Monday, 22 March 2021

सुप्रसिद्ध कवी व शाहीर प्राध्यापक कुंतीनाथ करके पाटील यांचे निधन

कोल्हापूर / प्रतिनिधी
दि.22/3/21

      सुप्रसिद्ध कवी व शाहीर प्राध्यापक कुंतीनाथ करके पाटील यांचे  ( वय ८५ ) निधन झाले. 

त्यांच्या  जीवन कार्याचा अल्पपरिचय

    हेरले (ता. हातकणंगले ) येथे10 एप्रिल 1936 साली त्यांचा जन्म झाला. त्यांचे शिक्षण बी.ए.पुणे विद्यापीठ ( 1959 ) साली झाले तर बी. एड. श्री मौनी विद्यापीठ गारगोटी येथे ( 1961) झाले.
        डॉक्टर बापूजी साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेत सन 1959 ते 1994 पर्यंत मुख्याध्यापक ते प्राचार्यपदाची सेवा सातवे, तुळजापूर, कराड ,कोल्हापूर पारगाव, इचलकरंजी, अजीवली, कापशी, मसूद माले, वडणगे, निगवे आदी ठिकाणी  बजावून 35 वर्षाच्या प्रदिर्घ सेवेनंतर  ते  दिनांक 1 मे 1994 रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांनी  केलेल्या उतुंग कार्याबद्दल त्यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

          पुरस्कार
कर्नाटक राज्यात निडसोशी येथे १९९० ला सर्वज्ञ गौरव पुरस्कार.नेताजी सुभाषचंद्र बोस पुरस्कार. स्वातंत्र्य शाहीर शंकरराव निकम, कुंडल पुरस्कार
दि. १५/८/२०००, डॉ. भाऊराव पाटील कर्मवीर पुरस्कार ८ जून१९९७ ला औरंगाबाद येथे दिला. १४ एप्रिल २००३ रोजी महाराष्ट्र शासनाने “दलित मित्र पुरस्कार” प्रदान केला,कोल्हापूर जिल्हा परिषदेमार्फत आदर्श शिक्षक पुरस्कार दिनांक पाच सप्टेंबर 1984 प्रदान करण्यात आला.2011- 12 सालामध्ये महाराष्ट्र राज्य शासनाने सांस्कृतिक विभागामार्फत बेस्ट शाहीर म्हणून पुरस्काराने सन्मानित केले.
डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या वतीने  17 फेब्रुवारी 2021 रोजी डी.लीट पदवी बहाल केली.

      साहित्यिक कार्य

काव्य संग्रह - पाझर, चैत्र पालवी, कांचन कुंभ,जलधारा. शाहिरी कविता- रणझुंजार, शाहिरी झंकार, रंगदार लावण्या,नवाशाहीर.
नाटक - खुळं पेरलं येड उगवलं
आत्मकथन- ताज्या आठवणी
• चरित्र - कथा ही महावीराची
चित्रपट गीते - रंगू बाजारला जाते, औंदा लगीन करायचं, बोला दाजीबा, सख्या सजना, बायको आली बदलून,अन्याय, प्रतिकार, सुळावरची पोळी, सोंगाड्या तील बिब्बं घ्या इत्यादी गीते लिहिली.

        कॅसेटस
लोक संगीत बाळू मामा (मंजूळ गाणी)
 जोतिबाच्या नावानं चांगभलं, पालखी ज्योतिबाची,मायेची मायाक्का, चंदनाच्या पालखीत, संगे गजानन (शेगाव), शंकराच्या सुता, डॉ. कर्मवीर भाऊराव,
शिवशंभो, महालक्ष्मी स्तोत्र, तुळजाभवानी, जैन भजन, माझे तुळजाई बाहुबली ते बाहुबली इत्यादी.

       
सामाजिक कार्य

शाहिरी पोवाड्याचे कार्यक्रम करुन गरीब
विद्यार्थ्यांना कपडे, धान्य, रोख रक्कम दिली.दुष्काळग्रस्तांना आर्थिक मदत, स्कूल ऑफ ओरिएंटल अॅण्ड आफ्रिकन स्टडीज युनिव्हर्सिटीऑफ लंडन विद्यापीठाने माझ्या आवाजात
स्वलिखीत पोवाडे लोकगीते १९६४ साली
ध्वनिमुद्रीत करुन नेली.शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरच्या बी. कॉम. भाग-१
च्या मायबोली, साहित्य सहवास या पाठ्यपुस्तकात कविता निवडल्या.
 साहित्य सौरभ कार्यक्रमात सांगली आकाशवाणी वरून कविता वाचली.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन इचलकरंजी,कसबा बावडा येथे कविता वाचन.आटपाडी, विटा, पलूस, इस्लामपूर, पुणे येथे कवि
संमेलनाचे अध्यक्ष अखिल भारतीय मराठी जैन साहित्य परिषदेच्या १२
व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्री क्षेत्र
बाहुबली कुंभोज जि. कोल्हापूर येथे १९९९ साली. अनेक शाळा कॉलेजमधून स्नेह-संमेलनाचे प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शनपर भाषणे दिली.
 काँग्रेस पक्षाचा प्रभावी प्रचार २० वर्षे केला.दि.१५/११/१९७९ रोजी, कै. इंदिरा गांधींचे कुडाळ ते गांधीमैदान, कोल्हापूर येथे आगमन होईपर्यंत,लाखो लोकांना प्रतिभेने ५ तास हसवत रोखून धरले.
राजर्षि शाहू महोत्सवात कोल्हापूरात शाहिरी कला सादर करुन लोकप्रियता मिळवली. भगवान महावीर
निर्वाण महोत्सव २५०० वा निमित्त शाहिरी कार्यक्रमाचा दौरा केला.
मुंबई आकाशवाणीवरुन प्रथमत:च जैन भजन सादर करणारा पहिला शाहीर दि. ०१ मे १९९४ ला सेवा निवृत्त झाले.
सध्या लेखन, व्याख्याने व शेती सांभाळून उत्तम जीवन जगत होते.
दि. २७ सप्टेबर २००९ आळंद, जि. गुलबर्गा येथे आम. सुभाष गुत्तेदार यांच्या शुभहस्ते जाहीर सत्कार संपन्न झाला.
दि. २८ ऑक्टोबर २००९ मराठवाडा विद्यापीठ, युवक महोत्सव, बक्षिस वितरण समारंभाचे प्रमुख पाहूणे. संयोजक प्राचार्य रमेश दाबके, रामकृष्ण परमहंस महाविद्यालय, उस्मानाबाद.
दि. ३१ ऑक्टोबर २००९ अनंत विद्यानगर संकेश्वर येथे मा. नाम. मल्हार गौडा पाटील, आयोजित इंदिरा
गांधी स्मृति दिन, प्रमुख पाहूणे उपस्थिती व मार्गदर्शन व सत्कार.दि. ३० एप्रिल २०१० रोजी महाराष्ट्र शासना मार्फत
सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त श्री शाहू खासबाग मैदान, कोल्हापूर येथे मा. ना. हर्षवर्धन पाटील पालकमंत्र्यांचे अमृतहस्ते जाहीर सत्कार करण्यात आला.

