Thursday, 29 June 2023

श्री सद्गुरु निरंजन महाराज आश्रम मौजे वडगांव येथे गुरुपौर्णिमानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

हेरले / प्रतिनिधी
श्री सद्गुरु निरंजन महाराज आश्रम मौजे वडगांव ( ता. हातकणंगले) येथे सोमवार दि. 3 जुलै रोजी व्यासपूजा गुरुपौर्णिमानिमित्त आश्रमामध्ये विविध धार्मिक  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सुर्योदय ६:०७ वा. : 'श्री' चे पादुकांना अभिषेक,सकाळी ८:०० ते ९:००: नोंदणी व चहापान,सकाळी ९:०० ते ११:०० : भजन : श्री भजनी मंडळ, हेरले, तबला साथ शौकत गुरुजी हेरले,
सकाळी ११:०० ते ११:३० प्रवचन परमार्थभूषण ह.भ.प. श्री. नारायण एकल महाराज जोगेवाडी,सकाळी ११:३० ते १२:१५ प्रवचन ह.भ.प. श्री. गुरुवर्य मधुकर महाराज पाटील कावणे
दुपारी १२:१५श्रींचे पादुकांना बेल व फुले अर्पण,दुपारी १२:१५ ते १:१५ प्रवचन ह.भ.प.सद्गुरु श्री. श्रीपाद दि. भडंगे महाराज,श्री सद्गुरु हरयेनमः महाराज संस्थान सोलापूर,दुपारी १:१५ ते ३:३०: महाप्रसाद
   दुपारी ३:३० ते ५:१५
: भजन श्री. सुधाकर ठाणेकर व सहकारी इचलकरंजी,सायंकाळी ५:१५ ते ५:३०चहापान,सायंकाळी ५:३० ते ६:३० प्रवचन ह.भ.प. श्री. विठ्ठल पाटील महाराज (तात्या) (शिरोली पुलाची)
सायंकाळी ६:३० ते ७:००: आशिर्वचन प. पू. सद्गुरु श्री आदिनाथ महाराज
सायंकाळी ७:१९ वा.: सुर्यास्त व आरती
   श्री सद्गुरु निरंजन महाराज आश्रमामधील या सर्व कार्यक्रमाचा सद्भक्तांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन श्री सद्गुरु निरंजन महाराज चॅरिटेबल ट्रस्ट, मौजे वडगांव यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Wednesday, 28 June 2023

मौजे वडगांव येथे कृषी संजीवनी सप्ताहाचे आयोजन


हेरले /प्रतिनिधी  
आपल्या आहारामध्ये तृणधान्य , भरड धान्य पिकांचे खूप महत्व असून त्याचा आपल्या आहारामध्ये वापर वाढविला पाहिजे असे प्रतिपादन कृषी विज्ञान केद्र, तळसंदे येथील दिपाली म्हस्के यांनी व्यक्त केले. त्या मौजे वडगाव (ता. हातकणंगले) येथील ग्रामपंचायतीच्या सभागृहात महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या कृषी संजीवनी सप्ताह निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच कस्तूरी पाटील होत्या.
            यावेळी कृषी मंडळ अधिकारी नंदकुमार मिसाळ व कृषी सहाय्यक सचिन आलमाने यांनी कृषी विभागाच्या विविध योजना व खरिप हंगामा बाबत मार्गदर्शन करून शासनाच्या विविध योजनाचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले. यावेळी गावातील ६० ते ७० शेतकऱ्यांना सोयाबीन बियानांच्या मिनिकिटचे मोफत वाटप करण्यात आले.
            यावेळी उपसरपंच सुनिल खारेपाटणे , ग्रामसेविका भारती ढेंगे , ग्रा.पं. सदस्य सुरेश कांबरे, रघूनाथ गोरड, सविता सावंत, सुवर्णा सुतार, रावसो चौगुले ,अविनाश पाटील, अमोल झांबरे , महादेव जाधव, मनोहर चौगले , यांच्यासह शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक रमेश परिट यांनी केले तर आभार उमेश सकटे यांनी मानले.

घोडावत इन्स्टिट्यूटचे प्राचार्य, विराट गिरी यांना 'पीएचडी' पदवी प्रदान


हेरले /प्रतिनिधी
 
संजय घोडावत इन्स्टिट्यूटचे प्राचार्य, विराट वसंतराव गिरी यांना नुकतीच विश्वेश्वरय्या  टेक्नॉलॉजिकल विद्यापीठाकडून कॉम्प्युटर सायन्स अँड इंजीनियरिंग विद्याशाखेमध्ये पीएचडी ही मानाची पदवी प्राप्त झाली आहे.

 "एनहानसिंग परफॉर्मन्स ऑफ टेक्स्ट  समरायझेशन अँड एक्सट्रॅकशन ऑफ इन्फॉर्मशन इन डिसिजन मेकिंग फॉर रिजनल लँग्वेजेस" हा त्यांचा पीएचडीचा मुख्य विषय होता. डॉ. मल्लिकार्जुन मठ  यांचे मोलाचे मार्गदर्शन या संशोधन कार्यास लाभले आहे.
 
