Thursday, 30 November 2023

कार्यशाळेच्या माध्यमातून विद्यार्थी घडतात - डॉ अजितकुमार पाटील.


कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समिती अंतर्गत मनपा राजर्षी शाहू विद्या मंदिर शाळा क्रमांक 11 कसबा बावडामध्ये ज्ञानरचनावाद अंतर्गत बालवाडीच्या मुख्याध्यापिका कल्पना पाटील व उपमुख्याध्यापिका सावित्री मॅडम यांनी दीपावली मध्ये कार्यशाळा घेऊन पालक व विद्यार्थी व माजी विद्यार्थी यांच्या अंतर्गत कार्यशाळे मध्ये घेतले होते त्यामध्ये चिखलाचे साहित्य उदाहरणात फळे फुले असे साहित्य भांडी खेळणी त्याचप्रमाणे कागद कामाच्या माध्यमातून आकाश कंदील तयार करणे पोपटाचा आकार तयार करणे घर तयार करणे इत्यादी प्रकारची प्रात्यक्षिक सादर करून पालकांना सांगितले त्याप्रमाणे आज कार्यशाळाच्या नंतर आज प्रथम शाळा भरली त्यामध्ये त्यांच्या शैक्षणिक साहित्य किंवा ते असले दीपावली भेटवस्तूंचे प्रदर्शन भरवले होते त्या प्रदर्शनाचे उद्घाटन शाळेचे मुख्याध्यापक डॉ अजितकुमार पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. 

 या कार्यशाळेसाठी  कोल्हापूर प्राथमिक शिक्षण समितीचे  प्रशासनाधिकारी एस के यादव साहेब शैक्षणिक पर्यवेक्षक उषा सरदेसाई मॅडम बाळासाहेब कांबळे ,विजय माळी यांनी सहकार्य केले तसेच या कार्यशाळेमध्ये पालकांनी मधुरा कांबळे अनुराधा भोसले दीपक पाटील रेश्मा कांबळे कांचन हुलस्वार यांनी आपले कार्यशाळा संदर्भात मनोगते व्यक्त केली कार्यशाळा संपन्न होऊन त्या कार्यामध्ये भाग घेतल्याबद्दल शाळेचे ज्येष्ठ शिक्षक उत्तम कुंभार सुशील जाधव मिनाज मुल्ला विद्या पाटील आसमा तांबोळी उत्तम पाटील हेमंत कुमार पाटोळे इत्यादींनी सहकार्य केले त्या उपक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रमेश सुतार यांनी अभिनंदन केले कार्यशाळेसाठी माजी विद्यार्थी व पालक व व्यवस्थापन कमिटीचे सदस्य उपस्थित होते आभार मधुरा कांबळे यांनी मांडले.

Wednesday, 29 November 2023

मौजे वडगांव गावचावडी साठी निधी दयावामहसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन


हेरले /प्रतिनिधी 
 मौजे वडगांव ( ता. हातकणंगले) येथील जुन्या गाव चावडीसाठी  निधी उपलब्ध करून देऊन तलाठी कार्यालय , ग्रंथालय, अभ्यासिका , यासाठी नविन इमारत उभी करूण गतवैभव प्राप्त करून दयावे आशा मागणीचे निवेदन उपसरपंच सुनिल खारेपाटणे व ग्रा पं सदस्य सुरेश कांबरे यांनी राज्याचे महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांना दिले.
               मौजे वडगांव येथील स्वातंत्र्यपूर्व काळातील गावचावडी हि जुनी इमारत होती. या इमारती मध्ये १९५६ ते २००२ पर्यंत ग्रामपंचायतीचा कारभार चालत होता . ग्रामपंचायत व तलाठी अशी दोन्ही कार्यालय एकत्र या इमारती मध्ये होती. ग्रामपंचायत , तलाठी, कोतवाल , आदी प्रशासकीय घटक याच गावचावडीतून आपल्या गावचा कारभार पाहत होते . स्वातंत्र्यपूर्व काळातील जुनी इमारत आसल्याने ती मोडकळीस आली होती. ग्रामस्थांच्या जिवितास धोका निर्माण होण्या आगोदर त्याचे शासकीय निर्लेखन करून ती इमारत उतरवून घेण्यात आली .
            सध्या तलाठी कार्यालयासाठी इमारत नसल्याने गावातील ग्रामस्थांना विविध दाखल्यांसाठी हेरले सज्ज्यावर जावून हेलपाटे मारावे लागतात . गावात गावचावडीसाठी जागा उपलब्ध असून त्यामध्ये तलाठी कार्यालय, ग्रंथालय , आभ्यासिका, आशा विविध समस्यासाठी उपयोग होणार आहे. त्यामुळे इमारतीसाठी निधी उपलब्ध करूण दयावा आशी मागणी करण्यात आली .
            यावेळी महसूलमंत्री ना. राधाकुष्ण विखे पाटील यांनी निवेदन वाचून जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांना ताबडतोब या संदर्भातील प्रस्ताव तयार करून देण्याचे तोंडी आदेश दिले . यावेळी खास . धैर्यशील माने , जिल्हाधिकारी राहूल रेखावार, उपसरपंच सुनिल खारेपाटणे, माजी उपसरपंच विद्यमान सदस्य सुरेश कांबरे उपस्थित होते .

फोटो 
राज्याचे महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांना गावचावडीच्या निधी मागणी बाबत निवेदन देताना उपसरपंच सुनिल खारेपाटणे व ग्रा पं . सदस्य सुरेश कांबरे

Saturday, 25 November 2023

" Father of Sociology "-- ऑगस्त कॉम्त.डॉ ए बी पाटील, ( पीएच डी ),कोल्हापूर.

