Friday, 27 November 2020

कोडोली हायस्कूल येथील 1998 बॅच च्या विद्यार्थ्यांचा पाचवा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न!...

   कोडोली हायस्कूल मधून सन 1998 साली 10 वी नंतर पुढील शिक्षणासाठी इतरत्र विद्यार्थी गेले. तेव्हा मोबाईल सारख्या सुविधा उपलब्ध नव्हत्या. त्यामुळे इयत्ता दहावी पर्यंत सोबत असणारे लहानपणीचे मित्र संपर्कात राहणे अश्यक्य होते. यातच 15 ते 18 वर्षे निघून गेली. यातील जवळच असणारे काही मित्र एकमेकांच्या संपर्कात होते. पण उर्वरित मित्रांचे संपर्क हे रणजित घाटगे आणि प्रदीप जाधव यांनी शोधून काढायचे ठरवले आणि ते व्हॉटसअप, फेसबुक आदी मार्गांनी अत्यंत जिकिरीने मिळवले. पुढे त्यातूनच प्रत्यक्ष भेटण्याची आतुरता सर्वांना लागून राहिली. या संकल्पनेतून 2016 साली पहिला स्नेहमेळावा संपन्न झाला. यासाठी अमेरिकेत काम करत असताना मित्रांना भेटायचेच अशा निष्ठेने सुकुमार साळोखे, नाशिक हून नागेश मोहिते असे अनेक मित्र जे आज संपूर्ण भारत देशात आपापला व्यवसाय किंवा उद्योग, नोकरी, सामाजिक आणि राजकीय कार्य याच्या निमित्ताने दूर असले तरीही अनेक विद्यार्थी मित्र एकत्र आले. यानंतर दरवर्षी या स्नेहमेळाव्यात मित्र भेटू लागले, एकमेकांशी हितगुज साधू लागले. आणि याच हितगुजाचा मेळा घडवून आणण्यासाठी याही वर्षी रविवार दि. 15 नोव्हेंबर 2020 रोजी मोहरे ता. पन्हाळा येथील शेळके रिसॉर्ट व लॉन येथे निसर्गरम्य वातावरणात स्नेहमेळावा आयोजित केला होता. यानिमित्त उत्कृष्ठ असे घरगुती पद्धतीचे जेवणाचे नियोजन केले होते. यास पन्नास हून अधिक विद्यार्थी आले होते. कार्यक्रम संपन्न झाले नंतर आनंदाने एकमेकांचे आभार व्यक्त करत सर्वांनी निरोप घेतला.
      या कार्यक्रमासाठी प्रामुख्याने मच्छिंद्र पाटील, संतोष मोरे, भरत कडवेकर, दिपक गायकवाड, शिवाजी पाटील, धीरज जाधव, विक्रांत पाटील, महेंद्र बिळासकर, सचिन मेनकर, प्रवीण लोखंडे, संदिप काशिद आदींनी परिश्रम घेतले. प्रकाश शिणगारे व विजय महापुरे यांनी सर्वांची नोंदणी करून छान प्रकारे आर्थिक नियोजन केले.

दिपक शेटे यांची पुस्तके शालेयस्तरावर उपयुक्त - गृहराज्यमत्री शंभूराजे देसाई


हातकणंगले/ प्रतिनिधी

 दिपक शेटे यांची पुस्तके शालेय स्तरावर विद्यार्थ्यांना संजीवनी देणारे आहेत त्यांनी आपल्या पुस्तकात वापरलेले तंत्रज्ञान हे भविष्यातील पुस्तके निर्मितीस चालना व दिशा देणारे ठरणार आहे . दिपक शेटे यांनी आपली सर्व पुस्तके गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांना कोल्हापूर येथे भेट घेऊन त्यांना पुस्तके भेट दिली त्या प्रसंगी त्यांनी हे उद्गार काढले . 
     दिपक शेटे हे महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत . जिल्हाप्रमुख विजय देवणे  यांनी आपल्या मनोगतात दीपक शेटे यांनी पदवीधर व शिक्षक निवडणुकांमध्ये केलेले योगदानाचा उल्लेख केला व त्यांच्या शैक्षणिक कार्य शुभेच्छा दिल्या .
   दिपक शेटे हे गेली वीस वर्ष गणित अध्यापनाचे कार्य करत आहेत त्यांच्या शाळेचा दहावीचा गणित विषयाचा निकाल अत्यंत उत्कृष्टपणे दर वर्षी लागतो . त्यांनी गणिताची सात पुस्तके व दोन नाटके लिहिले आहेत . ते गणितात विविध उपक्रम राबवत असतात त्यांची उपक्रमशील शिक्षक म्हणून सुद्धा वेगळी ओळख आहे .  दहावीची गणित पुस्तक एका पानात  तयार करणारे तंत्रस्नेही म्हणून त्यांची ओळख आहे .त्यांनी अंकवेल , गणित मांडणीचे शुद्धलेखन , मॅथेमॅटिक्स रुलर्स अँण्ड फॉर्मुलाज, गणित कोश , एलईडी ,गणित नियम व सूत्रे, दहावीचे पुस्तके एका पानात अशी पुस्तके लिहिली आहे.त्यांनी किल्ली भूमितीची व रामानुजन जीवन अशी दोन नाटकेही लिहिली आहेत .महाराष्ट्र बुक रेकॉर्डमध्ये त्यांची नोंद आहे .त्यांना आजअखेर एक राष्ट्रीय व 18 इतर पुरस्कारांनी सन्मानित केले आहे .
    यावेळी  गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई , खासदार धैर्यशील माने , खासदार संजय मंडलिक , आम.प्रकाश आबिटकर , माजी आमदार उल्हास पाटील,जिल्हाप्रमुख विजय देवणे, मुरलीधर जाधव ,शिक्षक सेनेचे उपाध्यक्ष सतीश लोहार आदी मान्यवर उपस्थित होते .

      फोटो 
दिपक शेटे गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांना पुस्तके देताना.