नैसर्गिक भाषा प्रक्रियेच्या क्षेत्रातील डॉ. गिरी यांनी एक सॉफ्टवेअर अप्लिकेशन तयार केले आहे. या सॉफ्टवेअरचा वापर करून मजकुरातील महत्त्वाची माहिती एका लहान आवृत्तीमध्ये संक्षेपित करण्याची प्रक्रिया केली जाते. या प्रक्रियेत, मुख्य कल्पना ओळखल्या जातात आणि वापरासाठी संबंधित तपशील प्रदान केले जातात.  त्याबरोबरच मोठ्या वाक्याचे अर्थपूर्ण लहान वाक्य तयार करण्यासाठी हे सॉफ्टवेअर कार्य करत आहे.  या सॉफ्टवेअरचे पेटंट मिळविण्यासाठीची प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात आहे.
भारतीय प्रादेशिक भाषा मधील मजकूर सारांशीकरणातील संशोधन फारच मर्यादित आहे. आणि ते अद्याप प्राथमिक अवस्थेत आहे. डॉ. गिरी यांच्या संशोधनामुळे भारतीय भाषांमधील मजकूर सारांशीकरणाच्या क्षेत्रात केलेले काम उल्लेखनीय असणार आहे.

डॉ. विराट गिरी यांचे शिक्षण एम टेक कॉम्प्युटर भारती विद्यापीठ पुणे येथे पूर्ण झालेले आहे.  त्यांनी २०१२ पासून प्राचार्य, संजय घोडावत पॉलिटेक्निक, या पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. त्याचप्रमाणे संचालक संजय घोडावत  ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्विसेस कोल्हापूर, संचालक संजय घोडावत रेसिडेन्सी अकॅडमी कोल्हापूर, संचालक संजय घोडावत इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट अतिग्रे, तज्ञ करिअर समुपदेशक  आजपर्यंत करिअर व व्यक्तिमत्व विकास दहावी आणि बारावी नंतरच्या करिअर वाटा, स्पर्धा परीक्षेमधील संधी व आव्हाने अध्ययन व अध्यापन कौशल्य, संस्कार स्वरूपी शिक्षण, उद्योग व व्यवसाय, शैक्षणिक व्यवस्थापन कौशल्य, शिक्षण आणि शिक्षण व्यवस्था, सकारात्मक अभिरुद्धी विद्यार्थी व पालक इत्यादी अनेक विषयावर प्रबोधनात्मक व प्रोत्साहन पर ११०० हून अधिक व्याख्याने त्यांनी दिलेली आहेत. डॉ. गिरी यांचे  राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नियतकालिकेमध्ये सात शोधनिबंध प्रसिद्ध झाले असून दोन पेटंट  प्रसिद्ध झालेली आहेत. डॉ. गिरी यांना नवोदय विद्यालयाचे गुणवत्ता विद्यार्थी, डॉक्टर सुजित मिंचेकर फाउंडेशन कडून 'आदर्श शिक्षक रत्न पुरस्कार', पाणी फाउंडेशन 'जलरत्न पुरस्कार', स्वाभिमानी शिक्षक संघाचा 'आदर्श शिक्षक पुरस्कार' आय एस टी इकडून 'बेस्ट पॉलीटेक्निक प्राचार्य' पुरस्कार, टुडे रिसर्च अँड रेसिंग नवी दिल्ली या संस्थेमार्फत 'बेस्ट  अपकमिंग पॉलीटेक्निक पुरस्कार' नॉलेज रिहू मासिकाकडून भारतातील टॉप टेन पॉलीटेक्निक मधील एक पॉलीटेक्निक म्हणून गौरव प्राप्त झालेले आहेत.  सामाजिक कार्यामध्ये गिरी यांनी कार्यतत्पर जबाबदार व पारदर्शी प्रशासनाचा ठसा उमटलेला आहे.

या संशोधनाबद्दल बोलताना  डॉ. गिरी म्हणाले या संशोधनातून हे तंत्र मराठी भाषांमधील माहितीचे संक्षिप्त सारांश तयार करण्यासाठी वापरले जाईल . सामान्यतः, मजकूर सारांश प्रक्रियेमध्ये संकल्पना गोळा करणे , त्यांचे महत्त्व ओळखणे, मुख्य कल्पनांना प्राधान्य देणे आणि सर्वात उपयुक्त माहिती निवडणे यांचा समावेश होतो. नैसर्गिक भाषा मधील वाक्यांचा सारांश करणे  हे सॉफ्टवेअर-अप्लिकेशन निर्माण करणार आहे. हे कौशल्य विद्यार्थ्यांना व सर्वसामान्यांना अभ्यास करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. माझ्या या यशामध्ये माझे कुटुंबीय, सर्व सहकारी, मित्रपरिवार व घोडावत मॅनेजमेंटचे सहकार्य लाभले आहे.
 
त्यांच्या या यशाबद्दल संजय घोडावत विद्यापीठाचे चेअरमन संजयजी घोडावत, विश्वस्त विनायक भोसले यांनी शुभेच्छा देऊन सन्मानित केले.