       सांस्कृतिक कार्य

१९६४ ते ८७ आकाशवाणी पुणे, मुंबई, सांगली केंद्राचे गायक, शिवकालीन, पेशवाई आणि इंग्रजकालीन शूरवीरांचे
पोवाडे रचून आकाशवाणीवरुन सादर केले.शिवजयंती, हनुमान जयंती, बसवेश्वर जयंती, गणेशोत्सव,
भगवान महावीर जयंती निमीत्त श्री क्षेत्र तूळजापूर, टिळक चौक, सोलापूर, सांगोला, मंगळवेढा, पळसदेव, ता.इंदापूर
(पुणे), आळंद (गुलबर्गा) संकेश्वर, रत्नागिरी, निपाणी, हुपरी,कोल्हापूर, सांगली, बीड, नांदेड, परभणी, बार्शी, बारामती,जेजुरी, भिवंडी, कन्नमवारनगर, मुंबई, शिवाजी पार्क, आमदार
निवास मुंबई, शनिवारवाडा, पुणे, पिंपरी चिंचवड, पेण,रायगड, सावरकरांचा पुर्णाकृती पुतळा, उद्घाटनानिमित्त
रत्नागिरी, आंबेजोगाई येथे शाहिरीसत्र संचालक १० दिवस,नवरात्रौत्सव - तुळजापूर व कोल्हापूर महालक्ष्मी मंदिर येथे पोवाड्यांचे जाहीर कार्यक्रम करुन समाज प्रबोधन व परिवर्तनाचे भरीव कार्य केले.
       
     दूरदर्शन गायक

 दि. ५ मार्च १९७६ व १६ ऑगस्ट१९८७ असे २ वेळा वरळी मुंबई दुरदर्शन लोकसंगीत सादर केले होते.
अशा बहु आयामी व्यक्तिमत्वाचे वयाच्या ८५ वर्षी दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा,सून ,दोन मुली जावाई व नातवंडे असा मोठा परिवार आहे.

Friday, 19 March 2021

राज्य कुमार कबड्डी संघाच्या कर्णधारपदी तेजस पाटील.


कोल्हापूर/ प्रतिनिधी
दि.19/3/21
    तेलंगणा येथे होणाऱ्या राष्ट्रीय महाराष्ट्र संघाच्या कर्णधारपदी कोल्हापूर जिल्ह्यातील सडोली खालसा ता करवीर येथील तेजस मारुती पाटील यांची निवड झाली आहे 22 ते 25 मार्च दरम्यान ही स्पर्धा होणार आहे.
  उत्कृष्ट चढाई च्या जोरावर अनेक प्रतिस्पर्धी संघाना चितपट करणारा तेजस मारुती पाटील यांनी या पूर्वी कुमार कुमार गटाचे दोन वेळा प्रतिनिधित्व केले आहे. तसेच 19 वर्षाखालील शालेय स्पर्धेसाठी निवड झाली होती. गोकुळ शिरगाव येथील ई प्रसाद राव अकॅडमी मध्ये सराव करत असलेल्या तेजस पाटीलचे वडील पोलीस मारुती पाटील हे देखील 1992 93 मध्ये झालेल्या राष्ट्रीय कुमार गटात राज्य संघातून खेळले आहेत.
    तेजस पाटील याला प्रशिक्षक प्राध्यापक संभाजी पाटील तसेच  ई प्रसाद राव अकॅडमीचे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक रमेश भेंडीगिरी व उमा भेंडीगिरी तर वडील मारुती पाटील यांचे प्रोत्साहन लाभले. अशी माहिती प्रसिध्दीस संदीप पाथरे यांनी दिली.

Thursday, 18 March 2021

हेरले (ता. हातकणंगले) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आतापर्यंत ९८० लोकांनी घेतली कोरोना प्रतिबंधक लस

