्यांना फार यश आले नाही. म्हटले तर, तोटाच अधीक झाला. पण, अल्पावधीतच कंपनीची प्रगती सुरू झाली. जेट एअर हि एक प्रख्यात वक्तशीर कंपनी म्हणून जगभरात नावाजलेली कंपनी आहे. आज जेट एअरवेजमुळे नरेश गोयल भारतातील २० श्रीमंत व्यक्तींपैकी एक म्हणून ओळखले जातात. 

Saturday, 21 October 2017

महिलांनी घर संसार सांभाळून छोटया, मोठया व्यवसायाच्या माध्यमातून यथाशक्ती आर्थिक स्त्रोत निर्माण केले पाहिजे. असे प्रतिपादन महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील

हेर्ले/ वार्ताहर दि. २१ / १o/१७
जो पर्यंत स्त्री आर्थिक स्वावलंबनासाठी कमवणार नाही तोपर्यंत तिची घरामध्ये किंमत वाढणार नाही. म्हणून महिलांनी  घर संसार सांभाळून छोटया, मोठया व्यवसायाच्या माध्यमातून यथाशक्ती आर्थिक स्त्रोत निर्माण केले पाहिजे. असे प्रतिपादन महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.
      ते हेरले ( ता. हातकणंगले) येथे महिला सबलीकरण ध्येयातून तेरदाळे कुटूंबांने श्री घरगुती बिस्कीटाचे अद्दायावत युनिट सुरू केले आहे. त्याच्या उदघाटन प्रसंगी बोलत होते.
    ना. पाटील पुढे म्हणाले की, प्रत्येक कुटुंबांत चार तास पुरूषाने व चार तास स्त्रीने आपआपली कर्तव्याची कामे केली, तर निस्चित आर्थिक स्तर उंचावून विकास होईल. कोल्हापूर जिल्हयात स्वयंसिद्धाच्या माध्यमातून संचालिका कांचनताई परूळेकर यांनी ५० हजार स्त्रियांना स्वयंम रोजगारासाठी प्रशिक्षित केले आहे. त्यापैकी चार हजार पाचशे स्त्रिया स्वतःचा व्यवसाय सुरू करून स्वावलंबी झाल्या आहेत.  झोपडपट्टीतील २५० मुलांना दररोज त्यांना बिस्कीट मिळावीत यासाठी तरतूद केली असून स्वयंसिध्दा यांना ऑर्डर दिली आहे . महिला व्यवसायकांना  मिळालेल्या बाजारपेठेमुळे व्यवसायास बळ मिळणार आहे.
         जि.प. अध्यक्षा शौमिका महाडीक म्हणाल्या की, प्रत्येक घरामध्ये महिला घरचा खर्च काटकसरीने करीत त्यातील अल्पबचत करीत असतात. आर्थिक अडचणीच्या वेळी ती रक्कम कामी येते. याच प्रमाणे महिलांनी बचतगटाच्या माध्यमातून विविध घरगुती व्यवसाय सुरू करून आर्थिक स्तर उंचावून संसारास बळकटी आणावी असे आव्हान केले.
      प्रथमतः नामदार चंद्रकांत पाटील व जि.प अध्यक्षा शौमिका महाडीक, कांचनताई परूळेकर यांच्या हस्ते घरगुती बिस्कीटचे अद्यायावत युनिटचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार तेरदाळे कुटुंबांच्या वतीने करण्यात आला. याप्रसंगी तृप्ती पुरेकर, सौम्या तिरोडकर,माजी सभापती राजेश पाटील, जि.प. सदस्या डॉ. पद्माराणी पाटील, पं.स. सदस्या मेहरनिगा जमादार, नूतन सरपंच अश्विनी चौगुले, पी.डी. पाटील,पोलीस पाटील नयन पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक पद्मश्री तेरदाळे यांनी केले. आभार डॉ. संताष तेरदाळे यांनी मानले.

     फोटो
हेरले ( ता. हातकणंगले) येथे कार्यक्रमात बोलतांना नाम. चंद्रकांतदादा पाटील बोलतांना शेजारी जि.प. अध्यक्षा शौमिका महाडीक, राजेश पाटील व इतर मान्यवर

कांबरे बंधूचे कडवे आव्हानाची राजकारण्यांना प्रचिती!!