Monday, 26 June 2023

मौजे वडगांव येथे शाहू महाराज जयंती निमित्त वृक्षारोपण


हेरले /प्रतिनिधी  लोककल्याणकारी राजा राजर्षी छत्रपती शाहु महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून ग्रामपंचायतीच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. सदरच्या वृक्षारोपण शुभारंभापूर्वी ग्रामपंचायतीच्या वतीने लोकनियुक्त सरपंच कस्तूरी पाटील व उपसरपंच सुनिल खारेपाटणे यांच्या हस्ते प्रतिमेचे पुजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर ग्रामपंचायतीच्या आवारात विविध प्रकारच्या वृक्षांचे वृक्षारोपण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
           यावेळी सरपंच कस्तुरी पाटील, उपसरपंच सुनिल खारेपाटणे , ग्रामसेविका भारती ढेंगे , ग्रा.पं. सदस्य सुरेश कांबरे, रघूनाथ गोरड, स्वप्नील चौगुले, सविता सावंत, सुवर्णा सुतार, माजी सदस्य अविनाश पाटील, अमोल झांबरे, ज्ञानेश्वर सावंत, यांच्यासह ग्रा.पं. कर्मचारी व मान्यवर उपस्थित होते.

राजर्षी शाहू विद्यामंदिर शाळा शाळा नं 11 कसबा बावडा येथे लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

     कसबा बावडा प्रतिनिधी 
       लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्त मनपा राजर्षी शाहू विद्यामंदिर शाळा शाळा नं 11 कसबा बावडा येथे अभिवादन करताना आमदार श्री ऋतुराज पाटील दादा केंद्रमुख्याध्यापक  डॉ अजितकुमार पाटील भारत वीर मित्र मंडळाचे सामाजिक कार्यकर्ते सचिन चौगले ,विलास भोसले,मचिंद्र दाते,शरद पाटील, अभिजीत जाधव ,सुनील जाधव,आनंदा करपे श्रीराम सोसायटीचे संचालक, नगरसेवक माधुरीताई लाड, अशोक जाधव ,वंदना बुचडे,हरीश चौगले (बापू ),सुनिल पोवार,इतर मान्यवर उपस्थित होते.   
                                       
      कार्यक्रमाप्रसंगी आमदार ऋतूराज दादा पाटील यांच्या हस्ते महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षेत राज्यात तृतीय क्रमांक आल्याबद्दल श्रावणी पवार व जिल्ह्यात प्रथम आल्याबद्दल किमया चौगले हिचा सत्कार करण्यात आला.वर्गशिक्षक आसमा तांबोळी, तमेजा मुजावर,डॉ अजितकुमार पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
         शाळा व्यवस्थापन समितीचे दीपाली चौगले ,रमेश सुतार,गणेश घाटगे,साईराज दाभाडे,आरव लोंढे, रुद्र भोसले,हेमंतकुमार पाटोळे शाळेचे सर्व विध्यार्थी भारतवीर मित्र मंडळाचे सर्व जेष्ठ व तरुण पदाधिकारी उपस्थित होते.आभार अभिजित जाधव यांनी मानले.

Wednesday, 21 June 2023

मसोबा देवालयाच्या जागेवरील अतिक्रमण काढावे व इतर सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात या मागणीसाठी १००० ग्रामस्थांच्या सह्यांचे निवेदन

शिरोली/ प्रतिनिधी
 शिरोली ग्रामस्थांच्या वतीने  सरपंच व उपसरपंच यांना ग्रामदैवत मसोबा देवालयाच्या जागेवरील  अतिक्रमण काढावे व त्या ठिकाणी भिंतीचे किंवा तारेचे कुंपण घालून नागरिकांसाठी इतर सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात या मागणीसाठी १००० ग्रामस्थांच्या सह्यांचे निवेदन देण्यात आले.
यावेळी सरपंच सौ. पद्मजा करपे व उपसरपंच अविनाश कोळी यांनी सदर जागेचा पूर्वी केलेला मोजणी अहवाल मागून घेऊन त्वरित अतिक्रमण काढून कुंपण घालण्याचे आश्वासन दिले.
यावेळी कृती समितीच्या वतीने विठ्ठल पाटील, बाळासाहेब पुजारी, गिरीश फोंडे, अमृत उनाळे,रंगराव उनाळे, प्रशांत कागले, मानसिंग गावडे, योगेश खवरे, दशरथ पुजारी, दीपक उनाळे, रामचंद्र बुडकर, राजेंद्र पाटील, हरी पुजारी, वीरेंद्र मालेकर,ज्योती कांबळे, विशाल फोंडे, महेश फोंडे इत्यादी नागरिक उपस्थित होते.
 तसेच माजी ग्रामपंचायत सदस्य पिंटू करपे व ग्रामपंचायत सदस्य महंमद महात  यांनी देखील शिष्टमंडळाची चर्चा केली.
  शासकीय पातळीवर अक्षम्य गलथानपणाचे हे मूर्तिमंत उदाहरण आहे. यानंतर आतापर्यंत हे प्रकरण प्रलंबित आहे.
ग्रामपंचायत पासून ते तहसीलदार प्रांत कार्यालयापर्यंत या गोष्टीकडे दुर्लक्ष झाल्यामुळे  यावर पक्के काँक्रीटचे बांधकाम करण्याच्या तयारीत आहे. आपण त्वरित कारवाई करून हे अतिक्रमण काढावे. ग्रामस्थ यांच्या मसोबा देवालय व देवालयाच्या जागेसंबंधीच्या भावना तीव्र आहेत. आपण या एका महिन्याभरात कारवाई न केल्यास गावकऱ्यांच्या समोर आंदोलन करण्याशिवाय कोणताही पर्याय उरणार नाही. असा इशारा काँ. गिरीश फोडे यांनी यावेळी दिला
फोटो.....
पुलाची शिरोलीत ग्रामस्थांचे ग्रामपंचायतीला निवेदन सादर करताना काँ. गिरीश फोंडे, विठ्ठल पाटील रंगराव उनाळे, बाळासाहेब  पुजारी आदी.

