नुकतेच महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी एका राष्ट्रीय पक्षाचे विधान सभा नेते , ज्येष्ठ नेते , आमदार आदी दुष्काळी भागातील एका जिल्ह्यात आले होते , त्याप्रसंगी सभेआधी एका कार्यकर्त्याच्या घरी या नेत्यांसाठी शाही जेवणाचा बेत आखण्यात आला होता.सध्या विरोधी पक्षात असलेल्या या नेते मंडळींचा शाही जेवणाचा बेत सत्ताधार्यांनाही लाजवेल असा होता , जनता दुष्काळात होरपळत असताना , कार्यकर्ते उपाशीपोटी रात्रंदिवस प्रचार करत असताना नेते मंडळी मात्र चक्क सोन्याचा मुलामा देण्यात आलेल्या ताट-वाट्यामधून शाही भोजन करण्यात मग्न होते , कॅटरर्सकडून ही खास सोन्याचा मुलामा असलेली भांडी मागवण्यात आली होती , म्हणूनच जनता आणि कार्यकर्ते राहतात उपाशी मात्र नेते मंडळी सोन्याच्या ताटात शाहीभोजन करतात तुपाशी असे म्हटल्यास वावगे ठरू नये ,
लोकशाहीची याहून अधिक मोठी शोकांतिका ती काय !