हेरले/ प्रतिनिधी  दि. १९/१०/१७

     मौजे वडगाव ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत संयुक्त आघाडीचे सरपंच उमेदवार काशिनाथ कांबळे यांनी अपक्ष उमेदवार प्रकाश कांबरे यांच्यावर  ११ मतांनी विजय मिळवला. संयुक्त आघाडीने अकरापैकी सहा जागा जिंकून जय शिवराय पॅनेलचा पराभव  करीत सत्तांतर  घडवून आणले.
       सरपंच पदाची निवडणूक चौरंगी झाली. संयुक्त आघाडीचे काशिनाथ कांबळे ( ७६९ ), अपक्ष प्रकाश कांबरे ( ७५८), जय शिवराय आघाडी ( ४९७), जय हनुमान आघाडी ( ४८२) आदी उमेदवारांनी मते घेतली.
      आठ ग्रामपंचायत सदस्यासाठी दुरंगी निवडणूक झाली.संयुक्त आघाडीचे सहा विजयी उमेदवार किरण चौगुले ( ४४२), अश्विनी लोंढे( ४१२), सुभाष अकिवाटे  (३९७), वैशाली गोरड( ३६७), अवधूत मुसळे( (४५७), सरताज बारगीर( ४५६) या उमेदवारांनी प्रचंड मतांनी परस्पर उमेदवारांवार विजय मिळविला.आघाडीचे नेतृत्व मानसिंग रजपूत, किरण चौगुले, अवधूत मुसळे, मुबारक बारगीर यांनी केले.
      जय शिवराय आघाडीचे तीन उमेदवार बिनविरोध होऊन दोन उमेदवार विजयी अविनाश पाटील ( ३२६), सरिता यादव ( २४८) आदी पाच जागा मिळाल्या. आघाडीचे नेतृत्व श्रीकांत सावंत , रावसाहेब चौगुले, अॅड. विजय चौगुले, सरपंच सतिश चौगुले, सतिश वाकरेकर यांनी केले.
      अपक्ष सरपंच उमेदवार प्रकाश कांबरे यांनी सहा महिने परिश्रम घेऊन एकहाती प्रचार यंत्रणा राबवत ७५८ मते मिळवत दोन्ही आघाडीस चॅलेज केले होते. त्यांच्या पाठीशी जनतेने भरभरून साथ देऊन संयुक्त आघाडीच्या बरोबरीने मते पदरात टाकली. त्यांचा ११ मतांनी निसटता पराभव गावातील गटनेत्यांना आत्मपरिक्षण करणारा ठरला आहे.
                   सरपंच उमेदवार शिवसेना शाखाप्रमुख  सुरेश कांबरे यांना जय शिवराय आघाडीने माघारी पर्यंत झुलवत ठेवून नंतर उमेदवारी नाकारली. त्यांनी जय हनुमान आघाडी पुरूस्कृत उमेदवारीने निवडणूकीत उभे राहिले. अवघ्या सहा दिवसात बाळासाहेब थोरवत, धोंडीराम चौगुले, महादेव शिंदे, रामदास कांबरे, नेताजी कांबरे,रावसाहेब चौगुले, बाळासाहेब चौगुले, दादा चौगुले आदींनी खर्चासाठी वर्गणी काढून नेतृत्व करीत  दोन्ही आघाडींना आव्हान निर्माण केले. सुरेश कांबरे यांना ४८२ मते मिळाली.जय शिवराव आघाडीने त्यांना उमेदवारी नाकारल्यामुळे त्यांच्या मताच्या घटीमुळे ६ जागेवर परिणाम होऊन पराभवास सामोरे जावे लागले. बिनविरोध तीन व निवडणूकीत दोन जागा मिळाल्या. एका सरपंच पदाच्या उमेदवारीचा पत्ता कट केल्याने गर्वहरण होऊन सत्तेवर पाणी सोडावे लागले.
             
       कांबरे बंधूचे कडवे आव्हानाची राजकारण्यांना प्रचिती!!

पीके सामाजिक सेवाग्रुपचे अपक्ष सरपंच उमेदवार प्रकाश कांबरे यांचा ११ मतांनी पराभव झाला. त्यांनी गटनेत्यांना दाखवून दिले की, हम भी कुच्छ कम नही. तर सुरेश कांबरे यांची ६ तारखेस ऐन निवडणूकीच्या तोंडावर जय शिवराय आघाडीने सरपंच उमेदवारीचा पत्ता कट केला. मात्र सहा दिवसाच्या प्रचार यंत्रणेत आघाडीच्या उमेदरा ऐवढी मते घेऊन सहा उमेदवारांना पराभूत करण्याचा पराक्रम करून जोर का झटका कैसा लगा हे दाखवून दिले.
         
    किरण पॉलीटिक्स किंगमेकर बनले!!

गटनेते किरण चौगुले यांना यापूर्वी दोन निवडणूकीमध्ये उमेदवारी मिळाली नव्हती. त्यांनी उमेदवारी मागायची नाही आपण दुसऱ्यांना दयायची या जिद्दीने या निवडणूकीत पॅनेल तयार केले.ते निवडून तर प्रचंड मतांनी आलेच आणि सरपंच पद, ६ जागा जिंकून किंगमेकर बनले.
        
     शिवसेनेच्या वाघांनी मारला पंजा ! !

जय शिवराय आघाडीने निवडणूकीच्या काळात शिवसेना पुरस्कृत जय हनुमान आघाडीबरोबर फारकत घेतल्याने त्यांचे प्रभाग १,३,४ यातील उमेदवार शिवसेनेने पाडले. त्यामुळे वाघाने मारला पंजा याची प्रचिती जय शिवराय आघाडीस आली. चिडीयॉ चूग गई खेत आब क्या पछतांने का फायदा. अशी चर्चा चौका-चौकात आहे.

