Sunday, 30 January 2022

मौजे वडगाव येथे आरसीसी गटर्स कामाचा शुभारंभ

      हेरले (प्रतिनिधी)

 सामाजिक कार्य करीत असताना युवा पिढीने गट तट न मानता एकत्र आल्यास गावाचा विकास चांगल्या प्रकारे होऊ शकतो असे मत पंचायत समितीचे सदस्य उत्तम सावंत यांनी व्यक्त केले. ते मौजे वडगाव (ता. हातकणंगले) येथील विकास कामा च्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते.  तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच काशिनाथ कांबळे होते.
            मौजे वडगाव येथील सामाजिक कार्यकर्ते सुनील खारेपाटणे व  अमोल झांबरे यांच्या विशेष प्रयत्नातून व पंचायत समिती सदस्य उत्तम सावंत यांच्या पंचायत समिती १५ वा वित्त आयोग फंडातून येथील गल्ली नंबर ५ मध्ये आरसीसी गटर्स कामाचा शुभारंभ विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
        यावेळी पंचायत समिती सदस्य उत्तम सावंत, सरपंच काशिनाथ कांबळे, माजी उपसरपंच किरण चौगुले, शिवसेनेचे शहरप्रमुख सुरेश कांबरे, सुनील खारेपाटणे, बाळासो थोरवत, दिलावर हजारी, अमोल झांबरे, स्वप्नील चौगुले, संतोष मोरे ,संजय वड्ड, यांच्यासह गल्ली नंबर ५ मधील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक ग्रामपंचायत सदस्य अवधूत मुसळे यांनी केले. तर आभार ग्रामपंचायत सदस्य अविनाश पाटील यांनी मानले. 

 फोटो 
 मौजे वडगाव येथील गल्ली नंबर ५ मध्ये आरसीसी गटर्स शुभारंभ प्रसंगी उत्तम सावंत, काशिनाथ कांबळे, किरण चौगुले, अविनाश पाटील ,अवधूत मुसळे ,व इतर मान्यवर.

Tuesday, 25 January 2022

विद्यार्थ्यांनी ज्ञानार्थी बनावे - - डॉ अजितकुमार पाटील

**
म. न. पा राजर्षी शाहू विद्यामंदिर शाळा क्र 11 कसबा बाबडा मध्ये ७२ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण प्राथमिक आरोग्य केंद्र बावडाचे वैदयकीय अधिकारी अमर पोवार यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्र मुख्याध्यापक डॉ अजितकुमार पाटील होते. या कार्यक्रमामध्ये शिक्षक पतसंस्थेचे सभापती माननीय श्री वसंत आडके यांच्या हस्ते १लीच्या विद्यार्थ्यांना 9 दप्तर वाटप करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते  सचिन चौगुले व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री रमेश सुतार होते
विद्यार्थ्यांनी कर्मा काळातील अभ्यासाचा फायदा घेऊन ज्ञान आत्मसात करावे विविध विषयांमध्ये प्रभुत्व संपादन करावे तसेच मराठी हिंदी इंग्रजी या विषयांचा अभ्यास लक्षपूर्वक व काळजीपूर्वक करावा जेणेकरून भविष्यामध्ये एमपीसी यूपीसी अभ्यास स्पर्धा परीक्षेला सामोरे जाण्यासाठी आपणास वेळ व तयारीसाठी वेळ मिळेल ज्ञान आत्मसात करण्यासाठी सतत वाचन व चिंतन व मनन लेखन करावे तरच आपणाला दररोजच्या दैनंदिन जीवनामध्ये घडणाऱ्या सामाजिक परिस्थितीचा व दैनंदिन घडामोडींचा अभ्यास होणार आहे भारतीय लोकशाहीची परंपरा ही जगामध्ये आदर्श व प्रमाणबद्ध अशी आहे जगामध्ये भारतीय संस्कृती प्रसिद्ध आहे तसेच विज्ञान व अध्यात्म यांची संस्कार असे परंपरा लाभलेला एकमेव देश म्हणजे भारत देश आहे भारतामध्ये ज्याप्रमाणे विविध जाती धर्माचे लोक एकपर्यंत नांदत आहेत त्याप्रमाणे संस्कृतीही एकमेकाच्या आचार-विचार संस्कृतीवर परंपरा यांचा आदर्श घेऊन आदर्श भरत असे लोकशाही बनत चाललेले आहे भारतामध्ये एक समृद्ध अशी लोकशाही परंपरा लाभलेला देश आहे त्याचा फायदा विद्यार्थ्यांनी आपल्या दैनंदिन अभ्यासामध्ये करावा व देशाचे नाव मोठे करावे असे आवाहन डॉ राजकुमार पाटील यांनी केले.

शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्षा अनुराधा गायकवाड, ज्येष्ठ शिक्षक उत्तम कुंभार,सुशील जाधव, शिवशंभू गाटे,सुजाता आवटी, आसमा तांबोळी, विदया पाटील, तमेजा मुजावर, हेमंतकुमार पाटोळे, कल्पना पाटील उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवशंभु गाटे यांनी केले

कोल्हापूर मध्ये केंद्रस्तरीय ऑनलाइन शिक्षण परिषद संपन्न


को म न पा राजर्षी शाहू विद्यामंदिर शाळा क्र 11,कसबा बावडा,सी आर सी 7 कोल्हापूर मध्ये केंद्रस्तरीय ऑनलाइन शिक्षण परिषद शैक्षणिक पर्यवेक्षिका उषा सरदेसाई,केंद्रमुख्याध्यापक डॉ अजितकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली.
केंद्रमुख्याध्यापक डॉ अजितकुमार पाटील यांनी ऑनलाईन केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेच्या निमित्ताने भाषा पेटी,शंभर दिवस वाचन प्रकल्प याबद्दल शाळा व विद्यार्थी पालक यांनी विद्यार्थ्यांना कशाप्रकारे वाचनाची गोडी वाढविण्यासाठी शैक्षणिक उपक्रम घेऊन विद्यार्थ्यांना वाचनास प्रवृत्त करण्यात यावे जेणेकरुन विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाने वाचनाची गोडी वाढून तो मराठी भाषा वाचनसंस्कृतीसाठी समृद्ध असे साहित्य निर्माण करू शकेल .पालकांनी विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी कशी वाढवण्यासाठी उपक्रम घेऊन तो वाचनालय किंवा पुस्तकाच्या माध्यमातून तो मराठी भाषेवर प्रभुत्व गाजवले व मराठी भाषेला अभिमान वाटेल असे शिक्षण मिळण्याची प्रेरणा मिळेल असे महत्व प्रतिपादन केले.
 तज्ञ मार्गदर्शक म्हणून शहाजी पाटील,अर्चना गवळी,विद्या पाटील,पूनम कोळी,तंत्रस्नेही म्हणून सोनाली मोरे तर आभार उत्तम कुंभार यांनी मानले गणित पेटी,भाषा पेटी,इंग्रजी पेटी,100 दिवस वाचन उपक्रम, रीड टू मी इत्यादी विषयावर ऑनलाइन मार्गदर्शन करण्यात आले.केंद्रशाळा म न पा राजर्षी शाहू विद्यामंदिर शाळा क्र 11 कसबा बावडा सी आर सी  07 मधील 22 शाळेतील 88 मुख्याध्यापक, शिक्षक,शिक्षण तज्ञ यांनी या शिक्षण परिषदेच्या ज्ञानाचा लाभ घेतला.

Monday, 24 January 2022

मौजे वडगाव येथे बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी

  हेरले (प्रतिनिधी) 

मौजे वडगाव ता. हातकणंगले येथील शिवसेना शाखा व  हनुमान दूध संस्था मौजे वडगाव यांच्या वतीने हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पंचायत समितीचे सदस्य उत्तम सावंत व शिवसेना शहरप्रमुख सुरेश कांबरे  यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन करण्यात आले.
        यावेळी त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. व  म्हणाले की, हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या रोखठोक भूमिका आणि भल्याभल्या राजकारण्यांना घाम फोडणारे एक बिनधास्त व्यक्तिमत्व होते. एक पक्ष, एक मैदान ,आणि एकच नेता, अशी ख्याती असलेले महाराष्ट्रातील ते  एकमेव नेते होते .ते भाषण करीत असताना कोणाचीही भीडभाड ठेवत नसत त्यामुळे त्यांच्या स्पष्ट आणि जहाल भूमिकेमुळे ते ,हिंदुहृदयसम्राट, म्हणून ओळखले जाऊ लागले. 
     यावेळी पंचायत समिती सदस्य उत्तम सावंत, शिवसेना शहरप्रमुख सुरेश कांबरे, ज्येष्ठ शिवसैनिक बाळासाहेब थोरवत, ग्रामपंचायत सदस्य अवधूत मुसळे ,अविनाश पाटील, सुनील खारेपाटणे, संतोष मोरे ,अमोल झांबरे, स्वप्नील चौगुले, महादेव चौगुले, अण्णासो पाटील, महेश मोरे, विलास घुगरे, यांच्यासह शिवसैनिक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