Wednesday, 25 November 2020

हेरले येथील आदिनाथ नगरमध्ये जैन मंदिराच्या समोर सामाजिक सभागृहाचा पाया खुदाई शुभारंभ

हातकणंगले / प्रतिनिधी

हेरले ( ता. हातकणंगले ) येथील आदिनाथ नगरमध्ये जैन मंदिराच्या समोर सामाजिक सभागृहाचा पाया खुदाई शुभारंभ  संपन्न झाला. 
      आमदार राजूबाबा आवळे म्हणाले, पंचवीस पंधरा या फंडातून दहा लाखाचा फंड या सभागृहास दिला आहे. तसेच
 गावच्या विकासासाठी आमदार फंडातून  जास्तीत जास्त निधी देण्यासाठी प्रयत्नशील असेन. माजी सभापती राजेश पाटील म्हणाले मंदीर पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषद व ग्रामपंचायतीच्या फंडातून यथाशक्ती मदत करण्यासाठी प्रयत्नशील असेन असे मत व्यक्त केले. 
    ते सामाजिक सभागृहाच्या पायाखुदाई शुभारंभ सदिच्छा भेट प्रसंगी  बोलत होते. आमदार राजूबाबा आवळे यांच्या हस्ते पाया खुदाई शुभारंभ व भूमीपूजन करण्यात आले. याप्रसंगी सुरेश चौगुले यांनी कॉलनीमध्ये विकास कामाची मागणी केली.याप्रसंगी जवाहर साखर कारखाना संचालक आदगोंडा पाटील, उपसरपंच राहूल शेटे, पोलीस पाटील नयन पाटील, राजू कचरे ,ए बी चौगुले, अमोल पाटील आदी मान्यवरासह जैन समाजाचे बांधव उपस्थित होते.
         फोटो 
हेरले येथील आदिनाथ नगरमध्ये सामाजिक सभागृहाचा पाया खुदाई शुभारंभ करतांना आम. राजूबाबा आवळे माजी सभापती राजेश पाटील संचालक आदगोंडा पाटील व इतर मान्यवर.

Sunday, 22 November 2020

हेरले येथे रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा

हेरले / प्रतिनिधी
दि.22/11/20
हेरले (ता. हातकणंगले) येथील विराचार्य सेवाभावी संस्थेच्यावतीने गावातील   रुग्णांची  रुग्णवाहिके अभावी होणारी हेळसांड थांबावी.त्याचा फायदा गोरगरीब रुग्णांना व्हावा या हेतूने रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा माजी सभापती राजेश पाटील व जवाहर संचालक आदगोंडा पाटील यांच्या हस्ते येथील झेंडा चौक याठिकाणी सपंन्न झाला.
    यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करून विराचार्य सेवाभावी संस्थेचे विशेष  कौतुक केले.
    यावेळी सुहास कोरेगावे,माजी उपसभापती अशोक मुंडे,डॉ प्रविण चौगुले, जिंनगोंड पाटील,अरविंद चौगुले,प्रकाश चौगुले  ,शरद आलमान , प्रकाश पाटील,सतीश पाटील,बापू कोरेगावे,विशाल पाटील,अमित इंगळे,रावासो माने,कार्तिक कोळेकर व गावातील नागरिक उपस्थित होते.

फोटो 
:हेरले: येथे विराचार्य सेवाभावी संस्थेच्यावतीने रुग्णवाहिकेचे लोकार्पण करत असताना माजी सभापती राजेश पाटील,जवाहर संचालक आदगोंडा पाटील,जिंनगोंडा पाटील व आदी मान्यवर.

Saturday, 21 November 2020

२६ नोव्हेंबरच्या देशव्यापी संपात जिल्ह्यातील सर्व शाळा सहभागी होणार जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाचा निर्णय : एस डी लाड

कोल्हापूर / प्रतिनिधी
दि.२१/११/२०
  सद्याचे केंद्र सरकार शेतकरी कामगार व शिक्षण विरोधात असल्याने २६ नोव्हेंबर  रोजी होणाऱ्या देशव्यापी संपात सहभागी होण्याचा निर्णय कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या बैठकीत निर्णय झाला. ही सभा मुख्याध्यापक संघाच्या सभागृहामध्ये आयोजित केली होती. सभेच्या अध्यक्षस्थानी एस.डी. लाड होते.
       संविधान दिना दिवशी होणारा संप संविधान वाचविण्यासाठी असून तसेच केंद्र सरकार शेतकरी कामगार व शिक्षण कायदयांच्या विरोधात आहे. नविन शैक्षणिक धोरणाला विरोध करण्यासाठी कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाने या संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. संपा दिवशी संस्थाचालक मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी सकाळी ११ वाजता संग्राम उदयान (टाऊन हॉल )या ठिकाणी जमावे असे आवाहन एस डी लाड यांनी केले.
      या सभेस शिक्षण संस्थाचालक संघ अध्यक्ष वसंतराव देशमुख, अध्यक्ष सुरेश संकपाळ , सचिव दत्ता पाटील, भरत रसाळे, प्रा.सी एम गायकवाड, सुधाकर निर्मळे, प्राचार्य प्रभाकर हेरवाडे,  संतोष आयरे, सुधाकर सावंत, राजेश वरक, आर.डी. पाटील, प्रा.एन. आर. भोसले, मिलींद पांगिरेकर, इरफान अन्सारी, जगदीश शिर्के, आर एस बरगे आदीसह शिक्षक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
      फोटो 
जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या बैठकीत बोलतांना अध्यक्ष एस डी लाड सचिव दत्ता पाटील वसंतराव देशमुख सुरेश संकपाळ  भरत रसाळे व अन्य मान्यवर