Thursday, 19 October 2017

दिवाळी पाडवा

कार्तिक शुद्ध प्रतिपदा ( दिवाळी पाडवा ). श्रीविष्णूने ही तिथी बळीराजाच्या नावाने केली, म्हणून या तिथीला ‘बलीप्रतिपदा’ म्हटले जाते.
दिवाळी पाडवा साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त आहे. हा ‘विक्रम संवत’ कालगणनेचा वर्षारंभदिन म्हणून साजरा करतात.
     बळीराजा हा अत्यंत दानशूर होता. दारी येणारा अतिथी जे मागेल ते दान तो त्याला देत असे. 
बळीराजा वास्तविक असुर घराण्यातील असूनसुद्धा त्याच्या उदार तत्त्वामुळे अन् त्याने भगवंताला शरण जाऊन आपले सर्वस्व अर्पण केल्यामुळे तो तिन्ही लोकांचा चक्रवर्ती राजा होता त्यामुळे इंद्राचे इंद्र पद धोक्यात आले होते म्हणून इंद्राने विष्णू ला शरण जाऊन साकडे घातले.
     तेव्हा भगवान श्री विष्णूने मुंजा मुलाचा अवतार (वामनावतार) घेतला. (मुंजा मुलगा लहान असतो अन् तो ‘ॐ भवति भिक्षां देही ।’ म्हणजे ‘भिक्षा द्या’ असे म्हणतो.) वामनाने बलीराजाकडे जाऊन भिक्षा मागितल्यावर त्याने विचारले, ‘‘काय हवे ?’’ तेव्हा वामनाने त्रिपाद भूमीदान मागितले. ‘वामन कोण आहे आणि या दानामुळे काय होणार’, याचे ज्ञान नसल्याने बलीराजाने त्रिपाद भूमी वामनाला दान दिली. त्याबरोबर वामनाने विराटरूप धारण करून एका पायाने सर्व पृथ्वी व्यापून टाकली. दुसर्‍या पायाने अंतरिक्ष व्यापले अन् त्याने ‘‘तिसरा पाय कोठे ठेवू ?’’, असे बलीराजास विचारले. त्यावर बलीराजा म्हणाला, ‘‘तिसरा पाय माझ्या मस्तकावर ठेवा.’’ तेव्हा ‘तिसरा पाय त्याच्या मस्तकावर ठेवून बलीराजाला पाताळात घालावयाचे’ असे ठरवून वामनाने, ‘‘तुला काही वर मागावयाचा असेल तर माग (वरं ब्रूहि)’’, असे त्याला सांगितले. तेव्हा त्याने वर मागितला, ‘आता पृथ्वीवरील माझे सर्व राज्य संपणार आहे आणि आपण मला पाताळात घालविणार आहात, तेव्हा तीन पावले टाकण्याचे जे सर्व घडले, ते पृथ्वीवर प्रतिवर्षी तीन दिवस तरी माझे राज्य म्हणून ओळखले जावे. प्रभू, यमाप्रीत्यर्थ दीपदान करणार्‍याला यमयातना होऊ नयेत, त्याला अपमृत्यू येऊ नये आणि त्याच्या घरी लक्ष्मीने निरंतर वास करावा.’ ते तीन दिवस म्हणजे आश्विन कृष्ण चतुर्दशी, आश्विन अमावास्या आणि कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे दिपावली पाडवा !

Friday, 13 October 2017

मनपा.राजर्षी शाहू विद्यामंदिर क्र.११ कसबा बावडा मध्ये वाचन प्रेरणा दिन उत्साहात संपन्न

कसबा बावडा: प्रतिनिधी
विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी व अवांतर वाचनाची सवय लागावी म्हणून आज दिनांक 13 ऑक्टोबर रोजी राजर्षी शाहू विद्यामंदिर शाळा  क्र. कसबा बावडा कोल्हापूर येथे वाचन प्रेरणा दिन मोठ्या उत्साहामध्ये पार पडला. सदर प्रसंगी कोल्हापूर शिक्षण विभागाचे शिक्षण उपसंचालक श्री एम. के.गोंधळी साहेब, शिक्षण निरीक्षक श्री डी.एस.पोवार साहेब, प्राथमिक शिक्षण समिती कोल्हापूरचे प्रशासनाधिकारी श्री विश्वास सुतार साहेब ,मुख्याध्यापक अजितकुमार पाटील सर ,भारतवीर मित्र मंडळाचे राहुल भोसले,नितीन जाधव,शैक्षणिक पर्यवेक्षिका उषा सरदेसाई,आदी उपस्थित होते
त्याचवेळी मा.उपसंचालक एम.के. गोंधळीसाहेब यांच्या हस्ते
' कमाल गुणवत्तेचे कमाल विद्यार्थी:- शैक्षणिक व्हिजन 2020 ' या माननीय प्रशासनाधिकारी सुतार साहेब यांच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या उद्दिष्ट फलकाचे  तसेच शाहू तरंग वाचनालय यांचे उदघाटन करणेत आले.
सदर प्रसंगी गोंधळी साहेब म्हणाले ," वाचनाबरोबर आपण अवांतर वाचनही केले पाहिजे.आज जीवनशैली बदलत आहे या बदलत्या जीवनशैली बरोबर आपण आपले आरोग्य सांभाळले पाहिजे.शिकाल, वाचाल आणि आरोग्य संभाळाल तर टिकाल ". असा महत्वपूर्ण संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