फोटो 
  हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस अभिवादन करताना पं. समिती सदस्य उत्तम सावंत, शिवसेना शहर प्रमुख सुरेश कांबरे, व शिवसैनिक पदाधिकारी

Sunday, 16 January 2022

स्वच्छ सर्वेक्षण 2022 व माझी वसुंधरा अभियान बाबत कार्यशाळा

**

सद्या संपूर्ण महाराष्ट्रात प्लास्टिक बंदी लागू आहे या अनुषंगाने महानगरपालिके तर्फे   सिंगल युज प्लास्टिक चा वापर कऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे .
नागरिकांनी प्लास्टिक पिशवीचा वापर न करता कापडी पिशवी किंवा कागदी पिशवीचा वापर करावा आणि आपले शहर प्लास्टिक मुक्त करून कोल्हापूर महानगरपालिकेने सहभाग घेतलेल्या स्वच्छ सर्वेक्षण2022 व माझी वसुंधरा अभियान मध्ये आपल्या शहराला जास्तीत जास्त गुणांकन मिळवून देने साठी प्रयत्नशील रहावे असे आवाहन महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे याचाच एक भाग म्हणून आज दिनांक 8 जानेवारी 2022 रोजी प्रशासक डॉ कादंबरी बलकवडे उप आयुक्त रविकांत आडसुळ यांच्या मार्गदर्शनाखाली म.न.पा.राजर्षी शाहू विद्यामंदिर कासबा बावडा येथे कागदी पिशवी बनविण्याची कार्यशाळा आयोजित केली होती. 
या कार्यशाळेमध्ये डॉ अजितकुमार पाटील, हेमंतकुमार पाटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थाना घरातील वर्तमान पत्रापासून अत्यंत सोप्या पद्धतीने कागदी पिशवी कशी बनवता येऊ शकते  याबाबत प्रात्यक्षिक दाखवून माहिती देण्यात आली तर या कार्यशाळेत सहभागी विद्यार्थ्यांनी ही प्रात्यक्षिक दाखविले प्रमाणे वर्तमान पत्रपासून उत्कृष्ट कागदी पिशव्या बनविल्या. 
यावेळी माहिती शिक्षण व संवाद अधिकारी निलेश पोतदार स्वच्छ सर्वेक्षण 2022 चे ब्रँड अँबेसिटर शिक्षक सुभाष मराठे मुख्याध्याक डॉ अजितकुमार पाटील,उत्तम कुंभार, सुजाता आवटी,शिवशंभु गाटे, तमेजा मुजावर,आसमा तांबोळी, विद्या पाटील,हेमन्तकुमार पाटोळे, संदीप खोत तसेच   विद्यार्थी वेदांतीका पाटील,सार्थक पाटोळे,विनायक पाटोळे,जय सुतार,इतर विद्यार्थ्यांनी मोठया संख्येने उपस्थित होते.

बालावधूत हायस्कूलमध्ये १५ वर्षावरील विद्यार्थ्यांना लसीकरण.

  हेरले (प्रतिनिधी ) राज्य शासनाने कोरोना लसीकरणाची सक्ती केल्याने प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी मोठ्या रांगा लागत आहेत. दरम्यान ३ जानेवारीपासून १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण सुरू झाले असून विद्यार्थ्यांना शाळेमध्ये जाऊन कोरोना प्रतिबंधक लस देण्याची मोहीम मौजे वडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राने सुरू केली आहे.  लोकसेवा शिक्षण संस्था संचलित बालावधूत हायस्कूल मध्ये जाऊन १५  ते १८ वयोगटातील इयत्ता नववी व दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांचे १००% लसीकरण करण्यात आले.
          शासनाच्या आदेशान्वये मंगळवार दिनांक १२ रोजी १५  ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण शाळेत जाऊन सुरू केले होते. यामध्ये पंधरा वर्षावरील नववी व दहावीच्या एकूण १५० विद्यार्थ्यांचे लसीकरण मंगळवारी करण्यात आले. या मोहिमेचा शुभारंभ शालेय व्यवस्थापन समितीचे चेअरमन सदाशिव चौगुले यांच्या हस्ते करण्यात आले. 
    यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. पंकज पाटील, संजीवनी वाघमोडे, आशा वर्कर्स शितल चौगले ,रेखा मोरे, मुख्याध्यापक संजीव चौगुले ,आर. बी .पाटील, आर.एस. स्वामी. दत्तात्रय ढोंगे, सरोजिनी कारंडे ,उपस्थित होते.

