Tuesday, 29 August 2023

हेरले गावातील सहकाराची चळवळ बळकट करण्यासाठी छत्रपती ग्रुप च्या माध्यमातून विविध संस्था काढू राजेश पाटील


हेरले / प्रतिनिधी
हेरले गावातील सहकाराची चळवळ बळकट  करण्यासाठी यापुढे छत्रपती ग्रुपच्या माध्यमातून विविध  संस्था काढून छत्रपती शिवाजी ग्रुप ची घौडदौड कायस्वरूपी  चालू राहील असे प्रतिपादन  माजी सभापती राजेश पाटील यांनी  हेरले ( ता. हातकणंगले ) येथील श्री छत्रपती शिवाजी विविध कार्यकारी सहकारी (विकास) सेवा  संस्थेची २८ व्या  सर्वसाधारण सभा प्रसंगी बोलत होते.
       यावेळी  संस्थेचे सचिव नंदकुमार माने  यांनी अहवाल वाचन केले तर सभेच्या अध्यक्षस्थानी चेअरमन अशोक मुंडे होते .मोठ्या उत्साहात व खेळीमेळीत संपन्न झाली. 
         चेअरमन अशोक मुंडे म्हणाले,गेली काही वर्षांमध्ये संस्थेमध्ये अत्यंत काटकसरीने कारभार केला असल्याने ठेवी  व कर्जामध्ये वाढ झाली असल्यामुळे संस्थेस ४ लाख ४  हजार इतका नफा झाला आहे. सभासदांसाठी संस्थेमार्फत ठिबक सिंचन साठी अर्थसहाय्य करणार.संस्थेच्या प्रगतीत संचालक मंडळ व कर्मचारी यांचे योगदान मोलाचे आहे.
           या प्रसंगी  सरपंच राहुल शेटे, स्वाभिमानी शेतकरी संघटना सरचिटणीस मुनिर जमादार,शेतकरी सोसायटी चेअरमन अरविंद चौगुले,सुरेश चौगुले  यांनी मनोगते व्यक्त केली.
        या सभेस जवाहर पतसंस्थेचे शाखा चेअरमन अबूबकर जमादार,व्हा चेअरमन कपिल भोसले, उदय चौगुले, कृष्णात खांबे, शशिकांत पाटील, सुनील खोचगे, नितीन चौगुले, संजय पाटील, राजेंद्र कदम, स्वप्नील कोळेकर,  शांतादेवी कोळेकर, सुजाता पाटील,सुकुमार कोळेकर, रावसाहेब चौगुले, पांडू चौगुले, संजय परमाज,आदी मान्यवरांसह  सभासद, संस्थेच कर्मचारी, हितचिंतक मोठया संख्येंनी उपस्थित होते  आभार व्हा. चेअरमन कपिल भोसले  यांनी मानले.

फोटो:-हेरलेत छत्रपती शिवाजी विकास सेवा संस्थेत मार्गदर्शन करत असताना माजी सभापती राजेश पाटील

मौजे वडगाव हनुमान दुध संस्थेचा इमारत पायाभरणी शुभारंभ


हेरले / (प्रतिनिधी ) 

मौजे वडगांव ( ता. हातकणंगले) येथील जय हनुमान सह. दुध व्याव. संस्थेच्या इमारतीचा भुमीपुजन व पायाभरणी शुभारंभ संस्थेचे संचालक जयवंत चौगुले,  सभासद जीवन चौगुले, व आनंदा थोरवत यांच्या शुभहस्ते व सपत्नीक शुभारंभ करण्यात आला.
        जय हनुमान दुध संस्थेची स्थापना २०० ७ साली झाली असून संस्थेने कमी कालावधीत दुध संकलनाचा मोठा टप्पा पार केला आहे. सध्या संस्थेचे दररोज १५०० लिटर दुध संकलन असून संस्थेने स्वमालकीची जागा खरेदी केली आहे. सध्या याच जागेवर दोन मजली इमारत बांधकामचा आज शुभारंभ करण्यात आला आहे. या इमारतीचा पायाभरणी शुभारंभ केल्याने दुध उत्पादक व सभासदांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
          यावेळी चेअरमन सतिशकुमार चौगुले, व्हा.चेअरमन इंदूबाई नलवडे, संचालक महादेव शिंदे , रावसाहेब चौगुले, बाळासो थोरवत, सुरेश कांबरे, शकील हजारी, नेताजी माने, सुभाष मुसळे , महादेव चौगुले, जयश्री यादव, जयश्री रजपूत, धोंडिराम चौगुले, सुनिल सुतार, सचिव आण्णासो पाटील, कर्मचारी विलास घुगरे,यांच्यासह संस्थेचे दुध उत्पादक सभासद मोठ्या संस्थेने उपस्थित होते.

फोटो 
जय हनुमान दुध संस्थेच्या इमारत पायाभरणी शुभारंभ प्रसंगी संस्थेचे पदाधिकारी व दुध उत्पादक सभासद

Sunday, 27 August 2023

किशोर मुसळे चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई मार्फत वडगाव विद्यालयात ११ हजार झाडांचे वाटप.