या कार्यक्रमानंतर मुख्याध्यापक अजितकुमार पाटील लिखित 'महिलासाठी योगासने 'हे पुस्तक मान्यवरांना भेट दिले,त्यानंतर इयत्तावर मुलांचे मराठी, हिंदी, इंग्रजी व इतर वाचन घेणेत आले.लहान मुलांच्या वाचन कौशल्याचे कौतुक मान्यवरांनी केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवशंभू गाटे यांनी केले तर आभार श्री उत्तम कुंभार यांनी मानले.सदर प्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा प्राजक्ता शिंदे मॅडम,उपाध्यक्षा पल्लवी पाटील,शिक्षण तज्ञ इलाई मुजावर,रमेश सुतार,वैशाली कोरवी,शुभांगी चौगले,जेष्ठ शिक्षक उत्तम कुंभार,सुशील जाधव,जयश्री सपाटे , सुजाता आवटी,अरुण सुनगार, प्राजक्ता कुलकर्णी,आसमा तांबोळी,बालवाडी शिक्षिका कल्पना पाटील मॅडम,प्रभावळे, सेवक हेमंत पाटोळे ,मंगल मोरे तसेच  भागातील पालक,जेष्ठ नागरिक ,सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आर्या वाले हिचे राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये यश


पेठ वडगांव प्रतिनिधी

स्टुडंट ऑलंपिक असोशिएशन इंडिया यांच्यावतीने हरिद्वार येथे घेण्यात आलेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये ४८ किलो वजन गटामध्ये सौ.विजयादेवी यादव इंग्लिश मिडियम स्कूल पेठ वडगांवची विद्यार्थीनी
कु. आर्या संतोष वाले हिने सुवर्णपदक पटकावले.
         तिला संस्थेचे अध्यक्ष मा. गुलाबराव पोळ, चेअरपर्सन सौ.विद्याताई पोळ, संचालक डॉ. सरदार जाधव , प्राचार्या सौ. स्नेहल नार्वेकर यांचे
प्रोत्साहन व किडा शिक्षक सागर पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
            या राष्ट्रीय स्तरावरील यशाबद्दल आर्या व विद्यालयाचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

मौजे वडगांव थेट सरपंच निवडणुकीत कांबरे बंधूंच्या स्वयंभू ताकदीने  हाय होल्टेज लढत