अतिग्रे डेडिकेटेड कोविड सेंटर ठरले गोर- गरीब जनतेचा आधारवड

हेरले/ प्रतिनिधी

  हातकणंगले तालुक्यातील अतिग्रे येथील डेडिकेटेड कोविड-१९ हेल्थ सेंटर एसजीयु मध्ये ७ हजार ४३९ नॉनकोविड सह उपचारासाठी रूग्ण दाखल होते, त्यापैकी ३८५० रूग्ण पॉझिटिव्ह होते त्यांच्यावर उपचार होऊन कोरोनामुक्त झाले तर ५४ जणांचा मृत्यू झाला.११ एप्रिलपासून हे कोविड सेंटर सुरू असून या सेंटरचे प्रमुख सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.उत्तम मदने सव्वासात महिने वास्तव्यास असून आहोरात्र सेवा देत कोरोना योद्धा म्हणून सेवा बजावत आहेत. त्यांच्या या अतुलनिय सेवेमुळे हातकणंगले तालुक्यास हे कोविड सेंटर गोर- गरीब जनतेस आधारवड ठरले आहे.
         कोल्हापूर जिल्हा अधिकारी दौलत देसाई , मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, प्रांताधिकारी डॉ. विकास खरात, तत्कालीन बीडीओ अरूण जाधव , तहसिलदार प्रदीप उबाळे, उदयोगपती संजय घोडावत महिला व बालकल्याण समिती सभापती डॉ. पद्माराणी राजेश पाटील यांच्या मार्गदर्शनाने व सहकार्याने एसजीयु कोविड सेंटर ११ एप्रिल रोजी सुरू झाले. या सेंटरचे प्रमुख म्हणून डॉ. उत्तम मदने कार्यरत राहून पदभार सांभाळत आहेत.
         या सेंटरमध्ये बाह्यरुग्ण कक्ष, अंतररूग्ण कक्ष, औषध भांडार विभाग, स्वॅब टेस्ट व अँटीजन टेस्ट प्रयोगशाळा कक्ष, एक्सरे कक्ष, जेवण विभाग  रूग्णांना साहित्य पुरवठा आदी विभाग कार्यरत आहेत. डॉक्टर्स व कर्मचारी वर्ग सेवा बजावत असून आरोग्य सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उत्तम मदने यांच्या नेतृत्वाखाली डॉ. शैलेंद्र पाटील, डॉ. रूपाली किनींगे, डॉ.शोएब पटेल, डॉ. सविता बडबडे ,डॉ.अमोल नरदे, डॉ. कोमल खेडकर, डॉ.पूजा पाटील, डॉ. स्नेहा पुजारी, डॉ. आरती अळदी, डॉ. ललिता गायकवाड, डॉ.हर्षल शिखरे,डॉ. जिनेश्वरी मानगावे, डॉ. सुकन्या पाटील. डॉ. स्नेहल लवटे, डॉ. पूजा जाधव, डॉ. तेजस्विनी पाटील, डॉ.निकीता कोळी, डॉ. अंजली फुटाने ,डॉ.मयुरी खोत आदी१९ डॉक्टरांनी कोरोना योध्दा म्हणून सेवा बजावत रूग्णांना कोराना मुक्त केले आहे. चौदा लॅब टेक्निशयन,  एक एक्सरे टेक्निशयन, दोन सुपरवायजर , सात डाटा ऑपरेटर, एक ईसीजी टेक्निशयन, चवेचाळीस आरोग्य सेविका , बावीस वॉर्डबॉय , अकरा सफाई कामगार , तीन सिक्युरिटी गार्ड  आदीजण सेवा बजावत आहेत, यांचीही सेवा कोराना योध्दयांचीच आहे. चार इमारतीमध्ये एच सिक्समध्ये २५२बेड, एच सेवन -२५२, एच एठ- २९४, एच नाईन - २५५ बेड असे एकूण १०५३बेडचे सुसज्ज कोविड सेंटर सेवेस उपलब्ध आहे. या पैकी ७o ऑक्सिजन बेड होते सद्या वाढवून ११० आहेत. पुढील धोका ओळखून सहा हजार लिटर लिक्विड ऑक्सिजन टॅक बसवून २१० ऑक्सिजन बेडचे नियोजन केले आहे. सर्व रुग्णांना औषधे, इंजेक्शन्स, आवश्यक लागणाऱ्या वस्तू जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्याकडून पुरवठा होत आहे.
          या सेंटरमध्ये २१ एप्रिलमध्ये पहिला कोविड रूग्ण उपचारासाठी दाखल झाला. आतापर्यंत २४३०७ बाह्य रुग्णांची तपासणी केली आहे. त्यापैकी ७४३९रूग्ण उपचारासाठी दाखल झाले त्यापैकी ३८५o रूग्ण पॉझिटिव्ह होते. त्यांच्यावर योग्य उपचार करून कोरोना मुक्त केले.पैकी ५४ रुग्णांचा मृत्यू झाला.
आतापर्यंत सेंटरमध्ये १५४०८ जणांचे स्वॅब घेण्यात आले. १९४१ जणांची अँटीजन तपासणी करण्यात आली. या कोविड सेंटरमध्ये तपासणीतील २८२६ जणांची तपासणी अंती पॉझिटिव्ह रिपोर्ट आला.यामध्ये कोविडचे काही लक्षणे नाहीत, सौम्य लक्षणे , मध्यम लक्षणे ,तीव्र लक्षणे आदी चार प्रकारान्वये रुग्णांवर सात ते अकरा दिवसापर्यंत औषधोपचाराचे किट देऊन उपचार केले जातात. तीव्र लक्षणांच्या रुग्णांवर रेमडीसिव्हर इंजेक्शन देणे,ऑक्सीजन लावणे व लक्षणानुसार औषधे देणे आदी सेवा दिल्या जात आहेत. या कोविड सेंटरमध्ये चार इमारतीमध्ये - काही लक्षणे नाहीत (२००२ रुग्ण ), सौम्य लक्षणे ( २७८४ रूग्ण), मध्यम लक्षणे ( १९४८ रुग्ण), तीव्र लक्षणे ( ३४५८रूग्ण) आदी रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत.४१ रुग्णांना संदर्भ सेवेसाठी कोल्हापूरला पाठविण्यात आले आहे. सकस व उत्कृष्ठ दोन वेळा जेवण, चहा नाष्टा आदी आहाराची सेवाही रूग्णांना दिली जाते. संसर्ग वाढल्याने  रुग्णांची संख्या जुलै ,ऑगस्ट, सप्टेबंर, ऑक्टोबंर या चार महिन्यात जास्त होती. संसर्ग कमी झाल्याने सद्या रूग्ण संख्यात घट झाली आहे. क्यूअर रेट ९९.३० असून डेथ रेट ०.७३ इतका आहे.अशी माहिती प्रसार माध्यमांना डॉ. उत्तम मदने यांनी दिली.
      या कोविड सेंटरला हातकणंगले तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. सुहास कोरे , डॉ. राहूल देशमुख ( हेरले ), डॉ.जेसिका अॅडरुंज ( शिरोली ), डॉ. रामेश्वरी ( सावर्डे), डॉ.हर्षद बोरगावे ( साजणी), डॉ. रिजवाना बोरगावे (पट्टणकोडोली ), डॉ. माहेश्वरी उंबरजकर (भादोले), डॉ. राजवर्धन कदम ( हुपरी), डॉ. ठाकरे ( आळते), डॉ. शैलेंद्र गायकवाड ( अंबप ) आदी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकिय अधिकाऱ्यांची सेवा व सहकार्य लाभल्याने हातकणंगले तालुक्यातील कोविड  रुग्णसंख्या घटली आहे.

Thursday, 19 November 2020

कोल्हापूरचे सुपुत्र मनोज गुरव यांची महाराष्ट्र चॅप्टर च्या चेअरमन पदी निवड

हेरले/वार्ताहर
दि19/11/20
कोल्हापूरचे सुपुत्र मनोज गुरव यांची महाराष्ट्र चॅप्टर च्या चेअरमन पदी निवड झाली आहे. 
हैद्राबाद येथे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सर्वेअर्स आणि लाॅस असेसर्स च्या वतीने हि निवडणूक घेण्यात आली होती. या मध्ये कोल्हापूर येथील मनोज गुरव हे विजयी झाले. त्यांच्या निवडीने कोल्हापूरला पहिल्यांदाच मान प्राप्त झाला आहे.‌सेक्रेटरी पदी निलेश बेडमुठा ( बारामती) खजानिस पदी सिध्दनेश इंगळे (पुणे) यांची निवड झाली आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सचिन मुळगे यांनी काम पाहिले.

