Monday, 31 August 2020

पर्यावरण समतोलासाठी वृक्ष संगोपन ही आजच्या काळाची गरज- जि.प. अध्यक्ष राहुल केंद्रे


उदगीर प्रतिनिधी गणेश मुंडे 

वक्षारोपण ही सामाजिक चळवळ बनली पाहीजे.प्रत्येक नागरिकांने या चळवळीत सक्रीय सहभाग नोंदवावा.जर हे शक्य नसेल तर किमान वृक्षसंगोपनासाठी तरी पुढे यावे असे आवाहन करत पर्यावरणाचे समतोल राखण्यासाठी वृक्ष संवर्धन ही आजच्या काळाची खरी गरज बनली असून जास्तीत जास्त संख्येने वृक्ष लागवड केली पाहिजे.तसेच त्यांचे संगोपन ही तितकेच महत्त्वाचे आहे.असे ते हैबतपुर ता.उदगीर येथे वृक्षलागवडी कार्यक्रम दरम्यान  जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे  1000 वृक्ष रोपांची लागवड करत असताना बोलत होते.यावेळी मंचावर उपस्थित जि.प.माजी उपाध्यक्ष रामभाऊ तिरुके,सरपंच सुधाकर दंडिमे,पंचायत समिती सदस्य सुभाष कांबळे,भाजपचे उदगीर तालुका उपाध्यक्ष चंद्रकांत भातमोडे,तिवटघ्याळचे सरपंच गजानन नरहरे,अशोक तेलंगपूरे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Sunday, 30 August 2020

प्रा. बागुल ( शिंपी ) यांना पी.एच. डी. पदवी प्रदान

*
                                            *नंदुरबार - ( प्रतिनिधी  - वैभव करवंदकर ) - - - - -*                            नंदुरबार येथील  शिंपी समाजातील सामाजिक कार्यकर्ते  प्रा. भटू बागुल ( शिंपी )  यांना पी.एच. डी. पदवी प्रदान केली आहे. प्रा. भटू बागुल हे शहादा येथील सातपुडाशिक्षण प्रसारक मंडळाच्या वसंतराव नाईक कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील पदार्थविज्ञान विभाग प्रमुख प्रा.भटू यशवंत बागुल यांना पी.एच. डी. पदवी प्रदान करण्यात आली.
      कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव संलग्नित प्रताप महाविद्यालय, अमळनेर येथील डॉ. पी. एस. सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली “ फोटोव्होल्टिक प्रोपरटीज ऑफ नॅनोस्ट्रक्चर थीक फिल्म्स ऑफ पुअर अन्ड डोप्ड सीडीटीई.” या विषयात संशोधन केले आहे.  कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ,जळगाव विद्यापीठाच्या वतीने  ऑनलाईन व्हायवा घेण्यात आला होता, सदर विद्यापीठाचे कुलगुरू व कुलसचिव यांनी त्यांना पीएचडी पदवी प्रदान केल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
        प्रा. डॉ. भटू बागुल यांचे सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष नानासाहेब जाधव , सोनामाई शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा सौ. आशाताई जाधव, सचिव अॅड. सुधीर जाधव, विभागीय सचिव प्रा.संजय जाधव, उपाध्यक्ष सौ. प्रतिमा जाधव, सचिव सौ. वर्षा जाधव, समन्वयक संजय राजपूत, प्राचार्य डॉ. ए.एन. पाटील, डॉ. एस. एम. पाटील तसेच सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर  कर्मचारी यांनी  त्यांचे अभिनंदन व कौतुक केले आहे.

श्री सदगुरू निरंजन महाराज आश्रमाचे सदगुरू विनयानंद महाराज यांचे देहावसान

हातकणंगले / प्रतिनिधी
प्रशांत तोडकर

हातकणंगले तालुक्यातील मौजे वडगाव येथील श्री सदगुरू निरंजन महाराज आश्रमाचे सदगुरू विनयानंद महाराज  यांचे अल्पशा आजाराने वयाच्या ६५ व्या वर्षी निधन झाले त्यांचे सहकार क्षेत्रातील व अध्यात्मिक  जीवनाचे कार्य थोडक्यात.

   त्यांचा जन्म 12 जानेवारी 1953 सालचा आहे.शिक्षण : SSLC 1968 साली रोज १० कि मी पायी चालत पूर्ण केले. त्यांनी शालेय जीवनात सन 1967 मध्ये "थेफ्ट अलार्म" या उपकरणास पहिला पुरस्कार, तसेच " लिक्विड लेवल कंट्रोल स्विच, मल्टीटाईमर, इमर्जन्सि लॅम्प" इ।। उपकरणांची निर्मिती केली होती. शालेय जीवनापासूनच संशोधन वृत्ती होती.
      त्यांनी प्रथमतः नोकरी  ग्रामपंचायत मांगूर जिल्हा बेळगाव येथे क्लार्क कम् सेक्रेटरी म्हणून सेवा  दिड वर्षे केली. तदनंतर  श्री हनुमान सह. दूध संस्था यळगूड जिल्हा कोल्हापूर येथे रूजू होऊन  दूध संकलक ते सचिव, असा सेवा काल 42 वर्षे पूर्ण केला.सर्वांचे सहयोग व मार्गदर्शनामुळे, विविध कार्यपध्दतीमध्ये नियोजन,शिस्त, वक्तशिरपणा आणि कार्यतत्परता यामध्ये आदर्श निर्माण केला आहे.त्याबद्दल संस्थेने 2013 मध्ये सेवानिवृत्तेचेवेळी सन्मानपत्र देवून सत्कार करून गौरव केला.
त्यांच्या उतुंग कार्यामुळे सदर संस्थेस महाराष्ट्र शासनाने "सहकार महर्षि" हा पहिला पुरस्कार सन 2012 मध्ये देऊन संस्थेचा गौरव केला.
     त्यांनी अभ्यासाने व कौश्यल्याने संगणक क्षेत्रातील योगदान : Y2K प्रॅाब्लेम 1997 मध्ये दूर केला, यळगूड येथे COMPUTER LAN SYSTEM 1992 मध्ये यशस्वी केली, तसेच WIFI तंत्रज्ञान सन 2005 साली पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रथम यशस्वी केले. त्यामुळे त्यांची  दै पुढारी सकाळ तरुणभारत पुण्यनगरी महासत्ता इत्यादी  दैनिकांनी पहिल्या पानावर चार कॅालम बातमी देवून प्रसिध्दी दिली होती.
      त्यांनी श्री पैसाफंड शेतकी सहकारी बँक लि. हुपरी येथे सन 2000 पासून संगणक सल्लागार म्हणून कार्य केले. बँकिंग क्षेत्रात 10 KM परिसरात  प्रथमता WIFI तंत्रज्ञानाचा रेडिओ फ्रिक्वेन्शीद्वारे हेड आॅफीस व सर्व शाखेकडील सर्व संगणक यंत्रणा जोडून  पुरेपूर सुरक्षित उपयोग केला आहे. याबद्दल मंत्रीमहोदयांचे हस्ते सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात ,इतरत्रही सहकारी संस्था व प्रायव्हेट प्रकल्पात वेळोवेळी मार्गदर्शन करीत होते. असे त्यांचे सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य घडले आहे.
    सन 1973 मध्ये श्री सद्गुरु निरंजन महाराज यांचेकडून शाम्भवी दिक्षा अनुग्रह घेतला आणि त्यांच्या अध्यात्मीक जीवनाची सुरूवात झाली.सन 1978 मध्ये विवाह होऊन त्यांचे आपत्य  चि.विवेक BE COMPUTER पदवी मिळवून  पुणे येथे MNC मध्ये सेवेत आहे.अध्यात्मिक सेवा सन 1993 पासून हुपरी येथे सतसंग मंडळ सुरु केले असून दर रविवारी सकाळी 10 ते 12 वेदांत विषयक ग्रंथाचे वाचन,  प्राणायम,ओंकार आणि ध्यान असे कार्यक्रम अव्याहतपणे सुरु आहेत.
   त्यांची  सन 1998 पासून हातकणंगले तालुक्यातील मौजे वडगाव येथील श्री सद्गुरु निरंजन महाराज आश्रम येथे उत्तराधिकारी "विनयानंद" म्हणून नियुक्ती झाली.अनेक दुर्मिळ ग्रंथांचे प्रकाशन,दोन एकरशेतजमिनीवरआश्रम,ध्यानमंदिर, अन्नक्षेत्र व सभामंटप उभारणी,साधकांचे सहयोगातून दर पौर्णिमा व विविध जयंत्या इत्यादि वार्षिक 24 कार्यक्रम अव्याहतपणे चालु राहतील अशी फंडस व्यवस्था केली आहे.
" समन्वय से समाधि " हे आश्रमाचे बोध वाक्य असून " शुध्द,स्थिर,व्यापक आणि परिपूर्ण " हा कन्सेप्ट आहे.

सदाचार सार साचा । मंत्र दिधला जीवनाचा ।।

सर्व धर्माचा समन्वय । मार्ग दाविला अद्वय ।।

।। विज्ञानातील विध्वंसकता आणि अध्यात्मातील अंधानुकरण दूर करणे ।।

।। शुद्ध आचार विचार आणि कर्म हीच पूजा ।।

 हा सारभूत विचार रुजविणे हेच ध्येय  आहे.
याप्रमाणे त्यांनी जीवन व्यथीत केले.
     त्यांचा गौरव : सन 1989 ते सन 2016 अखेर विविध संस्था, ट्रस्ट आणि धार्मिक संस्थाकडून रोख रक्कम, स्मृतिचिन्हे देवून आदर्श सेक्रेटरी, उत्तम प्रशासक, धार्मिक सुसंस्कार, जगद्गुरु शंकराचार्य करवीर पीठ सामाजिक पुरस्कार सन २०११ व ज्ञानदिप पुरस्कार सन २०१६  इत्यादि अनेक पुरस्कार देऊन करण्यात आला आहे. त्यांच्या अल्पशा आजाराने जाण्याने श्री सदगुरू निरंजन महाराज आश्नम ,गुरुबंधू व आश्रमाच्या अनुयांमध्ये पोकळी निर्माण झाली आहे.

Saturday, 29 August 2020

शिक्षक सेनेतर्फे मंत्री राजेंद्र पाटील -यड्रावकर यांना निवेदन

शिरोळ प्रतिनिधी
*
महाराष्ट्र राज्य खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती ) नियमावली १९८१ मसुद्यातील दुरुस्तीबाबत व जुन्या पेन्शन योजनेबाबत सांस्कृतिक व आरोग्य मंत्री राजेंद्र पाटील - यड्रावकर यांना निवेदन शिक्षक सेना कोल्हापुर जिल्हा अध्यक्ष अरुण मुजुमदार यांच्या मार्गदर्शनाने देण्यात आले , निवेदन देताना  शिक्षक सेनेचे  जिल्हा कोषाध्यक्ष प्रमोद कांबळे सर यांनी शिक्षकांची प्रश्ने, समस्या  मांडल्या , जिल्हा उपाध्यक्ष सतिश लोहार सर , तालुका उपाध्यक्ष अरुण भगत सर, जिल्हा कमिटी सदस्य शिवकुमार मुरतले सर यांनी जुन्या पेन्शन संदर्भातील आपली मते व्यक्त केली व त्यावर चर्चा करण्यात आली, यावेळी हातकणगंले तालुका अध्यक्ष गजानन लवटे सर ,इंचलकरंजी शहर कार्याअध्यक्ष राहुल रजपुत सर , इतर शिक्षक सैनिक  मान्यवर उपस्थित होते .

गडमुडशिंगीत इम्युनिटी बूस्टरचे वाटप


गडमुडशिंगी (प्रतिनिधी दीपक गुरव)

गडमुडशिंगी (ता.करवीर )येथील त्रिशूल फ्रेंड सर्कलने इम्युनिटी बूस्टरचे वाटप करून समाज प्रति आपली  कृतज्ञता व्यक्त केली.सुमारे चारशे ग्रामस्थांनी इम्युनिटी बूस्टर चा लाभ घेतला .
त्रिशूल फ्रेंड सर्कल नेहमीच सामाजिक उपक्रमात अग्रेसर आहे.या कोरोना महामारी मध्ये लोकांना आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी इम्युनिटी बूस्टरचा उपयोग होत आहे.अदृश्य काडसिद्धेश्वर महाराज (कणेरी)यांच्या मार्गदर्शनाखाली बंगळुरू येथील डॉक्टरांनी या इम्युनिटी बूस्टरची निर्मिती केली आहे.
या सामाजिक कार्यासाठी ग्रामस्थांनी अदृश्य काडसिद्धेश्वर महाराज आणि त्रिशूल फ्रेंड सर्कलचे आभार मानले.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष ,उपाध्यक्ष आणि मंडळाचे कार्यकर्ते आदींची प्रमुख उपस्थिती होती.