ऑगस्त कॉम्त यांनी समाजशास्त्रात सर्वप्रथम  " Sociology "हा शब्द प्रयोग प्रथम मांडला त्यामुळे यांना समाजशास्त्राचा जनक असे म्हणतात त्यांनी सामाजिक विज्ञान म्हणून 1839 मध्ये समाजशास्त्राची निर्मिती केली." समाजाचा सर्वांग पूर्ण अभ्यास करणारे जे शास्त्र ते समाजशास्त्र होय ."असे त्यांनी व्याख्या मांडली आहे.ऑगस्त कॉम्त यांचा जन्म 19 जानेवारी 1798 रोजी फ्रान्समध्ये झाला.त्यांनी आपल्या शैक्षणिक जीवनामध्ये फ्रेंच विचारवंत सेंट सायमन, बेंजीबियन फ्रेंक्लिन ,बोरनॉल्ड्स मास्टर त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकल्या.कॉम्त ला एक सर्वश्रेष्ठ आधुनिक विचारावंत म्हणून मानले जाते. 1822 मध्ये त्यांनी पहिले पुस्तक लिहिले आणि 1830 मध्ये त्यांनी " कोर्स ऑफ पॉझिटिव्ह फिलॉसॉफी " हा महत्त्वपूर्ण ग्रंथ लिहिला आणि तो 1842 ला प्रसिद्ध केला.कॉम्त च्या  मते भाषा हे परस्पर संपर्क महत्त्वाचे माध्यम आहे त्यामुळे एका पिढीचे दुसऱ्या पिढीकडे आचार - विचार हस्तांतरित करता येतात व संस्कृती संवर्धन व रक्षण करता येते. तसेच समान भाषा बोलणारे व्यक्तिमध्ये आपुलकी भावना निर्माण होते व त्यांच्यात ऐक्याची भावना निर्माण होते. धर्माच्या बाबतीत त्यांनी विचार मांडताना सामाजिक व्यवस्थेसाठी समान आर्थिक श्रद्धाची खूप आवश्यकता असते. समान धार्मिक श्रदांच्या अभावाने समाजाचे अनेक भिन्न गटात विभाजन होते.हे टाळण्यासाठी समाजव्यवस्थेला समान धर्माची गरज असते. थोडक्यात धर्माच्या पाठबळाशिवाय कोणतीही शासन व्यवस्था व्यवस्थित काम करू शकत नाही अशा प्रकारे धर्माच्या आधारामुळेच सरकारी अद्यांना नैतिक अधिष्ठान निर्माण होते.
 श्रम विभाजनाच्या बाबतीत भाषा व धर्म या दोन घटकाशिवाय समाजाची अवस्था निर्माण होणार नाही.श्रम विभाजन याचा अर्थ कामाची मागणी होईल प्रत्येक कामाचे लहान भाग पाडण्यात येऊन त्या भागाचे काम वेगवेगळ्या व्यक्तीकडे कृतीप्रमाणे दिल्यास व कौशल्यानुसार दिल्यास त्याचे अस्तित्व इतरांवर प्रभाव टाकते. त्यामुळे त्यांचा विकास होतो सामाजिक गतीशास्त्राच्या विचारानुसार सामाजिक गतीशास्त्रामध्ये सामाजिक विकास अवस्था समाजाची प्रगती यासंबंधी विचार येतो सतत घडणाऱ्या बदलांचे शास्त्र असल्यामुळे त्याचा अभ्यास करणे फार महत्त्वाचे आहे. सामाजिक प्रगतीच्या नियमांची माहिती करून घेणे या गतीशास्त्रात महत्त्वाचे आहे. ती सामाजिक प्रगतीचा अभ्यास ऐतिहासिक तत्वज्ञानावर आधारित केला जातो. वर्तमान परिस्थितीत भविष्यकालीन परिस्थितीचा आधार घेऊन मानवी प्रगती प्रक्रियेचा शोध घेणे आवश्यक असतो हा त्याचा हेतू असतो. सामाजिक स्थितीशास्त्र आणि सामाजिक गतीशास्त्र या समाजशास्त्र दोन्ही विभागांचा वरील आढावा विचारात घेता असे सुचित करायचे आहे की त्यांना सामाजिक स्थितीशास्त्रामध्ये मानवी स्वभाव व समाजाची स्थिरचना इत्यादींचा अभ्यास केला जातो तर सामाजिक शास्त्रामध्ये समाजाच्या विकासाचा अथवा प्रगतीचा अभ्यास करण्यात येतो हे दोन्ही विभाग परस्पर संबंधित असल्याने त्यांना एकमेकापासून वेगळी करणे अवघड आहे. ऑगस्तने अनेक समाजशास्त्रीय विचार मांडले. त्यामध्ये विज्ञानवाद अथवा प्रत्यक्षवाद ही संकल्पना सर्वात महत्त्वाची मानले जाते. यामध्ये मानवी बुद्धीचा विकास ही शेवटच्या विकासातील अवस्था आहे. असे त्यांनी मांडले जगातील सर्व घडामोडी नैसर्गिक नियमानुसार घडून येत असतात. त्यामुळे हे नियम समजावून घेताना काल्पनिक अथवा तांत्रिक विचारांचा उपयोग होत नाही तर त्यासाठी वैज्ञानिक पद्धतींचाच अवलंब केला पाहिजेत. जागतिक घटना व घडामोडी कडे पाहण्याचा हा दृष्टिकोन आणि त्यातून मिळणारे ज्ञान यालाच विज्ञानावाद म्हणावे असे त्यांनी सांगितले आहे. आपल्या सामाजिक शास्त्रामध्ये प्रभावशाली अशी विचार मांडले 

मानवाच्या अवस्थांच्या तीन कल्पना आहेत तीन नियम त्यांनी मांडले आहेत.
 काल्पनिक किंवा असत्य अवस्था त्यामध्ये चेतनावाद बहुदेवाद एकेश्वरवाद असतो तसेच अध्यात्मिक किंवा तात्विक अवस्था वैज्ञानिका अवस्था किंवा प्रत्यक्ष अवस्था याचे त्यांनी मूल्यमापन सुद्धा केलेले आहे त्यामुळे ज्ञान विज्ञान अवस्थेत उपयोगी पडत नाही. अशावेळी सामाजिक घटना घडामोडींचा अभ्यास करताना केवळ कारणांचा विचार न करता निरीक्षण वर्गीकरण सिद्धांतिक इत्यादी मार्गाने मिळणारे ज्ञान स्वीकारणे खूप फायदेशीर ठरते.यातूनच समाजशास्त्राचा उदय झाला आहे. असे आपल्या ग्रंथाद्वारे समाजाला एक नवी दिशा देण्याचे कार्य केलेलं आहे.कॉम्तचे सर्व तत्त्वज्ञान अभिजात आणि सामाजिक विचारांच्या इतिहासात अद्वितीय आहे.
" दुसऱ्यासाठी जगा " हा प्रत्यक्षवादी समाजव्यवस्थेची विचारात घेता आपणास त्याच्या समाजशास्त्राची उंची किती आहे हे समजू शकते.त्यांच्या समाजशास्त्रीय विचारासंबंधी शेवटी असे म्हणतात की त्याची विचार हे त्या काळाच्या मानाने फारच पुढचे होते. सामाजिक विचारांचा अभ्यास करणाऱ्या कॉम्त च्या विचारातून विविध असे नवीन माहिती मिळते असे म्हटले तर व चुकीचे ठरणार नाही.सध्याच्या विज्ञान व आधुनिक युगात हे विचार मार्गदर्शक व दिशादर्शक ठरणारे आहेत.

Friday, 24 November 2023

आ. डॉ. विनयरावजी कोरे (सावकर ) यांचा सत्कार

हेरले / प्रतिनिधी
 मौजे वडगांव ( ता. हातकणंगले) येथील जय हनुमान तालिम मंडळाला तंटामुक्त अध्यक्ष मधुकर आकिवाटे व सामाजिक कार्यकर्ते वृषभनाथ पाटील यांच्या पुढाकाराने वारणा विविध उदयोग समुहाचे नेते माजी मंत्री आ. डॉ. विनयरावजी कोरे यांनी तालमीत मल्लांना कुस्ती खेळण्यासाठी मोफत तांबडी माती देऊन बहुमोल सहकार्य केल्या बद्दल त्यांचा जय हनुमान तालीम मंडळ व ग्रामपंचायत सदस्य यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
             मौजे वडगांव येथील जय हनुमान तालीम मंडळाची स्थापना २४ / १२ / १९७६ साली झाली . त्यावेळचे तात्कालीन ग्रामीण विकास व उद्योग राज्यमंत्री कै . उदयसिंहराव गायकवाड व जि. प . चे अध्यक्ष माजी खासदार कै . बाळासाहेब माने यांच्या शुभहस्ते उदघाटन होऊन सुरुवात झाली . त्यावेळी तालमीत लागणारी तांबडी माती स्वर्गीय देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार यांनी दिली होती . त्यानंतर तब्बल ४७ वर्षानंतर या तालमीत आ. डॉ. विनयरावजी कोरे यांनी मोफत तांबडी माती देऊन तरुण मल्लामध्ये कुस्ती खेळण्याचा उत्साह निर्माण केला आहे. सध्या जय हनुमान तालमी मध्ये २५ ते ३० मल्ल रोज नित्य नियमाने व्यायाम करत नवीन मऊ मातीमध्ये कुस्ती खेळून शड्डचा आवाज घुमवत आहेत .
           यावेळी तंटामुक्त अध्यक्ष मधुकर आकिवाटे, उपसरपंच सुनिल खारेपाटणे, पै. बाळासो थोरवत, वृषभनाथ पाटील, ग्रा.पं सदस्य सुरेश कांबरे , रघूनाथ गोरड, स्वप्नील चौगुले, अविनाश पाटील,संदिप खारेपाटणे, अमोल झांबरे, संदीप नलवडे,उपस्थित होते .