Sunday, 15 November 2020

आभाळमाया संस्थेकडून समाजातील वंचित घटकांना मदतीचा हात मिळणार डॉ. रूपा शहा यांचे प्रतिपादन


हेरले / प्रतिनिधी
दि.15/11/20

प्रकाशाचा सण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दीपावलीच्या सणाच्या पहिल्याच दिवशी  मानवतेच्या भावनेतून मातोश्री या वृद्धाश्रमातील वृद्ध महिलांना साडी व पुरुषांना शाल देऊन मायेची ऊब देणाऱ्या जिल्हा परिषद शाळेतील प्राथमिक शिक्षिका, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ कोल्हापूर जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षा व प्राथमिक शिक्षक बँकेच्या संचालिका लक्ष्मी पाटील यांचे कार्य हे निश्चितच प्रेरणादायी असून कौतुकास्पद आहे असे  प्रतिपादन डॉ. रूपा शहा यांनी केले. 
       सामाजिक, शैक्षणिक व मानवतेच्या भावनेतून स्थापन केलेल्या आभाळमाया या संस्थेच्या कार्याची सुरुवातच वृद्धाश्रमामधील वृद्धांना मायेची ऊब देत करण्यात आली या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी मातोश्री वृद्धाश्रमाच्या अध्यक्षा वैशाली राजशेखर होत्या. 
     कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे समाजभान समुहाचे प्रमुख विश्वास सुतार म्हणाले, लक्ष्मी  पाटील आपले शैक्षणिक कार्य सांभाळत सामाजिक बांधिलकी  सतत जपत असतात.आभाळमाया या संस्थेच्या माध्यमातून त्या समाजासाठी भरपूर सामाजिक कार्य करतील याची खात्री आहे.
   आभाळमाया संस्थेच्या संस्थापिका  लक्ष्मी पाटील म्हणाल्या ,आभाळमाया या संस्थेच्या माध्यमातून समाजातील निराधार, अनाथ,वंचित ,गरीब व गरजूंच्या जीवनातील अंधार आपल्या कुवतीप्रमाणे नाहीसा करण्यासाठी जास्तीत जास्त मदत करण्याचा सतत प्रयत्न राहील.
      कार्यक्रमास वृद्धाश्रमाच्या उपाध्यक्षा सूर्यप्रभा चिटणीस, नेते रघुनाथ खोत, शिक्षक संघाचे जिल्हा सरचिटणीस सुनिल पाटील, राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब निंबाळकर,  स्वाभिमानी शिक्षक संघटनेचे जिल्हा सरचिटणीस भाऊसाहेब सकट ,करवीर अध्यक्ष रावसाहेब पाटील, सरचिटणीस प्रकाश सोहनी,  मनोज माळवदकर,राजेश वाघमारे, शरद पाटील, तुषार पाटील, प्रहारचे अध्यक्ष विष्णू मोहिते, नूतन सकट ,छाया पानारी,रेखा पाटील ,उषा नंदगावकर  ,बाजीराव पाटील 
आदी उपस्थित होते.
     स्वागत मारुती पाटील व प्रास्ताविक संजय पाटील यांनी केले, आभार संस्थेच्या उपाध्यक्षा सविता पाटील  यांनी मानले व सुत्रसंचालन स्वाती खाडे यांनी केले.

            फोटो 

कोल्हापूर : येथील मातोश्री वृद्धाश्रम येथे आयोजित आभाळमाया संस्थेच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना डॉ. रूपा शहा सोबत वैशाली राजशेखर ,विश्वास सुतार, लक्ष्मी पाटील ,सुनील पाटील व

Thursday, 12 November 2020

पक्षी सप्ताहाच्या निमित्ताने अब्दुल लाट येथे पक्षी निरीक्षण व पक्षी गणना 2020 उत्स्फूर्तपणे साजरा !

प्रतिनिधी सतिश लोहार
**             

                    ज्येष्ठ पक्षीतज्ञ मारुती चितमपल्ली आणि जागतिक कीर्तीचे पक्षीतज्ञ डॉ. सलीम अली यांच्या जयंतीनिमित्त संम्पूर्ण देशभर 5 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर हा सप्ताह पक्षीसप्ताह म्हणून पक्षीप्रेमींकडून देशभर साजरा केला जातो. 
या वर्षी देशात पहिल्यांदाच महाराष्ट्र शासनाकडून अधिकृतपणे या पक्षीसप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.याचेच औचित्य साधून आज अब्दुल लाट तालुका- शिरोळ , जिल्हा- कोल्हापूर येथे निसर्गप्रेमींकडून  पक्षी निरीक्षण व पक्षी गणना कार्यक्रम राबविण्यात  आला. अब्दुल लाट येथील श्री दत्त मंदिर पासून नदीकडे जाणाऱ्या रस्त्याने आढळणाऱ्या पक्ष्यांची गणना करण्यात आली. या गनणेमध्ये चित्र बलाक ,युरेशियन ऱ्हीनेक, पिवळा धोबी या परदेशी स्थलांतरित पक्षांसह राखी बगळा, जांभळा बगळा, गाय बगळे, जांभळी पाणकोंबडी, नदिसुरय, पान कावळा असे पानपक्षी तसेच इतर सामान्य 50 प्रजातींच्या असे एकूण 60 प्रजातींच्या 325 पक्षांची नोंद करण्यात आली. सदर पक्षी गणनेत अब्दुल लाट व शिवनाकवाडी येथील पक्षीमित्र श्री. प्रमोद कुंभार , डॉक्टर श्री.संतोष उमराने,श्री. ओम पाटील,श्री. संदीप वळवाडे, श्री.विनायक माळी,श्री. संतोष कोळी,श्री. शितलणाथ खोत,श्री. योगेश उमराणे, श्री. दिगंबर उमराणें, श्री. सतीश कुरणे .यांनी सहभाग नोंदवला.

