सिद्धनेर्ली तालुका कागल येथील जलतरण मंडळांने एक अनोखा उपक्रम हाती घेतला असून तो पूर्णत्वास नेला आहे, सिद्धनेर्ली येथील ज्येष्ठ नागरिक युवक मंच यांनी मिळून एक जलतरण मंडळ स्थापन केले होतें.कोरोनाचा प्रभाव संपूर्ण देशात सुरू आहे ,त्यामुळे सर्वांना मुबलक वेळ उपलब्ध होत आहे, या वेळेचा सदुपयोग करण्यासाठी माजी सरपंच वाय व्ही पाटील यांच्या प्रेरणेतून आणि संकल्पनेतून सिद्धीनेर्लीत एक जलतरण मंडळ स्थापन करण्यात आले, त्याच्या माध्यमातून सपूर्ण गावांमध्ये आव्हान करून नदीकाठी जाणार्या रस्त्याकडे झाडे लावून एक चांगले सुशोभीकरण करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता, या प्रस्तावाला उस्फूर्त प्रतिसाद देत गावातील शेकडो नागरिकांनी पाचशे रुपयांपासून ते पाच हजार रुपये पर्यंत देणगी देऊन सहकार्य केले आहे, अनेक नागरिकांनी साहित्य स्वरूपात मदत केली.या श्रमदानाच्या माध्यमातून वीस फुटाची झाडे लावण्यात आली असून एकूण सोळा प्रकारच्या झाडांचा समावेश आहे, नदीकडे जाणाऱ्या रस्त्याकडे जाण्यासाठी पाचशे मीटर चे अंतर असून दोन्ही बाजूने वृक्षारोपण करण्यात आले आहे . जवळपास एक महिना हे मंडळ या वृक्षलागवडीसाठी वेळ देत असून वृक्ष लागवड पूर्ण झाल्यानंतर मंडळाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
यामध्ये माजी सरपंच वाय.वी पाटील प्राध्यापक सुनील मगदूम, आनंदा घराळ ,विजय कुरणे, सुभाष मगदूम ,लक्ष्मण गुरव ,विजय पाटील, नामदेव कुनुरे,तुकाराम निकम ,बंडू संपकाळ,गोरख पाटील तसेच धन्य निरंकार मंडळ यांच्यासह गावातील अनेक लोकांनी सहभाग घेतला.
फोटो - रस्त्याच्या दोन्ही बाजूला श्रमदानातून लावण्यात आलेली झाडे.