फोटो 
गडमुडशिंगी(ता.करवीर)येथे इम्युनिटी बूस्टर वाटप प्रसंगी त्रिशूल फ्रेंड सर्कल चे कार्यकर्ते

Friday, 28 August 2020

विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा या होणारच

अंतिम वर्षाच्या विद्यापीठाच्या परीक्षा या होणारच. 
परीक्षा घेण्याची तारीख पुढे ढकलली जाऊ शकते, मात्र परीक्षा होणारच असं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं आहे. विद्यार्थ्यांना ‘प्रमोट’ करता येणार नाही. त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर महाराष्ट्र सरकारला अंतिम वर्षाच्या परिक्षा घ्याव्या लागतील.

बाप्पासाठी त्याने उभारला शिवसेना भवन'चा अप्रतिम देखावा.

हातकणंगले / प्रतिनिधी

    बुद्धीची देवता असलेल्या गणपती बाप्पाची आरासही कल्पकतेने केली जाते. पारंपरिक आरास पद्धती बरोबरच  काहीतरी नवं तयार करण्याचा प्रयत्न तरुणांकडून केला जातो. बाप्पाच्या आरासातून  सामाजिक संदेश दिला जातो तर  संस्कृतीचं जतनही करण्याचा प्रयत्न केला जातो. यंदा लॉकडाऊनच्या काळातही तरुणांमधील ही सर्जनशीलता कमी झालेली नाही. हातकणंगले तालुक्यातील हेरले  येथील शिवसैनिक संदीप मिरजे यांनी 'शिवसेना भवन'चा अप्रतिम देखावा घरामध्ये साकारलेला आहे. त्याची दखल शिवसेना पक्ष प्रमुख मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी घेऊन फेसबुक पेजद्वारे कौतुक केले आहे.
       कोरोनामुळे  सामुहिक संसर्गाच्या भितीमुळे  प्रत्येक सण उत्सवावर कोरोनाचं सावट असल्याने कोणतेच सण उत्साहाने साजरे करता आले नाहीत. त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळंही यंदा साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरे करत आहेत. मात्र, समाजात नवचैतन्य भरण्यासाठी बाप्पाचं आगमन झालंय, त्यामुळे त्याचं स्वागत आणि त्यांची आरास  झाली पाहिजे त्यामुळे संदीप ने  घरातच 'शिवसेना भवन' उभारण्याची संकल्पना साकारली आहे. त्याने आपल्या घरातील शिवसेना भवनच्या आरासचे व्हिडीओ रेकॉर्डींग सोशल मीडियावर शेअर केले होते. त्याची दखल शिवसेना पक्ष प्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेऊन त्यांनी या पोस्टला फेसबूक पेजवर लाईक करून  सोशल मीडियावर द्वारे त्याचे कौतुक केले आहे.
       फोटो 
हेरले येथील संदिप मिरजे याने घरी बाप्पांची आरास  शिवसेना भवनची प्रतिकृती उभारून केली.

शिस्त पालन न केल्यास कोरोना हॉटस्पॉट होणार

सैनिक टाकळी प्रतिनिधी

 सैनिक टाकळी तालुका शिरोळ येथील कोरोना रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक बाब असल्याने लोकांनी शिस्तीचे पालन न केल्यास भविष्यामध्ये गाव हॉटस्पॉट मध्ये जायला वेळ लागणार नाही . गावामध्ये ज्यावेळी कोरोना चे रुग्ण नव्हते. त्यावेळी गावाने स्वयंशिस्त पाळली होती. दक्षता कमिटीनी घालून दिलेल्या नियमांचे पालन देखील केले होते. गावाच्या वेशीवर ती चेक पोस्ट ठेवून येणाऱ्या जाणाऱ्यांच्या नोंदी ठेवल्या होत्या यामुळे गावामध्ये एकही रुग्ण आढळून आला नव्हता. परंतु अनलॉक ची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर परिस्थिती बदलत गेली . आज अखेर सुमारे दहा पेक्षा जास्त ही रुग्ण आढळले असून त्यामध्ये पाच लोकांचा मृत्यू झाल्याने लोक भीतीच्या छायेखाली आहेत. सध्या  वातावरणातील बदलामुळे काही लोक सर्दी तापाने आजारी पडत आहेत. दरम्यान गावांमध्ये समूह संसर्ग झाल्याने नेमके आजारपण कशाचे या द्विधा अवस्थेत लोक आहेत. गावातील अनेकांचे मृत्यू हे नैसर्गिक की कोरोना याचे स्पष्टीकरण नसल्यामुळे  अंत्यविधी वेळी अनेकांचा संपर्क येत आहे . सध्या पुराने दिलासा दिला असला तरी कोरोना ने डोके वर काढल्याने या संकटाचा सामना सामुहिक रित्या करावा लागणार आहे  दानवाड दत्तवाड राजापूर खिद्रापूर राजापूर वाडी या गावामध्ये सुद्धा सध्या रुग्ण  आढळत असून या परिसरातील गावांसाठी मध्यवर्ती ठिकाणी कोविड सेंटर सुरू व्हावे . जेणेकरून अत्यवस्थ रुग्णांना वरती तात्काळ उपचार होतील अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

Thursday, 27 August 2020

कोरोना काळात विद्यापीठाच्या अंतिम परिक्षांचे काय होणार ? आज सुप्रीम कोर्टात निकाल

कोरोना काळात रखडलेल्या विद्यापीठाच्या 
अंतिम वर्षाच्या परीक्षा घ्याव्यात का, यासंदर्भात सर्वोच्च न्यायालय आज आज निकाल देणार आहे. सर्व परीक्षा सप्टेंबरमध्ये घेण्यात येतील की कोरोना संकटाचा काळ लक्षात घेता पुढे ढकलण्यात येईल याचा निर्णय सर्वोच्च न्यायालय घेईल. सर्वोच्च न्यायालयात १८ ऑगस्ट रोजी या खटल्याची सुनावणी झाली तेव्हा अंतिम निर्णय राखून ठेवला होता. तो आज जाहीर केला जाईल. 

कोल्हापूरात पर्यावरणपूरक पद्धतीने गणरायाला निरोप - पुढच्या वर्षी लवकर या च्या गजरात विसर्जन



कोल्हापूर प्रतिनिधी

शहरातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन ज्या त्या प्रभागांमध्ये करण्याचे नियोजन केले होते . कसबा बावडा येथे सहा ठिकाणी कृत्रिम विसर्जन कुंड ठेवण्यात आली होती. तर सार्वजनिक मंडळांनी सामाजिक उपक्रम म्हणून जवळपास दहा ठिकाणी अशी सजावट केलेली कृत्रिम विसर्जन कुंड सज्ज ठेवली होती.
कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर दरवर्षी ज्या ठिकाणी गर्दी होते, त्या ठिकाणी गणेशमूर्ती विसर्जनाला प्रतिबंध घालण्यात आला आहे. यामुळे कसबा बावडा राजाराम बंधारा, पंचगंगा नदी, रंकाळा तलाव येथे विसर्जन करू नये, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले होते. याला प्रतिसाद देऊन कसबा बावडा येथील बहुतांशी नागरिकांनी आपल्या जवळच्या कुंडात गणरायाचे विसर्जन केले. यावेळी सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क चे काटेकोरपणे पालन केले गेले. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या च्या गजरात विसर्जन करण्यात आले.
कोल्हापूर महापालिकेतर्फे प्रत्येक प्रभागात तात्पुरते विसर्जन कुंड ठेवण्यात आले होते. शहरात आणि उपनगरात जवळपास नव्वद ठिकाणी विसर्जन कुंड ठेवले होते . या ठिकाणी विसर्जन होणाऱ्या गणेशमूर्ती ट्रॅक्टरच्या साह्याने नेऊन महापालिकेचे कर्मचारी इराणी खण येथे त्यांचे विसर्जन केले गेले . यासाठी महापालिकेने ट्रॅक्टर ट्रॉली भाडेतत्त्वावर घेतले होते.

पर्यावरण पूरक गणेश उत्सव-२०२० ला कसबा बावड्यात चांगला प्रतिसाद

कोल्हापूर प्रतिनिधी 

पर्यावरणपूरक गणेश उत्सव-२०२० कोल्हापूर महानगरपालिका आयोजित या उपक्रमास सर्वांनी प्रतिसाद देऊया...!   या उपक्रमाला अंतर्गत पॅव्हेलीयन ग्राउंड, कसबा बावडा येथे कोल्हापूर महानगरपालिकाचे  शहर उपअभियंता  हर्षदीप घाटगे , तेजस घोरपडे, राजू कदम, आरोग्य निरीक्षक नंदकुमार पाटील,आरोग्यरक्षक मनोज कुरणे,केंद्रमुख्याध्यापक अजितकुमार पाटील, राजाराम कांबळे सर,चंद्रकांत कुंभार सर,संपत कांबळे, राजू पिसाळ,उदय तावडे,प्रकाश कांबळे,रमेश शिंगे,आरोग्यसेविका वंदना बनकर,आदींच्या सहकार्याने गणेश मूर्तींचे व गौरी- गणपतीच्या निर्माल्यांचे विसर्जन करण्यात आले.
 कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त  मल्लिनाथ कलशेट्टी, प्राथमिक शिक्षण समितीचे प्रशासनाधिकारी मा एस के यादव यांनी आवाहन केल्याप्रमाणे मार्फत सोशल डिस्टन्स नियमांचे काटेकोरपणे पालन करून पर्यावरणपूरक जलकुंभ मध्ये विसर्जन करून महानगरपालिकाकडून आरोग्य विभागाने पुरविण्यात आलेल्या डंपर मध्ये सुरक्षित ठेवून इराणी खान कोल्हापूरकडे पाठवण्यात आले.
कोरोना च्या पार्श्वभूमीवर जलकुंडा मध्ये घरगुती गणेश मूर्ती विसर्जन करण्यासाठी या वर्षी कोरोनाकाळींन परिस्थितीत काळजी व सुव्यवस्था व्यवस्थित होण्यासाठी प्रशासनाने सर्वप्रकारची यंत्रणा राबविण्यात आली होती.यावर्षी प्रथमच प्रशासनाने कोल्हापूर शहरामध्ये प्राथमिक शाळेतील 243 शिक्षकांच्या विशेष नेमणुका करण्यात आल्या होत्या. 
काटेकोरपणे नियोजन केल्याबद्द कसबा बावडा परिसरातील नागरिक, लोकप्रतिनिधी, तरुण मंडळे यांनी आनंद व्यक्त केला.

Wednesday, 26 August 2020

पट्टणकोडोली येथे 162 रक्तदात्यानी केले रक्तदान

*
पटट्ण कोडोली: (साईनाथ आवटे)
पटटण कोडोली तालुका हातकणगंले येथे हुपरी पोलिस स्टेशनच्या महा रक्तदान शिबिराच्या   आव्हानाला प्रतिसाद देत 162 रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली.
            सध्या संपूर्ण जगभर कोरोना व्हायरस या संसर्गजन्य रोगाने  थैमान घातले आहे. या कोरोना काळात रक्ताचा तुटवडा भासू नये यासाठी गणेश उत्सव  मंडळानी इतरत्र अवाजवी खर्च न करता गणेश उत्सव साध्या  पद्धतीने साजरा करून रक्तदान शिबिर आयोजित करून 1000 बाटली रक्त हुपरी परिसरातून जमा करावे असे आव्हान हुपरी पोलिस स्टेशनचे पी. आय.राजेंद्र मस्के यांनी केले होते.त्यांच्या या आव्हानाला प्रतिसाद देत काल हुपरी येथे 400 जणांनी रक्तदान केले तर आज पटटण कोडोली येथे पहिल्याच दिवशी 162 जनांनी रक्तदान केले. या कार्यक्रमासाठी हुपरी पोलिस स्टेशनचे पी आय राजेंद्र मस्के,बाळूमामा देवस्थान आदमापूर प्रमुख मानकरी कृष्णात वाघापूरे,उपसरपंच कृष्णाजी मसुरकर, रोटरी क्लबचे अध्यक्ष मच्छींद्र जाधव ,राणोजी पुजारी, अनिल कांबळे, मुबारक शेख, अनिल बिरांजे, प्रशांत निकम,मोहन वर्धन , हुपरी पोलिस स्टेशनचे निवृत्ती माळी, दिपक कांबळे,  दिपक सुतार इत्यादि मान्यवर मंडळी हजर होते. या रक्तदान शिबिराचे आयोजन शंभूराजे प्रतिष्ठान च्या  मावळ्यानी करून यशस्वी पार पाडले.

