आज बुधवार दिनांक ८ जुलै २०२० रोजी खासदार धैर्यशील माने यांनी केलेल्या मागणीनुसार संभाव्य महापुराच्या नियोजनासाठी महाराष्ट्र व कर्नाटक राज्याच्या जलसंपदा खात्याचे मंत्री व अधिकाऱ्यांची एकत्रित बैठक सह्याद्री अतिथी गृह, मुंबई येथे संपन्न झाली.
महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री मा.ना. जयंत पाटील व कर्नाटक राज्याचे जलसंपदा मंत्री मा.ना. रमेश जारकीहोळी यांच्या उपस्थितीमध्ये आज संपन्न झालेल्या बैठकीमध्ये कर्नाटक राज्यातील अलमट्टी व हिप्परगी धरणामधील पाण्याचा विसर्ग तसेच महाराष्ट्र राज्यामधील पाण्याचा विसर्ग यामध्ये दोन्ही राज्यातिल पाटबंधारे विभागाच्या अधीकार्यांनी समन्वय साधुन नियोजन करण्याचे ठरले.
यावेळी खासदार धैर्यशील माने यांनी अतिरिक्त होणारे कर्नाटक राज्यात वाहून जाणारे पावसाचे पाणी दुष्काळी भागाकडे वळविण्याची मागणी केली
तसेच खासदार धैर्यशील माने यांनी कर्नाटक राज्याचे पाटबंधारे मंत्री मा.ना.रमेश जारकीहोळी यांच्याशी चर्चा करुन अलमट्टी धरणाबरोबरच हिप्परगी धरणामधील पाण्याची फुग व कर्नाटकातील मांजरी पूलाच्या भरावामुळे पाण्याची फुग येवुन महापुराचा धोका निर्माण होत असल्याचे निदर्शनास आणुन दिले.
या बैठकीमध्ये संभाव्य महापुराचा धोका टाळण्याच्या अनुषंगाने दोन्ही राज्याचे मंत्री व अधिकार्यांच्यामध्ये सकारात्मक चर्चा झाली
या बैठकीस खासदार धैर्यशील माने महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री मा.जयंत पाटील कर्नाटक राज्याचे पाटबंधारे मंत्री मा.रमेश जारकीहोळी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा.सतेज पाटील सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मा.बाळासाहेब पाटील सहकार राज्यमंत्री मा.विश्वजित कदम आरोग्य राज्यमंत्री मा.राजेंद्र पाटील यड्रावकर खासदार मा.संजय पाटील आमदार मा.राजेश पाटील कर्नाटक राज्याचे आमदार मा.श्रीमंत पाटील महाराष्ट्र व कर्नाटक राज्याचे जलसंपदा खात्याचे सचिव व अधिकारी उपस्थित होते