 फोटो 
 पंधरा वर्षांवरिल विद्यार्थ्यांचे शाळेमध्ये जाऊन लसीकरण करताना आरोग्य अधिकारी.

Tuesday, 11 January 2022

मौजे वडगाव येथील रस्ता गावठाण पासून सुरु करा. खा. धैर्यशील माने व जि. .प .च्या माजी अध्यक्षा शौमिका महाडिक यांचे बांधकाम विभागाला लेखी पत्र.

     हेरले /प्रतिनिधी
हातकणंगले तालुक्यातील मौजे वडगाव येथील गेल इंडिया कंपनीच्या सी एस आर फंडातून होणारा रस्ता गावठाण पासून सुरु करावा असे लेखी पत्र खासदार धैर्यशील माने व जि .प.च्या माजी अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी शेतकर्‍यांच्या वतीने जि .प .चे कार्यकारी अभियंता महेद्र क्षीरसागर यांना दिले. 
       मौजे वडगाव येथील गावठाण पासून मंजूर असणारा रस्ता व कामाची तशी वर्क ऑर्डर असूनही ठेकेदाराने चारशे ते पाचशे मीटर सोडून पुढचा रस्ता सुरू केल्याने गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन रस्त्याचे काम बंद पाडले आहे. जोपर्यंत गावठाणपासून रस्ता सुरू करत नाही. तोपर्यंत काम करू न देण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे .सदर ठेकेदाराने रस्त्यासाठी लागणारी यंत्रसामग्री घेऊन गेले असून रस्त्याचे काम अर्धवटच सोडले आहे. त्यामुळे वर्क ऑर्डर व ग्रामपंचायतीच्या ठरावानुसार रस्त्याचे काम गावठाण पासून सुरु करावे यासाठी खासदार धैर्यशील माने व जि.प. च्या माजी अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी लेखी पत्रे बांधकाम विभागाला दिले आहेत. यावेळी शिवसेनेचे शहर प्रमुख सुरेश कांबरे, बाळासो थोरवत, ग्रामपंचायत सदस्य अविनाश पाटील, सामाजिक कार्यकर्ते सुनील खारेपाटणे, अमोल झांबरे, उपस्थित होते. 

फोटो 
   मौजे वडगाव येथील गावठाण पासून रस्ता सुरु करावा यासाठी खासदार धैर्यशील माने व शौमिका महाडिक यांचे लेखी पत्र शेतकर्‍यांच्या वतीने देताना सुरेश कांबरे, बाळासो थोरात,अविनाश पाटील ,सुनील खारेपाटणे, व इतर मान्यवर.

Friday, 7 January 2022

शालेय जीवनापासून सर्वांनी वाहतुकीचे नियम पाळून प्रवास करणे महत्त्वाचे - सपोनि स्वाती सुर्यवंशी