श्री दत्त विकास सेवा संस्थेच्या चेअरमनपदी विलास सावंत यांची एकमताने बिनविरोध निवड

हेरले / प्रतिनिधी
दि.26/8/2
 मौजे वडगाव ( ता. हातकणंगले ) येथील श्री दत्त विकास सेवा संस्थेच्या चेअरमनपदी विलास सावंत यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली. संस्थेचे चेअरमन अॅड . विजय चौगुले यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त होते . निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तालूका उपनिबंधक कार्यालयातील अधिकारी मकसूद सिंधी यांनी काम पाहिले .
          यावेळी माजी चेअरमन अॅड . विजय चौगुले , व्हा . चेअरमन प्रकाश सावंत , रघूनाथ काकडे , महालिंग जंगम , राजाराम आकिवाटे , मोहन शेटे , सतिश चौगुले , शिवाजी जाधव , कृष्णात गोरड , गौतम तराळ , राजश्री लोहार , वंदना भोसले , सचिव महेश माने ,यांच्यासह संचालक मंडळ व कर्मचारी वर्ग उपस्थित होते .

पोलीस आणि डॉक्टरच्या वेशातील गणेश मुर्तीची स्थापना करुन कोरोना योद्ध्यांप्रती कृतज्ञता

         

हातकणंगले/ प्रतिनिधी
दि.26/8/20


कोल्हापूर येथील  विश्वविक्रमवीर स्केटर व सायकलिस्ट डॉ केदार साळूंखे वय 8 यानी  पोलीस आणि डॉक्टरच्या वेशातील गणेश मुर्तीचे साधेपणाने प्रतिष्ठापना करून या गणेश चतुर्थी मध्ये राज्यासह जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भाव  वाढत असून या कोरोना ची साखळी रोखण्यासाठी कार्यरत असलेले कोरना योद्धा डॉक्टर्स, पोलीस ,सफाई कर्मचारी अशा वर्कर अंगणवाडी सेविका यांच्या कार्या बद्दल कृतज्ञता आपल्या गणपतीच्या देखाव्या मधून व्यक्त करून  सन्मान केला आहे. 
    त्याचबरोबर नियम पाळा कोरोना टाळा घरी, रहा सुरक्षित रहा आसे प्रभोधनत्मक संदेश देऊन, हे बुद्धिदेवता ज्ञान मंदिराचे दरवाजे उघडू दे आता,  हे विघ्नहर्ता ही मैदाने मोकळी का सर्व विघ्न दूर कर खेळू बागडू द्या आम्हाला असे साकडे ही श्री गणेशाला घालण्यात आले आहे. 

Tuesday, 25 August 2020

सैनिक टाकळी येथे इम्युनिटी बुस्टर औषधाचे वाटप

सैनिक  टाकळी प्रतिनिधी 

कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असल्याने लोकांची प्रतिकारशक्ती वाढावी यासाठी परमपूज्य अदृश्य काडसिद्धेश्वर महाराज कणेरी यांच्या सहकार्यातून बेंगलोर येथील डॉक्टरांनी तयार केलेले इम्मुनिटी बूस्टर चे वाटप येथील श्रीराम सोयाबीन खरेदी विक्री संघ व हरिभाऊ प्रेमी ग्रूप  यांच्या विद्यमाने करण्यात  आले .गावातील सुमारे आठशे नागरिकांनी याचा लाभ घेतला . यावेळी माजी पंचायत समिती उपसभापती हरिचंद्र पाटील म्हणाले कोरोना वरती कोणतेही औषध  नसले तरी  आपली प्रतिकारशक्ती वाढवल्यास या रोगापासून आपण दूर राहू शकतो  .पाटील यांनी  काडसिद्धेश्वर महाराज यांच्या  उपक्रमा बद्दल आभार व्यक्त केले. यावेळी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष बी एस पाटील, वैद्य आनंदराव पाटील, विजय पाटील, अरुण पाटील, बंडू शिरहट्टी,  संजय पाटील श्रीनिवास पाटील  अविनाश मुगदूम किरण पाटील, महेश पाटील, संजय घेवडे, महेश पाटील व हरिभाऊ ग्रुप चे सर्व सदस्य उपस्थित होते

एलान फौडेशन आणि सलमान खान चे कार्य कौतुकास्पद - राज्यमंत्री डॉ राजेंद्र पाटील यड्रावकर

सैनिक टाकळी  प्रतिनिधी.
  गतवर्षी आलेल्या महापुराचा तडाखा शिरोळ तालुक्यातील अनेक गावाना बसला . अनेकांची घरे उध्वस्त झाली. घर पडझडीने लोकांचे  मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेकांचे संसार उघड्यावर पडले.त्यांची घरे उभारणी करण्याचा प्रयत्न करत असताना सलमान खान आणि एलान फौडेशनने खिद्रापूर गावाला दत्तक घेऊन ७० घरांचे बांधकाम करून देण्याची केलेली संकल्पना ही गोरगरिबांना तारणारी असल्याचे प्रतिपादन आरोग्य राज्यमंत्री डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले.
      
    खिद्रापूर ता.शिरोळ येथील महापुरात पडझड झालेल्या घरांची पुर्नबांधणी करण्यासाठी एलान फौडेशन दिल्ली व अभिनेते सलमान खान यांनी घेतलेल्या70 घरांच्या आज सोमवारी पायाभरणी शुभारंभ प्रसंगी अध्यक्षस्थानावरून राज्यमंत्री डॉ. पाटील -यड्रावकर बोलत होते.
     जिल्हाधिकारी दौलत देसाई,तहसीलदार डॉ.सौ.अपर्णा मोरे-धुमाळ,पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शंकर कवितके,पोलीस निरीक्षक चंद्रकांत निरावडे,पंचायत समिती सभापती सौ.कविता चौगुले,सरपंच हैदरखान मोकाशी आदी प्रमुख उपस्थित होते.
   यावेळी बोलताना जिल्हाधिकारी देसाई म्हणाले कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्याच्या समन्वयामुळे संभाव्य महापुराचा धोका टळला आहे. काही अंशी दिलासा मिळाला आहे. अशातच कोरोणाच्या आपत्तीचा सामना करत असताना नागरिकांनी सोशल डिस्टन्स आणि मास्कचे वापर करून कोरोणाचा धोका टाळावा.सामाजिक बांधिलकी जोपासत सलमान खान आणि फौंडेशनने गावाला दत्तक घेऊन सुरू केलेले कार्य हे कौतुकास्पद आहे. 
      व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे कार्यक्रमात बोलताना एलान फौंडेशचे आकाश कपूर म्हणाले सलमान खान आणि आमच्या फौंडेशनने दत्तक घेतलेल्या घरांचे लवकरच बांधकाम पूर्ण करून ग्रामस्थांच्या हक्काचे घर निर्माण करून देणार असल्याचे सांगितले
        यावेळी प्रतीक चौगुले यांनी मनोगत व्यक्त केले.तर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रजवलन करण्यात आले.कार्यक्रमाचे स्वागत मियाखान मोकाशी.प्रास्ताविक संतोष जुगळे यांनी केले तर आभार ग्राम विकास अधिकारी म्हालिंग अकीवाटे यांनी मानले.
    यावेळी उपसरपंच ललिता काळे,पोलीस पाटील दिपाली पाटील,नगरसेवक जवाहर पाटील,रविकांत कारदगे,हिदायतुला मुजावर,कॉन्ट्रॅक्टर इलियास पटेल
मंडल अधिकारी विनायक माने तलाठी सुनील बाजारी,पंचायत समिती  चौगुले आदी प्रमुख उपस्थित होते.

Monday, 24 August 2020

लेखाधिकारी सागर वाळवेकर व उपशिक्षणाधिकारी डी.एस.पोवार यांचा मुख्याध्यापक संघाच्या वतीने सत्कार


हातकणंगले / प्रतिनिधी
दि.24/8/20
 मिलींद बारवडे

      जिल्ह्यातील माध्यमिक शाळांतील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची सातव्या वेतन आयोगाप्रमाणे सेवापुस्तके तपासणी शिबिर मुख्याध्यापक संघात घेण्याचे आश्वासन कोल्हापूरचे नूतन लेखाधिकारी सागर वाळवेकर यांनी मुख्याध्यापक संघाच्या शिष्टमंडळास दिले. कोल्हापूर जिल्हा माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या वतीने सागर वाळवेकर यांचा संघाचे चेअरमन सुरेश संकपाळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 
      यावेळी माध्यमिक विभागाचे नूतन उपशिक्षणाधिकारी श्री.डी.एस.पोवार यांचा कोल्हापूर जिल्हा माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक संघाचे चेअरमन सुरेश संकपाळ, व्हा.चेअरमन बी.आर. बुगडे, राज्य शाळा कृती समितीचे कार्याध्यक्ष बाबा पाटील, लोकल ऑडीटर मिलिंद पांगिरेकर, खजिनदार नंदकुमार गाडेकर, संपर्क प्रमुख अशोक हुबळे, रवींद्र मोरे, इरफान अन्सारी, सुरेश उगारे, अजित रणदिवे, पोपट पाटील आदी उपस्थित होते.
      फोटो 
माध्यमिक उपशिक्षणाधिकारी डी एस पोवार यांचा सत्कार करतांना मुख्याध्यापक संघाचे चेअरमन सुरेश संकपाळ व्हा.चेअरमन बी आर बुगडे कृती समितीचे कार्याध्यक्ष बाबासाहेब पाटील व इतर मान्यवर

Thursday, 20 August 2020

महाराष्ट्र राज्य डिसीपीएस संघर्ष समितीचे वेतन अधिक्षकांना निवेदन

प्रतिनिधी कोल्हापुर
*
     एनपीएस फाॅर्म भरण्यास सक्ति करू नये,डिसीपीएस पावत्या, सातव्या वेतन आयोगाचा पहिला हप्ता,डिसीपीएस नवीन खाती, अतिरिक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या कपातीचा हिशेब, एनपीएस फाॅर्म न घेता पगारपत्रक स्विकारणे यासह अनेक मागण्यांचे निवेदन राज्य डिसीपीएस संघर्ष समितीचे वतीने वेतन अधिक्षकांना देण्यात आले. 
     यावर मा. वेतन अधिक्षक म्हस्के  यांनी संघटनेचे म्हणणे शासन दरबारी मांडतो असे सांगितले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष श्री करणसिंह सरनोबत, उपाध्यक्ष श्री सतिश लोहार, कोल्हापूर शहरकार्यकारीणी सदस्या सौ तांबोळी मॅडम, संताजी शिंदे सर,नाईक सर, सचिन पाटील सर,चव्हाण सर, सौ .व्ही के पाटील मॅडम , एस व्ही चौगले सर , एस .एम . कोळी सर, ए .एन मुजावर सर , व्ही एस मेटकरी , एन .डी . फकीर सर एम एस पासार्डेकर, सर व संघटनेचे सदस्य उपस्थित होते.

Wednesday, 19 August 2020

आजपासून एसटी प्रवास सुरू ... ई पासशिवाय प्रवास करता येणार - खाजगी वाहनांना ई पास सक्तीचा


गणेशोत्सवाच्या तोंडावरच सर्वसामान्यांना दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. आजपासून आंतरजिल्हा एसटी बस सेवा सुरू करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. आंतरजिल्हा प्रवास करताना ई पास लागणार नाही मात्र स्वतः च्या वाहनाने प्रवास करताना ई पास आवश्यक आहे. 

कोरोनाबाधित पत्रकारांसाठी स्वतंत्र व्यवस्था करावी.कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर्स वेलफेअर असोसिएशनची मागणी

 
हातकणंगले / प्रतिनिधी
दि.२०
प्रशांत तोडकर

कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर्स वेलफेअर असोसिएशन यांच्यावतीने कोरोनाबाधित पत्रकारांसाठी शासनाने स्वतंत्र व्यवस्था करावी अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे ईमेल द्वारे  निवेदन पाठवून केली आहे.
    निवेदनात म्हटले आहे की, कोरोना या महामारीच्या संकटाशी भारतासह अवघे जग लढा देत आहे.या लढय़ामध्ये सरकार,प्रशासन,डॉक्टर्स,नर्स, पोलीस आदीच्या प्रमाणेच पत्रकारांची ही भूमिका ही अतिशय महत्त्वाची आहे.
    पत्रकार पत्रकारिता करीत असताना काहींना कोरोनाची बाधा होत आहे. कोरोनाची बाधा झालेल्या पत्रकारांवर योग्य वेळी,योग्य उपचार होण्यासाठी पत्रकारांसाठी तसेच पत्रकारांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांसाठी स्वतंत्र व्यवस्था करावी.
    सदरचे निवेदन कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुधाकर निर्मळे,उपाध्यक्ष अभिजित कुलकर्णी,सचिव सुरेश पाटील,कौन्सिल मेंबर सुरेश कांबरे आदींनी दिले.