ज्ञानेश्वर मुळे फाऊंडेशनच्या नजराणा ब्रँड चा प्रथम वर्धापन दिन उत्साहात संपन्न

प्रतिनिधी सतिश लोहार 
**
इचलकरंजी येथे चांगुलपणाच्या चळवळी अंतर्गत सुरू झालेल्या ज्ञानेश्वर मुळे फाऊंडेशनच्या वतीने डॉ.ज्योती बडे निर्मित नजराणा ब्रँड च्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त रोप वाटप कार्यक्रम संपन्न झाला.या कार्यक्रमास इचलकरंजीतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आदरणीय महाजन गुरुजी व वृक्षसंवर्धनाचे कार्य करणाऱ्या सौ. चित्कला कुलकर्णी या उपस्थित होत्या. डॉ.ज्योती बडे यांनी स्वागत करून  नजराणा ब्रँड च्या कामाची माहिती दिली. यानंतर चांगुलपणाच्या चळवळी च्या कार्यकर्त्या न्या. दिलशाद मुजावर यांनी शुभेच्छा दिल्या. उपाध्यक्षा शैला कांबरे यांनी चांगुलपणाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली व नेत्रदान आणि देहदान करावे असे आवाहन केले.डॉ.दशावतार बडे यांनी नेत्रदान,देहदान,अवयव दान याबाबत शास्त्रोक्त माहिती दिली. शैला कांबरे यांच्या  संकल्पनेतून नेत्रदान व देहदान संकल्प यासाठी ज्ञानेश्वर मुळे सरांच्या मार्गदर्शनाने व प्रेरणेने नेत्रदान certificate वाटप करण्यात आले. डॉ.दशावतार बडे,डॉ.ज्योती बडे ,ऋत्विक बडे,देविका बडे,मनोहर कांबरे,शैला कांबरे, पुष्पा साळी, तुकाराम मोटे, नेहा काजवे,डॉ.वंदना बडवे  यांनी नेत्रदान संकल्प जाहीर केला. नेत्रदान व देहदान संकल्प केलेल्या दात्यांचे सत्कार पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.चित्कला कुलकर्णी यांनी वृक्षा मुळे होणारे फायदे सांगून वृक्ष लावा असा संदेश दिला.सध्याच्या कोरोना परिस्थितीस अनुसरून महाजन गुरुजी यांनी  विविध रोगांवर लस तयार करणाऱ्या शास्त्रज्ञांची माहिती सांगून वृक्षांचे महत्त्व विशद केले.सक्रिय कार्यकर्ते 
संजय परीट सर यांनी कचरा व्यवस्थापन व प्लास्टिक मुक्ती हा उपक्रम राबविण्यासाठी सर्वांनी एक होऊन काम करू असे आवाहन केले. तसेच आदरणीय  डॉ.ज्ञानेश्वर मुळे यांनी व्हिडिओ कॉल च्या माध्यमातून उपस्थितांशी संवाद साधला व शुभेच्छा दिल्या.चांगुलपणाच्या चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन केले. मुळे फाऊंडेशन च्या गेल्या दीड वर्षातील उपक्रमांच्या डॉक्युमेंट्स फाईल्स चे अनावरण गोधडी स्पेशालिस्ट विद्या गायकवाड, बिझिनेस वूमन श्रध्दा सातपुते, इंजिनिअर स्नेहा बडे  यांच्या हस्ते करण्यात आले. उपस्थित सर्वांना ज्योती बडे यांनी स्वतः तयार केलेल्या रोपांचे वाटप करण्यात आले.संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चांगुलपणाच्या चळवळी चे सच्चे कार्यकर्ते प्रा.श्री .मनोहर कांबरे  यांनी उत्कृष्टपणे केले.चहापानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

मौजे वडगाव येथील जय हनुमान सहकारी दूध व्यावसायिक संस्थेच्या वतीने दीपावली बोनस व भेटवस्तू वाटप

हेरले / वार्ताहर

जिल्ह्याची अर्थवाहिनी असलेल्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक (गोकुळ)  संघ व प्राथमिक दूध संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेची दिवाळी गोड होण्यास मोठा हातभार लागला आहे. असे मत संघाचे वरिष्ठ पर्यवेक्षक सुरेश पाटील यांनी व्यक्त केले. 
    ते मौजे वडगाव येथील जय हनुमान सहकारी दूध व्यावसायिक संस्थेच्या दीपावली बोनस  व भेटवस्तू वाटप प्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन सतीश कुमार चौगुले होते.
ते पुढे म्हणाले, गेली आठ महिने कोरोनाच्या  महामारी मुळे प्रत्येक क्षेत्रावर गंभीर परिणाम झाला आहे . पण कोल्हापूर जिल्हा दूध संघाने दूध संस्थेना  पाठबळ देऊन दुग्धव्यवसाय कठीण प्रसंगीही  अखंडितपणे ठेवून ग्रामीण भागातील जनतेला मोठा दिलासा दिलासा दिला आहे .सर्व व्यवहार ठप्प असताना मात्र जिल्ह्याची आर्थिक वहिनी म्हणून गोकुळ संघाने सर्वांना विश्वासात घेऊन  वेगवेगळे उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपली आहे . जवळपास ८० कोटी रुपये जिल्ह्यातील उत्पादकांना संघाने फरक बील वाटप केले आहे.  त्याहीपेक्षा ग्रामीण भागातील प्राथमिक दूध संस्थेने आपल्या नफ्यातून जास्तीत जास्त रक्कम बोनस व भेटवस्तू च्या रूपाने दूध उत्पादकांना वाटप केले आहे. या दोघांच्या सहकार्याने जिल्ह्यामध्ये दूध उत्पादकांची दिवाळी अत्यंत चांगली व गोड होण्यास मदत झाली आहे असे पाटील यांनी सांगितले.
     चेअरमन चौगुले म्हणाले, संस्थेने काटकसरीने व्यवसाय करून दूध उत्पादकांना संघ व संस्थेच्या माध्यमातून सुमारे १७  लाख रुपयांचे फरक बिल (बोनस) म्हणून दूध उत्पादकांना वाटप केले आहे .संघाच्या सर्व प्रकारच्या सेवा सुविधेचा लाभ दूध उत्पादकांना मिळवून देण्यास संस्था नेहमी अग्रेसर राहिली आहे . किसान फार्मर्स पॅकेजच्या माध्यमातून सुमारे सव्वा पाच लाख रुपये इतकी आर्थिक मदत  दूध उत्पादकांना मिळाली आहे.
    चेअरमन सतिशकुमार चौगुले ,व्हा चेअरमन नेताजी माने, संस्थापक चेअरमन बाळासाहेब थोरवत, बाळासो चौगुले, जयवंत चौगुले, आनंदराव पोवार,महादेव शिंदे, सुनिल सुतार, सुरेश कांबरे, सागर थोरवत ,शकील हजारी, महादेव चौगुले, सचिव आण्णासो पाटील, विलास घुगरे, सोमनाथ जंगम आदि उपस्थित होते.स्वागत संस्थेचे सचिव अण्णासाहेब पाटील यांनी केले ,प्रास्ताविक सतिश चौगुले यांनी केले. तर आभार संस्थेचे ज्येष्ठ संचालक बाळासाहेब थोरवत यांनी मानले .
 
         फोटो 
मौजे वडगाव :  येथील जय हनुमान सहकारी दूध संस्थेच्या सभासदांना दीपावली बोनसचे वाटप करताना गोकुळ दूध संघाचे वरिष्ठ पर्यवेक्षक सुरेश पाटील.
प्रसंगी संस्थेचे चेअरमन सतीशकुमार चौगुले ,बाळासाहेब थोरवत , नेताजी माने, आनंदराव पोवार,  सुरेश कांबरे, श्रीकृष्ण थोरवत , अण्णासो पाटील आदी मान्यवर.