हेरले/ प्रतिनिधी

 वडगांव पोलीस ठाण्याच्या वतीने शासन स्तरावरील निर्देशानुसार नववर्षाच्या सुरुवातीस  नागरिकांमध्ये व  विद्यार्थ्यांमध्ये विविध कायद्यांची जागृती होण्यासाठी 'राईजिंग डे ' अभियान सुरू केले आहे. त्या पार्श्वभूमीवर सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वाती सुर्यवंशी यांनी वडगांव विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना  विविध कायद्यांचे महत्त्व या निमित्ताने विषद करून मार्गदर्शन केले.
         सपोनि स्वाती सुर्यवंशी म्हणाल्या, शालेय विद्यार्थ्यांचे १८ वर्षापेक्षा वय कमी असल्याने दुचाकी वाहन चालवू नये. वाहन चालविण्याचा परवाना मिळण्याचे आपले वय नसल्याने आपणावर व पालकांवर कायदेशीर कारवाई होऊन गुन्हा नोंद होऊ शकतो. यामुळे आपल्यावर गुन्हा नोंद झाल्याने आपले करिअर धोक्यात येऊ शकते व पालकांना आर्थिक दंड व कायदेशीर अनेक कारवाईंना सामोरे जावे लागते.
         शालेय जीवनापासून सर्वांनी वाहतुकीचे नियम पाळून प्रवास करणे महत्त्वाचे आहे. यामुळे अपघाताचे प्रसंग घडण्याचे प्रमाण कमी होते. शालेय  मुलींची छेडछाड होण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे मुलींनी आपल्याला त्रास देणाऱ्यांची नावे शाळेत निर्भयपणे आपल्या शिक्षकांना सांगावित ते आमच्याकडे त्या बाबतीत माहीती देतील त्या अनुषंगाने पोलिस दल छेडछाड करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केरेल.
         विद्यार्थ्यांनी शालेय अभ्यास कारणाशिवाय व विधायक कार्याशिवाय अँड्राईड मोबाईलचा वापर टाळावा. या ॲड्राईड मोबाईलच्या वापरामध्ये आपला वेळ वाया न घालवता अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. मोबाईल वरून सायबर गुन्हेगारी फोपावली आहे. त्यामुळे फसवा फसवीचे प्रकार, सोशल मीडिया वरून अक्षेपार्ह संदेश यामुळे सामाजिक ऐक्य धोक्यात येत आहे. त्यामुळे या अनावश्यक मोबाईल वापरापासून शालेय जीवनामध्ये सावध राहणे गरजेचे ठरत आहे. आदी विषयांवरती मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना कायद्याच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन सपोनि स्वाती सुर्यवंशी यांनी केले.
      या प्रसंगी पर्यवेक्षक डी.के. पाटील, नेताजी वडगावकर, एस.डी. बाबर ,पोशी वाघमारे,पोशी शेलार आदी मान्यवरांसह विद्यार्थी उपस्थित होते.
      फोटो 
वडगांव विद्यालयामध्ये बोलतांना वडगांव पोलिस ठाण्याच्या सपोनि स्वाती सुर्यवंशी

क्रीडा महोत्सव चे उद्घाटन



हेरले / प्रतिनिधी

हेरले येथील कौतुक विद्यालय येथे वार्षिक क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन पत्रकार सूरज पाटील यांच्या हस्ते  करण्यात आले.
 अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक सुनील भोसले होते.यावेळी  नितेश कारंजे प्रमुख उपस्थिती होते.
  क्रीडा ज्योतीचे स्वागत करण्यात आले. मिजबा बारगिर हिने  क्रीडा शपथ यांनी दिले.

यावेळी मुख्याध्यापक एस आर चोगुले, जे एस पाटील,एस ए ढवळे,  डी ए,हवालदार,के ए खतीब,आर एस आलमान,, एस एम कोळी,ए एल पाटील, प्रास्तविक व आभार के व्ही हराळे यांनी मानले.यावेळी विध्यार्थी विध्यार्थीनी उपस्थित होते.
फोटो:-कौतुक विद्यालय हेरले येथे  वार्षिक क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन करत असताना पत्रकार सूरज पाटील, नितेश कारंजे उपस्थित होते.

Thursday, 6 January 2022

समाज घडवण्याची जबाबदारी पत्रकारांची : डॉ. सोनाली पाटील


हेरले / प्रतिनिधी
 सुसंस्कृत समाज घडवणे ही पत्रकारांची जबाबदारी असून शिरोली इंडस्ट्रीज एरिया रिपोर्टर असोसिएशन (सिएरा)चे पत्रकार ही जबाबदारी योग्य रितीने पार पाडत आहेत, असे प्रतिपादन हातकणंगले पंचायत समितीच्या नवनिर्वाचित सभापती डॉ. सौ सोनाली पाटील यांनी केले. सिएराच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मराठी पत्रकार दिन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. ज्येष्ठ उद्योजक सुरेंद्र जैन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
स्थानिक गुन्हे अन्वेषणचे सहायक पोलिस निरीक्षक किरण भोसले आणि शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश खांडवे यांची प्रमुख उपस्थिती होती.
       उद्योगपती जैन म्हणाले की, पत्रकारांची विकासाची दृष्टी असली की समाजाचाही विकास होतो. उद्योजकांच्या समस्या मांडण्यासाठी पत्रकार नेहमीच तत्पर असतात. एमआयडीसीच्या जडणघडणीत त्यांचे मोठे योगदान आहे.
सपोनि भोसले म्हणाले की, कोरोना आणि परिस्थितीच्या काळात चांगली साथ दिली आणि जबाबदारीने वार्तांकन केले.
    गुन्हेगारी बाबत प्रबोधन करण्यासाठी पत्रकारांची चांगली साथ मिळत असल्याचे मत सपोनि राजेश खांडवे यांनी व्यक्त केले.सीएराचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी स्वागत तर 
सुनील कांबळे यांनी प्रास्ताविक केले. अभिजीत कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन तर विश्वास चरणकर यांनी आभार मानले.
यावेळी दीपक ऐतवडे, सतीश पाटील, संदीप कांबळे, हरी बुवा आदी पत्रकार उपस्थित होते.
     फोटो 
हातकणंगले पंचायत समितीच्या नवनिर्वाचित सभापती डॉ. सोनाली पाटील व ज्येष्ठ उद्योजक सुरेंद्र जैन यांचा सत्कार करतांना अभिजीत कुलकर्णी सुरेश पाटील विश्वास चरणकरसह अन्य मान्यवर.