फॉटो 
आ. डॉ. विनयरावजी कोरे (सावकर ) यांचा सत्कार करतांना तालीम मंडळ व ग्रा पं सदस्य

मन एक पवित्र बंधन - डॉ. अजितकुमार पाटील,कोल्हापूर ( पीएच डी )

मन करा रे प्रसन्‍न ।
सर्व सिद्धीचें कारण ।
मोक्ष अथवा बंधन ।
सुख समाधान इच्छा ते ॥१॥ संत जगतगुरु तुकाराम महाराज.

*जेव्हा विचार, प्रार्थना आणि हेतू सर्व सकारात्मक असतात, तेव्हा जीवन आपोआप सकारात्मक होते*

आपण आपल्या दैनंदिन जीवनात रोज कुणाला तरी प्रसन्न करण्याचा प्रयास करत असतो. प्रसन्न करणे म्हणजे आपलेसे करणे. त्याला काय हवे नको ते पहाणे. त्यासाठी कष्ट करणे, त्याच्या आवडीच्या गोष्टी करणे हे सर्व आपण ज्या व्यक्तीला प्रसन्न करावयाचे असते त्या व्यक्तीकडे पाहून करत असतो.
ज्या गोष्टींचा सततचा सहवास आहे अशा गोष्टी माणसाला आपणाकडे ओढून घेतात व मन ज्याकडे आपण कधीच लक्ष देत नाही, त्याचेवर बाह्य गोष्टी आकर्षित होत नाहीत.
त्या वस्तुंना मनाचा ठाव ठिकाणा माहित नसतो. हा मनाचा ठाव लागला म्हणून न दिसणारे आंत एकांतात असलेल्या मनाचे अवलोकन करणे गरजेचे आहे.
त्यासाठी योगा, मनन, चिंतन या गोष्टी गरजेच्या आहेत. यातून मनाची ठेवण माणसाच्या ध्यानात येते.
मन हा दोन अक्षरी शब्दाचा सर्व खेळ आहे. मन हे सर्व समस्यांचे व प्रश्नांचे मूळ उत्तर आहे.  मन हेच सर्व समस्यांचे व प्रश्नांचे समाधान आहे. या मनाने काय करावे? त्यावर नियंत्रण कसे ठेवायचे? सम स्थितीत कसे आणायचे? 
महाभारतात युद्ध भूमीवर अर्जुनाने भगवान श्रीकृष्णाला म्हटले, "हे कृष्णा! हे मन निश्चितच खूप चंचल आणि अतिशय हट्टी आणि बलवान आहे, मला या मनावर नियंत्रण ठेवणे अत्यंत कठीण वाटते, जसे की वाऱ्यावर नियंत्रण ठेवणे."
यावर भगवान श्रीकृष्णांनी समर्पक असे उत्तर दिले, "हे कुंतीपुत्र, चंचल मनावर नियंत्रण ठेवणे अत्यंत कठीण आहे यात शंका नाही, परंतु सर्व सांसारिक इच्छांचा (वैराग्य) त्याग करून आणि सतत ध्यान साधना करून ते नियंत्रित केले जाऊ शकते.
खरे तर यानंतर वेगळे काही लिहिण्याची गरज नाही. मी कोणतेही प्रवचन,उदाहरणे, दाखले देण्याचा प्रयत्न करत आहे असे समजू नका, परंतु मी प्रतिकूल परिस्थितीचा कसा सामना केला आणि आजही करत आहे हे तुम्हा सर्वांना सांगण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे.
  आपण आपले स्वतःचे प्रतिबिंब उकळत्या पाण्यात पाहू शकतो का? अजिबात नाही. अस्वस्थ आणि क्षुब्ध मन आपल्याला शांती मिळवून देऊ शकते का? नाही. ज्याप्रमाणे प्रतिबिंब फक्त शांत पाण्यातच दिसते, त्याचप्रमाणे शांत आणि संतुलित मन आपल्याला संतुलित व्यक्ती बनण्यास मदत करते आणि केवळ शांत आणि संतुलित मनच आपला मित्र होऊ शकतो. तर संपूर्ण व्यायाम मनाला संतुलित स्थितीत कसे आणायचे याबद्दल आहे. जेव्हा परिस्थिती अनुकूल नसते, आयुष्यातील प्रत्येक गोष्ट आपल्या विरोधात दिसते, तेव्हा आपल्याला संयम बाळगण्याची गरज वाटते. तो धीर कसा धरू शकतो? आम्ही ते उघडे ठेवले आहे. आपण आपले मन तसे प्रशिक्षित केलेले नाही. अनेक प्रश्न आहेत, उत्तर एकच आहे - ध्यान.
मन कधी गुरूप्रमाणे हिताच्या गोष्टी सांगते, कधी शिष्याप्रमाणे आज्ञाधारक होते. मन प्रसन्न असेल तर परमार्थात रमते आणि मोक्ष मिळतो. मन उदास असेल, तर अधोगतीला नेते.
मन हे एका बीजा प्रमाणे असते. ते जेव्हा प्रेमाने पेरले जाते तेंव्हा ते अधिकाधिक फुलते. त्याचप्रमाणे आत्मा विकासाच्या रोपट्याचं खतपाणी म्हणजे मन. काही ताडाची झाडे तीन वर्षात फळे द्यायला लागतात तर काहींना दहा वर्षे पण लागतात.

Tuesday, 21 November 2023

शिरोली विकास सेवा संस्थेच्या चेअरमन पदी उद्योजक धनाजी विठ्ठल पाटील यांची तर व्हा. चेअरमन पदी मदन पांडुरंग संकपाळ यांची एकमताने निवड

हेरले /प्रतिनिधी
पुलाची शिरोलीयेथील मातृ संस्था असलेल्या शिरोली विकास सेवा संस्थेच्या चेअरमन पदी उद्योजक धनाजी विठ्ठल पाटील यांची तर व्हा. चेअरमन पदी मदन पांडुरंग संकपाळ यांची एकमताने  निवड करण्यात आली. या विशेष निवड सभेच्या अध्यक्षस्धानी हातकणंगले उपनिबंधक  डॉ. एस. एन. जाधव हे होते.
या संस्थेवर माजी आमदार महादेवराव महाडिक गटाची सत्ता आहे. त्यामुळे गेली पंचवीस वर्षाच्या परंपरेनुसार महादेवराव महाडिक यांनी नुतन पदाधिकार्यांच्या नावाचे पत्र बंद पाकीटातून पाठवले होते. त्यानुसार या दोन्ही निवडी जाहीर  करण्यात आल्या. 
या निवडीकामी माजी आमदार अमल महाडिक, राजाराम साखरचे जेष्ठ संचालक दिलीप पाटील व पेठ वडगाव बाजार समितीचे सभापती सुरेश पाटील यांचे सहकार्य लाभले.
नुतन पदाधिकार्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पुगुच्छ , शाँल , श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. तर निवडणूक अधिकारी   यांचा सत्कार  यांचे हस्ते करण्यात आला.
याप्रसंगी पेठवडगाव बाजार समितीचे सभापती सुरेश पाटील, दिलीप पाटील, नूतन चेअरमन धनाजी पाटील, माजी सरपंच तात्यासो पाटील, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सतिश पाटील, क्रूष्णात करपे, महंमद महात, डॉ. सुभाष पाटील यांची भाषणे झाली.
या निवड सभेस शब्बीर देसाई, अनिल शिरोळे, बी.एस.पाटील, उदयसिंह  पाटील, क्रूष्णात खवरे, नारायण मोरे, प्रकाश कौंदाडे,   रामभाऊ बुडकर, जग्गनाथ पाटील, सलिम महात, कमल सोडगे, अनुसया करपे, क्रूष्णात उनाळे, धनाजी यादव, सदाशिव संकपाळ, योगेश खवरे, संभाजी पाटील,  दिलीप शिरोळे, दिपक यादव,यांचेसह विविध संस्थांचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 
स्वागत व प्रास्ताविक संजय पाटील यांनी केले. सेक्रेटरी नंदकुमार पाटील यांनी विषय वाचन  केले, आभार मदन संकपाळ यांनी मानले.