Tuesday, 18 August 2020

उदगीर तालुका पत्रकार संघाच्यावतीने २१ आॅगस्ट २०२० रोजी रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन

**
*उदगीर (प्रतिनिधी) गणेश मुंडे 

उदगीर तालुका पत्रकार संघाच्यावतीने सोमवार दि.२१ आॅगस्ट रोजी सकाळी १० वा. रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.उदगीर तालुका पत्रकार संघाच्यावतीने वर्षातून दोन वेळा 6 जानेवारी दर्पण दिना निमित्य व ब्लड बॅकेत जेव्हा रक्ताचा तुटवडा निर्माण होतो,अशावेळी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते.सध्या कोरोणा विषाणूचा प्रादुर्भाव उदगीर शहर व परिसरात दिवसेंदिवस वाढत असून,उपचारासाठी रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढत आहे.त्यामुळे रक्ताची मागणी वाढत आहे.परंतू, ब्लड बँकेत मागणी जास्त व पुरवठा कमी असल्यामुळे रक्ताचा तुटवडा निर्माण झाला असल्याने उदगीर तालुका पत्रकार संघाच्यावतीने रक्ताची गरज लक्षात घेता  शुक्रवार दिनांक २१ आॅगस्ट रोजी सकाळी १० वाजता नगर परिषद व्यापारी संकुल समोरिल प्रांगणात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी उदगीर शहर व परिसरातील इच्छुक रक्तदात्यानी रक्तदान करुन रक्तदानाच्या राष्ट्रीय सामाजिक कार्यात सहभाग नोंदवावा असे आवाहन उदगीर तालुका पत्रकार संघाच्या वतीने केले आहे.

पट्टणकोडोली येथे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याच्या डोसचा सर्वांनी लाभ घेण्याचे आवाहन - शिरीष देसाई


पट्टणकोडोली : ( साईनाथ आवटे  )पट्टणकोडोली तालुका हातकणंगले येथे कणेरी मठाचे अधिपती श्री. काडसिद्धेश्वर महाराज यांच्या आशीर्वादाने व कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस सहकार सेल चे जिल्हाध्यक्ष श्री.शिरीष आण्णासो देसाई यांच्या विशेष प्रयत्नातून सध्या सर्वत्र पसरत असलेल्या कोरोना आजारावर मात  करण्यासाठी व आपली रोग प्रतिकार शक्ती वाढवणेसाठी  बुस्टर डोस मोफत देणेत येणार आहे. गावातील जास्तीत जास्त लोकांनी सोशल डिस्टंसिंग चे सर्व नियम पाळून व मास्कचा वापर करून याचा लाभ घ्यावा असे आवाहन कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस सहकार सेल चे जिल्हाध्यक्ष श्री.शिरीष देसाई यांनी केले आहे. तरी सर्वानी आपल्या सोबत येतेवेळी  सीलबंद शुद्ध 1 लिटर पाण्याची बाटली घेऊन येणेचे आहे. शेतकरी विकास सेवा सोसायटी पट्टण कोडोली येथे उद्या बुधवारी सकाळी दहा वाजल्यापासून मोफत देणेत येणार आहे.

विश्वविक्रमवीर डाॅ. केदार साळूंखे यास आदर्श बालगौरव क्रिडारत्न पुरस्कार.


    पेठ वडगांव / प्रतिनिधी
     मिलींद बारवडे

  विश्वविक्रमवीर स्केटर व सायकलिस्ट डाॅ. केदार विजय साळूंखे वय वर्षे  अवघे  आठ यास  मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी यांचे वतीने देण्यात येणारा ,'आदर्श बालगौरव क्रिडारत्न पुरस्कार' २०२० व किडस ॲचिव्हर आयकॉन अवॉर्ड २०२० पुरस्काराने सन्मानित  करण्यात आले. प्रसिद्ध राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ. प. केशवजी महाराज या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
    विश्वविक्रमवीर डाॅ.केदार साळुंखे यांने  अवघ्या सातव्या वर्षी सायकलिंगमध्ये एकाच बुकमध्ये एका वेळी  चार रेकॉर्ड करणारा पहिला भारतीय ठरला आहे. आतापर्यंत स्केटींग  व सायकलिंगमध्ये  १२ विश्वविक्रम नोंदवले आहेत.तसेच अनेक पुरस्कार  प्राप्त झाले आहेत.  अनेक स्पर्धेत विजेतेपद पटकावली आहेत. यामधे गाेल्ड २०,  सिल्वर १६ , ब्राँझ १५पदक व अन्य बक्षिसेही मिळवली आहेत.
      सुप्रसिद्ध राष्ट्रीय कीर्तनकार हभप श्री केशवजी महाराज सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रसंस्थापक अध्यक्ष अॅड.कृष्णाजी जगदाळे ज्येष्ठ समाजसेवक  अशोकानंदजी जवळगावकर, ज्येष्ठ पत्रकार सदानंद खोपकर,  आयकर अधिकारी श्रीमती अरुणा परब यांनी या समारंभाला विशेष पाहुणे म्हणून ऑनलाईन उपस्थिती नोंदविली हाेती.डाॅ.केदार साळुंखे याला विबग्याेर स्कुलच्या प्राचार्या स्नेहल नावेॅकर,काेच सचिन इगंवले, स्वप्निल काेळी, वडिल विजय साळूंखे व आई स्वाती गायकवाड साळूंखे यांचे  मार्गदर्शन लाभले आहे .


      फोटो 
डॉ.केदार साळुंखे ऑनलाईन पुरस्कार स्विकारतांना शेजारी वडील पीआय विजय साळुंखे आई डीवायएसपी स्वाती गायकवाड साळुंखे राष्ट्रीय कीर्तनकार ह. भ.प. श्री केशवजी महाराज  प्रसंस्थापक अध्यक्ष अॅड. कृष्णाजी जगदाळे प्रमुख पाहुणे यांच्या उपस्थित.

Monday, 17 August 2020

कोल्हापूर जिल्ह्यात सर्वसमावेशक महिला बालविकास भवन उभारणार – डॉ.पद्माराणी पाटील.


हेरले / प्रतिनिधी

    देशातील महिला ह्या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत.सर्व क्षेत्रात महिलांनी भरारी घेतली आहे, शासनाने आता त्यांना संधी देणे गरजेचे आहे.त्यासाठीच कोल्हापूर जिल्ह्यात सर्वसमावेशक महिला बालकल्याण भवन उभे करू असे प्रतिपादन कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती डॉ.पद्माराणी राजेश पाटील यांनी केले.स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या कार्यालयात महिला व बालविकास भवनाचे उदघाटन जि. प.अध्यक्ष बजरंग पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
              यावेळी सभापती डॉ.पद्माराणी पाटील म्हणाल्या, जिल्हयातील महिलांना महिला व बालविकास विभागाची सर्व माहिती,अडीअडचणीची माहिती ही एकाच छताखाली मिळावी ह्या उद्देशाने शासनाच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.परंतू भविष्यात महिला आर्थिक विकास महामंडळ, महिला आयोग, महिला बालविकास विभाग यांची एकत्रित इमारत म्हणून नाविन्यपूर्ण महिला बालविकास भवन बांधण्यासाठी सर्वोतोपरी कटिबद्ध राहू.
    जि.प.अध्यक्ष बजरंग पाटील म्हणाले, ह्या भवनच्या नवीन इमारती साठी लागेल ती मदत करू. त्यासाठी येत्या सर्वसाधारण सभेत त्याच्या पुढील मंजुरीसाठी ठराव मांडून,जागेसंदर्भात ही चांगला निर्णय घेऊ.
   यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, बांधकाम सभापती हंबीरराव पाटील, शिक्षण सभापती प्रवीण यादव, समाजकल्याण सभापती स्वाती सासणे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने यांसह सर्व अधिकारी, खातेप्रमुख, कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

        फोटो 
महिला व बालविकास भवनचे उद्घाटन करतांना जि प अध्यक्ष बजरंग पाटील महिला व बालकल्याण सभापती डॉ. पद्माराणी पाटील व इतर मान्यवर.

Sunday, 16 August 2020

शिरदवाड ग्रामस्थांना रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याच्या गोळ्यांचे वाटप

प्रतिनिधी सतिश लोहार

शिरदवाड ता . शिरोळ येथील स्वातंत्र्य सैनिक कै . हिंदुराव सिताराम देशमुख-पाटील यांच्या स्मरणार्थ अॅडव्होकेट श्री बाजीराव हिंदुराव देशमुख-पाटील  यांच्याकडून कोरोना प्रादुर्भावाच्या काळात Covid-19 कोरोना आजार होऊ नये याकरीता मौजे शिरदवाड येथील ग्रामस्थांना रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी कंम्फोरा १एम होमीओपॅथीक या गोळ्यांचे वाटप केले . जवळपास पाचशे कुटुंबाना त्याचे वाटप करण्यात आले, या कोरोना कालावधीत अशा समाज कार्याची गरज आहे असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले , शिरदवाड गावातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता या गोळ्यांचे वाटप केल्याचे अॅडव्होकेट पाटील यांनी सांगितले ,या सामाजिक कार्यासाठी अॅडव्होकेट  बी. एच. देशमुख - पाटील यांचे आभार सरपंच अक्षदा कांबळे यांनी मानले, यावेळी उपसरपंच मगदुम , अॅडव्होकेट ऋतुराज देशमुख - पाटील,सत्यराज देशमुख -पाटील , राजेंद्र देशमुख , ग्रामपंचायत सदस्य  भिमराव कांबळे, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पाटील व इतर मान्यवर नागरीक उपस्थित होते .

नंदनगरीत शहिद शिरीषकुमार मंडळातर्फे ध्वजारोहण

       
        नंदुरबार  - ( प्रतिनिधी - वैभव करवंदकर ) - - - -                         
   निर्धार स्वातंत्र्य दिनाचा.. कोरोना मुक्त  करण्यासाठी  नियम पाळा कोरोना टाळा, सुरक्षेसाठी मास्कचा वापर करा.               वन्दे मातरम्              .. भारत माता की जय आदी घोषणांच्या निनादात भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त शहरातील बालवीर चौकात शहीद शिरीषकुमार मित्र मंडळातर्फे  ध्वजारोहण करण्यात आले.                           यावेळी सामाजिक अंतर ठेवून व मास्कचा वापर करीत सेवानिवृत्त शिक्षक जी. एस. गवळी यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. तत्पूर्वी हुतात्मा शिरीषकुमार मेहता यांच्या प्रतिमेस शालेय विद्यार्थी धिरेन हिरणवाळे व भारत मातेच्या प्रतिमेस वैष्णवी सुभाष उदीकर या चिमुकल्यांनी पुष्पहार अर्पण केले. राष्ट्रगीतानंतर उपस्थितांनी तिरंग्यास सलामी दिली. याप्रसंगी कोरोना योद्धा म्हणून सन्मानित करण्यात आलेले सन्मान पत्र व सन्मान चिन्ह ठेवण्यात आले होते. ध्वजारोहणानंतर जी. एस. गवळी यांच्या संकल्पनेतून स्वच्छ हात धुणे बाबतीत प्रात्यक्षिक देखावा सादर करण्यात आला. स्वातंत्र्य दिनानिमित्त पर्यावरणाचा संदेश देत चिमुकल्यांच्या हस्ते  वृक्षारोपण करण्यात आले. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष महादू हिरणवाळे यांनी सांगितले की, कोरोनाशी लढा देण्यासाठी सर्वानी संघटितपणे कार्य करुन शासन नियमांचे पालन करावे. या छोटेखानी कार्यक्रमास प्रा. एकनाथ हिरणवाळे, मोतीलाल नुकते, नितिन तावडे, सदाशिव गवळी, सौ. विमल हिरणवाळे, सौ. नंदा हिरणवाळे तसेच कु. लिना हिरणवाळे, भाग्यश्री हिरणवाळे, चैताली हिरणवाळे, नेहल चौधरी, कावेरी चौधरी, गोपाल हिरणवाळे कृष्णा चौधरी, विशाल हिरणवाळे आदी  विद्यार्थी उपस्थित होते.