Tuesday, 4 January 2022

छत्रपती शिवाजी विद्यानिकेतन ज्युनियर कॉलेज व दिशा इंग्लिश मीडियम स्कूल पेठवडगावमध्ये कलाविष्कार महोत्सवाचे शानदार उद्घाटन.


 हेरले / प्रतिनिधी

  छत्रपती शिवाजी विद्यानिकेतन  जुनिअर कॉलेज  दिशा इंग्लिश मीडियम स्कूल पेठ वडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव देणाऱ्या कलाविष्कार  महोत्सवाचे उद्घाटन सोहळा दिमाखात पार पडला.
मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करून दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कवायत संचलनाच्या माध्यमातून पाहुण्यांना शानदार मानवंदना दिली.
   कार्यक्रमाचे अध्यक्ष बी. जी. बोराडे म्हणाले, स्वतः या प्रशालेच्या यशाची वाटचालीचे प्रत्यक्ष साक्षीदार असून संस्थेचा नावलौकिक महाराष्ट्रभर  पसरत आहे.पालकांच्या अपेक्षापूर्ती करणारी एकमेव शाळा म्हणून प्रशालेची यशस्वी वाटचाल कौतुकास्पद आहे. येणारी पिढी आदर्श व आदर्शवत घडवण्याचे काम या प्रकारच्या माध्यमातून सुरू आहे. शिक्षण क्षेत्रातील या उद्दिष्ट उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांनी मुख्याध्यापक राजेंद्र माने यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले.
     यश मिळवण्याचे मार्ग विद्यार्थ्यांना सांगताना त्यांनी नेहमीच शाश्वत गोष्टीचा स्वीकार करा व शिस्तबद्ध जीवन जगताना अपयशाची भीती न बाळगता नवनवे प्रयोग करण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन केले.  चांगले व्यक्तिमत्व घडविण्यासाठी मोठ्या लोकांचे आत्मचरित्राचे वाचन करा, तुमच्यातील सुप्तगुणांना बाहेर काढून स्व-विकास करा असा संदेशही  त्यांनी या प्रसंगी दिला.
        प्रमुख पाहुणे  संगीता चव्हाण  नुतन  संचालिका कृषी उत्पन्न बाजार समिती वडगाव व नूतन संचालक बामणे, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा मुख्याध्यापक राजेंद्र माने संस्थेचे उपाध्यक्ष  प्रदिप दरवान, सचिव  सुवर्णा माने ,खजानीस  बापुसो माने सर्व विभागांचे विभाग प्रमुख कलाविष्कार प्रमुख हे ए. बी .गावडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
  
 कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक  संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा मुख्याध्यापक  राजेंद्र माने यांनी केले. प्रास्ताविकातून त्यांनी कलाविष्कार  महोत्सवाचे स्वरूप स्पष्ट केले तसेच या कलाविष्कार महोत्सवात पार पाडणार्‍या विविध स्पर्धेची माहिती सांगितली. या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे महत्त्वाचे मुख्य उद्दिष्ट स्पष्ट केले. या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते प्रशालेच्या सह्याद्री वार्षिक क्रीडा महोत्सवातील यशस्वी खेळाडूंना बक्षीस वितरण करण्यात आले. कलाविष्कार महोत्सवाचे प्रमुख  ए. बी.गावडे  व एन. पी. दरवान  यांचा व विभाग प्रमुख,जिमखाना प्रमुख यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अध्यापिका पाटील व  एस. ए. मोरे यांनी केले . एस. डी. सोरटे  यांनी  आभार मानले.
       फोटो 
छत्रपती शिवाजी विद्यानिकेतन व ज्युनियर कॉलेज व दिशा इंग्लिश मीडियम स्कूल पेठ वडगाव या प्रशालेमध्ये कलाविष्कार महोत्सवाचे  उद्घाटन प्रसंगी बी जी बोराडे यांचा सत्कार करतांना मुख्याध्यापक राजेंद्र माने व अन्य मान्यवर.