Sunday, 19 November 2023

२४ वर्षानंतर माजी विद्यार्थ्यांचा भरला आठवणींचा वर्गमुरगुड विद्यालयला केली लाखाची मदत

कोल्हापूर / प्रतिनिधी

मुरगुड विद्यालय हायस्कूल  ज्युनिअर कॉलेज या शाळेच्या इयत्ता दहावी 1999 च्या बॅचच्या माजी विद्यार्थी विद्यार्थिनी कडून गुरु शिष्यांचा स्नेह मेळावा मुरगुड विद्यालयात शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या समवेत उत्साहाने पार पडला, तब्बल 24 वर्षानी जणु आठवणींचा वर्ग या ठिकाणी भरला. या मेळाव्याचे अध्यक्षस्थानी प्रशालेचे उपमुख्याध्यापक एस. बी .सूर्यवंशी तर तर प्रमुख पाहुणे  कोल्हापूर शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष माजी प्राचार्य शिवाजीराव सावंत होते.
    आपण ज्या शाळेत शिकलो आणि  जिवनात यशस्वी झालो त्या आपल्या शाळेचे आणि शिक्षकांचे काहीतरी आपण देणे लागतो हा उद्देश ठेवत  हा कार्यक्रम पार पडला ,यावेळी शिक्षकांना वाचनीय पुस्तके भेट देत तसेच शाळेप्रती कृतज्ञता व्यक्त करत तब्बल 75 हजाराचे  पंचवीस बेंच, पचंवीस हजाराचे सॅनिटरी नॅपकिन पॅड मशीन व सीलिंग फॅन अशी एकुण एक लाखाची भेटवस्तूची मदत शाळेसाठी देवू केले.
     याप्रसंगी बोलताना प्रमुख पाहुणे शिवाजीराव सावंत  म्हणाले, या शाळेमध्ये अनेक मेळावे झाले पण हा  गुरु शिष्यांचा स्नेह मेळावा म्हणून एक नवीन उपक्रम या 1999 च्या बॅचने घालून देत शाळेसाठी एक अविस्मरणीय भेट म्हणून बेंच देऊ केले .ही गोष्ट पुढच्या पिढीला प्रेरणा देणारी व उल्लेखनीय असल्याचे सांगितले याचं बेंचवर बसून इथून पुढची पिढी ज्ञानार्जन करून देशातील विविध क्षेत्रात यशस्वी होईल असे गौरवोद्गार त्यांनी काढले. 
    यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष ,एस बी,सुर्यवंशी ,सी.आर. माळवदे,   इंदलकरसर ,इ. बी. देशमुख,आर.डी. लोहार, पी. पी. पाटील , अनिल पाटील, आदि शिक्षकांनी मनोगत व्यक्त केले, 
यावेळी शाळेचे पर्यवेक्षक एस.डी. साठे,  कागलचे मुख्याध्यापक टि.ए. पोवार,आर.एच. पोळ,एम. एम.रेडेकर, एस ए पाटील,आर.जी.पाटील आनंदराव कल्याणकर,पी.एन. पाटील ,एम एच खराडे,यांच्या सह अनेक आजी माजी शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी ,माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी संख्येने उपस्थित होते
   कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमोल चौगले ,स्वागत व सूत्रसंचालन  सागर कुंभार तर आभार सचिन सुतार यांनी मानले

 फोटो...
   मुरगुड.. येथील मुरगुड विद्यालय जुनियर कॉलेज मुरगुड येथे सन 1999 चे दहावीचे माजी विद्यार्थी आपल्या शिक्षक वृंदा समवेत

मौजे वडगांव बारकी पाणंद रस्त्यावर भुयारी मार्ग करा पालकमंत्री तथा वैधकीय शिक्षणमंत्री नाम. हसन मुश्रीफ व खास . धैर्यशिल माने यांना निवेदन


हेरले / प्रतिनिधी ) मौजे वडगांव येथील बारकी पाणंद रस्त्यावर भुयारीमार्ग करावा आशा मागणीचे निवेदन मौजे वडगांव ग्रामपंचायत सदस्यांच्या शिष्टमंडळाने कोल्हापूरचे पालकमंत्री तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री नाम . हसन मुश्रीफ व खास . धैयशिल माने यांना दिले .
             नागपूर रत्नागिरी या नविन राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु आहे. पण हा रस्ता करत असतांना शेतकऱ्यांच्या आडचणीचा विचार नकरता काम सुरू असून मौजे वडगांव (ता. हातकणंगले) येथील बारकी पाणंद म्हणून प्रसिध्द असणऱ्या व गावातील सातशे ते आठशे एकर क्षेत्र आसणाऱ्या शेतकऱ्यांना या पाणंद रस्त्याचा वारंवार वापर करावा लागतो .
          गावच्या गायराण व पाझर तलावाकडे जातांना गावातील शेतकरी जनावरे चरणेसाठी, शेतातील गोठ्यावर धारा काढणेसाठी, शेतींची मशागत करणेसाठी ' दिवस व रात्रीचे शेतीपिकांना पाणी पाजणेसाठी, तसेच रोजंदारीवर काम करण्यासाठी लागणारे शेतमजूर, ऊस वाहतूकीचे ट्रॅक्टर , या सर्वांना याच पाणंद रस्त्यांचा वापर करावा लागतो. तसेच गेल इंडिया , HPCL व BPCL यासारखे शासनाचे मोठे प्रोजेक्ट गायरान मध्ये आसल्याने जाणेयेणेसाठी याच पाणंद रस्त्याचा वापर करावा लागतो. त्यामुळे जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडणे धोकादायक होऊ शकते . तसेच या आगोदर रस्ते प्रकल्प अधिकाऱ्यांशी ग्रामपंचायतीने लेखी पत्रव्यवहार केला आहे . त्यामुळे या पाणंद रस्त्यांवर भुयारी मार्ग करणे अत्यंत्य गरजेचे आहे अशी मागणी ग्रा पं . शिष्टमंडळाने केली . यावेळी नामदार हसन मुश्रीफ यांनी दिपावली नंतर केंद्रिय रस्ते विकासमंत्री नितिन गडकरी यांची भेट घेऊन भुयारी मार्गाचा प्रश्न मार्गी लावणार आसल्याचे आश्वासन दिले .
            या शिष्टमंडळामध्ये उपसरपंच सुनिल खारेपाटणे , ग्रा.पं. सदस्य सुरेश कांबरे , रघूनाथ गोरड , अविनाश पाटील, स्वप्नील चौगुले , प्रकाश कांबरे , आनंदा थोरवत, अमोल झांबरे , अमर थोरवत, उपस्थित होते .

फोटो
भुयारी मार्गासाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना निवेदन देतांना मौजे वडगाव ग्रां पं . चे शिष्टमंडळ

Saturday, 18 November 2023

स्वच्छता हीच आरोग्याची गुरुकिल्ली

डॉ अजितकुमार पाटील, कोल्हापूर- पीएच डी ( मराठी विज्ञान साहित्य )

कोल्हापूर महानगरपालिका अंतर्गत कोल्हापूरचे आयुक्त के मंजूलक्ष्मी यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर शहरातील शिक्षण विभाग, आरोग्य विभाग यांनी *स्वच्छ कोल्हापूर सुंदर कोल्हापूर*
 या मोहिमे अंतर्गत प्राथमिक विद्यालय, उच्च माध्यमिक, महाविद्यालयीन स्तरावर सुद्धा स्वच्छतेचे महत्व विविध माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न सुरू आहे कारण
 *स्वच्छ हवा आरोग्याची गुरुकिल्ली* आहे

 समर्थ संत तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे *नाही निर्मल जीवन काय करील साबण*

 याप्रमाणे आरोग्याचे महत्व पटवून देण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न सर्वच स्तरावर होत आहे कारण आपले आरोग्य चांगले असेल तर आपण आपले जीवन ,आपले मन, विचार ,मानसिक स्थिती स्थिर राहणार आहे याच्या माध्यमातून मी आपना समोर आरोग्य संदर्भात विचार अभ्यासपूर्ण मांडत आहे याचा सर्व विद्यार्थी नागरिक जेष्ठ नागरिक यांनी विचार करावा.

