नंदुरबार प्रतिनिधी - वैभव करवंदकर
नंदुरबार येथील शिक्षक भारती संघटनेतर्फे दिनांक 03 जुलै रोजी मागण्याचे निवेदन शिक्षणाधिकारी एम. व्ही. कदम यांच्या शिक्षणाधिकारी कार्यालय , जिल्हा परिषद नंदुरबार याठिकाणी देण्यात आले.
शिक्षक भारती ही राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांची शासन मान्यता प्राप्त संघटना आहे. राज्य शासकीय निमशासकिय कर्मचारी संघटना समन्वय समितीची सदस्य आहे. समन्वय समितीने पुकारलेल्या राज्यव्यापी आंदोलनात शिक्षक भारती संघटना सहभागी होत आहे. या आंदोलनात शिक्षक भारती संघटना राज्यातील सर्व शिक्षणउपसंचालक,शिक्षणाधिकारी व जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन मागण्यांचे निवेदन देत आहेत. त्या अनुषंगाने नंदूरबार शिक्षणाधिकारी जि. प. नंदुरबार यांनाही शिक्षक भारती कडून निवेदन देण्यात आले.
यावेळी शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष राहुल पाटील म्हणाले की , देशात कोरोनाच संकट आहे, राज्याची स्थितीची आम्हाला जान आहे. विनाअनुदानित शाळांचा प्रश्न कोरोना पेक्षाही भयानक आहे. अनेक विनाअनुदानित शिक्षक पार्ट टाईम काहीतरी काम करून आपला उदरनिर्वाह चालवत होता. कोरोना मुळे सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले त्यांच्या हातातलं कामही शासनाने हिरावून घेतले आहे, अशा परिस्थितीत विनाअनुदानित शिक्षकावर उपासमारीची वेळ आली आहे. मागच्या सरकारने आम्हाला छडले होते, आघाडी सरकार आल्यानंतर विनाअनुदानित शिक्षकांना आपलं सरकार आले, आपले काम आता निश्चित होईल, मात्र तसे होताना दिसत नाही, या सरकारने भ्रमनिरास नकरता तात्काळ १००% अनुदान दिले पाहिजे, कोरोनाच्या संकटात आमच्या मागण्याही रास्त आहेत, आमच्या मागण्यांचा योग्य विचार या सरकारने करावा.
आंदोलनातील मागण्या - कोरोना काळात ऑनलाईन शिक्षण सुरू ठेवण्यासाठी मोबाइलऐवजी टेलिव्हिजनचा वापर सुरु करा. ऑनलाइन शिक्षण प्रभावीपणे देण्यासाठी मुख्याध्यापक व शिक्षकांच्या प्रशिक्षणाची व्यवस्था करा. विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन शिक्षणाची साधने उपलब्ध करून द्या. (टॅबलेट, ऍन्ड्रॉइड फोन) विनाअनुदानित शाळांना विनाअट १००% अनुदान द्या. कोविड ड्युटीवर मरण पावलेल्या शिक्षक शिक्षकेतरांना ५० लाखांची मदत तातडीने द्या. कोविड ड्युटीवर कोरोनाची लागण झाल्यामुळे झालेल्या उपचाराचा खर्च तातडीने द्या. कोविड ड्युटी करणाऱया सर्व शिक्षक शिक्षकेतरांना कार्यमुक्त करून त्यांचा वापर ऑनलाइन शिक्षणात करा.
कोविड ड्युटी केलेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱयांना बदली रजा मंजूर करून त्याची सेवापुस्तिकेत नोंद घ्या. कोविड ड्युटी करणाऱ्या शिक्षक शिक्षकेतरांना प्रोत्साहन भत्ता द्या व विशेष वेतनवाढ लागू करा. शाळा सुरू करण्याचा निर्णय शाळा व्यवस्थापन समितीवर न टाकता त्याची संपूर्ण जबाबदारी महाराष्ट्र शासन आणि स्थानिक प्रशासनावर द्या. शाळा सुरू करण्यापूर्वी सर्व शाळांचे सँनिटायझेशन करा. शाळांना थर्मल स्कॅनिंग मशीन, सॅनिटायझर, मास्क हॅण्डग्लोज इत्यादी सर्व साहित्य उपलब्ध करून द्या.
कोरोना काळात विद्यार्थ्यांना वर्कबुक व अॅक्टिव्हिटी बुक द्या. कोरोनामुळे स्थलांतरित गरीब, दलित, मागासवर्गीय व भटक्या विद्यार्थ्यांना त्यांच्या घराजवळील शाळेत विनाअट प्रवेश द्या.
कोरोना काळात अनुदान, पगार, महागाई भत्ते इत्यादींमध्ये कपात करू नका. मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेतरांना शाळेतील उपस्थिती शाळा सुरू होईपर्यंत बंधनकारक करू नका. यावेळी सर्व सदस्य फिजिकल डिस्टन्सिंग नियम पाळून निवेदन देण्यात आले. यावेळी शिक्षक भारती विनाअनुदानित संघर्ष समितीचे राज्यकार्याध्यक्ष व शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष राहुल अशोकराव पाटील, आशिष दातीर, महेश नांद्रे, राजेश जाधव,पुष्कर सूर्यवंशी, संजय पाटील, गोरख पाटील, सुर्यवंशी सर, राहुल मोरे, संदीप पाटील, उपस्थित होते.