हेरले, चोकाक, माले, मौजे वडगावमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

हेरले / प्रतिनिधी
         दि.१६/८/२०
         प्रशांत तोडकर

    हेरले परिसरातील ग्रामपंचायती पदाधिकारी  व सहकारी संस्थांचे पदाधिकारी यांनी सोशल डिस्टन्स ठेवून  ७३ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा केला.
      हेरले (ता हातकणंगले) येथील ग्रामपंचायतीचे ध्वजारोहन सरपंच अश्विनी चौगुले यांच्या हस्ते व ध्वजपूजन उपसरपंच राहुल शेटे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी,ग्रामविकास अधिकारी संतोष चव्हाण तलाठी, सर्कल सर्व ग्रामपंचायत सदस्य,आशावर्कर उपस्थितीत होते.
श्री छत्रपती शिवाजी विकास सेवा  सोसायटी येथे चेअरमन उदय चौगुले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी माजी सभापती तथा संचालक राजेश पाटील ,स्वप्नील कोळेकर, सुनील खोचगे, अशोक मुंडे,रमेश कदम,सेक्रेटरी दशरथ खोत,रवींद्र मिरजे,गुरू नाईक,अक्षय इंगळे आदी मान्यवर उपस्थित होते.
    चोकाक (ता.हातकणंगले) येथील ग्रामपंचायतीचे ध्वजारोहण उपसरपंच महावीर पाटील यांच्या हस्ते तर चावडी समोर पोलीस पाटील सचिन कुंभार यांच्या हस्ते ध्वजारोहण  संपन्न झाला . यावेळी सरपंच मनीषा सचिन पाटील ग्रामसेविका अनुपमा सिदनाळे तलाठी नितीन जाधव कृषिसहायक सचिन अलमाणे सर्व ग्रामपंचायत सदस्य , सदस्या तसेच मुख्याध्यापक , शिक्षक वर्ग आदी मान्यवर उपस्थितीत होते.
       माले (ता हातकणंगले) येथे ग्रामपंचायतीचे व मराठी शाळा येथील सरपंच प्रताप उर्फ बंटी पाटील यांच्या हस्ते ध्यजारोहण करण्यात आले.
 यावेळी  उपस्थित उपसरपंच रोहिणी भरत गावडे ,माजी उपसरपंच सुनील कांबळे, ग्रामसेवक सुनिल खांडेकर पोलिस पाटील तलाठी शाळेतील शिक्षक आंगणवाडी सेविका व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
     मौजे वडगावमध्ये ७३ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध कार्यालय व संस्थामध्ये विविध मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले . यामध्ये मुख्य झेंडा चौक येथील ध्वजारोहण सरपंच काशीनाथ कांबळे  ग्रामपंचायत कार्यालयाचे ध्वजारोहण उपसरपंच सुभाष आकिवाटे यांच्या हस्ते पार पडले. विद्यामंदिर प्राथमिक शाळेचे संदिप मगदूम , दत्त सोसायटीतील राजाराम आकिवाटे , बौद्ध समाज येथील ग्रामसेवक विठठल कांबळे , कामधेनू दुध संस्थेचे महमंद हजारी आशा मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.

Saturday, 15 August 2020

अहिल्यादेवींच्या चरित्रामध्ये समाजाच्या उत्कर्षाची ताकत - पत्रकार महादेव वाघमोडे यांचे प्रतिपादन


एस. एम. वाघमोडे
गांधीनगर प्रतिनिधी

महिलांसाठी अत्यंत प्रतिकूल काळामध्ये आपल्या असामान्य कर्तृत्वाने सर्वोत्कृष्ट राज्यकारभार चालवीत संपूर्ण जगात आदर्श निर्माण केलेल्या राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या चरित्रामध्ये समाजाच्या उत्कर्षाचे सिक्रेट लपलेले आहे असे प्रतिपादन पत्रकार महादेव वाघमोडे यांनी गडमुडशिंगी (ता. करवीर) येथे समस्त धनगर समाजाच्या वतीने आयोजित  अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमात  केले. याच वेळी त्यांनी अहिल्यादेवी होळकर यांनी तत्कालीन काळात मातब्बर विरोधकांना मुत्सद्दी राजकारणात द्वारे कशी मात दिली याचे स्पष्टीकरण दिले तसेच फक्त स्वतःच्या राज्यातील जनतेचा आणि विशिष्ट समुदायाचा विचार न करता संपूर्ण भारतभर रयतेसाठी भरीव  कार्य करीत वेगळा  आदर्श निर्माण केला. त्यामुळे विस्तारवादी राजकर्त्यांच्या अन्याय अत्याचाराने त्रस्त रयतेला अहिल्यादेवी यांचा मोठा आधार होता. त्यामुळे अशा कर्तुत्ववान स्त्रीच्या चरित्राचे अनुकरण केल्यास समाजाची आर्थिक, सामाजिक ,राजकीय ,शैक्षणिक प्रगती सहज साध्य असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी अहिल्यादेवी यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण समाजातील ज्येष्ठ मार्गदर्शक गणपती पुजारी यांच्या हस्ते करण्यात आले तर आभार प्रदर्शन यशवंत खिलारी यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन रासपचे तालुका संपर्कप्रमुख कृष्णात रेवडे यांनी केले. यावेळी म्हाळु पुजारी, पंडित पुजारी, विक्रम, पुजारी, संतोष रेवडे, आनंदा रेवडे ,शिवाजी रेवडे, विशाल पुजारी, करशीद्ध रेवडे ,शिवाजी वाघमोडे, अक्षय पुजारी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
फोटो 
गडमुडशिंगी तालुका करवीर येथे समस्त धनगर समाजाच्या वतीने अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमांमध्ये प्रतिमापूजन व पुष्पहार अर्पण करताना गणपती पुजारी, यशवंत खिलारी, कृष्णात रेवडे व इतर

सर्वांच्या सहकार्यातून कोरोनावर मात करण्याची शक्ती मिळो - गणेश मंडळांनी प्लाझ्मा दानसारखे उपक्रम राबवावेत - पालकमंत्री सतेज पाटील


कोल्हापूर, दि. 15 ऑगस्ट 2020 

सर्वांच्या सहकार्यातून कोरोनावर मात करण्याची शक्ती मिळो आणि कोरोनाचे संकट लवकरच दूर होवो ही आशा व्यक्त करताना गणेश उत्सवात गणेश मंडळाच्या तरूण कार्यकर्त्यांनी प्लाझ्मा दानसारखे उपक्रम राबवून गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहनही पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज केले.
 भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 73 व्या वर्धापनदिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा मुख्य सोहळा करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील, खासदार संजय मंडलिक, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋतुराज पाटील, महापौर निलोफर आजरेकर, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल उपस्थित होते. 
 पालकमंत्री श्री. पाटील शुभेच्छा संदेशात म्हणाले, कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा स्वातंत्र्यदिन सोहळा आज देशभर कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचा अवलंब करुन साजरा होत आहे. ज्यांच्या असिम त्यागातून आपल्याला स्वातंत्र्य मिळाले, त्या थोर स्वातंत्र्य सैनिकांच्या, देशभक्तांच्या, क्रांतीकारकांच्या आणि शहिदांच्या प्रती मी प्रथम आदर व्यक्त करतो. आपणा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो.
कोल्हापूर जिल्हयात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना रुग्ण डिस्चार्ज होण्याचे प्रमाणही चांगले आहे. जिल्ह्यात कोरोना समूह संसर्गाचा धोका टाळण्यासाठी शासन-प्रशासन अहोरात्र प्रयत्न करीत आहेच, मात्र आम्ही कोल्हापूरी- जगात भारी ही उक्ती कोरोनाच्याबाबतीत खरी ठरविण्यासाठी जनतेने आता प्रतिबंधक उपाययोजना कठोरपणे अंमलात आणून आपण, आपलं कुटुंब आणि समाजाला कोरोनापासून दूर ठेवण्याची गरज आहे. 
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जवळपास गेली पाच महिने लॉकडाऊनसह अन्य प्रतिबंधक उपायांव्दारे कोरोनाला हरविण्याचे प्रयत्न शासन आणि प्रशासन यांच्याकडून युध्दपातळीवर केले जात आहेत. असे असले तरी गेल्या महिनाभरात कोल्हापूर जिल्ह्यात 12 हजाराहून अधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांनी राज्यातील जनतेच्या सक्रीय पुढाकाराने कोरोना विरुध्दच्या युध्दात निश्चितपणे जिंकू असा आत्मविश्वास बाळगला आहे. त्यांचा हा आत्मविश्वास सार्थ ठरविण्यासाठी प्रत्येकाने नियमांची अंमलबजावणी करून कोरोनाला हरविण्यात पुढाकार घेणे गरजेचे आहे.

प्लाझ्मा थेरेपीने 25 अत्यवस्थांना जीवदान
  कोरोना रुग्णावर प्लाझ्मा थेरेपीचा प्रयोगही जिल्ह्यात यशस्वी झाल्याचे सांगून पालकमंत्री म्हणाले, 60 दात्यांनी प्लाझ्मा दान केला आहे. यामुळे 25 अत्यवस्थ रुग्णांना जीवदान मिळाले आहे. यासाठी सीपीआर, डी.वाय.पाटील हॉस्पिटल, आयसोलेशन, आयजीएम हॉस्पीटल या कोरोना हॉस्पीटलांबरोबरच खासगी हॉस्पिटलमध्येही कोरोना रुग्णांवर उपचाराच्या सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. कोल्हापूर शहरातील खासगी हॉस्पीटलांनीही रुग्णसेवेसाठी योगदान दिले आहे. 
7 हजार 332 बेडची उपलब्धता
 जिल्ह्याचे प्रमुख आरोग्य उपचार केंद्र म्हणून सी.पी.आर.कडे पाहिले जाते. सी.पी.आर. मध्ये सध्या 429 बेड्सची व्यवस्था असून त्यापैकी 222 ऑक्सिजन बेड्स आहेत. आणखी 94 ऑक्सिजन बेड्स वाढविण्याचे काम सुरु आहे. आयसीयू बेड्स 73 असून आणखी 
8 बेड्सची भर घातली जात आहे. त्याचबरोबर 66 व्हेंटिलेटर, 50 एनआयव्ही, 20 हाय फ्लो नेझल ऑक्सीजन या सुविधा उपलब्ध आहेत.  सीपीआरसह समर्पित कोरोना हॉस्पीटल आणि समर्पित कोरोना मदत केंद्र यांना एकूण 12 एक्सरे मशिन देण्यात येत आहेत. जिल्ह्यात दररोज होणारी 2 हजार स्वॅब नमुने तपासणी क्षमता आता 5 हजार पर्यंत करण्यात येत आहे. प्रत्येक कोव्हिड केअर सेंटरमध्ये ॲन्टीजेन टेस्ट करण्याची सुविधा उपलब्ध आहे. 
कोव्हिड काळजी केंद्र, समर्पित कोव्हिड आरोग्य केंद्रांमध्ये एकूण 7 हजार 332 बेडची उपलब्धता असून यामध्ये 808 ऑक्सिजन बेड व 288 आयसीयू बेड आहेत. 
  रुग्णांना हॉस्पीटलमधील उपलब्ध बेडची माहिती कळावी तसेच बेड उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. यासाठी तीन स्वतंत्र मोबाईल क्रमांक दिले आहेत. दिवसाला सरासरी 400 ते 500 फोन स्वीकारण्यात येत आहेत. कोरोना रुग्णांकडून खासगी हॉस्पीटलमध्ये शासकीय दराने बील आकारणी व्हावी तसेच उपलब्ध बेडची संख्या कळावी यासाठी प्रत्येक हॉस्पीटलसाठी एका शासकीय कर्मचाऱ्याकडे समन्वयक म्हणून जबाबदारी दिली आहे. महापालिकेच्यावतीने खासगी रूग्णालयांना दरफलक लावण्याबाबत कळविण्यात आले असून बिले तपासणीसाठी लेखापरीक्षण विभागातील कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागातही हॉस्पीटलांसाठी समन्वय अधिकारी नेमण्यात आले आहेत. 
कोरोना योध्यांना मानाचा मुजरा
 जिल्ह्यात सुरु असलेल्या कोरोना विरुध्दच्या लढ्यात शासन, प्रशासन, स्वयंसेवी-सेवाभावी संस्था-संघटना तसेच जिल्ह्यातील जनतेने केलेले सहकार्य महत्वाचे आहे. आरोग्य यंत्रणेतील डॉक्टर्स, नर्सेस व सर्व स्टाफ, पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच विविध विभागाचे शासकीय कर्मचारी, सेवाभावी संस्थांचे सदस्य या सर्व कोरोना योध्दांना आजच्या स्वातंत्र्यदिनी मी मानाचा मुजरा करतो ! अशा शब्दात पालकमंत्र्यांनी गौरव केला. 
   कोरोनाची सौम्य लक्षणे असणाऱ्या किंवा लक्षणे नसणाऱ्या पॉझिटिव्ह रूग्णांवर घरी उपचार करण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे. करवीर तालुक्यातील वडणगे ग्रामपंचायतीने सर्वप्रथम पुढाकार घेवून हा उपक्रम सुरु करुन तो यशस्वी केला आहे. याबाद्दल वडणगे ग्रामपंचायतीचे सरपंच, सर्व सदस्य व कोरोना दक्षता समितीचे सदस्य आणि ग्रामस्थ यांचे मी मनापासून कौतुक करतो. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात अणेक ठिकाणी हा उपक्रम सुरु झाला असून यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण निश्चितपणे कमी झालेला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून आजअखेर जिह्यात 3 हजारहून अधिक कोरोना बाधित घरी उपचार घेत आहेत. प्रशासनामार्फत या सर्वांना किट दिले असून त्यामध्ये पल्स ऑक्सीमीटर, डिझीटल थर्मामीटर, मास्क इत्यादी वस्तू देण्यात आल्या आहेत. यापैकी 2 हजारहून अधिक आता बरे झाले आहेत.
कोल्हापूरकरांचे दातृत्व
 कोरोनाच्या या संकट काळात अनेक सेवाभावी संस्था, संघटना व व्यक्तींनी कोल्हापूर रिलीफ फंड याला मदत करुन दातृत्वाची परंपरा जपली आहे. रोटरी मुव्हमेंट कोल्हापूर तर्फे 62 लाख रुपये खर्चून 538 बेड्स उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. त्यापैकी 120 बेड्स च्या माध्यमातून महासैनिक दरबार हॉल येथे कोवीड केअर सेंटर सुरु केले आहे. या ठिकाणी क्रिडाई कोल्हापूर तर्फे पायाभूत सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. तसेच शिरोली येथील जैन मंदीरामध्ये जैन समाजातर्फे कोवीड केअर सेंटर सुरु केले आहे. कसबा बावडा, राजोपाध्येनगर, फुलेवाडी या ठिकाणी स्थानिक नगरसेवकांनी कोवीड केअर सेंटर उभारण्याचा निर्णय घेतला आहे. उद्योजक व औद्योगिक संघटना यांनी 20 व्हेंटीलेटर उपलब्ध करुन देण्याचे जाहीर केले असून त्यापैकी 3 व्हेंटीलेटर जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द केले आहेत. 
घाटगे ग्रुपने शववाहिका उपलब्ध करुन दिली आहे. व्हाईट आर्मी संस्थेने कोवीडच्या काळात लाखो गरजूंना जेवण उपलब्ध करुन दिले आहे. अनेक शैक्षणिक संस्था, साखर कारखाने यांनी सुध्दा आपल्या कडील सुविधा कोरोना केअर सेंटर तयार करण्यासाठी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. होर्डिंग ॲण्ड आऊट सोर्सींग ॲडर्व्हटायझर्स असोसिएशनच्या माध्यमातून 2 हजार प्रबोधनाचे फलक लावण्यात आले आहेत. त्याचबरोबर अनेक ज्ञात-अज्ञात लोकांनी सुध्दा या संकट काळात मदतीचा हात पुढे केला आहे. त्याच सर्वांचे पालकमंत्र्यांनी आभार मानले.
पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी यंत्रणा सज्ज 
      जिल्ह्यात गेल्या वर्षी उदभवलेल्या महापुराच्या पार्श्वभूमीवर यंदा पूर प्रतिबंधासाठी आवश्यक उपाययोजना नियोजनबध्दरितीने राबविल्याने ऑगस्टच्या पहिल्या आठवडयात निर्माण झालेल्या पूर परिस्थितीतूनही जिल्ह्याला सावरता आले. यापुढे पडणारा पाऊस, धरणातील पाणीसाठा, धरणातून पाणी सोडण्याचे नियोजन, नदीकाठच्या लोकांना सावधानतेचा इशारा आणि पूरग्रस्तांसाठी बचाव व मदत कार्य याचे नियोजन सुध्दा केले आहे. याबरोबरच कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये योग्य समन्वय ठेऊन अलमट्टी धरणातील पाणीसाठा आणि विसर्ग यावर अधिक लक्ष देण्यात येत आहे. संभाव्य पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहे. 
पूर परिस्थिती उद्भवल्यास एनडीआरएफच्या 4 पथकांसह स्वयंसेवी संस्थांची पथकेही तैनात आहेत. यात  जवळपास 808 स्वयंसेवक आहेत. 51 रबर बोट, 700 लाईफ जॅकेट, 400 लाईफ रींग, 18 आस्का लाईट उपलब्ध आहेत. पुढारी रिलिफ फौंडेशनतर्फे दोन यांत्रिकी बोटी महापालिकेला नुकत्याच प्रदान करण्यात आल्या आहेत. यापूर्वीही पाच यांत्रिकी बोटी जिल्हा प्रशासनाला प्रदान करण्यात आल्या आहेत, असेही पालकमंत्री म्हणाले. 
  जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत यंदा जिल्ह्यास सर्वसाधारण वार्षिक योजनेसाठी 330 कोटीची तर अनुसूचित जाती उपयोजनेसाठी 130 कोटीचा विकास आराखडा मंजूर करण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वर्ष 2019-20 साठी 13 कोटी 17 लाख तर चालू वर्षी 13 कोटी 25 लाख तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये अधिकाधिक निधी उपलब्ध करून घेण्याचा माझा प्रयत्न राहील. 
      