हेरले / प्रतिनिधी दि. १३/१०/१७
    मौजे वडगाव( ता. हातकणंगले) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडणूकीत जय हनुमान ग्रामविकास आघाडी पुरुस्कृत उमेदवार माजी उपसरपंच सुरेश कांबरे व अपक्ष उमेदवार प्रकाश कांबरे यांनी जय शिवराय आघाडीच्या अविनाश कांबळे व संयुक्त आघाडीच्या काशिनाथ कांबळे यांच्या बरोबरीने प्रचारात आघाडी घेतलेने चौरंगी काटा लढत होत आहे. पहिल्यादांच थेट जनतेतून सरपंच निवडीमुळे गट कार्यकारी प्रमुख म्हणून कार्यकरणाऱ्या कांबरे बंधूंनी स्वयंभू ताकदीने  हाय होल्टेज लढत निर्माण केली आहे. त्यामूळे त्यांनी संपूर्ण तालूक्याचे लक्ष वेधले आहे.
     मौजे वडगावचे सरपंचपद अनुसूचित जाती पुरूषसाठी राखीव आहे. थेट जनतेतून सरपंच पद निवडले जात असलेने पाच वर्षाचा कालावधी या पदाला मिळणार आहे. या सरपंच पदाने बहुआयामी नेतृत्व उभारीस येणार आहे. युवा मतदार सुशिक्षित असलेने शाननाचे ध्येय ग्राम विकास हा सरपंचावर अंवलंबून आहे.हे ज्ञात झालेने योग्य उमेदवारास निवडून आणून कार्यकुशल सरपंच गावास मिळावा. हे स्वप्न सत्यात उतरविणेसाठी त्यांनी उच्चशिक्षित व सुशिक्षित अशा उमेदवारास साथ देण्याचा पक्का निर्धार केल्याची चर्चा तरुण मंडळातून होत आहे.         जय हनुमान ग्रामविकास आघाडीचे पुरूस्कृत उमेदवार सुरेश कांबरे यांना गटनेते सरपंच सतिश चौगुले,बाळासाहेब थोरवत, धोंडीराम चौगुले, महादेव शिंदे, दादा चौगुले, महादेव चौगुले, आनंदा थोरवत यांनी साथ देत ग्रा.सदस्यसाठी पॅनेल उभा न करता फक्त सरपंच पदाची जागा लढवत आहेत. माजी उपसरपंच सुरेश कांबरे पदवीधर असून गेली २२ वर्षे सामाजिक कार्य करीत आहेत. त्यांनी या आघाडीचे नेतृत्व करून २००७च्या निवडणूकीत निववडून येऊन उपसरपंच पदाच्या माध्यमातून एक कोटीची विकास कामे केली. गावास तंटामुक्त व निर्मलग्राम पुरस्काराचा बहुमान मिळवून दिला.शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, राजकिय, आर्थिक क्षेत्रात सदैव अग्रभागी राहतात. विदयार्थी , ग्रामस्थ, लहान थोरांच्या समस्या अडीअडचणींना तत्पर मदत करणारे असे व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ख्याती आहे.
          २oवर्षापासून दूधसंस्था, विकास संस्था,ग्रामपंचायत आदीच्या  निवडणूकीत अग्रस्थांनी राहून गटनेत्यांना विविध पदावरती आरूढ करणेसाठी आहोरात्र राबून त्यांना पदापर्यंत पोहचविण्यासाठी प्रामाणिक कार्य केले आहे.  त्यांनी सामाजिक सेवा सातत्याने केलेने त्यांचा गावात बोलबाला आहे. गटनेत्यांनीही आपल्या प्रामाणिक एकनिष्ठ शिलेदारास सरपंच करण्याचा चंग बांधला असल्यामुळे त्यांचे मोठेआव्हान निर्माण झाले आहे.
        अपक्ष प्रकाश कांबरे पीके ग्रुप सामाजिक सेवा ग्रुपच्या माध्यमातून सरपंच पदासाठी उभारले आहेत. त्यांच्या पत्नी संगिता कांबरे यांनी दहा वर्ष ग्रामपंचायत सदस्याच्या पदातून लाखो रुपयांची विकास कामे केली आहेत. प्रकाश कांबरे गेली पंचवीस वर्षे सामाजिक कार्य करीत आहेत. त्यांनी ही विविध क्षेत्रातील निवडणूकीच्या माध्यमातून सांघिक कार्यकारी प्रमुखाची भूमिका बजावली आहे. गेली सहा महिन्यापासून अपक्ष उमेदवार म्हणून त्यांनी ग्रामस्थांशी संपर्क साधून प्रत्यक गाठी भेटीवर भर ठेवून स्वयंभू प्रचार यंत्रणा गतीमान केली आहे. त्यांच्या विविध क्षेत्रातील सामाजिक कामे केल्याने त्यांच्याही उमेदवारीने निवडणूकीत रंग भरून आव्हान निर्माण केले आहे. त्यांना पीके ग्रुपच्या कार्यकर्त्यांची साथ आहे.
           जय शिवराय आघाडीचे उमेदवार अविनाश कांबळे सत्ताधारी आहेत. गतवेळच्या निवडणूकीत सदस्य झाले नंतर त्यांना उपसरपंच पदाची संधी देण्यात आली. या पदाच्या माध्यमातून त्यांनी यथाशक्ती विकास कामांची कार्ये केली. अविनाश कांबळेही गेली वीस वर्ष सामाजिक कार्यात सहभागी असतात. त्यांना आघाडीची ताकद मिळाली आहे त्यामुळे त्यांनी आव्हान निर्माण केले आहे. आघाडीचे गटनेते अॅड. विजय चौगुले, सतिश वाकरेकर यांची साथ मिळत आहे.
         संयुक्त आघाडीचे सरपंच पदाचे उमेदवार काशीनाथ कांबळे निवडणूक लढवत आहेत. त्यांनी  काही कालावधी समाजसेवा केली आहे. त्यांचा सामाजिक कार्यातील सांघिक सहभाग पाहून आघाडीने उमेदवारी दिली आहे. त्यांना आघाडीची ताकद मिळाल्याने त्यांचे आव्हान निर्माण झाले आहे. गटनेते मानसिंग रजपूत, किरण चौगुले, अवधूत मुसळे, डॉ. विजय गोरड, मुबारक बारगीर यांची साथ त्यांना लाभली आहे.
      दोन्ही आघाड्यांच्या उमेदवारास  प्रभागामधील उमेदवारांचे सहकार्य लाभलेने मोठी ताकद मिळते. त्याप्रमाणे दोन्ही आघाड्यातील उमेदवारांना प्रतिसाद लाभत आहे. जय हनुमान आघाडीची चारीही  प्रभागात दोन्ही आघाड्यांना  विजयी -पराजयी करण्याइतपत ताकद आहे. त्यामुळे सरपंच उमेदवार सुरेश कांबरे यांना दोन्ही आघाड्यातून सहानूभूतीची लाट निर्माण झाली आहे.  त्यांच्या आघाडीचा प्रभागातील उमेदवारांसाठी पाठींबा मिळविण्यासाठी दोन्हीकडून धडपड चालली आहे. त्यामुळे त्यांचे आव्हान दोन्हीआघाड्यांना चिंतनात्मक ठरत आहे. अपक्ष उमेदवार  प्रकाश कांबरे दोन्ही आघाडांच्या नेते व कार्यकर्ते यांच्या मैत्रीपूर्ण संपर्कात असलेने त्यांचे आव्हान निर्माण झाले आहे.
     हातकणंगले तालूक्यामध्ये मौजे वडगांव मध्ये अनुसूचित जाती पुरुष सरपंच पदाची चौरंगी लढतीत सुरेश कांबरे व प्रकाश कांबरे हे कांबरे बंधू स्वयंभू ताकदीचे असलेने आघाडीच्या उमेदवारांस त्यांनी कडवे आव्हान निर्माण केलेले आहे. त्यामुळे या लक्षवेधी लढतीकडे संपूर्ण तालूक्याचे लक्ष लागून राहिले आहे.