पेठवडगाव / प्रतिनिधी

   कोजिमाशि पतसंस्थेचे  चेअरमन प्राचार्य लक्ष्मण उर्फ बाळ डेळेकर यांच्या प्रयत्नातून किशोर मुसळे चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई ( के.एम. सी. टी.) यांनी वडगाव विद्यालय ( ज्युनि. कॉलेज/ तंत्रशाखा) पेठवडगाव या विद्यालयास सुमारे पाच लाख रुपये किंमतीची पेरू, जांभुळ, सिताफळ, चिंच या फळांची व बांबू आदीची ११ हजार झाडे प्रदान केली.
   वृक्षारोपण व रोपवाटप  कार्यक्रम प्रसंगी किशोर मुसळे चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई ( के.एम.सी. टी.) संस्थापक विश्वनाथ पोयेकर,सीएसआर मुख्य विवेकानंद सावंत,पर्यावरण विभाग प्रमुख शरद घनवट, समन्वयक अब्दुल शेख, फ्लीट ग्राफिक्स डिझायनर प्रेमकुमार हुबळे, माजी मुख्याध्यापिका सौ. एस .ए. कुलकर्णी , माजी उपनगराध्यक्ष रंगराव पाटील, माजी उपनगराध्यक्ष सुकुमार पाटील आदी मान्यवरांच्या उपस्थित हा कार्यक्रम संपन्न झाला. अध्यक्षस्थानी प्राचार्य बाळ डेळेकर होते.
   या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक उपमुख्याध्यापक सुधाकर निर्मळे यांनी केले.फ्लीट ग्राफिक्स डिझायनर प्रेमकुमार हुबळे यांनी ट्रस्टच्या वतीने १० लाख झाडांची वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट कार्यक्रमा अंतर्गत केएमसीटीच्या सामाजिक सेवेच्या कार्याचा आढावा घेतला.  
    संस्थापक विश्वनाथ पोयेकर म्हणाले  ट्रस्टने पालघर सारख्या दुर्गम भागात केलेली झाडांची लागवड, गरीब व गरजू विद्यार्थी यांच्यासाठी शाळांची निर्मिती , अन्नछत्र , निवाऱ्याची सोय , डिजिटल क्लासरूमची सोय , कोरोनाच्या काळात विविध भागात पोलीस बंधु भगिनी यांचेसाठी नाष्टयाची सोय, विविध भागात पिण्याच्या पाण्याची सोय केली. संस्थेच्या कार्याची माहिती देऊन ट्रस्टच्या सामाजिक कार्याचा आढावा घेतला.
     सीएसआर मुख्य विवेकानंद सावंत यांनी प्रशालेतील मुलांशी प्रश्नोत्तराच्या  माध्यमातून झाडांचे महत्त्व विशद केले.विद्यार्थ्यांच्याकडून झाडे लावून जगवण्याची ग्वाही घेतली व त्याचे फोटो संस्थेला पाठवण्याचे आवाहन केले.विद्यालयासाठी डिजिटल क्लासरुम व पाणी फिल्टर यंत्र देण्याची या प्रसंगी त्यांनी घोषणा केली. 
    प्राचार्य बाळ डेळेकर म्हणाले,
या शाळेने आम्हाला घडविले आहे. म्हणून शाळेच्या उन्नत्तीसाठी  विविध उपक्रम राबवित आहोत.शाळेतील विद्यार्थी अतिशय गरीब कुंटूंबातील असून विद्यालयात शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांसाठी माझ्या प्राचार्य पदाच्या कालावधीत अनेक उपक्रम माझे स्वतःचे वेतन खर्च करुन राबवत असून त्याचा मला मनस्वी आनंद आहे. केएमसीटी संस्थेने ११ हजार  झाडांची अनमोल
भेट शाळेस देऊन हातभार  लावला आहे. या ११ हजार  झाडांची विद्यार्थी लावगड करून सर्व झाडांचे संवर्धन करून मोठी करतील असे आश्वासन दिले. या वेळी प्रमुख मान्यवरांच्या अमृत हस्ते रोपांचे विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले.           
          या प्रसंगी संस्थेचे मुख्य लिपिक के. बी. वाघमोडे,परीक्षा विभाग प्रमुख डी.ए.शेळके, तंत्र विभाग प्रमुख अविनाश आंबी, जेष्ठ शिक्षक डी.एस.कुंभार ,सौ. एस.एस.चव्हाण, ए. डी. जाधव, विठ्ठल कुंभार आदी मान्यवरांसह शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.छायाचित्रण डी. एस. कुंभार व सचिन पाटील यांनी केले. सूत्रसंचालन अजीत लाड यांनी केले.. कार्यक्रमाचे आभार पर्यवेक्षिका सौ.आर.आर. पाटील यांनी मांनले.
   फोटो
वडगाव विद्यालयात रोपवाटप कार्यक्रमात मान्यवर व सर्व विद्यार्थी रोपे उंचावून दाखविताना.