मानवाच्या दैनंदिन जीवनामध्ये रोजच्या कृतीतून तयार होणाऱ्या अनेक टाकाऊ पदार्थांना घन कचरा म्हणतात. योग्य वापर केला तर “टाकाऊ पदार्थ” सुद्धा मौल्यवान स्रोत होऊ शकतो. मानवी समाजात घन कचरा ही आर्थिक विकास, पर्यावरणाचा ऱ्हास आणि आरोग्याच्या समस्या या दृष्टीने गंभीर प्रश्न भारतातच नव्हे तर जगासमोर उभा आहे. त्यामुळे हवा, पाणी व जमीन प्रदूषित होऊन मानवी अधिवासाला धोका निर्माण होत आहे. घन कचऱ्याचे संकलन, साठवण, वाहतूक, प्रक्रिया व विल्हेवाट किंवा पूनर्वापर इ. बाबी घन कचरा व्यवस्थापनात येतात.

*घन कचऱ्याचे वर्गीकरण* : घन कचऱ्याचे वर्गीकरण खालीलप्रमाणे करतात.

१ विघटनशील कचरा
२ अविघटनशील कचरा
परिणाम घातक परिणाम
अघातक परिणाम
प्राकृतिक स्थिती सुका कचरा
ओला कचरा
पुन:चक्रीकरण पुन:चक्रीय कचरा
अपुन:चक्रीय कचरा

*घन कचऱ्याचे स्रोत* : घरगुती कचरा : हा कचरा घरामधून तयार होतो. उदा., टाकाऊ कागद, कागदी वस्तू व वेष्टने, काच, रबर, धातू, चामड्याच्या वस्तू इत्यादी.

*औद्योगिक कचरा* : रंग-गाळ, तेल, राख, लोखंडी व इतर जड धातू इत्यादी.

*धोकादायक कचरा* : रासायनिक, जैविक, स्फोटक, रोगप्रसारक इत्यादी पदार्थ.

*शेतातील घन कचरा* : झाडांची पाने, फुले व फांद्या, पिकांचे टाकून दिलेले भाग, जनावरांचे मलमूत्र इत्यादी.

*इलेक्ट्रॉनिक घन कचरा* : टाकाऊ दूरदर्शन संच,घरातील जुने इलेक्ट्रिक साहित्य,बांधकाम मधील प्लास्टिक, म्युझिक सिस्टिम्स, रेडिओ सेट ,जुने मोबाईल फोन, चार्जर, जुने संगणक इत्यादी.

*जैववैद्यकीय कचरा* : रुग्णालयामधील बॅंडेज, हातमोजे, सुया, वापरलेला कापूस, तापमापकामधील पारा, औषधे इत्यादी.

विघटनशील घन कचरा : खराब शिळे अन्न, खराब फळे, खराब भाजी, कागद, माती, राख, झाडांची पाने इत्यादी.

*घन कचरा व्यवस्थापनाच्या सर्वसाधारण पद्धतीखालीलप्रमाणे आहेत* :

(अ) भूमिभरण : या पद्धतीत कचरा पातळ थरांत पसरला जातो, त्यावर घट्ट गाळ आणि चिकणमाती किंवा प्लॅस्टिकचा थर दिला जातो. आधुनिक भूमिभरण पद्धतीमध्ये तळाशी प्लॅस्टिकचे  प्रचंड मोठे  अच्छिद्र पटल  पसरले जाते, त्यावर चिकणमाती, जाड प्लॅस्टिक आणि वाळूचे अनेक थर दिले जातात. अशी पद्धत अवलंबिल्याने पाझरलेले पाणी भूजलात मिश्रित होत नाही व भूजल प्रदूषण टाळता येते.

प्लॅस्टिकच्या तळाशी पाझरलेले पाणी साचल्यास खाली पंप टाकून पाणी वर खेचले जाते आणि त्याच्यावर प्रक्रिया करून शुद्धीकरण केले जाते. जमिनीची भूमिभरणक्षमता संपते तेव्हा ती जमीन पाण्याची टंचाई टाळण्यासाठी चिकणमाती, वाळू व मातीसह झाकली जाते. पाण्याच्या गळतीमुळे होणारे भूजल प्रदूषण रोखण्यासाठी व भूमिभरणाच्या क्षेत्राचे निरीक्षण करण्यासाठी त्याच्या आजूबाजूला अनेक विहिरी खोदल्या जातात. कचऱ्याच्या विघटनाने तयार झालेला मिथेन वायू साठविला जातो आणि त्याचा वापर विद्युत् किंवा उष्णता निर्माण करण्यासाठी केला जातो.
भूमिभरणासाठी जागेची निवड : (१) भूजलाशी संपर्क टाळण्यासाठी जमिनीची उंची भूजल पातळीपेक्षा जास्त असणे आवश्यक असते. (२) शक्यतो चिकणमाती किंवा गाळ असणाऱ्या प्रदेशातील जागा निवडावी. (३) ही जागा खडक उत्खनन क्षेत्रात नसावी. अशा क्षेत्रांत खडकांतील भेगांमुळे पाणी खाली पाझरते व भूजल प्रदूषण होऊ शकते .

भूमिभरणामुळे मोठ्या प्रमाणात दुष्‍परिणाम होऊ शकतात. हे परिणाम पुढीलप्रमाणे असू शकतात : (१) जीवघेणा अपघात (उदा., कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली सफाई कामगार दबले जाण्याचे प्रसंग). (२)पायाभूत सुविधांचे नुकसान (उदा., कचऱ्याच्या जड वाहनांमुळे रहदारीला अडथळे). (३) स्थानिक पर्यावरणाचे प्रदूषण (उदा., जमिनीचा वापर आणि त्याचबरोबर भूमिभरण बंद केल्यानंतर गळती आणि माती प्रदूषणाने भूजल आणि / किंवा पाणवठ्याचे प्रदूषण). (४) सेंद्रिय टाकाऊ पदार्थांच्या विघटनामुळे कचरा निर्माण होणाऱ्या मिथेनाचे वातावरणातील वायूंशी मिश्रण (मिथेन हा कार्बन डाय-ऑक्साइडापेक्षासुद्धा शक्तिशाली हरितगृह वायू आहे आणि परिसरातील रहिवाशांसाठी तो धोकादायक ठरू शकतो). (५) उंदीर व माशी यांच्यासारख्या रोगप्रसारकांचे पोषण या क्षेत्रात मुख्यतः होते.