Thursday, 12 October 2017

सिद्धनेर्ली येथील दुधगंगा नदीवरील पूलाची दुरावस्था


सिद्धनेर्ली - रवींद्र पाटील
कागल मुरगुड रोड बरोबरच सध्या हया रोडवरील सिद्धनेर्ली येथील नदीकिनारा जवळ असणारऱ्या दूध गंगा नदीवरील पुलाची अवस्था बिकट झाली असून काही ठिकाणी संरक्षण पोलची मोडतोड झाली असून सध्या हा पूल धोकादायक बनला आहे .            सण 1971 साली बधलेल्या या पुलाची लांबी दोनशे  95 फूट असून एकूण आकारा गाळे असणारा हा पूल 22 फूट रुंदीचा आहे . गेली अनेक वर्षे वाहतुकी साठी वापरण्यात येत आहे.कागल मुरगुड रोडवरील हा एक मोठा आणि नेहमीच वर्दळीचा भागातील पूल असल्यामुळे  सतत ह्या पुलावरून वाहनांची गर्दी दिसून येते पण सध्या हा पूल धोकादायक बनला असून पुलाच्या बाजूला असणाऱ्या संरक्षण कटडयावरील असणाऱ्या पाईप मोडल्या असून काठीच्या आणि बांबूच्या साहाय्याने या ठिकाणी तात्पुरते उपाय केलेले आहेत .ह्या पुलावर काही ठिकाणी झाडे  उगवली आहेत तर पुलाच्या काही भागामध्ये रोडवरती खडये  पडलेले आहेत . गेल्या अनेक दिवसांपासून ह्या पुलाची  दुरवस्था वाढत आहे. अनेक ठिकाणी रोड साईटला असणाऱ्या पाट्या  निखळल्या आहेत.बाजूचे संरक्षक लोखंडी बार काही ठिकाणी गंजलेल्या अवस्थेत आहेत. यामुळे हा पूल  दिवसेंदिवस धोकादायक ठरत आहे प्रशासनाचा भोंगळ कारभाराचा हा नमुनाच म्हणावा लागेल अशी परिस्थिती आहे. मुरगुड राधानगरी ह्या भागात जाणारी बरीच अवजड वाहने नेहमीच ह्या मार्गावरून जात असतात सध्या ह्या पुलावरून प्रवास करणे धोकादायक बनले असून या पुलाच्या दुरुस्तीची मागणी सामान्य नागरीकाकडून होत आहे.

जोतिबा येथे महावितरणचा भोंगळ कारभार


वाडीरत्नागिरी(जोतिबा) - अतिश लादे

येथील महावितरणच्या कार्यालयात भोंगळ कारभार पहावयास दिसुन येत आहे.दोन-दोन दिवस तक्रार करून देखिल दुर्लक्ष करण्याचे काम कर्मचारी करत आहेत.कामाच्या वेळेत स्वतःची कामे करण्यात व्यस्त असतात.तक्रारी बद्दल विचारना केली असता.करतो, नंतर या,अशी उलट-सुलट उत्तरे दिली जातात.फोन केले असता उचलत देखील नसल्याची तक्रार नागरिक करत आहेत.तसेच कार्यालय उघड़े ठेवून कामाच्या  नावाखाली गावातून फिरण्याचे काम करत असताना पहावयास मिळत आहे.यावर प्रशासनाने कडक कारवाई करावी अशी मागणी नागरिक करत आहेत.

फोटो - जोतिबा महावितरण कार्यालयात कर्मचारी नसताना

मनपा पोटनिवडणुकीत भाजप-ताराराणी आघाडीचे रत्नेश शिरोळकर विजयी

                
  

कोल्हापूर प्रतिनिधी
कोल्हापूर महापालिकेच्या ताराबाई पार्क प्रभाग क्रमांक ११ जागेसाठी  झालेल्या  पोटनिवडणुकीत भाजप-ताराराणी आघाडीचे रत्नेश शिरोळकर हे 1,399 मताधिक्य विजयी झाले विरोधी काँग्रेस राष्ट्रवादी या संयुक्त आघाडीचे उमेदवार राजू लाटकर  यांना  1,199  मते मिळाली तर त्यांचा 200 मतांनी पराभव झाला. राज्याचे आजी माजी मंत्री, आमदार असे दिग्गज या रणधुमाळीत उतरले होते.
ताराराणी आघाडीच्या नगरसेवकाचा जातीचा दाखला अवैध ठरल्याने त्यांचे नगरसेवकपद रद्द झाले होते. त्यामुळे पोटनिवडणूक लागली होती.