Wednesday, 11 November 2020

संजय घोडावत पॉलीटेकनिक चा एमएसबीटीई परीक्षेत उच्चांकी निकाल


२०४ विद्यार्थ्यांनी मिळविले ९० टक्के हुन अधिक गुण

हातकणंगले/ प्रतिनिधी
दरवर्षी प्रमाणे संजय घोडावत पॉलीटेकनिक ने आपली उच्चांकी निकालाची परंपरा कायम राखली आहे. उन्हाळी २०२० परीक्षेत २०४ विद्यार्थ्यांनी ९० टक्के गुणांपुढे मार्क्स मिळवून गुण मिळवून दैदिप्यमान यश संपादन केले आहे.
तृतिय वर्ष कॉम्प्युटर सायन्स अँड  इंजिनीरिंग विभागातून आदिती काईंगडे -प्रथम क्रमांक  (९९.०६  % ), पार्थ भोसले व सना मोमीन  - द्वितीय क्रमांक (९८.९४ % ),  लक्ष्मीकांत म्हेत्रे, शुक्राना खातीब, मैथिली  जाधव, सोमेश चौगुले, अनिता  लवाटे- तृतीय क्रमांक (९८.८२ %) गुण मिळवून घवघवीत यश मिळविले  आहे.
   तृतिय वर्ष इलेक्ट्रिकल इंजिनीरिंग विभागातून आकाश निर्मळे व प्रज्ञा कोठे -प्रथम क्रमांक (९८.६३% ), ऋत्विक पाटील- द्वितीय क्रमांक (९८.३८ % ), अंकिता पोवार- तृतीय क्रमांक (९८.२५ %), गुण मिळवून दैदिप्यमान यश संपादन केले आहे.
     तृतिय वर्ष सिव्हिल इंजिनीरिंग विभागातून श्रद्धा माळी -प्रथम क्रमांक  (९८.५६ % ), श्रेयस कलकुटगी, तुषार कोष्टी  व यशराज लोंढे -द्वितीय क्रमांक (९८.४४ % ), जॉयसी कांबळे- तृतीय क्रमांक (९८.३३%), गुण मिळवून दैदिप्यमान यश संपादन केले आहे.
तृतिय वर्ष इलेकट्रॉनिक्स टेलेकॉम्युनिकेशन इंजिनीरिंग विभागातून तुषार अलासे -प्रथम क्रमांक  (९८.५३ % ), अबूजेफा कुडचे - द्वितीय क्रमांक (९८ % ), सिमरन सनदी - तृतीय क्रमांक (९७.८७ %)गुण मिळवून घवघवीत यश मिळविले  आहे. 
    मेकॅनिकल इंजनिरिंग विभागातून सोहम चौगुले -प्रथम क्रमांक  (९८.२२  % ), ओंकार माळी व प्रीतम पाटील - द्वितीय क्रमांक (९७.८९  % ),  मयूर जाधव व ऋतुजा सूर्यवंशी -तृतीय क्रमांक (९७.७८ %) गुण मिळवून दैदिप्यमान यश संपादन केले आहे.
    या निकालाबद्दल प्राचार्य  विराट गिरी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे व यापुढेही उच्चांकी निकालाची परंपरा कायम राहील अशी आशा व्यक्त केली तसेच या यशाचे श्रेय सर्व विद्यार्थी व स्टाफ यांना देऊन पालकांचे ही कौतुक केले.घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष संजयजी घोडावत व विश्वस्त विनायक भोसले यांनी सर्वांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.या यशाबद्दल सर्वच स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Tuesday, 10 November 2020

प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेते आमिर खान यांची संजय घोडावत विद्यापीठास सदिच्छा भेट.

हेरले / वार्ताहर
पाणी फौंडेशनचे संचालक व प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेते आमिर खान यांनी नुकतीच संजय घोडावत विद्यापीठास सदिच्छा भेट दिली. संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष श्री संजयजी घोडावत यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी आमिर खान यांच्या पत्नी किरण खान, विश्वस्त सौ. नीता घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, प्रभारी कुलगुरू डॉ.एम टी.तेलसंग, कुलसचिव डॉ.एन.के.पाटील, संचालक व्ही.व्ही.कुलकर्णी व प्राचार्य विराट गिरी, डॉ. उत्तम मदने आदी मान्यवर उपस्थित होते.
     यावेळी सुपरस्टार आमिर खान यांनी संजयजी घोडावत यांच्याशी विविध विषयावर चर्चा केली. अध्यक्ष संजयजी घोडावत यांनी प्रारंभी आमिर खान यांना ग्रुप बद्दल माहिती देत आजवरच्या प्रगती आलेखावर प्रकाशझोत टाकला. याचबरोबर संजय घोडावत फौंडेशन व मजले येथील पाणी फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने केलेल्या सामाजिक कार्याची माहिती दिली तसेच संजय घोडावत विद्यापीठाचे शैक्षणिक कामकाज व संशोधनाबद्दल सविस्तर माहिती दिली गेली. यावेळी आमिर खान यांनी संजय घोडावत विद्यापीठाच्या कोव्हीड रुग्णालयातील रुग्णांची आवर्जून विचारपूस केली. यावेळी रुग्णालयाचे डॉ. उत्तम मदने यांनी २४००० रुग्ण बरे होऊन सुखरूप घरी गेल्याचे सांगितले. यावेळी आमिर खान यांनी संजय घोडावत यांनी कोरोना काळात केलेल्या सामाजिक कार्याचा अहवाल पाहिला.
संजयजी घोडावत यांनी आमिर खान यांना विद्यार्थ्यांच्या जीवनावरील 'तारे जमीन पर' फिल्म सारखा नवीन विषय घेऊन आपण एक नवीन चित्रपट निर्मित करावा यासाठी आमच्याकडून लागेल ती मदत देऊ करण्याचे आश्वासन दिले.
सुपरस्टार आमिर खान म्हणाले'' या जगात खूप असे लोक आहेत जे आपले देहभान हरपून सामाजिक कार्य करीत आहेत त्यापैकी संजयजी घोडावत हे आहेत. खरेतर यांच्या सामाजिक कार्याबद्दल आजवर ऐकून होतो पण आज प्रत्यक्षात अनुभव आला. कोरोना काळात कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात  मोठया रुग्ण क्षमतेचे हॉस्पिटल उभे करून सामान्यांना आधार देण्याचे कार्य त्यांनी केले आहे. घोडावत फौंडेशनच्या माध्यमातून केलेली मदत तसेच विद्यापीठाच्या माध्यमातून कित्येक विद्यार्थी आपले भविष्य येथे घडवीत आहेत.आपल्या भावी वाटचालीस खूप शुभेच्छा'.असे बोलून त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
         फोटो 
संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत प्रसिध्द बॉलीवूड अभिनेते आमिर खान यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतांना शेजारी विश्वस्त विनायक भोसले प्राचार्य डॉ. विराट गिरी व अन्य मान्यवर