हातकणंगले / प्रतिनिधी


हेरले (ता. हातकणंगले) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये एक मार्चपासून कोरोना प्रतिबंधक लस देण्याची मोहीम सुरू झाली असून ९८० लोकांनी लस घेतली.
             प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये पहिल्या टप्प्यांमध्ये डॉक्टर, नर्स ,पॅरामेडिकल स्टाफ, सफाई कर्मचारी, आशा कर्मचारी ,अंगणवाडी सेविका, खाजगी डॉक्टर व त्यांचे कर्मचारी आदींना कोरोना प्रतिबंध लसी दिल्या गेल्या. दुसऱ्या टप्यामध्ये  राज्य शासकीय कर्मचारी, पोलीस कर्मचारी, कोरोना योध्दे,  महसूल कर्मचारी, केंद्र शासन कर्मचारी ,स्थानिक स्वराज्य संस्था लोकप्रतिनिधी,पदाधिकारी आदींना लसी देण्यात आल्या.
      तिसऱ्या टप्प्यामध्ये  ६०वर्षावरील सर्व वयोवृद्ध व  ४५ ते  ५९ वयातील व्याधीग्रस्त लोकांना कोरणा प्रतिबंध लस देण्याचे सत्र सुरू आहे. दररोज २०० लोकांना लसीकरण देण्याचे उद्दिष्ट सुरू असून दिवसास १२०पर्यंत लोकांचा प्रतिसाद दिसत आहे.हेरले प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत रूकडी उपकेंद्रामध्ये दहा दिवसापूर्वी लसीकरण मोहिम सुरु केली आहे तरी ५ लसीकरण सत्र पूर्ण झाले आहेत. येत्या काही दिवसात चोकाक व अतिग्रे या गावांमध्ये लसीकरण केंद्र सुरू होणार आहे.लस देण्यासाठी चार कक्षाचे नियोजन केले आहे. नोंदणी कक्ष, ऑनलाईन नोंदणी कोवीन अॅप कक्ष, लसीकरण कक्ष, निरिक्षण कक्ष,लसीकरणासाठी आशा कर्मचारी यांना प्रत्येकी एक हजार लोकसंख्या  सर्वेक्षणाचे कार्य दिले आहे. यातून  ६०वर्षावरील वयोवृद्धांना लसीकरण घेण्यासाठी आवाहन केले जाते. तसेच ४५ ते ५९ वयोगटातील व्याधीग्रस्त लोकांनाही प्रतिबंध लस दिली जात आहे.मतदान यादी प्रमाणे सर्वेक्षण सुरू आहे. 
         आजपर्यंत हेरले २८५, माले ३८, चोकाक ६७, अतिग्रे ४०, रुकडी स्पेशल ४७७  असे एकूण ९८० लोकांनी लस घेतली आहे. दररोज दोनशे लोकांना लस देण्याचे उद्दिष्ट आहे मात्र १२५पर्यंत लोकांचा प्रतिसाद मिळत असून लोकांनी न घाबरता स्वयंम स्फूर्तीने लस घेण्यासाठी आरोग्य केंद्रात जाणे महत्त्वाचे ठरत आहे.
 वैद्यकिय अधिकारी डॉ. राहुल देशमुख म्हणाले की आरोग्य केंद्रांमध्ये येताना स्वतःचे आधारकार्ड घेऊन येणे गरजेचे आहे.तसेच आपल्या शेजारील गल्लीतील किंवा गावातील ज्येष्ठ नागरिकांना लस घेण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी सर्व सामाजिक संस्था व लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेण्याची गरज आहे.प्राथमिक आरोग्य केंद्रातील लसीकरण अत्यंत नीटनेटकेपणाने आयोजित केले असून सर्व नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येक व्यक्तीसाठी स्वतंत्र सिरिंज व योग्य शीतसाखळी मध्ये साठवलेली लस तसेच कोणताही दुष्परिणाम होऊ नये म्हणून लसीकरण झालेल्या व्यक्तींना अर्धा तास देखरेखीखाली ठेवण्यात येते. चुकून एखादा दुष्परिणाम झाल्यास लसीकरण सत्राच्या ठिकाणी सर्व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित केलेले आहे व अत्यावश्यक सर्व साधनसामुग्री इंजेक्शन्स उपलब्ध करून ठेवले आहेत. तरी नागरिकांनी न घाबरता स्वताला कोरोणापासून संरक्षण देणारी कोव्हीशील्ड ही  लस घ्यावी असे आवाहन प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल  देशमुख यांनी केले आहे.

वाढीव वेतन अनुदान देण्याचा शासन आदेश मंजूर

कोल्हापूर / प्रतिनिधी

राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व वर्ग तुकड्यांना नव्याने 20 टक्के व 20 टक्के वेतन घेणाऱ्या शाळांना 20 टक्के वाढीव वेतन अनुदान देण्याचा शासन आदेश आज शालेय शिक्षण विभागाने निर्गमित केला . यामुळे या आदेशाने राज्यातील 33 हजार 214 शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना याचा लाभ होणार आहे. यासाठी  140 कोटी रुपयांचे अनुदान देण्यात येणार असून एक नोव्हेंबर २०२०  पासून यांचा लाभ मिळणार आहे . यासाठी शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे पाठपुरावा केला होता .
   15 फेब्रुवारी 2019 रोजी पात्र झालेल्या प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना सी एम फंडातून आर्थिक तरतूद द्यावी अशी मागणी या अधिवेशनात आमदार प्रा.जयंत आसगावकर यांनी केली होती .शासनाने त्वरित हा प्रश्न निकाली काढण्याचे ग्वाही यावेळी दिली होती . त्यामुळे राज्यातील सर्वांचे लक्ष लागून राहिले होते .आज हा आदेश प्राप्त होत असताना यापूर्वी नियमबाह्य अनुदान उपलब्ध झालेल्या शाळांना अनुदान देऊ नये तसेच असे अनुदान दिले असल्यास संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध चौकशी करण्यात येणार आहे. तसेच हे अनुदान कोणत्याही दुसर्‍या कामासाठी वापरता येणार नाही कोषागार अधिकारी हा निधी या निधीची तरतूद झाल्यावर ताबडतोब या सर्वांचे वेतन काढण्याचे आदेश दिला आहे .

