उदगीर प्रतिनिधी:- गणेश मुंडे
राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची295 वी जयंती उदगीर तालुक्यातील राचनावाडी व एकुर्का रोड येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी त्यांच्या विचाराचे पाईक होण्याची गरज असल्याचे मत उपस्थित मान्यवरानी व्यक्त केले.तसेच धनगर समाज शिकुन, संघटीत झाला पाहिजे आणि समाजोपयोगी कार्य आजच्या तरुण पिढीने केले पाहिजे असा मतप्रवाह निर्माण झाला. प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.यावेळी फिजीकल डिस्टन्सींग पाळण्यात आला.धनगर समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते तर
एकुर्का (रोड) येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती सोशल डिस्टंन्स ठेवून साजरी करण्यात आली. यावेळी आश्विन कंजे, राहुल सोनकांबळे, सतिश मालसे, सहदेव जाधव, अमर बनसोडे, चंद्रकांत जाधव आदी ग्रामस्थ उपस्थित होते.