मौजे वडगांव येथून पायी दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान

हेरले /प्रतिनिधी 
मौजे वडगांव (ता. हातकणंगले) येथून ह. भ . प. प्रकाश वाकरेकर (महाराज ) व ह.भ.प. अरविंद जाधव (महाराज ) यांच्या मार्गदर्शनाखाली आषाढी एकादशी निमित्त मौजे वडगांव व संभापूर येथील वारकरी सांप्रदयातील बांधवानी श्रीक्षेत्र पंढरपूर कडे प्रस्थान केले. गावातील मुख्य रस्त्यावरून टाळ व मृदंगाच्या गजरात विठ्ठल रखुमाई मारुती मंदिरात एकत्र जमा होऊन गावातील विविध संस्थाचे पदाधिकारी ग्रामपंचायत सरपंच , उपसरपंच, सदस्य तसेच भविकांच्या कडून निरोप देण्यात आला. यावेळी ह. भ. प. अरविंद जाधव ( महाराज ) म्हणाले की, मौजे वडगांव व संभापूर या दोन्ही गावातील मिळून शंभरहून अधिक वारकरी या दिंडी सोहळ्यात सहभाग घेतला आहे. या दिंडी सोहळ्याचे यंदाचे ९ वे वर्ष असून प्रत्येक वर्षी दिंडीतील वारकऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे.
        यावेळी दिंडी चालक हभप प्रकाश वाकरेकर ( महाराज ), अरविंद जाधव ( महाराज ), आण्णासो थोरवत, तुकाराम झांबरे, बाळासो चौगुले, भिमराव कांबरे,मालन गरड, संगिता तेली, कल्पना लोखंडे , तर संभापूर येथील नितिन मोहिते , प्रविण मेथे, पोपट पाटील, अशोक झिरंगे , सुरेखा पाटील, वर्षा झिरंगे, यांच्यासह वारकरी संप्रदायातील भजनी मंडळ व भक्त मंडळी उपस्थित होते.

राजर्षी शाहू विद्यामंदिर मध्ये योग दिन उत्साहात साजरा

कोल्हापूर प्रतिनिधी 

कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समिती संचलित राजश्री शाहू विद्यामंदिर शाळा क्रमांक 11 बावडा मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. 
   शाळेचे केंद्रमुख्याध्यापक डॉ. अजितकुमार पाटील यांनी तेजचंद्रा बहुउद्देशीय संस्था भोसलेवाडी या संस्थेच्या योगसाधक शोभा निलमवर व उज्वला चौगले यांचे गुलाब पुष्प व पुस्तक देऊन स्वागत केले. शाळेचे जेष्ठ शिक्षक उत्तम कुंभार सर यांनी प्रास्ताविक केले सुशील जाधव सर यांनी योगासनाचे महत्त्व व नियम समजावून सांगितले. 

या कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रमेश सुतार अनुराधा गायकवाड दिपाली चौगले ,नीलम पाटोळे तसेच शाळेतील इतर शिक्षक मिनाज मुल्ला उत्तम पाटील आसमा तांबोळी तमेजा मुजावर विद्या पाटील कल्पना पाटील,सावित्री काळे,हेमंतकुमार पाटोळे इत्यादी उपस्थित होते.
 कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन शाळेतील विद्यार्थी साईराज दाभाडे यांनी केले . 
सदर कार्यक्रमांमध्ये वृक्षासन प्राणायाम, ताडासन, वज्रासन, चक्रासन, हस्तआसन, त्रिकोणासन इत्यादी प्रात्यक्षिके उस्फूर्तपणे केली.

Sunday, 18 June 2023

हेरले (ता. हातकणंगले)येथील कौतुक विद्यालयामध्ये मिशन आयएएस हा कार्यक्रम संपन्न

हेरले / प्रतिनिधी
हेरले (ता. हातकणंगले)येथील कौतुक विद्यालयामध्ये मिशन आयएएस हा कार्यक्रम आयोजित केला होता. यामध्ये मी ' आयएएस. अधिकारी होणारच ! या विषयावर' मिशन आयएएसचे संचालक नरेशचंद्र काठोळे यांनी आयएएस होण्यासाठी इयत्ता दुसरी पासून कशी तयारी करावी कोणते प्रश्न सोडवावे यासंदर्भात खूप उत्कृष्ट मार्गदर्शन केले.  
     यावेळी कौतुक विद्यालय व हेरले हायस्कूल हेरले च्या इयत्ता दहावी तील गुणवंत यादीत आलेले विद्यार्थ्यांचा काठोळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. हेरले येथील कौतुक विद्यालयाचे विद्यार्थी हेरले हायस्कूलचे विद्यार्थी, केंद्र शाळा हेरले, शाळा नंबर दोन, कन्या शाळा हेरले या शाळेतील विद्यार्थी हजर होते. हा कार्यक्रम अनुश्याम मंगल कार्यालय येथे  पार पडला. कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विश्वास पवार, संचालक सुनील भोसले, नितीन कारंजे मुख्याध्यापक शाळेचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

   फोटो 
 हेरले : आयएएस अधिकारी होणारच ! या विषयावर' मिशन आयएएसचे मार्गदर्शक संचालक नरेशचंद्र काठोळे यांच्या समवेत विद्यार्थी.