Monday, 21 August 2023

राजर्षी शाहूंच्या विचारांचा वारसा शाहू चे विद्यार्थी जपत आहेत - - डॉ नेताजी पोवार


शाळेचा 152 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

कोल्हापूर प्रतिनिधी 
 मनपा राजर्षी शाहू विद्या मंदिर नंबर 11 शाळेचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पाहुणे कमला महाविद्यालयचे प्राध्यापक डॉ एन व्ही पवार, Innerwheel club च्या अध्यक्षा  मनिषा जाधव मॅडम,वृषाली बाड, सुरेखा जाधव,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रमेश सुतार,उत्तम कुंभार, उत्तम पाटील,सुशिल जाधव हे प्रमुख उपस्थित होते.
प्रथमतः शाळेचे केंद्र मुख्याध्यापक डॉ अजितकुमार पाटील सर यांनी कार्यक्रमचे प्रास्ताविक करून शाळेमधे घेण्यात येणार्‍या विविध उपक्रमांची माहिती दिली, तसेच MSTS, ऋणानुबंध परीक्षा, रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आदी स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले बद्दल प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते देणगीदार पालक,विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
संदीप सुतार,जोतिबा बामणे,अक्षय खोत,तेजस्विनी कुराडे यांनी वर्धापनदिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप केल्या.
अध्यक्षा मनीषा जाधव मॅडम यांनी शाळेमधे मुलांवर होणाऱ्या चांगल्या संस्कार चे कौतुक केले. तसेच डॉ एन व्ही पवार यांनी शिक्षणातून मुलांचा सर्वांगीण विकासासाठी शाळा करत असलेले प्रयत्न वाखाणण्याजोगे आहेत या शब्दात शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक यांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री उत्तम कुंभार सर यांनी केले. व आभार तमेजा मुजावर मॅडम यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचा सर्व शिक्षक स्टाफ यांनी प्रयत्न केले.

Sunday, 20 August 2023

वडगाव विद्यालय ज्युनि. कॉलेज / तंत्र शाखा वडगाव या शाळेस " संत सोपानकाका सुंदर माझी शाळा” पुरस्कार

पेठ वडगाव /प्रतिनिधी

  वडगाव विद्यालय ज्युनि. कॉलेज / तंत्र शाखा वडगाव या शाळेस " संत सोपानकाका सुंदर माझी शाळा”हातकणंगले तालुका प्रथम क्रमांक पुरस्काराने गौरवण्यात आले. कोजिमाशी चेअरमन प्राचार्य बाळ डेळेकर यांच्या कार्यकुशलतेने या पुरस्काराचा बहुमान विद्यालयास प्राप्त झाला.
   संत सोपानकाका सहकारी बैंक लि. सासवड, श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ सासवड, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने“संत सोपानकाका सुंदर माझी शाळा”पारितोषिक वितरण समारंभ २०२२ -२०२३ या वर्षातील कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या विद्याभवन शिवाजी पार्क,कोल्हापूर  येथील सभागृहामध्ये संपन्न झाला. अध्यक्षस्थानी शिक्षक नेते दादासाहेब लाड होते.या प्रसंगी प्रमुख मान्यवर कोजिमाशी चेअरमन प्राचार्य बाळ डेळेकर, बी. जी. बोराडे, सचिव दत्ता पाटील,खंडेराव जगदाळे, प्राचार्य डी.एस. घुगरे संपर्क प्रमुख अशोक हुबाळे, सागर चुडाप्पा यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
     वडगाव विद्यालय ज्युनि. कॉलेज l तंत्र शाखा वडगावमध्ये सुंदर वृक्ष लागवड व संगोपन, अटल लॅब, प्रशस्त सांस्कृतीक सभागृह, प्रशस्त चित्रकला हॉल, प्रशस्त प्रार्थना मैदान, सुसज्ज प्रयोगशाळा, निटनेटके अध्यापन वर्ग, प्रशस्त क्रीडा मैदान, एनसीसी ट्रूप, सुसज्ज स्टाफ रूम, निटनेटके कार्यालय, प्रशस्त वॉशरूम,  सुसज्ज टेक्निकल हॉल, सुसज्ज ग्रंथालय, प्रशस्त सुंदर इमारत, आदी संपन्न भौतिक सुविधासह प्रत्येक वर्षी दहावी व बारावी बोर्ड परीक्षेतील उतुंग यशाची परंपरा, शासकिय व अशासकीय स्तरावरील विविध स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांचे यश, शासकिय चित्रकला परीक्षेतील शंभर टक्के निकालाची परंपरा, उत्कृष्ठ छात्रसैनिकांचे प्रशिक्षण व संचलन,शिस्तप्रिय, कर्तव्यदक्ष, कार्यतत्पर प्राचार्य बाळ डेळेकर, शिक्षकवृंद व विद्यार्थी यांच्या विविध गुण संपन्न पैलुंचे परीक्षण होऊन हा पुरस्कार शाळेस प्राप्त झाला.
        प्राचार्य बाळ डेळेकर म्हणाले या पुरस्कारासाठी  'शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर ' अध्यक्षा श्रीमती शिवानीताई देसाई,उपाध्यक्ष शिवाजी सावंत, सेक्रेटरी जयकुमार देसाई, पेट्रन कौन्सिल सदस्य  युवा नेते दौलत देसाई,चेअरमन 
सौ. मंजिरी मोरे देसाई यांचे बहुमोल सहकार्य व पाठबळ लाभले. तसेच शिक्षकवृंद , सेवक वर्ग व विद्यार्थी यांचे सहकार्य लाभल्याने शाळेस हा बहुमान प्राप्त झाला.
       “संत सोपानकाका सुंदर माझी शाळा”पुरस्कार प्राप्त झालेच्या सन्मार्थ विद्यालयामध्ये कार्यक्रम संपन्न झाला. या प्रसंगी प्राचार्य बाळ डेळेकर यांच्या हस्ते सेवक वर्ग सतीश पाटोळे, नेताजी कुरवडे, बाबासाहेब पाटील, अविनाश कोळी, रविंद्र चौधरी, संदीप नाकुले आदींचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी उपमुख्याध्यापक सुधाकर निर्मळे, कार्यवाह के.बी. वाघमोडे, तंत्रविभाग प्रमुख अविनाश आंबी,जेष्ठ शिक्षक डी.एस. कुंभार , सुवर्णा चव्हाण, परीक्षा विभाग प्रमुख डी.ए. शेळके, काकासाहेब भोकरे,एस.एस. माने, आर.एस. पाटील, यु.सी. पाखरे, पी.ए. पाटील, जे.एम.मणेर आदीसह शिक्षकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते. सुत्रसंचालन अजित लाड यांनी केले.
    फोटो 
  वडगाव विद्यालय ज्यु. कॉलेज वडगावचे प्राचार्य बाळ डेळेकर प्राप्त पुरस्कारासह शेजारी उपमुख्याध्यापक सुधाकर निर्मळे तंत्रविभाग प्रमुख अविनाश आंबी आदी मान्यवरांसह शिक्षकवृंद सत्कारमूर्ती सेवक वर्गासह