(आ) भस्मीकरण : भस्मीकरण म्हणजे फक्त राख शिल्लक होईपर्यंत ज्वलन करणे. भस्मक हे असे यंत्र आहे की, जे कचरा आणि अन्य प्रकारचे टाकाऊ पदार्थ यांची राख होईपर्यंत ज्वलनासाठी वापरले जाते. भस्मक तयार करण्यासाठी घनता जास्त असणारे तसेच उष्णतारोधक असे पदार्थ वापरले जातात, जेणेकरून आजूबाजूच्या परिसरात अतिउष्णतेचा त्रास होणार नाही.
कचऱ्याच्या त्वरित तसेच कमी संसाधनाच्या वापरात ज्वलनासाठी भस्मकामध्ये उच्च उष्णतापातळी राखणे जरूरीचे असते. उष्णता बाहेर पडू दिल्यास कचऱ्याचे पूर्णपणे किंवा वेगाने ज्वलन होत नाही. भस्मीकरण ही  विल्हेवाट पद्धती असून त्यात घन सेंद्रिय कचऱ्‍यांचे ज्वलन केले जाते तसेच त्यायोगे त्यांना अवशेष आणि वायुजन्य उत्पादांमध्ये रूपांतरित करता येते. ही पद्धत घन कचरा व्यवस्थापन आणि सांडपाणी व्यवस्थापनातील अवशेष या दोन्ही गोष्टींच्या विल्हेवाटीसाठी उपयुक्त आहे. या प्रक्रियेमुळे घन कचऱ्याचे प्रमाण मूळ घनफळाच्या २०—३० टक्के कमी होते.

भस्मीकरण आणि इतर उच्च तापमान कचरा व्यवस्थापन प्रणाली कधीकधी “औष्णिक उपचार” (thermal treatment) म्हणून वर्णिल्या जातात. कचऱ्याचे भस्मीकरण छोट्या स्तरात सुद्धा दिसून येते. घरातील कचऱ्याचे सर्वसामान्य ज्वलन हे छोट्या प्रमाणावरील भस्मीकरण तसेच उद्योगांतील मोठ्या प्रमाणावर आणि जास्त कचऱ्याचे केलेले ज्वलन मोठ्या स्तरातील भस्मीकरण म्हणता येते. घन, द्रव आणि वायू या प्रकारांच्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी ही पद्धत वापरता येते. काही घातक टाकाऊ पदार्थांची विल्हेवाट लावण्याची एक व्यावहारिक पद्धत म्हणून ती ओळखली जाते. वायूचे प्रदूषण कमी करणे यांसारख्या अडचणींमुळे  कचऱ्याच्या विल्हेवाटीचा हा एक विवादात्मक उपाय आहे.

(इ) सेंद्रिय खतांची निर्मिती :  मोठ्या शहरांमध्ये भूमिभरणासाठी जागेची कमतरता असल्यामुळे, योग्य  माध्यमाद्वारे जैवविघटनशील कचऱ्याचे (म्युनिसिपल कचऱ्यापासून वेगळा) विघटन केले जाते. यातून मातीसाठी चांगल्या दर्जाचे पोषण मिळते, तसेच समृद्ध आणि पर्यावरणीय अनुकूल खत तयार केले जाते त्यामुळे मातीची गुणवत्ता आणि उत्पादनक्षमता वाढते.

भारतात तयार होणाऱ्‍या महापालिकेतील घन कचऱ्यामध्ये ३५—४० टक्के सेंद्रिय घटक आहेत. या कचऱ्याचे, विल्हेवाटीच्या सर्वांत जुन्या पद्धतींपैकी एक, सेंद्रिय पद्धतीने पुनर्नवीनीकरण केले जाऊ शकते. सेंद्रिय कचऱ्याच्या  विघटनाची नैसर्गिक प्रक्रिया म्हणजे खत किंवा कंपोस्ट याचे उत्पादन, यामध्ये पोषक द्रव्ये अतिशय समृद्ध असतात.

कंपोस्टिंग म्हणजे जैविक प्रक्रिया असून त्यात सूक्ष्मजीव, मुख्यतः बुरशी आणि जीवाणू असतात, जसे की पदार्थासारख्या अवयवयुक्त कचऱ्यात बुरशीचे रूपांतर होते. हे तयार झालेले उत्पादन मातीसारखे दिसते, त्यामध्ये कार्बन आणि नायट्रोजन यांचे प्रमाण जास्त असते आणि वाढणाऱ्या वनस्पतींसाठी ते एक उत्कृष्ट माध्यम असते.
*घन कचरा*
नैसर्गिक सौंदर्य कमी होणे : पसरलेल्या घन कचऱ्यामुळे नैसर्गिक सौंदर्य कमी होते.
कचऱ्याची दुर्गंधी : साठविलेल्या कचऱ्यापासून दुर्गंधी निर्माण होते.
विषारी वायू : नागरी घन कचरा विल्हेवाटीची ठिकाणे किंवा भूमिभरण ठिकाणे यांमधून विषारी वायू बाहेर पडतात.
रोगांचा प्रसार : घन कचरा विल्हेवाटीची ठिकाणे अनेक रोगांना आमंत्रित करतात.
ऊर्जाभरण : सेंद्रिय कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती विविध प्रक्रियांद्वारे केली जाते. यातून जैववायूची निर्मिती करता येते.
औद्योगिक घनकचरा व्यवस्थापन : सध्या उद्योगधंद्यांमध्ये निर्माण होणार कचरा अधिकृत संस्थेकडे पाठविला जातो व त्याची शास्त्रीय पद्धतीने हाताळणी व विल्हेवाट लावली जाते.
घनकचरा व्यवस्थापनामध्ये वैयक्तिक सहभाग :
घनकचरा व्यवस्थापन करीत असताना तीन ‘R’ महत्त्वाचे आहेत :
१) कचरा कमी करणे (REDUCE) : उदा., कमीत कमी कागद व कॅरीबॅगेचा वापर करणे.
२)पुनर्वापर (REUSE): उदा., वापरलेल्या वहीतील कोऱ्या कागदापासून नवीन वही तयार करणे.
३) पुन:चक्रीकरण (RECYLCE): घन कचऱ्यामधील धातू, रबर, काच इ. पदार्थ पुन:चक्रीकरणासाठी पाठविले जातात.
                     

Tuesday, 14 November 2023

ज्ञानरचना आणि अध्यापन एक प्रभावी पध्दत - डॉ अजितकुमार पाटील सर ( पीएच डी )

(Knowledge Construction and Teaching)


अध्यापन ही गुंतागुंतीची आणि क्लिष्ट प्रक्रिया आहे, हे सूक्ष्म अध्यापनामधून स्पार होतेच. कोणतीही कृती करताना नेमके मला काय करायचे आहे याची स्पष्ट जाणीव व्यक्तीला होणे गरजेचे असते. उदा. एखाद्या व्यक्तीला गावाला जायचे असेल तर त्यासा त्या गावाला जाण्याच्या वाहतुकीची माहिती घेणे, वाहतुकीचे साधन निश्चित करणे, त्या निवडलेल्या साधनाचे आरक्षण करणे, त्या गावातील मुक्कामानुसार स्वतःच्या सामानार्थी तयारी करणे, त्याचप्रमाणे आपल्या अनुपस्थितीत येथील कामाचे नियोजन करणे या कृती जितक्या चांगल्या होतील तितक्या प्रमाणात गावाला जाण्याचा कार्यक्रम यशस्वी होतो अन्यथा यामध्ये विस्कळीतपणा येतो.
वरील उदाहरणावरून हे लक्षात येते की, ज्या व्यक्तीला गावाला जायचे आहे त्या व्यक्तीच्या मनात खालील बाबींची स्पष्टता असणे गरजेचे असते.
१. कोणत्या गावाला जायचे ते ठिकाण
२. त्या गावाचे स्वरूप आणि सुविधा
३. त्या गावापर्यंत जाण्याच्या मार्गाचा परिचय
४. त्या गावापर्यंत पोहोचण्यासाठी करावयाच्या आवश्यक बाबी हे चित्र जितके स्पष्ट तितकी पुढील प्रक्रिया सुलभ होते. अध्यापन ही अशीच प्रक्रिय आहे. अध्यापनामध्ये विशिष्ट हेतू साध्य करण्यासाठी शिक्षकाला विविध कृती करावयाच्य असतात. त्यामुळे त्याला काही गोष्टींची 'स्पष्ट जाणीव' होणे गरजेचे असते. यालाच आपण अध्यापनाविषयीचे अवबोध म्हणू.