Friday, 16 June 2023

मौजे वडगाव विद्यामंदिर मध्ये नवागतांचे उत्साहात स्वागत

हेरले (प्रतिनिधी) उन्हाळी सुट्टी संपल्यानंतर शासनाच्या निर्देशानुसार १५ जून रोजी शाळा सुरु झाल्या आसून पहिल्या दिवशी विद्यार्थी शाळा प्रवेशाचा उत्सव म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी मोफत शालेय पाठ्य पुस्तके व खाऊचे वाटप करून मुलांच्या शाळेचा पहिला दिवस अविस्मरणीय करण्यात आला. यावेळी मुलांच्या किलबिलाटाने शाळेचा आवार गजबजला आणि पुन्हा शाळा सुरु झाल्याने विद्यार्थी, शिक्षक , पालकांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. यावेळी शाळेची माजी विद्यार्थीनी मानसी काकडे हिची मुंबई पोलिस दलामध्ये निवड झालेबद्दल शाळेच्या वतीने तीचा सत्कार करण्यात आला तसेच प्रमुख मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली.
         यावेळी उपसरपंच सुनिल खारेपाटणे , ग्रा.पं. सदस्य सुरेश कांबरे, स्वप्नील चौगुले , माजी ग्रा.पं. सदस्य अविनाश पाटील, व्यावस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष मोरे, अमोल झांबरे, मुख्याध्यापक आप्पासो पाटील, देवदत्त कुंभार , योगेश पाकले फिरोज मुल्ला, वैशाली कांबळे , सायली चव्हाण , यांच्यासह शिक्षक, शिक्षिका , पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फोटो 
विद्यामंदिर शाळेमध्ये नवागतांचे स्वागत करतांना ग्रा. पं . पदाधिकारी , मुख्याध्यापक ' शिक्षक, शिक्षिका , व पालक.

Thursday, 15 June 2023

विद्यार्थ्यांनी सखोल अभ्यास करावा - डॉ विजय पाटील सहा.आयुक्त कोल्हापूर .

कोल्हापूर प्रतिनिधी - 
आज मनपा राजर्षी शाहू   विद्यामंदिर क्र . 11  कसबा बावडा येथे   परिसर सुशोभीकरण आणि विविध शैक्षणिक गीते अशा चैतन्यमय वातावरणात शाळा प्रवेशोत्सव संपन्न झाला. 
 कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती  प्रतिमेच्या  फोटो पूजनाने करण्यात आली. फोटो पूजन सहाय्यक आयुक्त विजय पाटील,केंद्रमुख्याध्यापक डॉ अजितकुमार पाटील, आरोग्य अधिकारी नंदकुमार पाटील,शाळा व्यवस्थापन अध्यक्ष रमेश सुतार, उपाध्यक्षा अनुराधा गायकवाड  यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी दाखलपात्र विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प  देऊन मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले . तसेच नवागतांच्या हातात फुगे देण्यात आले व मान्यवरांच्या हस्ते पाठ्यपुस्तक वाटप करण्यात आले. वर्गात प्रवेश करताना सुमनांचा वर्षाव करण्यात आला .अशा प्रकारे पहिलीच्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव सहाय्यक आयुक्त विजयकुमार पाटील,केंद्रमुख्याध्यापक डॉ अजितकुमार पाटील,आरोग्य अधिकारी नंदकुमार पाटील, आरोग्य मुकादम मनोज कुरणे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रमेश सुतार, उपाध्यक्ष अनुराधा गायकवाड , सर्व सदस्य, मुख्याध्यापिका कल्पना पाटील ,सर्व  शिक्षक व सेवक यांच्या उपस्थितीत सपन्न झाला.
सहाय्यक आयुक्त डॉ विजय पाटील यांनी विद्यार्थ्यांनी सखोल अभ्यास करावा. शालेय जीवनात दैनंदिन व्यवहारात खेळासाठी एक तास,व्यवहार  ज्ञान,ध्यानधारणा करावी.मोबाईल पासून योग्य असे वापर करावा. असे प्रतिपादन केले.
केंद्रमुख्याध्यापक डॉ अजितकुमार पाटील यांनी विद्यार्थ्यांनी एकविसाव्या शतकाला सामोरे जाण्यासाठी दररोज एक तास व्यायाम आहार व ध्यानधारणा करून मन शांत राखण्याचा प्रयत्न करावा दररोज योगासने घालावी.सुर्यनमस्कार घालावा घरातील इतर कामे करून घरामध्ये सुद्धा आई-वडिलांचे  आज्ञाचे पालन करून योग्य अभ्यास करावा शिक्षणानेच समाज संस्कृत बनणार आहे असे प्रतिपादन केले  

सदर कार्यक्रमासाठी शाळेतील ज्येष्ठ शिक्षक उत्तम कुंभार सुशील जाधव उत्तम पाटील तमेजा मुजावर,आसमा तांबोळी मीनाज मुल्ला विद्या पाटील कल्पना पाटील सावित्री काळे हेमंतकुमार पाटोळे यांनी सहकार्य केले शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य दिपाली चौगले अनुराधा गायकवाड अध्यक्ष रमेश सुतार यांनी सहकार्य केले कार्यक्रमाचे आभार साईराज दाभाडे यांनी मांनले.