Thursday, 17 August 2023

शिक्षकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी र्शिक्षक संघटनेंच्या माध्यमातून प्रयत्नशील - शिक्षक नेते दादासाहेब लाड

कोल्हापूर /प्रतिनिधी

संच मान्यता त्रुटी, शिक्षकांना बीएलओच्या ड्युटी व नुतन मान्यता मिळालेल्या शिक्षकांच्या शालार्थ आयडी मिळण्यास दिरंगाई आदीसह शिक्षकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी सर्व शिक्षक संघटनेंच्या माध्यमातून शिक्षण मंत्री यांच्या बरोबर बैठक घेऊन समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील आहे. असे प्रतिपादन शिक्षक नेते दादासाहेब लाड यांनी केले.
      संत सोपानकाका सहकारी बैंक लि. सासवड, श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ सासवड, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने“संत सोपानकाका सुंदर माझी शाळा”पारितोषिक वितरण समारंभ २०२२ -२०२३ या वर्षातील कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या विद्याभवन शिवाजी पार्क,कोल्हापूर  येथील सभागृहामध्ये संपन्न झाला. त्या प्रसंगी बोलत होते.स्वागत व प्रास्ताविक सचिव दत्ता पाटील यांनी केले. अध्यक्षस्थानी शिक्षक नेते दादासाहेब लाड होते.या प्रसंगी प्रमुख मान्यवर बी. जी. बोराडे,खंडेराव जगदाळे, प्राचार्य डी.एस. घुगरे आदींनी मनोगतातून शिक्षकांच्या समस्या सांगून उपाययोजना स्पष्ट केली.
  विभागीय प्रथम क्रमांक माध्यमिक आश्रमशाळा रजपूतवाडी, द्वीतीय क्रमांक बालदास महाराज हायस्कूल शिरगाव सौते, जिल्हा स्तर प्रथम क्रमांक महाराष्ट्र हायस्कूल व ज्युनि. कॉलेज शिवाजी पेठ कोल्हापूर, द्वीतीय क्रमांक आदर्श हायस्कूल भामटे तृतीय क्रमांक जनतारा कल्पवृक्ष विद्यामंदिर व अक्काताई नरसाप्पा नांद्रेकर ज्युनि. कॉलेज जयसिंगपूर आदीसह ५ शाळांना पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
कोल्हापूर शहर व १२ तालुक्यातील प्रत्येक तालुक्यास तीन शाळांना संत सोपनकाका सुंदर माझी शाळा या  पुरस्काराने ३९ शाळा व विभागीय दोन जिल्हास्तर तीन असे एकूण ४४ शाळांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम, मानचिन्ह  प्रमाणपत्र व पुस्तक देऊन सन्मानीत करण्यात आले.
   या प्रसंगी  कोजिमाशी चेअरमन प्राचार्य लक्ष्मण उर्फ बाळ डेळेकर, व्हा.चेअरमन प्रकाश कोकाटे,रघुनाथ मांडरे,संपर्क प्रमुख अशोक हुबाळे, समन्वयक मुख्याध्यापक शिवाजीराव कोरवी, राहुल पवार, एम. आर. पाटील, आदी मान्यवरांसह कोजिमाशी संस्थेचे संचालक मंडळ, मुख्याध्यापक ४४ शाळांचे व शिक्षकवृंद उपस्थित होते.आभार सागर चुडाप्पा,सुत्रसंचलन शिवाजी पाटील यांनी केले.
        फोटो 
“संत सोपानकाका सुंदर माझी शाळा” पुरस्कार  शिक्षक नेते दादासाहेब लाड, सचिव दत्ता पाटील, बी. जी. बोराडे प्राचार्य डी. एस. घुगरे आदी मान्यवर पुरस्कार प्रदान करतांना स्विकरतांना कोजिमाशी चेअरमन वडगाव विद्यालयाचे प्राचार्य बाळ डेळेकर, उपमुख्याध्यापक सुधाकर निर्मळे आदीसह शिक्षकवृंद व अन्य मान्यवर