Sunday, 8 November 2020

शहरस्तरीय शालेय विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन भाषण स्पर्धा संपन्न



महापालिकेच्या 35  शाळातील विद्यार्थ्यांचा सहभाग,शाळा बंद शिक्षण चालू उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

कोल्हापूर, दि.5 :-

 कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्यावतीने “स्वच्छता अभियान” या विषयावर शहरस्तरीय शाळातील विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन भाषण स्पर्धा नुकत्याच पार पडल्या. या स्पर्धेत महापालिकेच्या 35  शाळातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
            महात्मा गांधी यांच्या 151 व्या जयंती निमित्त कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये ऑनलाईन शिक्षण उपक्रम राबवून विद्यार्थ्यांची सोय केली आहे. विद्यार्थ्यांना घरी आभ्यासाची आवड निर्माण व्हावी, म्हणून या भाषण स्पर्धांचे आयोजन केले होते. या स्पर्धांचे आयोजन महापालिकेच्या राजर्षि शाहू विद्यामंदिर शाळा क्रं.11 कसबा बावडा येथील शाळेचे केंद्र मुख्याद्यापक अजितकूमार पाटील यांनी संयोजन केले होते. स्पर्धेचे बक्षीस वितरण कोल्हापूरनगरीच्या महापौर निलोफर आजरेकर यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी उपमहापौर संजय मोहिते,स्थायी समिती सभापती सचिन पाटील,शिक्षण सभापती श्रावण फडतारे, प्रशासन अधिकारी एस.के. यादव, शैक्षणिक पर्यवक्षेक बाळासाहेब कांबळे, विजय माळी, उषा सरदेसाई  यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. शहरस्तरीय भव्य ऑनलाईन भाषण स्पर्धा " या उपक्रमात सर्वच स्पर्धकांनी प्रयत्नाची शिकस्त करून  " महात्मा गांधीजींचे स्वच्छताविषयक विचार या विषयावर मुद्देसूद भाषण सादर करून पुढील विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश संपादन केले.
          लहान गट
प्रथम क्रमांक - सोनाक्षी सोनाप्पा गावडे
म.न.पा.टेंबलाईवाडी विद्यालय 

द्वितीय क्रमांक - अर्णव सुकेश पाटील
म.न.पा.प्रिन्स शिवाजी विद्यामंदिर जाधववाडी

 तृतीय क्रमांक - यश सिध्दीविनायक बन्ने
म.न.पा.लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्यामंदिर जरगनगर.
          
             मोठा गट
प्रथम क्रमांक - देवयानी  हेमंत  बेर्डे
  म. न.पा.यशवंतराव चव्हाण विद्यामंदिर 

द्वितीय क्रमांक - वेदांत सूकेश पाटील
म.न.पा.प्रिन्स शिवाजी विद्यामंदिर जाधववाडी 

तृतीय क्रमांक - भार्गव गोपाळकृष्ण पोतदार
म.न.पा.वि.स.खांडेकर विद्यालय .

परिक्षक म्हणून तमेजा मुजावर, शिवशंभु गाटे,  विद्या पाटील, आस्मा तांबोळी यांनी काम पाहिले.याप्रसंगी महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाचे शहराध्यक्ष मनोहर सरगर, राजेंद्र पाटील, दिलीप माने, वैशाली पाटील, हेमंत पाटोळे, सुजाता आवटी हे उपस्थित होते.

Saturday, 7 November 2020

शिक्षक बँकेस डिव्हिडंड वाटपाची परवानगी मिळावी संचालिका- लक्ष्मी पाटील यांची भारतीय रिझर्व्ह बँकेकडे मागणी.



हातकणंगले/ प्रतिनिधी
दि.8/11/20
    मार्च 2020 पासून आपला देश व राज्य कोवीड सारख्या महाभयंकर रोगाचा सामना करीत आहेत. कोवीड संसर्ग होऊ नये या पार्श्वभूवीवर राज्यातील सर्व  सहकारी संस्थाच्या जनरल सभा घेण्यास महाराष्ट्र शासनाने दि .31 मार्च 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे . 
       आर्थिक वर्षात झालेला नफा विभागणीस मंजूरी देण्याचे सर्वाधिकार जनरल सभेस असल्याने व सध्याच्या काळात जनरल सभा घेणे शक्य नसल्याने महाराष्ट्र शासनाने दिनांक 2/11/2020 च्या अद्यादेशाद्वारे संचालक मंडळास नफा विभागणीचे अधिकार दिले असून डिव्हिडंड वाटपास परवानगी दिली आहे. 
      सदर अद्यादेशाच्या अनुषंगाने प्राथमिक शिक्षक बँक , कोल्हापूरसह सर्वच नागरी सहकारी बँकांच्या संचालक मंडळास सन 2019-20 चा नफा विभागणी करुन डिव्हडंड वाटपाचे अधिकार देणेबाबत आपणांकडून निर्देश व्हावेत व सर्व सभासदांची दिवाळी अधिक गोड करावी अशी मागणी रिझर्व्ह बँकेकडे प्राथमिक शिक्षक बँक संचालिका लक्ष्मी पाटील यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
      सभासदांना डिव्हिडंड मिळावा म्हणून शिक्षक नेते मोहनभोसले ,जनार्दन निउंगरे ,एन.वाय.पाटील ,बाळासाहेब निंबाळकर , शिक्षक संघ जिल्हा अध्यक्ष रविकुमार पाटील, सरचिटणीस सुनिल पाटील ,रघुनाथ खोत ,रवींद्र भोई,दुंडेश खामकर,अरुण चाळके ,मधुकर येसणे,किरण शिंदे ,प्रकाश मगदूम ,विजय भोसले , प्रकाश सोहनी ,सुनील एडके , नंदकुमार वाईंगडे ,अशोक पाटील तिरपनकर ,शिवाजी रोडे पाटील ,प्रकाश येडगे,भीमराव रेपे,रोहिणी लोकरे ,वैशाली कोंडेकर ,नूतन सकट ,संगीता खिलारे ,प्राजक्ता जाधव  आदिंनी शिक्षक बँकेकडे मागणी केली होती. त्या अनुषंगाने रिझर्व्ह बँकेकडे मागणी केली असल्याचे संचालिका लक्ष्मी पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे प्रसिध्दीस दिले आहे.