15 फेब्रुवारी 2021 रोजी पात्र झालेल्या शाळांना सी.एफ. फंडातून तरतूद झाली नसल्याने मुख्यमंत्री व अर्थमंत्री यांनी शिक्षणमंत्र्यांच्या विनंतीवरून 1 मार्च 2021 रोजी सुरू होणाऱ्या अधिवेशनात पुरवणी मागणी मंजूर करण्याचे अभिवचन दिले. त्यानुसार शिक्षक कर्मचाऱ्यांना वेतन देण्यासाठी पुरवणी मागणी नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंजूर झाली.
आज शालेय विभागाने 140 कोटीचा निधी वितरणाचा शासन आदेश शालेय शिक्षण विभागाने निर्गमित केला आहे.हा निधी मंजूर केल्याबद्दल आमदार जयंत आसगावकर यांनी ना. वर्षाताई गायकवाड यांचे पुष्पगुच्छ देऊन आभार व्यक्त केले. 
     हा आदेश सगळ्यांच्या संघटित प्रयत्नांमुळे निर्गमित होऊ शकला, याबद्दल मी सर्वांचेच आभार मानतो व त्यांना धन्यवाद देतो. परंतु अजूनही लढाई संपलेली नाही, कारण अद्यापही कोल्हापूर व मुंबई विभाग वंचित राहिलेले आहेत, अपात्र शाळा, अघोषित शाळा या अजूनही पगाराविना वंचित आहेत. या सर्वांसाठी आपण संघटितपणे प्रयत्न करूया.असे आवाहन शिक्षक आम. प्रा. जयंत आसगावकर यांनी केले आहे. अशी माहिती त्यांनी प्रसिध्दीस पत्रकाद्वारे दिली आहे.
. .. . . . . . ..
      फोटो 
  वाढीव वेतन अनुदान देण्याचा शासन आदेश मंजूर केल्या बाबत शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांचे अभिनंदन करताना शिक्षक आमदार प्रा. जयंत आसगावकर .

मुख्याध्यापक संघाच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा


कोल्हापूर / प्रतिनिधी

कोरोनामुळे शाळां बंद होत्या. घरामध्ये स्मार्टफोन नाही. आता अभ्यास करावयाचा कसा ? हा प्रश्न विद्यार्थी व पालकांना सतावत असताना कोरोनाच्या संकटामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भिती होती. या संदर्भात संघाचे चेअरमन सुरेश संकपाळ, सेक्रेटरी
दत्ता पाटील, इतर अन्य पदाधिकारी व आदर्श हायस्कूल, भामटे ता. करवीरचे तंत्रस्नेही शिक्षक मच्छिंद्र कुंभार यांच्यात चर्चा होऊन विद्याभवन ऑनलाईन शिक्षण बी चॅनेल व एसपीएन न्यूज
चॅनेलवरून प्रसारित होण्यावर शिक्का मोर्तब होवून विद्याभवन ऑनलाईन शिक्षण सुरु झाले.
     महाराष्ट्र शासनाचा शिक्षण विभाग व महाराष्ट्र राज्य प्रशिक्षण व संशोधन विभाग( SCERT ) पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या नवोप्रकम ( नवसंशोधन ) स्पर्धेत आदर्श हायस्कूल, भामटे ता. करवीर चे सहा. शिक्षक मा. मच्छिंद्र रघुनाथ कुंभार यांच्यनवोपक्रमांना सन ( २०१७ ते २०२१ पर्यंत ) सलग चार वर्षे महाराष्ट्र राज्यात अतिउत्कृष्ट
नवोपक्रमांच्या यादीत स्थान मिळवून कोल्हापूर जिल्ह्याचा दबदबा कायम राखला आहे.याकामी त्यांना आदर्श हायस्कूल भामटेचे मुख्याध्यापक व कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक
संघाचे विद्यमान सेक्रेरी दत्ता पाटील, संघाचे चेअरमन सुरेश संकपाळ, व्हा. चेअरमन मिलिंद पांगिरेकर, बी. आर. बुगडे, जॉ. सेक्रेटरी अजित रणदिवे, खजाननीस नंदकुमार गाडेकर व
कार्यकारी मंडळ सदस्य व संघाच्या विविध विषय समितीचे चेअरमन, सेक्रेटरी, तज्ज्ञ शिक्षकांचे
तसेच समाविष्ठ शिक्षकांचे व बी न्यूज व एसपीएन न्यूज यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Sunday, 14 March 2021

शाळेच्या बोनाफाईड वर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती द्या ग्रामविकास मंत्र्यांना निवेदन: लक्ष्मी पाटील



पेठवडगांव / प्रतिनिधी

 मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांना राज्य शासन विविध शिष्यवृत्ती योजना राबविते. यामध्ये शालेय मुलींकरता सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती ,अस्वच्छ व्यवसायात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना शिष्यवृत्ती ,इयत्ता पहिली ते दहावी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती विमुक्त जाती ,भटक्या जमाती, अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी शिष्यवृत्ती यामध्ये विद्यार्थ्यांचा स्वतःचा जातीचा दाखला ,तहसीलदार यांच्या सहीचा पालकांच्या उत्पन्नाचा दाखला सादर करण्याच्या खर्चिक व किचकट अटी ठेवण्यात आल्यामुळे बहुतांश शिष्यवृत्ती पात्र गोरगरीब विद्यार्थी या शिष्यवृत्तीपासून वंचित राहत आहेत . 
       शिष्यवृत्ती मिळविण्याकरिता विविध दाखल्याची पूर्तता करण्याकरिता पालकांना नाहक त्रास होत आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून केवळ विद्यार्थ्यांच्या शालेय बोनाफाईटवर व तहसीलदार यांच्या कडील पालकांचा उत्पन्नाच्या दाखल्या ऐवजी तलाठी यांच्याकडील पालकांचा उत्पन्न दाखला ग्राह्य धरून पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ देऊन मुलींच्या तसेच मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणास प्रोत्साहन द्यावे. अशी मागणी शिक्षक संघाच्या महिला आघाडी अध्यक्ष लक्ष्मी पाटील यांनी ग्राम विकास मंत्री  नामदार हसन मुश्रीफ  यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे केली आहे .       शिक्षण मंत्र्यांसोबत  चर्चा करून  याबाबत  सकारात्मक निर्णय घेऊ असे मत  नामदार हसन मुश्रीफ  यांनी व्यक्त केले.
        यावेळी उपाध्यक्ष पूजा मुराळी, सरचिटणीस मीना चव्हाण, कार्याध्यक्षा वैशाली  कोंडेकर ,जयश्री माने, नीता पोतदार, नूतन सकट ,प्राजक्ता जाधव आदी पदाधिकारी शिक्षिका उपस्थित होत्या.
         फोटो 
ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांना विद्यार्थी शिष्यवृत्ती बाबत लेखी निवेदन देताना शिक्षक संघ महिला आघाडी अध्यक्ष लक्ष्मी पाटील,वैशाली कोंडेकर, मीना चव्हाण ,जयश्री माने , पूजा मुराळी आदी

हेरलेत मोफत आरोग्य शिबिर संपन्न.