Tuesday, 15 August 2023

म.न.पा.राजर्षी शाहू विद्यामंदिर 11,कसबा बाबडा मध्ये 77 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा


कोल्हापूर प्रतिनिधी 

प्राथमिक शिक्षण समिती कोल्हापूर महानगरपालिका
 राजर्षी शाहू विद्यामंदिर शाळा क्र११,कसबा बावडा कोल्हापूर मध्ये 15 ऑगस्ट 2023 रोजी 77 व्या स्वातंत्र्य दिना निमित्ता इनर व्हील क्लब ऑफ सनराईज अध्यक्ष  मनीषा जाधव,स्मिता खामकर,यांच्या हस्ते व केंद्रमुख्याध्यापक डॉ अजितकुमार पाटील, सुनिल पोवार,अभिजित मगदूम, शामराव कदम,सचिन चौगले,राजू चौगले, यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले .

भारतविर मित्र मंडळाचे सचिन चौगले, सुनील पोवार,अजय बिरणगे, अनिकेत चौगले, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य,इनरव्हील सनराईजचे सुरेखा जाधव,मयूरा खोत,दिव्या घाटगे,पालक संघ सदस्य, शाळेचे माजी विद्यार्थी , भागातील नागरिक , पालक वर्ग मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते .
15 ऑगस्ट निमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेतील विद्यार्थ्यांना वृषाली बाड मॅडम यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली.तसेच त्यांनी 2 री ते 4 थी च्या विद्यार्थ्यांना इंग्रजी स्पिकिंग पुस्तके दिली .
बालवाडी ते सातवीपर्यंत विद्यार्थ्यांनी महात्मा गांधीजी, पंडित नेहरू,झाशीची राणी,क्रांतिकारक,वीर जवान, इत्यादी वेशभूषा परिधान केला होता.शाळेचे माजी विद्यार्थी शामराव कदम,अभिजित मगदूम यांची कोल्हापूर जिल्हा असोसिएशनमध्ये संचालक म्हणून निवड झाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला.आदर्श माता पालक यांचा सत्कार करण्यात आला .
 अष्टविनायक रिक्षा मित्र मंडळ च्या सदस्यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेबद्दल हातरुमाल वाटण्यात आले.


विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत गायन केले , तसेच विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर भाषणे केली , मेरी माटी मेरा देश अंतर्गत पंचप्राण शपथ व शाळेच्या क्रीडांगणावर वृक्षारोपण करण्यात आले.
शेवटी विद्यार्थ्यांना इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर  यांच्यामार्फत जिलेबी देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात .
सूत्रसंचालन आदिती बिरणगे व तमेजा मुजावर मॅडम यांनी केले.
आभार उत्तम पाटील यांनी मानले.

Saturday, 12 August 2023

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शेतीमध्ये करून अधिकाधिक गुणवत्तापूर्ण उत्पन्न घेण्यावर शेतकऱ्यांनी भर द्यावा

हेरले /प्रतिनिधी

शेती हा ग्रामीण अर्थकारणाचा पाया आहे. हा पाया मजबूत करण्यासाठी कृषिशिक्षण महत्वाचे योगदान बजावत आहे.पारंपरिक शेतीला फाटा देवून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शेतीमध्ये करून अधिकाधिक गुणवत्तापूर्ण उत्पन्न घेण्यावर शेतकऱ्यांनी भर द्यावा असे आवाहन महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत राजश्री छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालय कोल्हापूरच्या  कृषिदुतांनी केले.
        ते हेरले ( ता. हातकणंगले)येथे
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत राजश्री छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालय कोल्हापूरच्या अंतर्गत आयोजित कायक्रम प्रसंगी बोलत होते.
 यावेळी सरपंच राहुल शेटे, ग्राम विकास अधिकारी बी.एस.कांबळे आदी मान्यवरांसह सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
    कृषीदुतांनी ग्रामीण (कृषी) जागरूकता आणि कृषी उद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमाची माहिती ग्रामस्थांना दिली. या कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांना पीक व पीक समस्यांबाबत कृषीदूतन कडून व कृषी महाविद्यालय कोल्हापूरच्या प्राध्यापकांकडून मार्गदर्शन व्याख्याने प्रात्यक्षिके व तंत्रज्ञानाचा शेतीतील उपयोग, मृदा परीक्षण, एकात्मिक किड व रोग नियंत्रण , पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय, अन्नद्रव्य व्यवस्थापन या प्रकारच्या कार्यक्रमांची माहिती ग्रामस्थ व शेतकऱ्यांना दिली. यावेळी कार्यक्रम पार पाडण्यासाठी कृषिदुत अभिनंदन हनुमाळे , वरुण घोडके, अनिल  जंगम, स्वप्निल पाटील, मंथन पाटील. हे कार्यरत आहेत. महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. एस.बी.खरबडे. रावे समन्वयक डॉ.बी.टी. कोलगणे कार्यक्रमाधिकारी डॉ. पी.पी खराडे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
      फोटो 
हेरले : ग्रामपंचायत येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत राजश्री छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालय कोल्हापूरच्या आयोजित कार्यक्रम प्रसंगी कृषिदुत