छ. शिवाजी महाराज, राजर्षी शाहू, म. फुले,
 डॉ. आंबेडकर यांच्या विचारावर शासनाची वाटचाल

   छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, म. जोतीराव फुले, भारतरत्न 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर शासनाची  वाटचाल सुरू आहे, असे सांगून पालकमंत्री म्हणाले,  महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील 43 हजार 965 शेतकऱ्यांच्या खात्यावर 262 कोटी रक्कम वर्ग करण्यात आली आहे. उर्वरित पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यास शासन वचनबध्द आहे. यासाठी शेतकऱ्यांनी  आपला  आधार  क्रमांक  बँकेच्या कर्ज खात्याशी संलग्न करुन त्यांचे प्रमाणिकरण करणे गरजेचे आहे. या योजनेमुळे प्रती शेतकरी दोन लाखांपर्यतची कर्जमुक्तीची रक्कम राज्य शासन शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात थेट जमा करत आहे. राष्ट्रीयकृत बँका, व्यापारी बॅंका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, ग्रामीण बँका, विविध कार्यकारी सहकारी संस्थाकडून शेतकऱ्यांनी घेतलेले पीककर्ज "महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने" तून माफ केले जात आहे. तसेच जे शेतकरी अल्पमुदत पीक कर्जाची नियमितपणे परतफेड करीत असतात, अशा शेतकऱ्यांनाही प्रोत्साहन देण्याचा शासनाचा मानस आहे. 
  दहा रुपयात शिवभोजन थाळी योजना आघाडी शासनाने सुरु केली आहे. शिवभोजन थाळी या महत्वाकांक्षी योजनेचा लाभ जिल्ह्यातील हजारो गरजू लोकांना होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने केवळ पाच रुपयात शिवभोजन थाळी योजना राबवून अडचणीत सापडलेल्या गरजूंना पोटभर जेवण उपलब्ध करुन दिले आहे. जिल्ह्यात 34 ठिकाणी ही योजना सुरु असून आतापर्यंत 4 लाख 21 हजार 477 लाभार्थ्यांना याचा लाभ झाला आहे. 
  गुन्हे नियंत्रण व कायदा सुव्यवस्थेबरोबरच ग्रामपंचायत हद्दीत होणारे अतिक्रमण रोखण्यासाठी सीसीटीव्ही कंट्रोल रुमचा वापर उपयुक्त असल्याने पाचगाव, मोरेवाडी व कळंबा या ग्रामपंचायतींसाठी पोलीस विभागाच्या माध्यमातून व जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीतून 1 कोटी 9 लाख 15 हजार इतका निधी खर्च करुन सीसीटीव्ही कंट्रोल रुम पाचगांव येथे कार्यान्वित करण्यात आली आहे. या माध्यमातून या तीन गावातील 63 ठिकाणी 147 कॅमेरे बसविण्यात आले आहेत, असे सांगून पोलीस शौर्य पदक मिळालेल्या अधिकारी व जवान अशा 14 जणांचे त्यांनी अभिनंदन केले. 
 नुकत्याच जाहीर झालेल्या यूपीएससी परीक्षेमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील चार गुणवंत विद्यार्थ्यांनी यश मिळवून कोल्हापूरचा नावलौकीक वाढविला आहे. नेर्ली गावच्या डॉ. प्रणोती संकपाळ, राजारामपुरी येथील गौरी पुजारी-किल्लेदार, जवाहरनगर येथील सौरभ व्हटकर आणि पन्हाळा तालुक्यातील किसरुळ येथील अजय कुंभार या गुणवंतांच्या हातून कोल्हापूरच्या परंपरेला साजेशी कामगिरी नक्की होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 
 आपल्या सर्वांना आनंद देणारा गणेशोत्सव पुढील आठवड्यात साजरा होणार आहे. आपण सर्वांनी उत्साहाने गणेशोत्सव साजरा करावा. पण सोशल डिस्टंसिंग तसेच स्वत:च्या आणि कुटूंबाच्या सुरक्षेची काळजी घ्यावी. तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गणेशोत्सवात प्लाझमा दान सारखे उपक्रम राबवून कोरोना बाधित रुग्णांना बरे करण्यासाठी सहकार्य करावे. मोहरमच्या उत्सवात सुध्दा सर्वांनी आपली काळजी घ्यावी, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी केले. 

आज आपण सर्वजण स्वातंत्र्याचा आनंद घेत आहोत. हे स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांच्या प्रती तुम्हा आम्हा सर्वांनाच नितांत आदर आहे. जिल्हयातील शहीद जवानांच्या तसेच स्वातंत्र्य सैनिकांच्या, क्रांतिकारकांच्या प्रती सर्वांनीच उतराई होणे अगत्याचे आहे. आपणा सर्वांच्या सहकार्यातून कोरोनावर मात करण्याची शक्ती तुम्हा-आम्हा सर्वांना मिळो आणि कोरोनाचे संकट लवकरच दूर होवो, ही  आशा व्यक्त करतानाच कोव्हिड -19 मुळे मृत्यूमुखी पडलेल्या रूग्णांना त्यांनी आदरांजली वाहिली.सायकलींगमध्ये डॉक्टरेट ऑफ ॲथलेटिक्स ही मानाची पदवी मिळाल्याबद्दल अथर्व गोंधळी याचा यावेळी सत्कार करण्यात आला.  
कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे, अप्पर पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे, जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके, उपजिल्हाधिकारी स्मिता कुलकर्णी, संजय शिंदे, श्रावण क्षीरसागर, प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टिव्हन अल्वारिस आदी उपस्थित होते.
अव्वल कारकून नलिनी मोहिते यांनी सूत्रसंचालन केले.


अनंतशांती बहूऊद्देशीय संस्थेच्या वतीने कोविड योद्धांचा सन्मान..

कंदलगाव ता. १४ 
     अनंतशांती बहूऊद्देशीय संस्थेच्या वतीने छत्रपती प्रमिलाराजे रूग्णालयातील आधिपारिचारिका,परिचारिकांना कोविङ योद्धा'ने  सन्मानित करण्यात  आले.हा सोहळा व्हीनस काॅर्नर जवळील  वसंत रूत्तू हाॅलच्या सभागूहात पार पडला.   
   समाजातील भेदभाव संपविणाऱ्या कोरोना काळात अनेक स्तरातुन उच्चनिच भेदभाव न करता समाजसेवेसाठीअनेक मदतीचे हात पुढे आले.या प्रेरणेने गेली आठ वर्ष पाचशे हुन आधिक समाजिक उपक्रम राबिवलेल्या अनंतशांती संस्थेमार्फत कोरोना काळत एक लाख अर्सनिक अल्बम ३०ड्रम चे वितरण ग्रामिण डोगराळ दुर्गम भागात करण्यात आले. पन्नास हजार माहिती पञकाचे वितरण करुन कोरोणा विषयी जनजागृती केली तसेच वीस हजार मास्कचे मोफत वाटप  करण्यात आले. वाटसरुसाठी   एक हजार फुड पँकेटचे वितरण केले. जिल्हातील पाचशेहुन आधिक ग्रामपंचायतना आँनलाईन कोरोना योध्दा प्रमाणपञाचे वितरण केले आहे.                
     सामाजीक उपक्रम दोनशे हून आधिक राबविले आहेत व दिडशे शैक्षणिक उपक्रम वाडी वस्तीतील लोकासाठी राबविले आहेत.     महापुराच्या काळात विविध ठिकाणी शंभर हुन अधिक आरोग्य शिबीरे राबविली,पन्नास हजार रोपट्याचे वितरण व पाच हजार वृक्षाचे यशस्वी जतन केले आहे. कोरोणा काळात निस्वार्थी भावानेने मानव सेवा हिच ईश्वर सेवा या प्रेरणेने आपल्या व आपल्या कुटुंबाची जिवाची पर्वा न करता चोविस तास छञपती प्रमिला राजे रुग्णायला अंतर्गत रुग्णाची काळजी घेणे रुग्णाचे व नातेवाईकाचे समुपदेशन करणे रुग्णसेवेत कार्यरत असणाऱ्या व   कोरोणा काळात काम केलेल्या आधिपरिचारिका, परिचारिका यांच्या कामाचा आढावा घेवुन   याचा संस्थापक भगवान गुरव यांच्या मार्गदर्शना खाली  अनंतशाती कोरोणा योध्दा पुरस्कार ने वितरण करण्यात आले .या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे येथील यशोदा संस्थेच्या व्याख्याती राणी पाटील होत्या.यावेळी संस्थेच्या अध्यक्षा माधुरी खोत यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला .यावेळी भगवान गुरव, अरुणा पाटील, लता जाधव,स्नेहलता जाधव, किरण लोकरे, प्रशांत पाटील, नारायण चिले,महेंद्र पाडंव, फिरंगोजी शिदे संस्थेचे वस्ताद प्रमोद पाटील यावेळी  उपस्थित होते.यावेळी प्रार्थना शेलार, मनुजा रेणके, अंजली देवरकर, मानसी मुळे,विमल कलकुटकी, निला नबोदरी,ज्योती मोकाशी , ज्योस्ना पाटील ,राखी साळोखे, सुवर्णा लोखंडे ,ज्योती दळे, संगीता आळतेकर ,अपुर्वा किर्तने, दिपा सुर्यवंशी,आसिफा पटवेगार, पुष्पा राजमाने,शितल शेटे , सविता होवाळ,राजश्री चिदंगे, अलका गायकवाड, ज्योती मोकाशी,ज्योती आडारकर 
आदीसह ३० परीचारिकांना पुरस्कार देवुन सन्मानीत करण्यात आले. संस्थेच्या सचिव अरुणा पाटील यानी सुञसंचालन केले.