हेरले / प्रतिनिधी
दि.14/3/21
हेरले ( ता. हातकणंगले ) येथे कै अश्विन सर्जेराव जाधव यांच्या पाचव्या पुण्यस्मरणार्थ मोफत आरोग्य शिबिर संपन्न झाले.
    माने केअर हॉस्पिटल जयसिंगपूर व हातकणंगले आर्थोपेडिक अँड ई एन टी क्लिनिक व श्रीमंत जिजाऊ फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्दमाने  जयसिंगपूर येथील अस्थिरोग तज्ञ डॉ. अभिजीत माने आणि कान नाक घसा तज्ञ जयसिंगपूरच्या नगराध्यक्षा डॉ.नीता माने व लायन्स क्लब ऑफ जयसिंगपूर यांच्या वतीने डोळे तज्ञ डॉ. शिवाजी पवार यांच्या उपस्थित मोफत आरोग्य तपासणी व मोफत डोळे तपासणी तसेच मोफत मोतीबिंदू ऑपरेशन शिबिर संपन्न झाले.
     आरोग्य शिबिराचे उद्घाटन  जिल्हा परिषद सदस्य दलित मित्र डॉ. अशोकराव माने यांच्या हस्ते संपन्न झाले.
   या शिबिरामध्ये १३० जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली. हाडांची तपासणी  योग्य उपचार, विकारांची तपासणी योग्य उपचार, कान नाक व घसा मोफत औषधे  मोफत डोळे तपासणी, मोफत मोतीबिंदू ऑपरेशन शिबिर, हर्निया व किडनी स्टोन तपासणी व उपचार करून अल्पदरात शस्त्रक्रिया करण्यासाठी१३जणांची नोंदणी करण्यात आली.
       या प्रसंगी  संयोजक राकेश जाधव , सुहास राजमाने,माजी उपसभापती अशोक मुंडे, उपसरपंच राहुल शेटे, विनोद वड्ड, अर्जुन पाटील, सचिन जाधव डॉ. अमोल चौगुले, बकत्यार जमादार, सारंग पाटील , विशाल परमाज,लखन कांबळे, लखन वड्ड, प्रमोद वड्ड , मारूती जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

       फोटो 
हेरले: मोफत आरोग्य शिबीराचे उद्घाटन प्रसंगी दलित मित्र डॉ. अशोकराव माने डॉ. अभिजीत माने डॉ. निता माने राकेश जाधव व इतर मान्यवर.

Saturday, 13 March 2021

राहुल शेटे यांना आंतरराज्य विशेष सामाजिक सेवा गौरव पुरस्कार जाहीर.


हेरले / वार्ताहर
दि.13/3/21
हेरले ता हातकणंगले येथील उपसरपंच व सृष्टी फौंडेशन संचलित जिजामाता विद्यालय चे अध्यक्ष  राहुल शेटे यांना नॅशनल रूरल डेव्हलपमेंट फौंडेशन आणि हेल्थ नेचर डेव्हलपमेंट यांचा या वर्षीचा अंतरराज्य विशेष सामाजिक सेवा गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.
  कर्नाटक, महाराष्ट्र व गोवा या राज्यातून ग्रामीण भागातील सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात कार्य करीत असलेल्या व्यक्तींच्या कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. मेडल , प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह व म्हैसूर फेटा देऊन त्यांचा विशेष सत्कार करणेत येणार आहे.
   सदर आंतरराज्य पुरस्कार वितरण सोहळा बेळगाव येथे 28 मार्च 2021 रोजी होणार आहे. नॅशनल रूरल डेव्हलपमेंट फौंडेशन ची स्थापना बेळगाव चे माजी खासदार बॅरिस्टर अमरसिंह पाटील, माजी केंद्रीय मंत्री श्रीमती रत्नमाला सावनुर ,भारतीय सैन्य दलाचे निवृत्त ब्रिगेडियर सुधीर सावंत , अॅड. अनिल शिंदे , उद्योगपती सुरेशदादा पाटील व अभियंते मनोहर वडर यांनी केलेली आहे. पुरस्कार वितरण सोहळ्याला कर्नाटक,महाराष्ट्र व गोवा राज्यातील भारतीय सैन्य दलातील अधिकारी , सिनेकलाकार , शिक्षण खात्यातील अधिकारी, राजकीय नेते व मठाधिश उपस्थित राहणार आहेत. 
  उपसरपंच  राहुल शेटे यांनी हेरले सारख्या ग्रामीण भागात 25 वर्षात विविध सामाजिक उपक्रमातून मोठं कार्य केलेलं आहे जिजामाता विद्यालयाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्याच्यासाठी संस्कार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे या हेतूने सेमी इंग्लिश स्कुल चालू केले आहे. शिवराज सहकारी पाणी पुरवठा संस्थेच्या माध्यमातून सर्व सामान्य शेतकऱ्यांची जमीन बागायत करण्याचा प्रयत्न केला आहे. एकता कृषी संशोधन व विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून गावातील शेतकऱ्यांना शासकीय कृषी योजनांचा लाभ मिळवून दिला आहे. माईन मुळा या पिकासाठी G. I. ( *ग्लोबल आयडेंटिफिकेशन* ) मानांकन मिळवण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. एकता ग्रुपच्या माध्यमातून विविध स्पर्धा,वृक्षारोपण,रक्तदान शबीरे,स्वछता अभियान, प्लास्टिक मुक्ती अभियान,महिलांचे प्रशिक्षण वर्ग, दिव्यांगांना मदत,जेष्ठ नागरिकांना सहकार्य इत्यादी अनेक सामाजिक उपक्रम राबविलेत. 
    ग्रामपंचायतीच्या माध्यमातून शासकीय योजनांतून गरीब व सर्वसामान्य लोकांना सहकार्य , स्मशाभूमीत फळ झाड लागवड व संवर्धन, घनकचरा व सांडपाणी  व्यवस्थापनेसाठी प्रयत्न याच बरोबर ग्रामविकासाच्या नवं नवीन अनेक संकल्पनां राबविल्या आहेत.