Friday, 11 August 2023

शिस्तीचे धडे देणारे गुरुकुल शिक्षण समूह:- भैरव तळेकर

हेरले /प्रतिनिधी
 आदर्श गुरुकुल विद्यालय व ज्युनि कॉलेज पेठ वडगाव मध्ये १ ऑगस्ट ते ९ ऑगस्ट क्रांती सप्ताह निमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते . विद्यार्थ्यांनी क्रांतिकारकांच्या जीवनावरती आधारित पुस्तकांचे वाचन केले, तसेच सप्ताहाच्या सांगता समारंभावेळी विविध क्रांतिकारकांच्या जीवनावर आधारित नाट्यीकरण सादर केले . या कार्यक्रमाप्रसंगी पेठ वडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भैरव तळेकर , पोलीस उपनिरीक्षक प्रिया खाडे तसेच वडगाव नगरपालिकेचे कक्ष अधिकारी मुकुंद कदम , प्रशांत पाटील आदर्श गुरुकुल शिक्षण समूहाचे संस्थापक डॉ डी एस घुगरे तसेच संस्थेच्या सचिव तथा मुख्याध्यापिका सौ एम.डी. घुगरे मॅडम उपस्थित होत्या. या कार्यक्रम प्रसंगी बोलताना भैरव तळेकर म्हणाले आदर्श गुरुकुल शिक्षण समूहातील मुलांना शिस्तीचे, देश प्रेमाचे धडे दिले जातात. त्यामुळे भारताचे सुजाण नागरिक घडविण्याचे कार्य या संकुलात होताना दिसत आहे .विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी अशा थोर क्रांतिकारकांची माहिती विद्यार्थ्यांना मिळणे गरजेची होती . यावेळी प्रिया खाडे यांनी विद्यार्थ्यांना क्रांती दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
विविध विभागांचे प्रमुख व शिक्षक, विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला .
कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक पर्यवेक्षक शरद जाधव यांनी केले तर सूत्रसंचलन सोनाली शिखरे यांनी केले .

Friday, 4 August 2023

नियो.गोकुळ सहकारी दूध व्यवसायिक संस्था मर्यादित, हेरले या संस्थेचे उद्घाटन

हेरले /प्रतिनिधी
हेरले (ता. हातकणंगले )येथे नव्याने सुरू होत असलेल्या नियो.गोकुळ सहकारी दूध व्यवसायिक संस्था मर्यादित, हेरले  या संस्थेचे उद्घाटन गोकुळ दूध संघाचे संचालक माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
   डॉ सुजित मिणचेकर  यांचे स्वागत केले.तसेच एनडीडीबी (NDDB) मध्ये भारतातून पाच महिलांची निवड करण्यात आली असून यामध्ये गोकुळच्या अधिकारी निता कामत यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार डॉ सुजित मिणचेकर यांच्या हस्ते करण्यात आला.
   यावेळी माजी सभापती राजेश पाटील,लोकनियुक्त सरपंच राहुल शेटे, मालेचे उपसरपंच प्रताप उर्फ बंटी पाटील, माजी उपसरपंच विजय भोसले, अरविंद भानूसे, राकेश जाधव, संदीप चौगुले, मानसिंग माने, मंदार गडकरी, सूरज काटकर, शशुपाल कुरणे, सूरज पाटील, संस्थेचे चेअरमन विजय पाटील,सेक्रेटरी सुषमा पाटील, संचालक भुजगोंडा पाटील, अभिनंदन पाटील, अमित पाटील, अजित पाटील, जयश्री रयत ,रूपाली घुमटात,प्रमोद जाधव,मुकुंद पोतदार व गोकुळचे संकलन अधिकारी राजेंद्र पाटील सुपरवायजर उदय अंबी आदीसह अन्य मान्यवर उपस्थित होते.
   फोटो 
हेरले :येथे नव्याने सुरू होत असलेल्या नियो.गोकुळ सहकारी दूध व्यवसायिक संस्था मर्यादित, हेरले  या संस्थेचे उद्घाटन गोकुळ दूध संघाचे संचालक माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर करतांना शेजारी माजी सभापती राजेश पाटील, सरपंच राहुल शेटे व अन्य मान्यवर.