ज्ञानरचना आणि अध्यापन

अध्यापनामध्ये समाविष्ट बाबी: कोणत्याही विषयाच्या अध्यापनामध्ये शिक्षकाला खालील चार प्रकारचे अवबोध स्पष्ट करून घ्यावे लागतात.

१ काय शिकवायचे आहे ?
२. कोणाला व कशासाठी शिकवायचे आहे ?
३. शिकवण्यासाठी वर्गाची व शाळेची भौतिक परिस्थिती कशी आहे ?
 ४. हे सर्व हाताळण्यासाठी माझ्या स्वतःमध्ये किती क्षमता आहे ?
प्रत्येक शिक्षक ही प्रथम एक व्यक्ती आहे. त्यामुळे मानसशास्त्राच्या नियमानुसार प्रत्येक संवेदनेला प्रत्येक व्यक्ती वेगवेगळा अर्थ लावते. त्यामुळे एकाच संवेदनेचे विविध व्यक्तींमध्ये वेगवेगळे अवबोध निर्माण होतात. म्हणजे एकच आशय एकाच वर्गातील विद्यार्थ्यांसाठी दोन भिन्न शिक्षकांनी शिकवला तर त्यांच्या अध्यापनामध्ये खूपच तफावत असते. याची अनेक उदाहरणे आपल्याला अनुभवायलाही मिळतात. शिक्षक-प्रशिक्षणाचा हेतू चांगला शिक्षक तयार करणे हा आहे. यासाठी अध्यापनाचे जरी भिन्न अवबोध तयार झाले तरी त्या भिन्न अवबोधांची एकूण गुणवत्ता ही चांगलीच असली पाहिजे. या दृष्टीने अध्यापनाच्या या अवबोधांचे स्पष्टीकरण करणे गरजेचे आहे.
१. आशय अवबोध: विविध विषयांतील संकल्पना, नियम, तत्त्वे तसेच त्यामध्ये समाविष्ट असलेली मूल्ये विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे आणि आवश्यक असते.
१. शाळेभोवतालचा परिसर, लोकवस्ती व लोकजीवन
२. शाळेत प्रवेश करण्याचे रस्ते, शाळेचा आकार, शाळेमधील प्रयोगशाळा, इतिहास, भूगोल यांच्या विषय खोल्या आणि ग्रंथालय.
३. वर्गाचे शालेय इमारतीतील स्थान, आकार, प्रकाशयोजना, फलक, विद्युत पुरवठा, शैक्षणिक साधनासंदर्भातील सुविधा इत्यादी.
४. विद्यार्थ्यांची संख्या व बैठकव्यवस्था इत्यादी.
५. स्वक्षमता : अध्यापन ही बहुआयामी संकल्पना आहे व यामध्ये शिक्षक आणि त्याचे व्यक्तिमत्त्व यांचा फार मोठा प्रभाव आहे. शिक्षकांना समान स्तराचे प्रशिक्षण दिले पत्तेतील हजरजबाबीपणा, बहुश्रुतता, व्यासंग यांसारखे एकूण व्यक्तिमत्त्वावर प्रभाव पाडणारे घटक असले तरीसुद्धा प्रत्येकाची बोलण्याची क्षमता, भाषेतील ओघवतेपणा, वक्तृत्वशैली, वेगवेगळ्या व्यक्तींमध्ये वेगवेगळ्या प्रमाणात असतात. या प्रत्येक घटकासंदर्भात तसेच सतात, किती प्रमाणात आहेत याबाबतचे आत्मनिरीक्षण करणे गरजेचे असते. विशिष्ट अध्यापनासाठी लागणाऱ्या आवश्यक गुणवैशिष्ट्यांसंदर्भात आपल्यामध्ये या क्षमता जाणीव आशयाच्या अध्यापनासंदर्भात एक शिक्षक म्हणून स्वतःची ओळख स्वतःला पटवणे, या बार्बीचा  विचार करणे गरजेचे आहे. अवबोध क्षेत्रामध्ये समावेश होतो. यासाठी खालील अवबोध स्पष्ट असणे
१. माझे आशयज्ञान किती प्रमाणात आहे ते वाढविण्याच्या दृष्टीने त्या संदर्भातील केलेले विविध स्रोतांची माहिती आहे का ?
२. त्या स्रोतांचा वापर आशयाचे उत्तमरित्या आकलन होण्यासाठी मी कसा करून घेईन ?
३. माझे आशयज्ञान चांगले आहे परंतु ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आवश्यक कौशल्ये माझ्याजवळ आहेत का ? ती मिळवण्याचा प्रयत्न करणे.
४. काही कौशल्ये आत्मसात केलेली असतील परंतु त्यामधील सखोलता प्राप्त ये करण्यासाठी किंवा इतर आवश्यक कौशल्यांचे ज्ञान मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यात मी सक्षम आहे का ? सक्षम बनण्यासाठी काय करावे याचा शोध घेणे.
५. माझ्याकडे असलेल्या कौशल्यांचे आशयानुसार तसेच विद्यार्थ्यांच्या आकलन-
या क्षमतेनुसार नियोजन मी स्वतः कसे करेन ?
६. विविध अध्यापन पद्धती, त्या संदर्भातील माहिती मला आहे का ? तसेच केवळ माहिती असण्यापेक्षा त्याद्वारे अध्यापन करता येते का ? याची जाणीव असणे आवश्यक आहे.
७. विविध अध्यापन पद्धतींची माहिती कोठून मिळवायची, संदर्भ पुस्तकांच्या वापराद्वारे मी माझे अध्यापन प्रभावी बनवू शकतो का ?
वास्तविक यावर तात्विक विचार व चर्चा होणे गरजेचे आहे. मूल्यमापन तंत्र वर्तनवादी मानसशास्त्रावर आधारित आहे. साधारण १९७० नंतर वर्तनवादाच्या मर्यादा  आल्या व बोधात्मक मानसशास्त्र, मेंदू आधारित अध्ययन या विचारांचे प्राबल्य वाढले. आता तर संपूर्ण शिक्षणप्रणाली ज्ञान रचनावाद या संकल्पनेभोवती गुंफली जात आहे.
या तत्त्वांनुसार 'शिक्षकाने अध्ययन अनुभव दिले म्हणजे शिकवणे संपले' असे न मानता विद्यार्थ्यांनी त्या अध्ययन अनुभवांशी कशी व किती प्रमाणात आंतरक्रिया केली यावर विद्यार्थ्यांचे अध्ययन म्हणजे त्याची ज्ञानप्राप्ती व पर्यायाने अध्यापनाची फलश्रुती अवलंबून आहे, असे म्हणावे लागते.
 विचारांमध्ये विद्यार्थी, आशय, शैक्षणिक साधने, प्रश्न इत्यादींचा समावेश असतो. प्रत्येक शिक्षकाला त्याच्या वर्गाध्यापनामध्ये भिन्न-भिन्न कृती कराव्या लागतात. त्यासाठी त्याला स्वतंत्रपणे विचार करावा लागतो. या प्रमाणे असते. विशिष्ट वर्गात शिकविण्यासाठी काय काय करायचे याचे मानसिक चित्र शिक्षकाला तयार करावे लागेल. हेच चित्र कागदावर आणले की त्याच्या अध्यापनाचे नियोजन तयार झाले. एखादा नवशिका शिक्षक हे नियोजन सविस्तर करील. सरावानंतर तो केवळ टप्पांचे किंवा पायऱ्यांप्रमाणे नियोजन करील.

नियोजनामध्ये शिक्षक खालील तीन अवस्थांचा वापर करतात.