फोटो  - कोवीड काळात काम करणाऱ्या अधिपरिचारीका व परिचारीकांचा 'कोवीड योध्दा ' म्हणून सन्मान करताना संस्थेचे पदाधिकारी अरूणा पाटील, भगवान गुरव यांचे सह इतर मान्यवर .

रत्नाप्पा कुंभार हायस्कूलच्या वतीने कोरोना योद्धांचा सत्कार ..

कंदलगाव ता. १५ ,
    आर.के.नगर येथील दे.भ. रत्नाप्पा कुंभार हायस्कूल मध्ये चार महिन्यापासून आपल्या जीवाची पर्वा न करता परिसरातील व परिसरा बाहेरील कोरोना रूग्ण,कॉरन्टाईन व्यक्ति यांच्या सेवेसाठी अहोरात्र झटणाऱ्या जीवन ज्योती रेस्क्यूच्या जवानांचा कोरोना योद्धा म्हणून सत्कार करण्यात आला.
    अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव डॉ.सतिश घाळी होते. महादेव पोवार, व्ही.एम.महाजन, डॉ. सचिन आजगेकर, मुख्याध्यापक आर.बी.पाटील, पर्यवेक्षक बी.वाय.परकाळे यांचे सह सर्व शिक्षक उपस्थित होते.
     १५ ऑगष्ट निमित्त्य ठेवलेल्या या कार्यक्रमात संदिप गायकवाड, सुनिल जाधव,विनायक लांडगे, निहारिका राऊत, स्नेहल वड्ड, रामकुमार शर्मा, प्रांजल गायकवाड, श्रृती गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला.

फोटो  -रत्नाप्पा कुंभार हायस्कूल येथे कोरोना योध्दा सत्कारा वेळी हायस्कूलचे सचिव डॉ. सतिश घाळी, आर.बी. पाटील व इतर .
( छायाचित्र - प्रकाश पाटील )

जि प. मैदान येथे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न

**. 

उदगीर  प्रतिनिधी:-गणेश मुंडे
भारतीय स्वातंत्र्य दिनाचा  73 वा वर्धापन दिन समारंभ लातूर जिल्हा परिषदेमध्ये सोशल डिस्टन्सचे  नियम  पाळून साजरा करण्यात आला. या वेळी लातूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री राहुल केंद्रे यांच्या हस्ते लातूर जिल्हा परिषदेच्या प्रांगणामध्ये ध्वजारोहण करण्यात आले.आज दिनांक 15 ऑगस्ट 2020 रोजी स्वातंत्र दिनाच्या 73 व्या वर्धापन दिनाचा समारंभ लातूर जिल्हा परिषदेमध्ये साजरा करण्यात आला यावेळी जिल्हा परिषदेतील सर्व पदाधिकारी,सन्माननीय सदस्य,  अधिकारी,कर्मचारी व लातूर जिल्ह्यातील नागरिक,शेतकरी  यांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी दिल्या.यावेळी लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष मा.भारत बाई सोळंके मॅडम,कृषी सभापती गोविंदराव चिलकुरे,समाज कल्याण सभापती रोहिदास वाघमारे,स्थ्यायी समिती सदस्य संतोष वाघमारे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी,उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रभू जाधव,आदींसह सर्व विभागांचे विभाग प्रमुख,यावेळी उपस्थित होते.

Friday, 14 August 2020

उद्योजक आणि औद्योगिक संघटनाकडून प्रशासनाला व्हेंटिलेटर्स प्रदान


हेरले / प्रतिनिधी
प्रशांत तोडकर

: कोल्हापूर जिल्हयात कोरोना बाधीतांची वाढती रूग्नसंख्या आणि पाॅझिटीव्ह रूग्नांना वेळेत उपचार करून त्यांचा जीव वाचविण्यासाठी उद्योजक आणि औद्योगिक संघटनाकडून प्रशासनाला व्हेंटिलेटर्स प्रदान करण्यात आले. उद्योजक आणि औद्योगिक संघटनाकडून एकूण २० व्हेंटिलेटर्स देण्याचा निर्णय घेतला आहे.  यापैकी आज पहिले तीन व्हेंटिलेटर्स मे. शिरगावकर ग्रुप आॅफ इंडिस्ट्ज, मे. घाटगे-पाटील ग्रुप आॅफ इंडस्ट्जि आणि कोल्हापूर उद्यम को. आॅप सोसायटी यांच्यावतीने पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. 
जिल्हा प्रशासनास मदत आणि आरोग्य यंत्रेणेवरील ताण कमी करण्यासाठी उद्योजक आणि औद्योगिक संघटनांकडे व्हेंटिलेटर्स देण्याची मागणी केली होती.  कोल्हापूरातील कोरोना बाधीत रूग्नांवर वेळेत उपचार करण्यासाठी डाॅक्टर्स, प्रशासन आणि पोलिस यंत्रणेबरोबरच कोव्हीड योध्ये होण्यामध्ये उद्योजक आणि औद्योगिक संघटनांनीही पुढाकार घेतला आहे.  
उर्वरित सतरा व्हेंटिलेटर्सही लवकरच देण्यात येणार आहेत असा विश्वास गोकूळ शिरगाव मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष सचिन शिरगावकर यांनी व्यक्त केला.  दानशूर कोल्हापूरकरांची परंपरा सांभाळत उद्योजकांनीही प्रशासनाला मदतीचा हात दिला आहे असे गौरवोद्गार मंत्री सतेज पाटील यांनी यावेळी व्यक्त केले. या व्हेंटिलेटर्स मुळे अत्यावश्यक रूग्नांवर वेळेत उपचार करणे शक्य होणार आहे.  कोरानामुळे कोल्हापूरातील वाढत असलेला मृत्यु दर कमी करण्यासाठी याची खुप मदत होईल. 
यावेळी आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋतुराज पाटील, आमदार प्रकाश आबीटकर, महापौर सौ. निलोफर आजरेकर, आयुक्त मल्लीनाथ कलशेट्टी, उद्योजक सचिन शिरगावकर, सोहन शिरगावकर,  अतुल पाटील, चंद्रकांत चोरगे, नितीन वाडीकर, दिनेश बुधले, अशोक जाधव, संगीता नलवडे आदी उपस्थित होते.
.
फोटो
कोल्हापूर : उद्योजक आणि औद्योगिक संघटनाकडून पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे व्हेंटिलेटर्स प्रदान करताना उद्योजक सचिन शिरगावकर, शेजारी आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋतुराज पाटील, आमदार प्रकाश आबीटकर, महापौर सौ. निलोफर आजरेकर, आयुक्त मल्लीनाथ कलशेट्टी आदी
.

उदगीर च्या शैक्षणिक समृद्धीचा वारसा बिर्ला स्कुल पुढे चालवेल- जि.प.अध्यक्ष राहुल केंद्रे

*
उदगीर प्रतिनिधी:- गणेश मुंडे 

उदगीर ही शिक्षणाची पंढरी असून या शैक्षणिक पंढरीचा समृद्ध वारसा बिर्ला स्कुलच्या माध्यमातून पुढे चालविला जात असल्याचे  प्रतिपादन जि.प.अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी केले. 
गुणाई शिक्षण प्रसारक मंडळाच्या तालुकास्तरावरील देशातील पहिल्या शाळेच्या प्रारंभप्रसंगी ते बोलत होते.अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी जी,श्रीकांत होते.प्रतिकूल परिस्थितीत गुणाई शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून बापूराव राठोड यांनी केलेली शैक्षणिक क्षेत्रातील प्रगती कौतुकास्पद असल्याचे केंद्रे पुढे बोलताना म्हणाले.मार्कवान विद्यार्थी निर्माण करणे हे शिक्षणव्यवस्थेपुढचे आव्हान नसून सामाजिक भावना निर्माण करणे हे आव्हान आहे,मातीला व मातृभूमीला जोडून ठेवणारा विद्यार्थी बिर्ला ओपन माईंडस मधून घडावा अशी अपेक्षा जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी व्यक्त केली.जिल्हा परिषद,उपाध्यक्ष सौ.भारतबाई साळुंके,जि.प.चे सभापती गोविंदराव चिलकुरे, समाजकल्याण सभापती रोहीदास वाघमारे,बाबासाहेब घुले,चेअरमन दगडू साळुंखे, गोदावरी विकास महामंडळाचे माजी उपाध्यक्ष प्रा.नागनाथ निडवदे,जि.प.चे माजी उपाध्यक्ष रामचंद्र तिरूके,अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ.अरविंद लोखंडे,उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी,तहसिलदार व्यंकटेश मुंढे,संस्थेचे अध्यक्ष बापूराव राठोड आदी व्यासपिठावर उपस्थित होते.
    प्रारंभ श्री गणेशाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.बापूसाहेब राठोड,सौ.ज्योतीताई राठोड,दिगंबर राठोड,शाळेचे संचालक रमेश अंबरखाने,चंद्रकांत पाटील कौळखडकर,डॉ.माधव चंबुले आदींनी उपस्थितांचे स्वागत केले.संस्थेचे सचिव अमित राठोड यांनी कार्यक्रमाचे प्रास्तविक केले.सामाजिक भावना जागृत असणारा,कौटुंबिक मुल्ये जपणारा व जातीपातीच्या पलीकडे जाऊन विचार करणारा विद्यार्थी निर्माण करावा असे आवाहन जी.श्रीकांत यांनी पुढे बोलताना केले.शाळांच्या वर्गखोल्यांएवढीच मैदाने बळकट व्हावीत अशी अपेक्षा त्यांनी पुढे बोलताना व्यक्त केली.प्राचार्य श्रीमती पांडे यांनी मनोगत व्यक्त केले.प्रा.आश्विनी निवर्गी व धनंजय गुडसूरकर यांनी सुत्रसंचालन केले तर बापूराव राठोड यांनी आभार मानले.समाजकल्याण विभागाचे सहआयुक्त बाबासाहेब अरावत,समाजकलपाटील अधिकारी कमितकर,चंदरअण्णा वैजापूरे,पं.स,सभापती विजय पाटील आदी उपस्थित होते.

१०२ वर्षाची कोरोना बाधित महिलेने केली कोरोनावर मात - लाईफ केअर चे कार्य अभिमानास्पद - मुख्याधिकारी राठोड

उदगीर प्रतिनिधी गणेश मुंडे 

लाईफ केअर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर उदगीर येथून कोरोना बाधित १०२ वर्षाच्या महिलेने कोरोना या आजारावरती मात केली आहे खरोखर  ही अभिमानस्पद असल्याचे नगर पालिकेचे मुख्याधिकारी भारत राठोड यानी सांगितले.लाईफ केअर हॉस्पिटल येथे शुक्रवार दि १४ रोजी मुख्याधिकारी भारत राठोड यानी भेट देवून कोविड विभागासह हॉस्पिटल संपुर्ण हॉस्पिटल सुविधेची पहाणी केली.मा.आ.तथा लाईफ केअर चे चेअरमन सुधाकर भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली येथील रुग्णाची डॉक्टरांसह कर्मचारी घेत असलेली काळजी आणि करीत असलेल्या रुग्ण सेवेबद्दल समाधान व्यक्त केले. 
यावेळी लाईफ केअर हॉस्पिटल चे सी ओ ओ अमोल भालेराव यानी रुग्ना वरिल तातडीने उपचारासाठी कोरोना तपासणी साठी अँटीजेड कीट चा पुरवठा करण्यात यावा आणि गंभीर रुग्नासाठी व्हेन्टीलेटर्स ची उपलब्धता करुन द्यावी अशी मागणी केली, यावेळी वाढती रुग्ण संख्या आणि लाईफ केअर मधिल सर्व सुविधा पहाता अत्यावश्यक बाब म्हणून व्हेन्टीलेर्स आणि कीट पुरवठा करण्याबाबत पाठपुरावा करु असे सांगितले.यावेळी लाईफ केअरचे सी.ईओ अमोल भालेराव,मिलिंद घनपाठी,शिवकुमार वट्टमवार यांच्यासह लाईफ केअर चा कर्मचारी वर्ग उपस्थीत होते.