Tuesday, 13 June 2023

मौजे वडगांव येथे शांतता कमिटीची बैठक

       हेरले /प्रतिनिधी  
गुन्हा नोंद करण्यासाठी नव्हे तर स्पर्धा परिक्षेच्या मार्गदर्शनासाठी माझा उपयोग करुण घ्यावा असे मत शिरोली पोलिस ठाण्याचे सपोनि सागर पाटील यांनी व्यक्त केले ते मौजे वडगाव (ता. हातकणगले ) येथे ग्रामपंचायतीच्या सभाग्रहात शांतता समितीच्या बैठक प्रसंगी बोलत होते.
         आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याच्या प्रकारातून कोल्हापूर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेचे पडसाद इतर ठिकाणी उमठण्याची शक्यता लक्षात घेऊन शिरोली पोलिस ठाण्याच्या वतीने खबरदारी घेतली आहे. मौजे वडगांव येथे सोमावार दि १२ रोजी संध्याकाळी ८ वा. शांतता कमिटीची बैठक बोलविण्यात आली होती. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी कोठेही कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्वांनी दक्षता घ्यावी. सर्व धर्मिय व सर्व पक्षियांना शांततेचे आवाहन करण्यात आले .
          या शांतता बैठकीला उपसरपंच सुनिल खारेपाटणे , शिवसेना शाखाप्रमुख व ग्रा. प सदस्य सुरेश कांबरे , स्वप्नील चौगुले,माजी ग्रां पं. सदस्य अविनाश पाटील, रघूनाथ गोरड, माजी सरपंच सतिशकुमार चौगुले , श्रीकांत सावंत ,रावसो चौगुले, अमोल झांबरे, प्रताप रजपूत , महेश कांबरे, मोहन शेटे,रांझा पटेल, अमिरहमजा हजारी , यासिण मुल्लाणी , सलिम हजारी , हसण बारगीर , पोलिस पाटील, यांच्यासह विविध पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

फोटो 
शांतता कमिटीच्या बैठकीत मार्गदर्शन करतांना सपोनि सागर पाटील व इतर मान्यवर

Monday, 12 June 2023

दहावीच्या परीक्षेत मुरगुड विद्यालयाची दिव्या गुरव कागल तालुक्यात द्वितीय, मुरगुड केंद्रात प्रथम


दहावीचा निकाल 98.62 ,विक्रमी निकालाने समाधान

कोल्हापूर / प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत मुरगुड विद्यालय जुनियर कॉलेज मुरगुड मधील दिव्या  गुरव हिने 98.40 टक्के गुण प्राप्त करून मुरगूड केंद्रात प्रथम क्रमांक पटकावला तर सृष्टी पाटील 98.20 व प्रतीक खराडे 98  टक्के गुण मिळवून केंद्रात द्वितीय व तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले.
       शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर संचलित मुरगुड विद्यालय जुनिअर कॉलेज मुरगुड चा दहावीचा यावर्षीचा निकाल 98.62 टक्के इतका विक्रमी लागला असून 90 टक्के च्या वरती 19 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 80 टक्के च्या वरती 48 तर 75 टक्के च्या वरती 16 व 60 टक्के च्या वरती साठ विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. ‌
        दीपिका लुगडे( 96.40) संचित चौगले (96) मृणाल कापसे (95.80) यश भोई (95.60) अंकिता शेटके (95) धनश्री टेंबुगडे ( 95 ) सुमित आरेकर( 95) अमृता तांबेकर( 94.60) रसिका कांबळे (94) उत्कर्षा मुसाई (93.60) सृष्टी लाड (93.20) सई मोरबाळे (92 80) रोहित इंदलकर (92.80) रणवीर मडीलगेकर (92 ) पायल टेंबुगडे, 91.60 आरती बेलवलेकर (91. 40) भक्ती भांदीगरे ( 91.40) मीनाक्षी पठाडे (91.20) तेजस कटके( 90.60) ज्ञानेश्वरी कोळेकर( 90.60) प्रज्वली काळुगडे (90.20) राजनंदिनी शिऊडकर (90.20) श्रद्धा फराकटे ( 90.20) मधुरा तावडे (90.20) तनिष्का चव्हाण (90.20) अंकिता पाटील( 90.20)
   यशस्वी विद्यार्थ्यांना शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूरचे सेक्रेटरी प्रा. जयकुमार देसाई , अध्यक्षा श्रीमती शिवानीताई देसाई, उपाध्यक्ष शिवाजीराव सावंत, चेअरमन मंजिरी देसाई मोरे,युवा नेते  पेट्रन कौन्सिल मेंबर  दौलतराव देसाई, कोजिमाशीचे ज्येष्ठ संचालक, कौन्सिल मेंबर प्राचार्य बाळ डेळेकर, शालेय समिती चेअरमन प्रवीणसिंह पाटील, प्राचार्य एस. आर .पाटील, उपप्राचार्य एस. पी. पाटील, उपमुख्याध्यापक एस.बी.सुर्यवंशी, पर्यवेक्षक एस.एच.निर्मळे यांचे प्रोत्साहन व सर्व विषय शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.मुरगुड विद्यालय जुनिअर कॉलेजचा 10वी चा यावर्षीचा निकाल चांगला लागल्याने पालक, विद्यार्थी वर्गात समाधानाचे वातावरण दिसत आहे.