Wednesday, 11 October 2017

राधानगरी वन्यजीव अभयारण्य



हिरव्या रंगाच्या नाना छटा, फुलांचे विविध रंग आणि आकार पाहात निसर्गाच्या सान्निध्यात मनसोक्त भटकायचं आहे? मग कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी अभयारण्यात जायलाच हवे. गवा हा इथला बघण्यासारखा प्राणी आहे. राधानगरी अभयारण्याचा समावेश जागतिक वारसास्थळामध्ये करण्यात आला आहे. जगातील 34 अतिसंवेदनशील ठिकाणांपैकी पश्चिम घाटात राधानगरी अभयारण्य येते. 
दक्षिण व उत्तरेकडील पश्चिम घाटाला जोडणारा सह्याद्रीमधील हा महत्वाचा जंगलपट्टा आहे. याचा निमसदाहरित जंगलात समावेश होतो. कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिमेस असणाऱ्या राधानगरी अभयारण्याचा परिसर 351 चौ.कि.मी.चा आहे. याची समुद्रसपाटीपासूनची ऊंची 900 ते 1 हजार फूट असून येथे सरासरी पर्जन्यमान 400 ते 500 मि.मी आहे. दाजीपूरचे जंगल हे राधानगरी अभयारण्याचाच एक भाग आहे. कोल्हापूर संस्थानचे महाराष्ट्र राज्यात विलीनीकरण झाल्यानंतर 1958 ला दाजीपूर जंगलाची दाजीपूर गवा अभयारण्य म्हणून नोंद करण्यात आली. हे महाराष्ट्रातील सर्वात जुने आणि पहिले अभयारण्य आहे. राधानगरी आणि काळम्मावाडी धरणाच्या भोवतीच्या जंगल परिसराला 1985 ला राधानगरी अभयारण्याचा दर्जा देण्यात आला. येथील घनदाट जंगलाचे पट्टे डंग या नावाने ओळखले जातात. येथील डोंगरमाथ्यावर जांभ्या खडकांचे मोठे सडे आहेत. सड्यांवर व सड्यांच्या भोवताली असणाऱ्या दाट जंगलामधील जैवविविधता प्रचंड संपन्न अशी आहे. 
निमसदाहरित व पानगळीच्या मिश्र जंगल प्रकारामुळे हे वन असंख्य प्रजातींचे आश्रयस्थान झाले आहे. डोंगरातील दऱ्याखोऱ्यात घनदाट जंगल, विस्तीर्ण सडे आणि गवताळ कुरणात असंख्य प्रजातीचे वृक्ष, वेली, झुडपे, बुरशी आढळून येते. अभयारण्यात 1500 पेक्षा जास्त फुलझाडांच्या प्रजाती आहेत. भारताच्या द्विपकल्पामधील प्रदेशनिष्ठ 200 प्रजाती या भागात असून 300 पेक्षा जास्त औषधी वनस्पती इथे आहेत. येथे 36 प्रकारच्या वन्यप्राण्यांची नोंद झालेली आहे. वाघ, बिबळ्या, लहान हरिण, रानकुवा, अस्वल, गवा, सांबर, भेकर, चौसिंगा, रानडुक्कर, साळिंदर, उजमांजर, खवले मांजर, लंगूर याबरोबरच वटवाघळाच्या तीन प्रजातीही येथे आढळतात.
पक्षी निरीक्षणासाठी राधानगरी अभयारण्य अप्रतिम ठिकाण आहे. येथे 235 प्रकारच्या पक्ष्यांची नोंद झाली आहे. तीन प्रकारची गिधाडे येथे वास्तव्यास आहेत. जगात फक्त पश्चिम घाटात आढळणाऱ्या पक्ष्यांपैकी 10 प्रजातींचे पक्षी येथे आढळतात. अभयारण्यातील सांबरकोड, कोकण दर्शन पाँईट, सावदें, काळम्मावाडी धरण, उगवाई देवी मंदिर, ही स्थळे पक्षी निरीक्षणासाठी उत्तम आहेत. 121 प्रजातींच्या फुलपाखारांची नोंद राधानगरीत झाली आहे. सदर्न बर्डविंग हे भारतातील सर्वात मोठे फुलपाखरू (190 मी.मी.) असून ग्रास ज्येवेल हे सर्वात लहान फुलपाखरू (15 मी.मी.) आहे हे दोन्ही फुलपाखरू राधानगरी अभयारण्यात आढळतात. हजारोंच्या संख्येने एकत्र जमून स्थलांतर करणारी ब्ल्यू टायगर, ग्लोसी टायगर, स्ट्राईप टायगर ही फुलपाखरे याठिकाणी ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये येतात.
सरिसृप गटात राधानगरी अभयारण्यात वेगवेगळ्या जातींच्या पाली, सरडे, साप-सुरळी, देवगांडूळ, उभयचर प्राण्यांमध्ये वेगवेगळ्या प्रजातींचे बेडूक आपल्याला इथे भेटतात. पालीच्या नव्या प्रजातीची पहिली नोंद राधानगरीत झाली असून तिचे नामकरण Cnemaspis Kolhapurensis असे करण्यात आले आहे. अभयारण्यात 33 प्रकारच्या सापांची नोंद आहे. ऑलिव्ह फॉरेस्ट स्नेक, एरिक्स व्हिटेकरी, पाईडबेली शिल्डटेड या सापांची नोंद येथे झाली आहे. गोवा आणि कर्नाटकच्या संरक्षित भागाला लागून असलेले हे अभयारण्य ट्रेकर्सच्या पसंतीचे ठिकाण आहे. दाजीपूरला शासनाचे रिसॉर्ट आहे. 
कोल्हापूर सिंधुदूर्ग जिल्ह्याच्या सीमेवर राधानगरी तालुक्यामध्ये कोल्हापूरपासून साधारणत: 80 कि.मी. अंतरावर हे अभयारण्य वसले आहे. जवळचे विमानतळ कोल्हापूर आणि बेळगाव आहे तर जवळचे रेल्वेस्टेशन कणकवली आणि कोल्हापूर आहे. कोल्हापूर-राधानगरी-दाजीपूर हे अंतर 80 कि.मी चे असून निपाणी –राधानगरी-दाजीपूर हे अंतर 70 कि.मी.चे आहे. कणकवली- दाजीपूर-राधानगरी हे अंतर 60 कि.मी.चे आहे. दाजीपूर, राधानगरीला भेट दिल्यानंतर जवळ बिसन राष्ट्रीय उद्यान, स्वामी गगनगिरी महाराज मठ, राधानगरी धरण, फोंडा घाट आणि शिवगड किल्लाही आपण पाहू शकतो. महाराष्ट्रातील सर्वात पहिले असलेले हे अभयारण्य अनेक नद्यांनी वेढलेले आहे. भोगावती, दूधगंगा, तुळशी, कळमा, दिर्बा या नद्या अभयारण्यातून वाहतात. नंतर हे सर्व प्रवाह कृष्णेला जाऊन मिळतात. अंजन, जांभूळ, हिरडा, आवळा, पिसा, ऐन, किंजळ, आंबा, कुंभ, कटक, उंबर, गेळा, बिब्बा यासारखे वृ्क्ष तर कारवी, शिकेकाई, गारंबी, धायटी, मुरूडशेंग, करवंद, बेगाटी, रानमिरी, नरक्या अशा काही वेली आणि झुडुपांसह औषधी वनस्पतींची येथे रेलचेल आहे. अभयारण्याला भेट देण्याचा सर्वोत्तम कालावधी नोव्हेंबर ते मार्च असा आहे. तर मग कधी जाताय राधानगरी अभयारण्य पाहायला ?
- डॉ. सुरेखा म. मुळे
drsurekha.mulay@gmail.com
'महान्यूज' वरुन साभार