Monday, 3 January 2022

कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोटर्स वेलफेअर असोसिएशनचे उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार जाहीर ९ जानेवारीला वितरण


कोल्हापूर / प्रतिनिधी
कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोटर्स वेल्फेअर असोसिएशन कोल्हापूर यांच्यावतीने   रविवार ९ जानेवारी २०२२ रोजी मराठी पत्रकार पत्रकार दिनानिमित्त उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार वितरण समारंभ'संजय घोडावत विद्यापीठ अतिग्रे ( ता. हातकणंगले) येथे सकाळी १०.०० वाजता आयोजित केला आहे.       
   कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सकाळ माध्यम समुहाचे संपादक संचालक:श्रीराम पवार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून कोल्हापूर जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ.शैलेश बलकवडे,संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले, तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून संजय घोडावत पॉलिटेक्निक कॉलेजचे प्राचार्य विराट गिरी,कार्यकारी संपादक बी न्यूज ताज मुल्लाणी,दै.लोकमतचे वरिष्ठ पत्रकार समिर देशपांडे,दै.नवराष्ट्रचे आवृत्तीप्रमुख  दीपक घाटगे आदी मान्यवरांच्या उपस्थित हा समारंभ आहे.
  या वर्षीच्या उत्कृष्ट पत्रकार पुरस्काराची घोषणा अध्यक्ष सुधाकर निर्मळे,उपाध्यक्ष अभिजीत कुलकर्णी,सचिव सुरेश पाटील,खजाणिस सदानंद ऊर्फ नंदकुमार कुलकर्णी,जागल्या स्मरणिका संपादक प्रा.रवींद्र पाटील,कौन्सिल मेंबर अतुल मंडपे,सुरेश कांबरे यांनी केली.

 जिल्हा जीवनगौरव पुरस्कार 
राजेंद्र होळकर(दै.तरुण भारत),

जिल्हा उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार सुरेश पाटील(दै.तरुण भारत),

संदीप राजगोळकर (टीव्ही ९ मराठी न्यूज चॅनेल),

जिल्हा उत्कृष्ट सेवा पुरस्कार 
प्रा.अशोक पाटील (दै. सकाळ),

जिल्हा उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार -  नामदेव कुसाळे (एस न्यूज टीव्ही चॅनेल),
तालुका उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार
 विनोद  पाटील (दै. पुण्यनगरी)
निखिल  विभुते (दै.लोकनेता)
रमेश साबळे (दै.लोकमत)
 श्रीपाद स्वामी (दै. पुण्यनगरी) 
रंगराव बन्ने (दै. तरुण भारत), 
बाबुराव वंदुरकर (दै. पुढारी),
सदाशिव आंबोशे ( दै. तरुण भारत),
आनंदा वायदंडे (दै.लोकमत),
भिकाजी पाटील(दै.पुण्यनगरी),
 ज्योतिप्रसाद सावंत (संपादक मृत्युंजय महान्यूज /दै.नवराष्ट्र)
नारायण  गडकरी ( दै. पुढारी),
संजय  पोवार (दै.पुढारी),
डॉ.तुकाराम पाटील (दै.पुण्यनगरी),
दत्ताजीराव देसाई (दै. पुढारी),
प्रकाश सांडुगडे ( दै. तरुण भारत),
भानुदास गायकवाड (दै. तरुण भारत)
शिवाजी चव्हाण ( दै.राष्ट्रगीत)
विठ्ठल  मोहिते (दै. पुण्यनगरी )

या कार्यक्रमास कोल्हापूर जिल्हयातील सर्व पत्रकार बंधुंनी उपस्थित राहावे.असे आवाहन अध्यक्ष सुधाकर निर्मळे यांनी केले आहे.

हातकणंगले तालुका ग्रामपंचायत कामगार संघाचे गटविकास अधिकारी यांना निवेदन

हेरले / प्रतिनिधी
हातकणंगले तालुका ग्रामपंचायत कामगार संघाच्या वतीने हातकणंगले पंचायत समिती गटविकास अधिकारी शबाना मोकाशी यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
      यामध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन वेतनश्रेणी लागू करून पेन्शन, ग्रॅज्युवटी याचा लाभ देण्यात यावा,इतर जिल्ह्याप्रमाणे वेतनाची आर्थिक  तरतूद करावी, ग्रामपंचायतीकडून विशेष भत्ता थकबाकी अदा करण्यात यावी,ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना जाचक असलेला आकृती बंध  रद्द करून शासन निर्णया प्रमाणे वेतन देण्यात यावे,विशेष राहणीमान भत्ता मिळावा या मागण्या करण्यात आल्या आहेत.
    यावेळी आप्पासो रयत ,सुनील चावरेकर, संजय खाबडे, राहुल निंबाळकर,संदीप लोखंडे, दिलीप जाधव,राजेश सोळंकी, रणजीत खाबडे, संजय कोळी, सचिन लोहार,विष्णू खोत, नानासो खोत उपस्थित होते.