Saturday, 3 June 2023

वडगाव विद्यालय (ज्युनि. कॉलेज व तंत्र शाखा) वडगाव (ता. हातकणंगले) चा सन - २०२२ -२३ एस.एस.सी. बोर्ड परीक्षेचा निकाल ९८.१३%

पेठ वडगाव / प्रतिनिधी

 वडगाव विद्यालय (ज्युनि. कॉलेज व तत्र शाखा) वडगाव (ता. हातकणंगले) चा सन - २०२२ -२३ एस.एस.सी. बोर्ड परीक्षेचा निकाल ९८.१३% लागला. या परीक्षेस एकूण बसलेले विद्यार्थी  १६१,उत्तीर्ण झालेले विद्यार्थी - १५८ आहेत.
गुणानुक्रमे पहिले तीन क्रमांक 
प्रथम क्रमांक - कु. श्रध्दा मुरलीधर पाटील (९९.००% ),द्वितीय क्रमांक कु. आर्या सचिन गुरव ( ९८.४०% ) तृतीय क्रमांक - कु. भक्ती अजित लाड (९४.२०% )
टेक्निकल विषयाचा निकाल १००%  लागला आहे.संस्कृत विषयाचा निकाल  १००% व सेमी माध्यमचा ही निकाल १००% लागला आहे.
   टेक्निकल विभागात प्रथम क्रमांक
कु. विद्या शामराव भातडे (८६.००%)
मागासवर्गीयात प्रथम क्रमांक कु. अंजनी सचितानंद आवळे ( ८६.६०% ) या यशस्वी विद्यार्थ्यांना शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूरचे, सेक्रेटरी प्रा.जयकुमार देसाई , अध्यक्षा श्रीमती शिवानीताई देसाई , उपाध्यक्ष शिवाजीराव सावंत , चेअरमन प्रा. डॉ.मंजिरी देसाई मोरे , युवा नेते पेट्रन कौन्सिल मेंबर दौलतराव देसाई, कौन्सिल मेंबर मुख्याधापक  बाळ डेळेकर, माजी मुख्याध्यापक डी.‌के .पाटील,उपमुखाध्यापक एस.डी.माने , पर्यवेक्षिका सौ. आर.आर पाटील , तंत्र विभाग प्रमुख ए .एस .आंबी , मुख्य लिपिक .के.बी. वाघमोडे परीक्षा विभाग प्रमुख डी. एस. शेळके, जेष्ठ शिक्षक डी.एस. कुंभार, मिलींद बारवडे आदी मान्यवरांसह वर्गशिक्षक , विषय शिक्षक यांचे बहुमोल मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले. या वर्षी ही दहावी निकालाची उज्वल परंपरा कायमस्वरूपी ठेवल्याने विद्यार्थी ,
पालकवर्ग, माजी विद्यार्थी यांनी समाधान व्यक्त केले आहे.

सरपंचांना विशेष कार्यकारी अधिकारी पद मिळावे या मागणीसाठी लेखी निवेदन

हेरले / प्रतिनिधी

हेरले (ता.हातकणंगले) ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच राहुल शेटे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सरपंचांना विशेष कार्यकारी अधिकारी पद मिळावे या मागणीसाठी ग्रामपंचायतीने ठराव करून या ठरावानुसार लेखी निवेदन ईमेल द्वारे पाठवून मागणी केली आहे. सदर मागणीच्या निवेदनाची प्रत नामदार दिपक केसरकर यांना दिली आहे.
   ग्रामपंचायत हेरलेने विशेष कार्यकारी अधिकारी पद मिळणेसाठी केलेला ठराव पुढील प्रमाणे आहे. मासिक सभा क्र.२ दिनांक २४/०५/२०२३ ठराव क्रमांक ०७
चा करणा पुरता उतारा.विषय नं.७ सरपंच यांना विशेष कार्यकारी अधिकारी पद मिळणे बाबत. ठराव नं. ७ गावातील नागरिकांना शासकीय निमशासकीय शैक्षणिक व इतर काम योजना करत असत त्यांना त्यांचे कागद पत्रांची खरी प्रत करून घ्यावी लागते. खरी प्रत शिवाय कार्यालयीन कामकाज पूर्ण होत नाही. यामुळे नागरिकांना खरी प्रत घेण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागतो व इतरत्र हेलपाटे माराव्या लागतात. त्यामुळे 
 सरपंच हे लोकनियुक्त असलेने गावाचा गावगाडा ओढत असलेने त्यांना गाव परिचित असते. त्यामुळे त्यांना खरी प्रत करून देण्याचा अधिकार देण्यात यावा. "विशेष कार्यकारी अधिकारी हे पद मिळावे यासाठी या ठरावाने तशी मागणी करण्यात यावी. या ठरावाचे सूचक  अमित आदगोंडा पाटील, अनुमोदक सौ. सविता बाळगोंडा पाटील असून
सर्वानुमते  हा ठराव मंजुर झाला असून सरपंच राहुल शेटे व ग्रामविकास अधिकारी बी.एस. कांबळे यांच्या या ठरावावर सहया आहेत.

Thursday, 1 June 2023

नागपूर रत्नागिरी रस्त्यावर हेरले येथे भुयारी मार्ग करावा....