Thursday, 11 March 2021

मौजे वडगाव येथे गोकुळ बायोगॅस उद्घाटन संपन्न.


हेर्ले / वार्ताहर
दि.11/3/21
  मौजे वडगाव (ता.हातकणंगले ) येथील जय हनुमान दूध संस्थेमध्ये गोकुळ दूध संघ व राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड यांच्या संयुक्त विद्यमाने शिवसदन कंपनीचे चार बायोगॅस प्लॅन्टचे  उद्घाटन गोकुळच्या महिला नेतृत्व विकास कार्यक्रमाच्या प्रमुख नीता कामत व सहाय्यीका  वंदना पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
   या  प्रसंगी नीता कामत म्हणाल्या, सध्या देशामध्ये गॅस टाकीचे दर वाढत चालले आहेत. आपण ग्रामीण भागांमध्ये दुग्ध व्यवसाय करत आहोत, म्हैस व गाय पालनातून मिळणाऱ्या शेनापासून आधुनिक पद्धतीने निर्मित केलेल्या शिवसदन कंपनी सांगली यांच्या बायोगॅस प्रकल्प अतिशय चांगला आहे. त्याचा ग्रामीण भागातील दूध उत्पादकांनी लाभ घ्यावा. तसेच या बायोगॅसला साधारणपणे  २५ टक्के सबसिडीही दिली जाते. तेव्हा चालू आर्थिक वर्षामध्ये गोकूळच्या माध्यमातून १५० बायोगॅस जिल्ह्यामध्ये होत आहेत. याचा आनंद होत आहे.
      उद्घाटन प्रसंगी संस्थेने महिला दिनाचे आयोजनही केले होते. नीता कामत यांचा सत्कार संस्थेच्या संचालिका सुषमा कांबरे व वंदना पाटील यांचा सत्कार माजी सरपंच इंदूताई नलवडे यांच्या हस्ते करण्यात आला.
     या कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे चेअरमन सतीश चौगुले संस्थापक चेअरमन बाळासो थोरवत सुरेश कांबरे, बाळासो चौगुले, आनंदा पवार, सचिव आण्‍णासो पाटील उपस्थित होते.
      फोटो 
मौजे वडगाव येथे बायोगॅसचे उदघाटन करताना निता कामत  वंदना पाटील आनंदा पोवार, सुरेश कांबरे सचिव आण्णासो पाटील, चेअरमन सतिशकुमार चौगुले,बाळासो चौगुले आदी मान्यवर.

Monday, 8 March 2021

शिक्षणाशिवाय महिलांची प्रगती नाही: डॉ अजितकुमार पाटील

कोल्हापूर प्रतिनिधी 

_**_कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समिती ,कसबा बावडा येथील राजर्षी शाहू विद्यामंदिर शाळा क्र ११ मध्ये जागतिक महिला दिनानिमित्त साधून शाळेतील बालवाडी शिक्षिका कल्पना पाटील यांचा मुलींची शाळा क्र 7 च्या मुख्याध्यापिका जयश्री पुजारी यांचे हस्ते करण्यात आला यावेळी महिलांसाठी योगासने व पुष्पगुच्छ देऊन समारंभ संपन्न करण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळेचे केंद्र मुख्याध्यापक डॉ अजितकुमार पाटील हे होते. व विद्या पाटील मॅडम ,शिवशंभु गाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

यावेळी शाळेचे केंद्र मुखाद्यापक डॉ अजितकुमार पाटील यांनी एकविसाव्या शतकातील महिलांनी सक्षम व अभ्यासू असणे गरजेचे आहे.आपल्या कुटुंबातील शिक्षणाचा व संस्कृती,संस्कार यांचे विचार समाजातील व्यावहारिक जीवन जगत असतांना  उपयोग करावा.कोरोनाकाळींन आपत्तीमुळे घराचे आर्थिक व्यवस्था कोलमडून पडत आहे.त्यावर उपाय म्हणून आपल्या अंगी जे कौशल्य असेल त्याचा वापर करून उधोजक बनले पाहिले.सावित्रीबाई फुलेंनी तेंव्हाच्या काळात अतोनात हाल सोसले आहेत. आज एकविसाव्या शतकात आपण वावरत आहोत त्यामुळे समाज व घर यांचे मधील आपुलकीचे व जिव्हाळ्याचे नाते जपणे गरजेचे आहे.यांचा विचार करून सक्षमपणे महिलांनी उभे राहणे ही आजच्या काळाची गरज आहे.

महिलांनी चूल आणि मूल हे एकविसाव्या शतकातील समीकरण बदललेले आहे.पुरुषांनीसुद्धा आपल्या पत्नीच्या बरोबरीने काम केले पाहिजे. नोकरी असेल किंवा इतर उपजीविकेचे साधन असेल त्यामध्ये दोघांची साथ एकमेकांना दिली तरच आपले कुटुंब सक्षमपणे उभे राहणार आहे.जीवनामध्ये यशस्वीपणे व खंबीर उभे राहण्यासाठी शिक्षण हेच आपल्याला प्रगतीकडे नेणारे आहे.सोशल डिस्टनस पाळून कार्यक्रम शिस्तबद्ध करण्यात आला.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हेमंतकुमार पाटोळे मामा, ओंकार सोनूले, यश सोनुले,वेदांतिका पाटील,तेजस्विनी माने,मयुरी साठे, सोनल माने,समृद्धी केसरकर, दिव्या आवळे, केदार चौगले,सिद्धी पाटोळे,तनिष्का पाटील, समीक्षा जामदार,कल्पना मैलारी, श्रावणी वडर, मानसी दाभाडे,जान्हवी ताटे, अक्षरा लोंढे,यांनी सहकार्य केले.
आभार सुशांत पाटील  यांनी मानले.