Thursday, 13 August 2020

पोलीस अधीक्षक श्रीमती ज्योती क्षीरसागर प्राचार्य, पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची - तासगांव,सांगली यांना केंद्रिय गृहमंत्री विशेष पदक जाहीर

हातकणंगले / प्रतिनिधी
मिलींद बारवडे

   पोलीस अधीक्षक श्रीमती ज्योती क्षीरसागर प्राचार्य, पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची - तासगांव,सांगली यांना केंद्रिय गृहमंत्री विशेष पदक जाहीर झाले आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभुमीवर हे केंद्रिय गृहमंत्री विशेष पदक त्यांना जाहीर केले आहे. अशी माहिती त्यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे प्रसिध्दीस दिली आहे.
      सन २०११ मध्ये बीड जिल्हयातील आष्टी पोलीस ठाणे हद्दितील केरुळ या गावी ग्रामपंचायत निवडणुकीच्या कारणावरुन अतिशय संवेदनशिल खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. यामध्ये बाळू ऊर्फ रविंद्र खाकाल यांचा तलवारीने वार करुन खुन केला होता. खाकाल यांच्यावर एकूण २९ वार केले
होते. यावरुन आष्टी पोलीस ठाण्यात गु.र.नं. १४९/११ भा.द.वि. कलम १४७, १४८, १०९, २१२, २०१,
३०७, १२० (ब), ३०२ अन्वये गुन्हा दाखल होता,सदरच्या गुन्हयाचे स्वरुप गंभीर व संवेदनशिल असल्याने तात्कालिन उपविभागीय पोलीस
अधिकारी गेवराई श्रीमती ज्योती क्षीरसागर यांना सदरच्या गुन्हयाचा तपास वर्ग करण्यात आला,जिल्हयाची कायदा व सुव्यवस्था व सदरचा गुन्हा हा देखील अतिशय क्लिष्ट व किचकट असताना
सुध्दा त्यांनी त्यांच्या तांत्रिक कौशल्याचा आधार घेउन यातील १७ आरोपींना अटक करुन,त्यांच्याविरुध्द परिस्थितीजन्य आणि वैज्ञानिक सबळ पुरावा जमा करुन त्यांच्याविरोधात मुदतीत दोषारोपपत्र अतिरीक्त सत्र न्यायालय बीड यांच्या न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
      २०१२ ते २०१९ या कालावधीच्या न्यायालयीन सुनावणीअंती न्यायालयाने आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.त्यांनी राजकीय दृष्टया अतिशय संवेदनशिल गुन्हयाचा कौशल्याने तपास करुन हा गुन्हा उघडकीस आणून आरोपींना शिक्षा मिळवून दिली. त्यांनी यापुर्वी अनेक गंभीर गुन्हयांचा तपास केलाअसल्याने त्यांना केंद्र शासनाच्या केंद्रीय गृहमंत्री यांचे उत्कृष्ट अन्वेषण व अपराध सिध्दीबाबतचे
पदक (UNION HOME MINISTERS MEDAL FOR EXCELLENCE IN
INVESTIGATION) जाहीर झाले आहे.
       पोलीस अधिक्षक ज्योती क्षीरसागर या कोल्हापूर जिल्हयातील हातकणंगले तालुक्यातील वाठार तर्फ वडगाव या गावच्या कन्या असून,त्यांनी यापूर्वी नगर, बीड, सी.आय.डी अशा विविध ठिकाणी उत्कृष्टरित्या सेवा बजावलेली आहे. सध्या
त्या पोलीस प्रशिक्षणकेंद्र,तुरची-तासगांव, सांगली या ठिकाणी प्राचार्य या पदावर कार्यरत आहेत.

Wednesday, 12 August 2020

वाढदिवसानिमित्त मूर्तिकार, कारागिराना फळे वाटप ; प्रहार चित्रपट संघटनेतर्फे सत्कार


हेरले /प्रतिनिधी 
दि.१२/८/२०
  अखिल भारतीय प्रहार चित्रपट संघटनेचे राज्याध्यक्ष संदीप मोहिते यांच्या वाढदिवसानिमित्त  कावळा नाका ते शिरोली परिसरातील मूर्तिकार, कारागीर उद्योजकांना फळे वाटप करण्यात आले,  ऐन पावसाळ्यात व कोरोनाच्या संकटकाळात छोटे उद्योजक व कारागीर यांची भेट घेऊन संदीप मोहिते पाटील यांनी वाढदिवसानिमित्त  फळे वाटप करून त्यांचे आशीर्वाद घेतले.
        शिरोली येथे राज्यमंत्री नाम. बच्चुभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखालील प्रहार चित्रपट संघटनेचे राज्याध्यक्ष,  चित्रपट निर्माते ,लेखक संदीप मोहिते - पाटील यांचा वाढदिवसानिमित्त चित्रपट नाट्य कलाकार दगडू माने यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला,
       यावेळी प्रहार चित्रपट संघटनेचे कोल्हापूर जिल्हा संघटक दगडू माने,  सिने-नाट्य कलाकार राजेंद्र प्रधान,  कलाकार डी वाय माळी , नीरज कलावंत, सागर डपाले आदी पदाधिकारी उपस्थित होते.

        फोटो 
मुर्तिकार कारागीरींना फळे वाटप करतांना संदिप मोहिते दगडू माने व अन्य मान्यवर.

Tuesday, 11 August 2020

कोरोनारुपी संकटावर मात करण्यासाठी विरशैव लिंगायत गवळी समाजातर्फे साकडे


                              

नंदुरबार  - ( प्रतिनिधी - वैभव करवंदकर ) 

       कुटुंबांसह समाज आणि जगाला कोरोनारुपी संकटातून बाहेर पडण्यासाठी पवित्र श्रावण महिन्यात परम  पूज्य बालब्रह्मचारी सिदाजी आप्पा देवर्षी यांना विरशैव लिंगायत गवळी समाजातर्फे साकडे घालण्यात आले आहे. अशी माहिती नंदुरबार गवळी समाज महासंघाचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष महादू हिरणवाळे  यांनी दिली.                                           कोरोनामुळे यंदा  महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील दोन्ही ठिकाणी होणारे उत्सव यंदा रद्द करण्यात आले आहेत. मात्र असे असले तरी  संपूर्ण  प्रतिवर्षी श्रावण महिन्यात अखिल भारतातील वीरशैव लिंगायात गवळी समाजाचे आराध्य दैवत म्हणून परिचित असलेले परमपूज्य बालब्रम्हचारी सिदाजीआप्पा देवर्षी यांच्या चरणी अवघा समाज लीन होतो. दरवर्षी  श्रावण महिन्यातल्या तिसऱ्या सोमवारी महाराष्ट्रातील नगर आणि बीड जिल्ह्याच्या  सीमेवर असलेल्या सावरगाव तीर्थक्षेत्री आणि चौथ्या सोमवारी बिजेच्या दिवशी  कर्नाटक राज्यातील बिदर जिल्ह्यातील चीटगुप्पा  या ठिकाणी   गवळी समाज बांधव मोठ्या भक्तिभावाने येत असतात. यंदा मात्र कोरोनाने  सर्व भाविकांच्या आनंद उत्सवावर विरजण पडले आहे. दोन्ही ठिकाणी होणारे उत्सव यंदा रद्द करण्यात आले आहेत.  श्रावण महिन्यात नंदुरबारसह धुळे, जळगाव जिल्ह्य़ातील भाविक  सिदाजीआप्पा देवर्षी यांच्या आरती निमित्त घरोघरी पूजन आणि महाप्रसाद भंडाऱ्याचा लाभ घेत आहेत.  शासनाच्या  नियमानुसार  सोशल डिस्टंसिंगचे भान ठेवून घरगुती स्वरूपात धार्मिक कार्यक्रम केले जातात.   नंदुरबार जिल्ह्यातील प्रसिद्ध तोरणमाळ येथील सातपुडा पर्वतरांगेत सिदाजीआप्पा देवर्षी यांनी बारा वर्ष तपस्या केल्याची नोंद आढळून येते. कोरोनारुपी संकटातून बाहेर पडण्यासाठी पवित्र श्रावण महिन्यात परम  पूज्य बालब्रह्मचारी सिदाजी आप्पा देवर्षी यांना गवळी समाजातर्फे साकडे घालण्यात आले आहे. अशी माहिती नंदुरबार गवळी समाज महासंघाचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष महादू हिरणवाळे  यांनी दिली.

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे अन्नत्याग आंदोलन

उदगीर प्रतिनिधी गणेश मुंडे 

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद उदगीर तालुका अध्यक्ष तातेराव मुंडे  व पदाधिकारी यांनीअन्नत्याग आंदोलन केले.
*शासनाने 10 जुलै रोजी अधिसूचना काढून शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांना मिळणारी पेन्शन आणि भविष्य निर्वाह निधीचा अधिकार काढून घेतला आहे .ही अधिसूचना रद्द करावी यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद 10 ऑगस्टपासून तिसऱ्या टप्प्यातील राज्यव्यापी आंदोलनास सज्ज झाली आहे .या *घरी राहूनअन्नत्याग  आंदोलनात* 
 शालेय शिक्षण विभागात सेवे पश्चात मिळणारी पेन्शन कायमस्वरूपी नाकारली  जाणार आहे .पण महाराष्ट्र खाजगी शाळा सेवाशर्ती  अधिनियम 1977 चे कलम 4(1 )कलम 16( 2अ )मधील तरतुदीनुसार पूर्वलक्षी प्रभावाने 2005 पासून शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांची पेन्शन काढून घेता येणार नाही राज्य शिक्षक परिषदेच्या राज्य कार्यकारिणीच्या घेण्यात आलेल्या ऑनलाईन  सभेत या सुधारणेचा तीव्र निषेध व्यक्त करून तीन टप्प्यात आंदोलन करण्याचा निर्णय घेतला .त्यानुसार दोन टप्प्यात आंदोलन झाले .
याबाबत राज्य सरकारने कोणत्याही प्रकारचा निर्णय न घेतल्याने शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष वेणुनाथ कडू, महिला आघाडी प्रमुख पूजाताई चौधरी, कार्यवाह नरेंद्र वातकर ,यांच्यासह शिक्षक आमदार नागो गाणार, माजी आमदार भगवानराव साळुंखे आदि तिसऱ्या टप्प्यातील आंदोलनाचे नेतृत्व करणार असल्याचे शिक्षक परिषदेचे मच्छिंद्र गुरमे यांनी सांगितले.   9 ऑगस्ट पर्यंत सरकारने अधिसूचना रद्द करावी अन्यथा 10 ऑगस्टपासून राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा शिक्षक परिषदेने दिला आहे .या आंदोलनात जिल्हा अध्यक्ष मच्छिंद्र गुरमे, राजाराम खंदाडे, वनिता काळे, उदगीर तालुकाध्यक्ष तातेराव मुंडे रजनी जोशी उदगीर तालुका उपाध्यक्ष अतुल गुरमे 
कांचनकुमार केंद्रे बस्वराज पाटील सर मंगेश सरदार दत्ता गुनाले किरण धोंडगे विजयकुमार मुंढे सदाशिव खुडे सुशील कुलकर्णी बालाजी पडलवार महिला आघाडी प्रमुख वैशाली मुस्कावाड लक्ष्मण बेंबडे गौरव येवळीकर आदी पदाधिकाऱ्यांनी अन्नत्याग करून आंदोलनात सहभाग घेतला

Monday, 10 August 2020

चोकाकच्या ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी महावीर सुकुमार पाटील यांची बिनविरोध निवड

हेरले / प्रतिनिधी
 दि १० /८ /२०

   हातकणंगले तालुक्यातील चोकाकच्या ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी महावीर सुकुमार पाटील यांची बिनविरोध निवड झाली.सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच मनीषा सचिन पाटील होत्या.
      चोकाकच्या ग्रामपंचायतीवर आघाडी नेते  सुकुमार बुकशेट,अविनाश बनगे, महादेव चव्हाण,बाळासो कदम ,यांच्या  जखुबाई देवी ग्रामविकास आघाडीची सत्ता आहे.आघाडी अंतर्गत ठरल्या प्रमाणे उपसरपंच पदाचा सुकुमार पाटील यांनी राजीनामा दिल्याने उपसरपंच पद रिक्त झाले होते.
       महावीर पाटील यांचा उपसरपंच पदासाठी एकच अर्ज दाखल झाल्याने ग्रामसेवक अनुपमा सिदनाळे यांनी त्यांची बिनविरोध निवड केली.या सभेस पोलीस पाटील सचिन कुंभार, ग्रामपंचायत सदस्य विजय ननवरे,विकास चव्हाण,योगेश चोकाककर,लता पाटील,मनीषा कुंभार,सुवर्णा सुतार,अर्चना हलसवडे,स्मिता सरदार,उज्वला जाधव उपस्थित होते.