माध्यमिकचे शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार

प्रतिनिधी

  समर्पणाच्या भावनेने व प्रामाणिक पणाने काम करण्याच्या कार्यशैलीमुळे कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना 'बार टू मेडल ऑफ मेरीट ' या पुरस्काराने राज्यपाल  सी .विद्यासागर राव यांच्या हस्ते  मुंबई येथे स्काऊट गाईड पॅव्हिलियन शिवाजी पार्क येथे  सन्मानित करण्यात आले .  यावेळी महाराष्ट्र राज्य स्काऊट अँड गाईडचे मुख्य आयुक्त भा .ई .नगराळे हे उपस्थित होते .
     माध्यमिक शिक्षणधिकारी किरण लोहार पुरस्कार मिळाले नंतर माध्यमांशी बोलतांना म्हणाले रत्नागिरी जिल्ह्यामध्ये चार वर्षे सेवा बजाविली.या काळात चार वर्ष एसएससी बोर्ड सहसचिव, याचबरोबर एक वर्ष सचिव अतिरिक्त कार्यभार सांभाळला. दोन वर्ष अतिरिक्त माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यभार समर्थपणे कर्तव्य बजावले. कोल्हापूर जिल्ह्यात दीड महिने सेवा बजावत आहेत. या काळात जिल्हा परिषदेमध्ये प्रत्येक दिनी हजर राहून कार्यालयातील कामाचा निपटारा सुरु आहे. आठवड्यातील सहा दिवस कार्यभार सांभाळत शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील आहे.
       ७९ अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाची सुनावणी एका दिवसात पूर्ण केली. जिल्हयातील शैक्षणिक गुणवत्ता, स्काऊट गाईड, एनसीसी, खेळ, आरएसपी, एमसीसी, कला, क्रीडा यावर विशेष लक्ष देऊन कार्य करणार आहे. एनटीस, एमएमएस, स्कॉलरशीप आदी परीक्षेमध्ये जास्तीत जास्त विदयार्थी यशस्वी होणेसाठी प्रयत्नशील राहणार आहे. या यशासाठी शिक्षकांनी सहकार्य करावे.

         फोटो - राज्यपाल सी .विद्यासागर राव यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना माध्यमिकचे शिक्षणाधिकारी किरण लोहार व त्यांच्या पत्नी सुजाता लोहार.