हेरले (ता. हातकणंगले )येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास हेरले ग्रामपंचायतीच्या वतीने दोन संगणक व दोन प्रिंटर प्रदान


हेर्ले / वार्ताहर
दि.8/3/21


    हेरले (ता. हातकणंगले )येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास हेरले ग्रामपंचायतीच्या वतीने  दोन संगणक व दोन प्रिंटर प्रदान करण्यात आले.

      हेरले प्राथमिक आरोग्य केंद्रास ग्रामपंचायतीच्या वतीने १५  वित्त आयोग मधून  एक लाख निधीचे  दोन संगणक व दोन प्रिंटर प्रदान करण्यात आले. या प्रसंगी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समिती सभापती डॉ. पद्माराणी राजेश पाटील, पंचायत समिती सदस्या महेरनिगा जमादार, वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल देशमुख, उपसरपंच राहुल शेटे, ग्रामविकास अधिकारी संतोष चव्हाण, ग्रामपंचायत सदस्या स्वरूपा पाटील, विजया घेवारी आदी मान्यवर उपस्थित होते.


      फोटो 
हेरले :  प्राथमिक आरोग्य केंद्रास ग्रामपंचायतीच्या वतीने संगणक व प्रिंटर प्रदान करताना  पंचायत समिती सदस्या  महेरनिगा जमादार वैद्यकिय अधिकारी डॉ.राहुल देशमुख उपसरपंच राहुल शेटे ग्रामविकास अधिकारी संतोष चव्हाण व अन्य मान्यवर

Thursday, 4 March 2021

जागतिक महिला दिनानिमित्त गायक शिक्षक मंचाच्या वतीने संगीत सखी सन्मान पुरस्कार जाहीर.


कोल्हापूर / प्रतिनिधी
दि.4/3/21
जागतिक महिला दिन 2021 निमित्ताने गायक शिक्षक मंच यांच्या वतीने गेले दोन वर्ष गायक शिक्षक मंचामध्ये आपले कुटुंब व आपली नोकरी सांभाळून गायन सादर करणाऱ्या प्राथमिक/ माध्यमिक व उच्च माध्यमिक 21 शिक्षिकांना "संगीत सखी सन्मान 2021 " हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याचे गायक शिक्षक मंचाचे प्रमुख राजेंद्र कोरे, बाळ डेळेकर व रवींद्र सूर्यवंशी यांनी संयुक्तपणे माहिती दिली.
       जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर  ७मार्च २०२१ रोजी दुपारी ४:०० ते सायंकाळी ७:००वा. या वेळेमध्ये सदरचा कार्यक्रम होणार असून हा कार्यक्रम राम गणेश गडकरी हॉल , पेटाळा या ठिकाणी संपन्न होणार आहे.
      सदर कार्यक्रमाचे उद्घाटन व पुरस्कार वितरण अप्पर पोलीस अधीक्षक गडिंग्लज जयश्री गायकवाड व पोलिस उपअधीक्षक ( गृह )कोल्हापूर यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमास सोमनाथ रसाळ हे प्रमुख पाहुणे तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रभाकर हेरवाडे असणार आहेत.
        याप्रसंगी  " रजनीगंधा " हा पुरस्कार प्राप्त महिलांचा मराठी व हिंदी गीतांचा कार्यक्रम संपन्न होणार आहे.सदरचा कार्यक्रम हा " गायक शिक्षक मंच कोल्हापूर " या फेसबुक पेज वरून सर्वांना लाईव्ह पाहता येणार आहे.
पुरस्कार प्राप्त शिक्षिका :
               गिरिजा जोशी, शयराज मणेर, वर्षाराणी वायदंडे ,तबस्सुम आत्तार , मिरा शिंदे ,स्मिता पुनवतकर , निशा साळुंखे, नयना पाटील, स्नेहलता शिर्के ,उज्वला पाटील, रुपाली पाटील ,मनीषा एकशिंगे ,माया सूर्यवंशी ,रेखा पोवार ,विद्या शिंत्रे , संध्या आळवेकर ,आदिती ठाकरे ,उषा कोल्हे, स्वरा आकोळकर, सुजाता गायकवाड अशी माहिती प्रसिध्दी पत्रकाद्वारे राजेंद्र कोरे यांनी प्रसिध्दीस दिली.

Tuesday, 2 March 2021

कोल्हापूरच्या सुमित मोगलेंनी केली सामाजिक बांधिलकीतून ज्योतिबा डोंगरावर साफ-सफाई.




पेठवडगांव/ प्रतिनिधी
दि.2/3/21
 कोल्हापूरचे प्रसिद्ध देवस्थान  ज्योतिबा डोंगरावर कोल्हापूरचे सुमित मोगले यांनी ५० ते ६० लोकांना एकत्रित करून ज्योतिबा डोंगराची साफसफाई मोहीम पूर्ण केली.
    कोल्हापूरचे प्रसिद्ध देवस्थान म्हणजे ज्योतिबा या डोंगरावर अनेक भाविक गर्दी करत असे परंतु या ठिकाणी अनेक भाविक येऊन कचरा व प्लास्टिक तसेच टाकून जातात व हलगर्जीपणा करतात.
 सुमित मोगले यांनी नुकतेच या जागेला भेट दिली होती तर त्याच्या निदर्शनास आले की या ठिकाणी कचरा आणि प्लास्टिक चे प्रमाण वाढले होते त्यांनी त्या ठिकाणीचा एक व्हिडिओ तयार करून  ज्यांना ज्यांना इच्छा आहे त्यांनी त्यांची साथ देऊन ज्योतिबा डोंगर साफ करण्यास मदत करावी असे आवाहन केले.
      अनेक लोक मिळाले आणि ही मोहीम त्यांनी सोमवारी पूर्ण केली या मोहिमेच नाव त्यांनी 'क्लीन कोल्हापूर' असे ठेवल आहे या मोहिमेत तब्बल  ६० जण एकत्र आले होते. यात लहान वयाची मुल ते वयस्कर लोक ही जमले होती.या उपक्रमामध्ये कोणी राजकारणी, ट्रस्ट , फाऊंडेशनची मदत न घेता त्यांनी ही सफाई केली,यात प्लास्टिक, प्लास्टिकच्या बाटल्या, पत्रावळ्या, लहान मुलांचे डायपर्स, कपड्यात बांधलेले नारळ इत्यादी साहित्य या ठिकाणी निदर्शनास आले या वस्तू एकत्रित करून त्याची विल्हेवाट लावली.या मोहिमेत देवस्थान च्या पुजारांनी देखील सहभाग घेतला  आणि हि मोहीम यशस्वीरित्या पार पाडली.
यानंतर त्यांनी ठिकठिकाणी संदेश देणारे कॉमेडी पोस्टर्स लावले जेणेकरून लोकांचे लक्ष जाईल आणि ते परिसर साफ ठेवतील.
     जे सुमित मोगलेंनी केले ते तुम्ही आम्ही करू शकतो. सर्व तरुण पिढीने एकत्र येऊन आपला आजूबाजूचा परिसर, सार्वजनिक ठिकाणी, व इतर पर्यटन ठिकाणी जाऊन साफसफाई करून आपला परिसर, तालुका, जिल्हा स्वच्छ करूया.