Thursday, 3 August 2023

हातकणंगले दुय्यम निबंधक कार्यालयात सलोखा योजनेचा प्रारंभ

हेरले / प्रतिनिधी
        महसुल दिनाचे औचित्य साधून हातकणंगले येथील दुय्यम निबंधक श्रेणी १ या कार्यालयाच्या नुतनीकरणाचे उद्घाटन अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांचे हस्ते करण्यात आले.
           हातकणंगले येथील दुय्यम निबंधक वर्ग १ काळेसो यांच्या उपस्थितीत महसूल दिनानिमित शासनाच्या सलोखा योजना अंतर्गत पहिला दस्त नोंदवून लाभार्थांना सपूर्द करण्यात आला. तसेच तालुक्यातील इत्तर लाभार्थ्यांना या सलोखा योजनेसंदर्भांत माहिती देण्यात आली. व या योजनेचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन दुय्यम निबंधक काळेसो यांनी केले.
            यावेळी तहसिलदार कल्पना ढवळे , भुमिअभिलेख अधिक्षक सुवर्णा मसणे, क्लार्क शिवाजी पाटील, शंकर यादव, संगणक ऑपरेटर उत्तम पाटील, शिपाई जे. एम. सय्यद , साहिल पठाण, वकिल वर्ग, स्टॅम्प रायटर, पक्षकार व मुद्रांक विक्रते उपस्थित होते.

फोटो 
हातकणंगले दुय्यम निबंधक वर्ग १ येथे सलोखा योजने अंतर्गत पहिला दस्त नोंदवून सपूर्द करतांना मान्यवर

हातकणंगले तालुका शालेय स्पर्धा नियोजन बैठक संपन्न


हेरले / प्रतिनिधी
अतिग्रे  येथील संजय घोडावत इन्स्टिट्यूट मध्ये हातकणंगले तालुका शालेय स्पर्धा नियोजन बैठक संपन्न झाली. यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रशेखर साखरे म्हणाले की "कोल्हापूरचा अभिमान खेळ आमची शान" या घोषवाक्याच्या आधारे व Let's do it once, let's do it well या वृत्ती प्रमाणे आपण कार्य करून तालुकास्तरातील स्पर्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने पार पाडू. यावर्षी पाच राज्यस्तरीय स्पर्धा तर जवळजवळ (९०) नव्वद खेळ प्रकाराच्या खेळाच्या स्पर्धा घ्यावयाचे आहेत. आपल्या सर्व क्रीडा शिक्षकांच्या सहकार्याने स्पर्धा यशस्वी करू.तसेच त्यांनी सांगितले की तालुका स्पर्धा आयोजित करत असताना आवश्यक ती दक्षता घ्यावी खेळाडूंना विशेषता मुलींना क्रीडांगणामध्ये आवश्यक त्या सुविधा उपलब्ध होतील याची दक्षता घ्यावी.  स्पर्धेचे आयोजन करताना प्रशासकीय यंत्रणेला सेवा यंत्रणा याविषयी कल्पना द्यावी जेणेकरून अनुचित प्रकार घडणार नाही किंवा स्पर्धा चांगल्या पद्धतीने पार पडतील. क्रीडा शिक्षकांनी खेळाडूंच्या आहाराविषयी व प्रवासाविषयी काळजी घ्यावी.तसेच स्पर्धा घेत असताना अनुचित प्रकार घडू नये यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी.स्पर्धा आयोजन करत असताना विनाकारण आयोजकांना खेळाडूंना त्रास देणाऱ्या व्यक्तींवरती क्रीडा विभागाकडून व शासकीय यंत्रणे कडून कायदेशीर कारवाई करण्यात येईल.यावेळी व्यायाम शाळा अनुदान व विकास अनुदान अशा शासकीय योजनांचा  लाभ घ्यावा. राज्य शासनाच्या क्रीडा सुविधा योजनेच्या मार्फत शासनाकडून 90 लाखाचे अनुदानाची तरतूद आहे. अशा शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी केला.
यावेळी हातकणंगले तालुका समन्वयकांची निवड व सत्कार करण्यात आला.यावेळी तालुका क्रीडा अधिकारी अभय देशपांडे,क्रीडा अधिकारी सुधाकर जमादार, क्रीडा अधिकारी अरुण पाटील, क्रीडा अधिकारी रोहिणी मोकाशी क्रीडा अधिकारी,मनीषा पाटील, डेटा ऑपरेटर गौरव खामकर व संदीप जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.या बैठकीचे स्वागत प्रास्ताविक क्रीडा अधिकारी अरुण पाटील यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी पाटील आभार संताजी भोसले यांनी मानले.

Tuesday, 1 August 2023

कोजिमाशि पतसंस्थेच्या चेअरमनपदी पाचव्यांदा लक्ष्मण उर्फ बाळ डेळेकर यांची निवड झालेबद्दल वडगाव विद्यालयात सत्कार.