१. *शोधावस्था* : स्वतःच्या विषयाचे, विद्यार्थ्यांबाबतचे, अध्यापनाबाबतचे ज्ञान किती आहे? स्वतःला अध्यापनामध्ये किती, कसे व कोणते अनुभव आलेले आहेत ? अध्यापनातून नेमक्या कोणत्या बाबी साध्य करावयाच्या आहेत ? यांसारख्या मुद्द्यांचा विचार करून नियोजन कसे करायचे, हे शिक्षक ठरवितो.

२. *समस्या निराकरणावस्था* : विशिष्ट विद्यार्थ्यांच्या, वर्गाच्या तसेच विशिष्ट आशयाच्या काही गरजा असतात. या बाबींवर त्याला सविस्तर विचार करावा लागतो. या विचारांची दिशा, समस्या निराकरणाच्या पायऱ्यांप्रमाणे असते. त्या-त्या गरजांप्रमाणे शिक्षक नियोजनामध्ये बदल करतो.

३.*स्वयंमूल्यमापनावस्था* ही अवस्था कृतीनंतरची आहे. नियोजनाप्रमाणे कार्यवाही केली जाते. स्वतःच्या प्रत्येक कृतीचे मूल्यमापन करून कोणत्या बाबी नित्य कृती म्हणून स्वीकारायच्या, कोणत्या कृर्तीमध्ये जाणीवपूर्वक बदल करावयाचे हे ठरवितो. नित्य कृतींबाबत सविस्तर नियोजन करावे लागत नाही. नवीन बाबींचे सविस्तर नियोजन कसे करावयाचे, याबाबतचा तो पुढील नियोजनासाठी विचार करू लागतो.
म्हणून ज्ञानरचनावाद हा वापरताना शिक्षणाची आनंददायी शिक्षणाची सुरूवात झाली आहे असे म्हणावे लागेल.

       जय हिंद...

Saturday, 4 November 2023

स्वच्छता हीच आरोग्याची गुरुकिल्ली - डॉ. अजितकुमार पाटील

कोल्हापूर प्रतिनिधी 

मुख्यमंत्री सक्षम शहूर स्पर्धा अंतर्गत म.न.पा * राजर्षी शाहू विद्यामंदिर शाळेत कचराकुंडीचे वाटप करण्यात आले.

कोल्हापूर शहराने मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धे- मध्ये भाग घेतला असून शहरात स्वच्छता मोहिम सुरु आहे. या अंतर्गत स्वच्छ शाळा सुंदर शाळा उपक्रम सुरु आहे को आखिल कोल्हाटी डोंबारी समाज कोल्हापूर यांच्यावतीने शाळेस कचराकुंडीचे कसबा बावडा कोल्हापू वाटप करण्यात आले.

शाळेच्या विद्यार्थ्यांना
ओला कचरा व सुका कचरा यांची विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. याप्रसंगी स्वच्छ भारत स्वच्छ विद्यालय या प्रथनाट्यामध्ये ओला कचरा सुका कचरा प्लास्टिक कचरा ई कचरा या संदर्भात  विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले.यामध्ये सुप्रिया माने,आरव कोरवी,प्रणित पाटील,इतर विद्यार्थ्यांनी पथनाट्य उत्स्फूर्तपणे सादरीकरण केले.
 कार्यक्रमास  केंद्रमुख्याध्यापक डॉ अजितकुमार पाटील,सुशिल जाधव,उत्तम पाटील, अध्यक्ष तुकाराम लाखे,आरोग्य निरिक्षक नंदकुमार पाटील सुरेश लाखे, घरजू निकम, मुकादम मनोज कुरणे. उपस्थित होते. विठ्ठल लाखे, रखी लाखे, वैभव शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रमेश सुतार,तमेजा मुजावर, मिनाज मुल्ला, आसमा तांबोळी, विद्या पाटील, कल्पना पाटील,सावित्री काळे व शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य उपस्थित होते.
आभार उत्तम कुंभार यांनी मानले

Wednesday, 1 November 2023

मनोज जरांगे पाटील यांना पाठींबा देण्यासाठी मौजे वडगांव येथे कॅन्डल मार्च


हेरले /प्रतिनिधी
मौजे वडगांव (ता हातकणंगले येथे मराठा आंदोलनाच्या पार्श्वभुमीवर सकल मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी व उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांना पाठींबा देण्यासाठी कॅन्डल मार्चच आयोजन करण्यात आलं होत. यावेळी सर्वप्रथम छ.शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस अभिवादन करून गावातील मुख्य रस्त्यावरून निषेध फेरी काढण्यात आली . संपूर्ण गावातून फेरी काढून या कॅन्डल मार्चची सांगता झेडा चौक येथे करण्यात आली . यावेळी सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते तसेच ग्रामपंचायतचे व विविध संस्थाचे पदाधिकारी उपस्थित होते. तसेच गावातील विविध समाजाच्या वतीने सकल मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठींबा देण्यात आला . यावेळी राजकीय पुढाऱ्यानां गावामध्ये येण्यास बंदी करण्यात आली .

हेरले येथे एकदिवसीय उपोषण



     हेरले / प्रतिनिधी
मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी हेरले (ता हातकणंगले)  येथे मराठा तरुणांनी बुधवारी एक दिवसीय लक्षणीय उपोषण झेंडा चौक शिवतीर्थ येथे केले.
            आरक्षणाबाबात सरकारने दिलेल्या मुदतीत आश्वासनाची पूर्तती केली नसल्याच्या  निषेधार्थ मराठा आंदोलनाचे जरांगे-पाटील यांनी  पुन्हा अमरण उपोषण सुरू केले. त्यांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शविण्यासाठी सकाळी नऊ वाजता हेरले गावातील मराठा समाजाच्यावतीने  ‘एक मराठा कोठी मराठा’च्या घोषणा देत उपोषणला सुरवात केली. तरुणांच्या या उपोषणाला गावातील सर्व नागरिकांनी उत्स्फूर्त पाठिंबा दिला.यावेळी दिनांक २ रोजी हेरले गाव दुपारनंतर पूर्ण  बंद करण्याची तसेच सायंकाळी ६ वाजता गावातून मशाल मोर्चा काढण्यात येणार आहे.अशी घोषणा करण्यात आली.
    या एक दिवसीय  उपोषणास माजी सभापती राजेश पाटील,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सरचिटणीस मुनिर जमादार, सरपंच राहुल शेटे, तंटामुक्त अध्यक्ष अमर वडड, जवाहर साखर संचालक आदगोंडा पाटील,सर्जेराव भोसले,अमित पाटील,हिम्मत बारगिर,शिवसेनेचे उपतालुका प्रमुख संदीप शेटे,विनोद वडड,नौशाद देसाई, अबूबकर जमादार,अमीनुद्दीन पेंढारी,बाळगोंड पाटील,राहुल चौगुले,तसेच गावामधील  सर्व समाजाने एकमुखी पाठिंबा दिला.यावेळी  हातकणंगले पोलीस ठाण्याचे प्रमुख पोलीस निरीक्षक महादेव तोंदले यांनी भेट देऊन आंदोलन शांततेत करण्याचे आवाहन केले.         
               यावेळी विजय कारंडे ,माजी उपसरपंच कपिल भोसले ,ग्रामपंचायत सदस्य विजय भोसले ,मनोज पाटील,सयाजी गायकवाड,विश्वजीत भोसले ,आदिक इनामदार,नंदकुमार माने,उदय भोसले,शरद माने,संग्रामसिंह रुईकर, सोमनाथ भोसले,ऋषिकेश लाड,मनोज जाधव ,सोमनाथ भोसले,
डॉ. संतोष कागले,दीपक जाधव,प्रवीण सावंत,संदीप मिरजे,संतोष भोसले,यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

फोटो:-
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी हेरले येथील तरुणांनी एकदिवसीय उपोषन केले प्रसंगी.