       फोटो 
जोतिबा डोंगरावर सुमित मोगलेंच्या नेतृत्वाखाली सामाजिक बांधिलकीतून साफ सफाई करून क्लीन कोल्हापूर मोहिम यशस्वी करणारे युवक युवती व मुले.


Monday, 1 March 2021

टप्पा अनुदानित शाळांसाठी चालू अर्थसंकल्पामध्ये भरीव तरतूद - शिक्षक आमदार प्रा.जयंत आसगावकर



 कोल्हापूर /प्रतिनिधी
दि.1/3/21
वीस टक्के व चाळीस टक्के टप्पा अनुदान घेणाऱ्या शाळांचा वेतन अनुदान वितरणाची पुरवणी यादी बजेटमध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे. लवकरच या बाबतचा आदेश निघणार आहे, अशी माहिती पुणे विभाग शिक्षक आमदार प्रा. जयंत आसगावकर  यांनी दिली.
   शिक्षक आम. प्रा.आसगावकर म्हणाले, ही प्रक्रीया यापूर्वीच होणे गरजेचे होती, तरी देखील या माझ्या शिक्षक बांधवांना या तरतुदीमुळे थोडाफार दिलासा मिळाला आहे. भविष्यामध्ये आपण प्रचलित पद्धतीचा आदेश काढण्यासाठी आग्रही राहणार आहोत. तसेच अघोषिताच्या याद्या लवकरात लवकर घोषित करण्यासाठी आपले प्रयत्न सुरूच आहेत.
      कोल्हापूर विभागातील कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांचे टप्पा अनुदानाचा निधी वितरणाचा आदेश एकत्रितच निघणार आहे.या पूरक मागण्यांमध्ये जरी त्याचा उल्लेख नसला तरी शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांनी हा आदेश काढताना या संस्था एकत्र घेण्याचे आश्वासन दिले आहे,तरी शिक्षकांनी आश्वस्त राहावे असे आवाहन पुणे शिक्षक मतदार संघाचे आमदार प्रा.जयंत आसगावकर यांनी केले आहे .
     फोटो 
शालेय शिक्षणमंत्री नाम. वर्षाताई गायकवाड यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करतांना शिक्षक आम. प्रा. जयंत आसगावकर.

शिक्षण क्षेत्रात महिला शिक्षिकांचे योगदान कौतुकास्पद - नूतन सभापती मीनाक्षी पाटील



कोल्हापूर / प्रतिनिधी
दि.1/3/21
  शैक्षणिक समस्यांचे सोडवणूक करण्यासाठी कटिबद्ध आहोत. असे प्रतिपादन करवीर नूतन सभापती मीनाक्षी पाटील यांनी केले. शिक्षक संघ महिला आघाडी मार्फत नूतन सभापती  मीनाक्षी पाटील यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी त्या बोलत होत्या.
   महिला शिक्षिका घरातील सर्व जबाबदारी सक्षमपणे पेलत शिक्षण क्षेत्रात विद्यार्थी सर्वांगीण विकासाकरिता देत असलेले योगदान कौतुकास्पद आहे. असे गौरवोद्गार महिला सभापती यांनी व्यक्त केले.शिक्षक संघाच्या महिला जिल्हाध्यक्ष तथा शिक्षक बँकेच्या संचालिका  लक्ष्मी पाटील यांनी शिक्षण क्षेत्रातील विविध समस्या सभापती  यांच्या समोर मांडल्या.करवीर तालुक्यातील सर्व शैक्षणिक  प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहू तसेच पालकमंत्री सतेज पाटील , शिक्षक आमदार प्रा.जयंत आसगावकर  यांच्या कुशल नेतृत्वात शिक्षण क्षेत्रातील समस्यांची सोडवणूक करण्याकरता प्राधान्याने काम करू अशी  सभापती यांनी ग्वाही दिली.यावेळी छाया पानारी , निशा नातू, जयश्री पाटील , माधवी पाटील,  सुनिता सुतार , शैलजा गरडकर,  शुभांगी सुतार यांनी शैक्षणिक समस्या बाबत चर्चेत सहभाग घेतला. सर्वांच्या हस्ते नूतन सभापती  मीनाक्षी पाटील व  त्यांना साथ देणारे सामाजिक कार्यकर्ते  भगवान पाटील  यांचा सत्कार  बाजीराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
     फोटो 
 शिक्षक संघ महिला आघाडी कडून पंचायत समिती करवीर नूतन सभापती मीनाक्षी पाटील यांचे अभिनंदन करताना जिल्हाध्यक्षा लक्ष्मी पाटील जयश्री पाटील माधवी पाटील निशा नातू व महिला पदाधिकारी.