   हेरले / प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवकांची सह.पतसंस्था कोल्हापूरच्या चेअरमन, व्हा.चेअरमन पदाची निवड तज्ञ संचालक शिक्षक नेते दादासाहेब लाड यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली. संस्थेच्या चेअरमनपदी पदी वडगाव ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य  लक्ष्मण उर्फ बाळ डेळेकर यांची निवड झाली.सलग पाचव्यांदा चेअरमन पद मिळालेबद्दल वडगाव विद्यालयात  कौन्सिल सदस्य प्राचार्य बाळ डेळेकर यांचा  सत्कार उपमुख्याध्यापक  सुधाकर निर्मळे ,  पर्यवेक्षिका सौ. आर. आर.पाटील, संस्थेचे मुख्य लिपिक के. बी. वाघमोडे यांच्या हस्ते संपन्न झाला.
   याप्रसंगी बोलताना नुतन चेअरमन प्राचार्य बाळ डेळेकर म्हणाले ' दादासाहेब लाड यांच्या आशिर्वादाने पाचव्यांदा संस्थेचा चेअरमन म्हणून काम करण्याची संधी मिळते आहे.याचा मनस्वी आनंद होत आहे . माझ्या या यशस्वी वाटचालीमध्ये शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूरचे अध्यक्ष श्रीमती शिवानीताई देसाई,उपाध्यक्ष शिवाजी सावंत, सेक्रेटरी जयकुमार देसाई, पेट्रन कौन्सिल सदस्य  युवा नेते दौलत देसाई,चेअरमन सौ. मंजिरी मोरे देसाई यांचे बहुमोल सहकार्य व पाठबळ लाभले , तसेच संस्थेचे सर्व कर्मचारी बंधू - भगिनी यांचे नेहमीच सहकार्य मिळाले . माझ्या जडणघडणीत माझ्या पत्नी सौ. वंदना जाधव - डेळेकर ( मुख्याध्यापिका प्रायव्हेट हाय . ) व परिवाराचे योगदान आहे .या प्रसंगी  तंत्रविभाग प्रमुख ए. एस. आंबी , परीक्षा विभाग प्रमुख डी. ए. शेळके जेष्ठ शिक्षक डी. एस. कुंभार, काकासाहेब भोकरे, सुवर्णा चव्हाण, महेश कुलकर्णी, अकबर पन्हाळकर, अतुल पाटील आदी मान्यवरासह शिक्षकवृंद विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन अजित लाड यांनी केले.
 
    फोटो 
वडगाव विद्यालय ज्यु. कॉलेज वडगावमध्ये नुतन चेअरमन प्राचार्य बाळ डेळेकर यांचा सत्कार करताना उपमुख्याध्यापक सुधाकर निर्मळे पर्यवेक्षिका आर. आर. पाटील कार्यवाह के. बी. वाघमोडे आदीसह अन्य मान्यवर.

पाझर तलावातील पाणी देणार नाही यावर मौजे वडगावकर ठाम


हेरले / प्रतिनिधी 
        मौजे वडगांव येथील लघू पाटबंधारे अंतर्गत पाझर तलाव हा मौजे वडगांव साठी राखीव आहे. हा तलाव १९७२ मध्ये पूर्ण झाला असून त्यासाठी लागणारी जमीन गावातील शेतकऱ्यांनी दिली आहे. सदरच्या पाझर तलावातून नागाव गावासाठी जलजीवन मिशन अंतर्गत पिण्याच्या पाण्यासाठी पाईपलाईन करूण नेणार असे मौजे वडगावातील ग्रामस्थांना समजल्या नंतर मौजे वडगाव ग्रामसभेमध्ये तीव्र विरोध करण्यात आला. व तसा ग्रामसभेचा ठराव करूण पाटबंधारे विभागाला कळविण्यात आले. त्यानंतर पाटबंधारे विभागाने नागाव व मौजे वडगाव या दोन्ही गांवाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची सयुक्त बैठक बोलविण्यात आली.
                  या बैठकीमध्ये मौजे वडगावच्या पाझर तलावावर वडगावकरांचाच हक्क असून त्यांना पुरेसे झाल्यानंतर उरलेल्या पाणी साठ्यातून आम्हाला थोडे पाणी देऊन सहकार्य करावे अशी विनंती नागाव ग्रामपंचायतीच्या शिष्टमंडळाच्या वतीने करण्यात आली. परंतू मौजे वडगांव गावच्या भविष्यातील लोकसंख्या वाढीमुळे पाणी टंचाई निर्माण होऊ शकते त्यामुळे तलावातील एक थेंबही पाणी देणार नाही या मतावर मौजे वडगावकर ठाम राहिल्याने हि बैठक निष्फळ ठरली.
            यावेळी सरपंच कस्तुरी पाटील , उपसरपंच सुनिल खारेपाटणे, माजी सरपंच सतिश चौगुले, ग्रा.पं. सदस्य सुरेश कांबरे, स्वप्नील चौगुले, रघूनाथ गोरड, नितिन घोरपडे, मनोहर चौगले, धोंडीराम चौगुले, जयवंत चौगुले, अविनाश पाटील, सदस्या सविता सावंत, सुवर्णा सुतार,अमोल झांबरे, सचिन चौगुले, संतोष अकिवाटे, अमर थोरवत, संतोष लोंढे, यांच्यासह पदाधिकारी  उपस्थित होते.

चौकट
सदर लघूपाटबंधारे तलाव हा आठमाही म्हणजे खरिब व रब्बी हंगामाकरिता सिंचनासाठी बांधलेलाआहे. त्यामुळे त्यातील पाणी कायमस्वरूपी उदभव आहे का हे जलजीवन मिशन योजना राबवितांना संबधीत अधिकाऱ्यांनी तपासून पहावे.
                         स्मिता माने
                       कार्यकारी अभियंता 
                     पाटबंधारेविभागउत्तर       
                           कोल्हापूर

फोटो 
पाटबंधारे विभागाच्या वतीने आयोजित बैठकीत मौजे वडगांव व नागाव ग्रामस्थांना मार्गदर्शन करतांना कार्यकारी अभियंता स्मिता माने मॅडम .