Thursday, 5 November 2020

महावितरणच्या हेरले शाखा कार्यालयातील रिक्त पदे तात्काळ भरा : मौजे वडगाव शिवसेनेची मागणी

हातकणंगले/ प्रतिनिधी
दि.5/11/20
हातकणंगले तालूक्यातील हेरले येथील महावितरणच्या शाखा कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात हेरले ,  हालोंडी , मौजे वडगाव या तीन गावांचा समावेश आहे . या तिन्ही गावचे कार्यक्षेत्र पहता शाखा कार्यालयात अपुरे कर्मचारी आहेत . त्यामुळे रिक्त झालेली पदे तात्काळ भरावीत आशी मागणी मौजे वडगाव शिवसेनेच्या वतीने शिवसेना शहरप्रमुख सुरेश कांबरे , व शिवसेनेचे ग्रा .पं. सदस्य अवधूत मुसळे यांनी  महावितरण हातकणंगले उपकार्यकारी अभियंता सुरेश मैलापुरे यांचेकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे .
          हेरले येथील वीज मंडळाच्या शाखा कार्यालयाच्या अंतर्गत कनिष्ठ अभियंता -१ , मुख्य तंत्रज्ञ १, वरिष्ठ तंत्रज्ञ ६ , कनिष्ठ तंत्रज्ञ ३, यासह एकूण ११ पदे मंजूर आहेत . यापैकी काही पदे रिक्त तर काहींची बदली झाली आहे . सध्या कार्यालयात कनिष्ठ अभियंता , मुख्य तंत्रज्ञ व कनिष्ठ तंत्रज्ञ अशी तीनच पदे कार्यरत असून बाकीची पदे रिक्तच आहेत . त्यामुळे हेरले शाखा कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील मौजे वडगाव , हेरले ,  हालोंडी या तिन्ही गावचे घरगुती व शेती वीज कनेक्शनचा विचार केला असता साधारणतः ५६००पर्यत वीज कनेक्शन आहेत .यामुळे शाखा कार्यालयातील अपूऱ्या कर्मचाऱ्यांमुळे वीज ग्राहकांना सेवा मिळण्यावर परिणाम होत आहे . त्यामुळे हि रिक्त पदे तात्काळ भरावी अशी लेखी मागणी मौजे वडगाव शिवसेनेच्या वतीने केली असून सदर निवेदनावर शिवसेना शहरप्रमुख सुरेश कांबरे व शिवसेनेचे ग्रा.पं. सदस्य अवधूत मुसळे यांच्या सह्या आहेत .

फोटो 
महावितरण हातकणंगलेचे उपकार्यकारी अभियंता सुरेश मैलापूरे यांना लेखी निवेदन देतांना सुरेश कांबरे व अवधूत मुसळे

Tuesday, 3 November 2020

मौजे वडगाव येथे आमदार राजू बाबा आवळे व डॉक्टर विजय गोरड यांचा सत्कार .


फोटो - मौजे वडगांव - आमदार राजूबाबा आवळे यांचा सत्कार बाळासो सावंत व डॉ. विजय गोरड यांचा सत्कार भगवान कांबळे यांच्या हस्ते करतांना शेजारी अन्य मान्यवर.


हेरले / प्रतिनिधी
दि.3/11/20
मौजे वडगाव ( ता. हातकणंगले) येथे संजय गांधी नियोजन कमिटी मौजे वडगाव यांच्यावतीने आमदार  राजू बाबा आवळे यांची संजय गांधी निराधार कमिटीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल व डॉक्टर विजय गोरड यांची सदस्यपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. 
  यावेळी हेरले मंडलाधिकारी जाधव   तलाठी एस.ए. बरगाले, लोकनियुक्त सरपंच काशिनाथ कांबळे. माजी  उपसरपंच  किरण चौगुले तंटामुक्ती अध्यक्ष  महेश कांबरे ग्रामपंचायत सदस्य अविनाश पाटील, सुनिल खारेपाटणे, माजी पोलीस पाटील  मनोहर चौगुले, शितल परमाज,संजय जंगम, संतोष सावंत, कृष्णा सावंत, बाळासो सावंत, सुनील गरड, मारुती शेंडगे आदी मान्यवरांसह महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.  आभार भगवान कांबळे यांनी मानले.
    

Monday, 2 November 2020

जय हनुमान सह दूध संस्था व गोकुळ दूध संघ यांचे वतीने दूध उत्पादकांना किसान विमा पॉलिसीचा लाभ

हेरले / वार्ताहर


  मौजे वडगांव ( ता. हातकणंगले) येथील जय हनुमान सह दूध संस्था  व गोकुळ दूध संघ यांचे वतीने सर्व दूध उत्पादकांची सन २o१९-२० मध्ये किसान विमा पॉलिसी उतरविली आहे या विमा पॉलिसीमध्ये  १३ दूध उत्पादक सभासदांना प्रत्येकी ४० हजार रुपये प्रमाणे ५ लाख २o हजार रूपये संस्थेने वाटप केले आहे.याची दखल घेऊन इन्शुरन्स कंपनी व गोकुळ दूध संघाचे संचालक मंडळाने दूध संस्थेचे आभार व्यक्त केले.     

      गोकुळ दूध संघाने दूध उत्पादकांच्यासाठी किसान विमा योजना राबवून दूध उत्पादकांना लाभ मिळवून दिले बद्दल संस्थेच्या वतीने माजी चेअरमन  जयवंत चौगुले यांच्या हस्ते गोकुळ दूध संघाच्या संचालक मंडळाचा सत्कार करण्यात आला. जय हनुमान संस्थेचे दूध उत्पादक व संचालक  श्रीकृष्ण थोरवत व  राजकुमार थोरवत यांची गाय मयत झालेने विमा पॉलिसीची प्रत्येकी ४०हजार रक्कमेचा धनादेश गोकुळ दूध संघाचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक  अरुण नरके  व सर्व संचालक मंडळ व द न्यू - इंडिया इन्शुरन्स कंपनीचे अधिकारी कालेकर, कानिटकर , के वाय पाटील  यांचे हस्ते देण्यात आला. हातकणंगले तालुक्यामध्ये दूध उत्पादकांना जास्तीतजास्त विमा रक्कम मिळवून दिलेबद्दल जय हनुमान दूध संस्थेचा सत्कार गोकुळ संघाच्या वतीने करण्यात आला. या कार्यक्रमास संस्थेचे संचालक जयवंत चौगुले, सागर थोरवत संस्थेचे सचिव आण्णासो पाटील, राजकुमार थोरवत आदी उपस्थित होते.
       फोटो 
गोकुळ दूध संघामध्ये माजी चेअरमन अरूण नरके यांचा  जय हनुमान दूध संस्थेचे माजी चेअरमन जयवंत चौगुले  सत्कार करतांना शेजारी संचालक  मान्यवर.