हेरले / प्रतिनिधी

नागपूर रत्नागिरी  नवीन राष्ट्रीय महामार्गाचे  काम सुरू आहे.पण हा रस्ता करत असताना शेतकऱ्यांच्या अडचणीचा विचार न करता काम सुरू असून  हेरले (ता. हातकणंगले) सिद्धेश्वर डोंगराकडे जाणाऱ्या एक हजार एकर क्षेत्रातील शेतकऱ्यांना भुयारी मार्ग करावा अशी मागणी शेतकऱ्यांतुन होत आहे. 
           याबाबत अधिक माहिती अशी की हेरले गावातील बहुतांशी लोकांचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे.  हेरले येथील सिद्धेश्वर डोंगर परिसरातून एक हजार हून अधिक क्षेत्रात ऊसाची शेती केली जाते.  सध्या नवीन  नागपूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग बांधण्याचे काम सुरू आहे. हेरले येथील असंख्य शेतकऱ्यांच्या पीकाऊ उत्तम दर्जाच्या शेतजमिनी रस्त्यामध्ये गेलेल्या आहेत. या भागातील शेतकऱ्यांनी सुद्धा रस्त्याच्या कामासाठी कोणतीही अडचण केलेली नाही.  पण सध्या या नवीन राष्ट्रीय महामार्गा च्या उत्तरेला एक हजार एकर शेती पीकाऊ स्वरूपाची आहे.मसोबा मंदिर छत्री पाव ओढ्यातून सिद्धेश्वर डोंगराकडे जाणाऱ्या मुख्य  रस्त्यावर उत्तरेकडे जाण्यासाठी भुयारी मार्ग करावा.  जेणेकरून ऊस वाहतूक सह शेतकऱ्यांना इजा न होता सुरक्षित मार्ग तयार होईल. पण या राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यानी शेतकऱ्यांच्या अडचणी न पाहता एक कलमी कार्यक्रम राबवला आहे.  अधिकाऱ्यांच्या नियोजनानुसार शेतकऱ्यांना उत्तरेकडे जाण्यासाठी आपला, व आपल्या जनावरांचा जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडावा लागणार आहे. असा धोकादायक प्रवास करणे शेतकऱ्यांच्या व जनावरांच्या जीवावर उठू शकतो.  त्यासाठी या रस्त्यावर उत्तरेकडे जाणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी मोठ्या स्वरूपात भुयारी मार्ग करावा अशी मागणी हेरले गावातील शेतकऱ्यांच्या कडून होत आहे.

फोटो:-हेरले येथे नागपूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असताना

प्रतिक्रिया

 विजय कारंडे....
 सिद्धेश्वर डोंगर परिसरात 1000 एकर क्षेत्र  शेतीचे असून बहुतांशी क्षेत्रात उसाची शेती केली जाते. ऊस वाहतुकीसह  जनावरांनाही  घेऊन  महामार्गावरून रस्ता ओलांडणे  धोक्याचे आहे  तरी शासनाने आमच्या मागण्यांचा विचार करावा  आणि भुयारी मार्ग तयार करून द्यावा

डॉ. संगिता चौगुले व संगिता सावंत ' 'पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर ' पुरस्काराने सन्मानित


हेरले /प्रतिनिधी  
महिला व बालविकास क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल मौजे वडगांव ( ता . हातकणंगले ) येथील डॉ. संगिता चौगुले व सामाजिक कार्यकर्त्यां  संगिता सावंत या दोन महिलांचा ग्रामपंचायतीच्या वतीने 'पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर' पुरस्कार  देऊन गौरविण्यात आले आसल्याची माहिती निवड समितीचे अध्यक्ष तथा लोकनियुक्त सरपंच कस्तुरी पाटील यांनी दिली.
             महिला व बालविकास विभाग महाराष्ट शासन यांच्या आदेशाने व ग्रामपंचायत मौजे वडगाव यांच्यावतीने ग्रामपंचायतीच्या  क्षेत्रामध्ये महिला सक्षमीकरण , महिला स्वयंसहायता बचत गट , आरोग्य , साक्षरता , यासारख्या कार्यामध्ये उल्लेखनीय कार्य करून महिलांना प्रोत्साहन देण्याचे काम केले आहे. या कामांची दखल घेऊन त्यांना सरपंच कस्तुरी पाटील व उपसरपंच सुनिल खारेपाटणे यांच्या हस्ते सन्मान पत्र , सन्मानचिन्ह , शाल, श्रीफळ, व रोख रक्कम देऊन पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी ग्रा. पं . सदस्य सुरेश कांबरे व अविनाश पाटील तसेच पुरस्कार प्राप्त महिलांनी आपली मनोगते व्यक्त केली.
               यावेळी सरपंच कस्तुरी पाटील , उपसरपंच सुनिल खारेपाटणे , ग्रामसेविका भारती ढेंगे , माजी उपसरपंच व विद्यमान ग्रा. पं . सदस्य सुरेश कांबरे, रघूनाथ गोरड ,स्वप्नील चौगुले , अविनाश पाटील , अमोल झांबरे,सविता सावंत, सुवर्णा सुतार, सुनिता मोरे ,दिपाली तराळ , डॉ. वाघमोडे मॅडम , डॉ. पंकज पाटील, पोलिस पाटील, यांच्यासह ग्रा.पं. कर्मचारी अंगणवाडी सेविका आशा वर्कर व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

फोटो 
ग्रामपंचायतींच्या वतीने पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर पुरस्कार देताना मान्यवर