Saturday, 1 January 2022

हेरले येथे ३१ डिसेबर रात्री मसाला दूध वाटप करुन विधायक संदेश

हेरले / प्रतिनिधी

वीर सेवा दल शाखा व अंकूर फाऊंडेशन  हेरले यांच्या संयुक विद्यमाने नवीन वर्षाच्या पुर्वसंध्येला  ३१ डिसेंबर  रोजी  रात्रौ ८ ते १० वाजेपर्यंत झेंडा चौक येथे व्यसन मुक्ती हीच देशाची शक्ती. आवाज तरुणाईचा संकल्प व्यसनमुक्त राष्ट्र निर्मितीचा, दारु नको दूध प्या, या संदेशाचा नारा देत या उपक्रमा अंतर्गत  मोफत मसाला दूध वाटप करण्यात  आले. गावातील तरुण वर्गाने, लहान, थोरांनी  या उपक्रमात सहभागी होऊन गुलाबी थंडीच्या रात्री गरम मसाले दूधाचा         अस्वाद घेतला.
    या कार्यक्रमाचे संघनायक संकेत पाटील, उपसंघनायक अरिहंत परमाज साहिल पाटील सम्मेद हणमंत आशिष माणगावे संदेश चौगुले अमोल पाटील बाळगोंड पाटील विशाल परमाज संदीप परमाज आदींनी संयोजन केले. या स्तुत्य उपक्रमाबद्दल सर्व स्तरातून या संयोजक तरुणांचे अभिनंदन होत आहे.
     फोटो 
हेरले येथे ३१ डिसेबर रोजी रात्री मसाला दूध वाटप करतांना वीर सेवा दलाचे युवक सदस्य.

शंभर टक्के शाळा 'अ' श्रेणीत आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहूया - माध्यमिक शिक्षण अधिकारी एकनाथ आंबोकर

हेरले / प्रतिनिधी

कोविडच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने दिलेल्या निर्देशांचे काटेकोर पालन करून कोविडवर मात करून, आरोग्य जपूया. तसेच नव नविन तंत्रज्ञानाचा वापर करून शैक्षणिक गुणवत्ता संवर्धन करू. शाळा सिद्धी क्षेत्रे व त्यातील मानकांचे पालन करून शंभर टक्के शाळा 'अ' श्रेणीत आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहूया अशा संकल्पना राबविण्यासाठी कोल्हापूर जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाचे माध्यमिक शिक्षण अधिकारी एकनाथ आंबोकर यांनी नविन वर्षानिमित्त माध्यमांशी बोलत असतांना कोल्हापूर जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षणाचा नव वर्षाचा शैक्षणिक संकल्प स्पष्ट केला.
        माध्यमिक शिक्षण अधिकारी एकनाथ आंबोकर म्हणाले, माध्यमिक शिक्षकांनी नवनविन तंत्रज्ञानाचा दैनंदिन अध्यापनात शैक्षणिक साधनासह जास्तीत जास्त वापर करीत ज्ञान अनुभूती द्यावी. विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी सतत प्रयत्तशील राहावे.शाळेची सिध्दी क्षेत्रे मानाकन शंभर टक्के करून सात क्षेत्रे त्यांच्यातील ४६ मानके याचा अभ्यास करून अमलबजावणी करावी. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व शाळा 'अ' श्रेणी आणण्यासाठी प्रयत्न करावेत.
        जिल्हयातील प्रत्येक शाळेने आपली विशिष्ट ओळख निर्माण होण्यासाठी एका प्रकारच्या क्रीडा प्रकारामध्ये विशिष्ट नैपुण्य आणण्यासाठी विद्यार्थ्यांना घडवावे. त्यामुळे ते विद्यार्थी जिल्हा, राज्य, राष्ट्रीय पातळीवर क्रीडा क्षेत्रात आपल्यासह शाळेचे नाव लौकीकास प्राप्त करतील. विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास करण्यासाठी सहशालेय उपक्रमांना जास्तीत महत्त्व द्यावे.