नंदगाव प्रतिनिधी
जिल्ह्यात बरेचठिकाणी क्वारंटाईन व्यक्तींबाबत नकारात्मक बातम्या येत असताना नंदगावातील क्वारंटाईन व्यक्तींनी काय केलं ते वाचायला हवचं.
नंदगाव ( ता - करवीर ) येथील परभणी , रायगड , व सातारा येथून आलेल्या तिघांना ग्रामपंचायत नंदगाव , कोरोना दक्षता समिती , व आरोग्य विभाग यांच्या वतीने विद्या मंदीर नंदगाव प्राथमिक शाळेमध्ये वेगवेगळ्या क्वारंटाईन कक्षामध्ये राहण्याची सोय करण्यात आली आहे . वेळेचा सदुपयोग म्हणून या तिघांनी या मिळालेल्या संधीच सोनं केल . गावातील ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून शाळेच्या आवारातील बागकाम तसेच पडझड झालेल्या संरक्षण कठड्याची दुरुस्ती , ग्रंथालय , यासारख्या अनेक सोयी सुविधा केल्या आहेत . पण लॉक डाऊन मुळे शाळा बंद झाली . या काळात शाळेकडे थोड दुर्लक्ष झाल. ही बाब या क्वारंटाईन झालेल्या व्यक्तींनी हेरली .व ग्रामपंचायतीची परवानगी घेवून त्यांनी ऐकमेकात सुरक्षीत अंतर ठेवून शाळेच्या स्वच्छतेला सुरवात केली . संपूर्ण शाळा झाडून काढली .झाडांना नियमीत पाणी घालणे . झाडांच्या भोवती उगवलेल्या तणाची खुरपणी केली . संडास बाथरूम स्वच्छ धुतले , क्रीडागंणाची स्वच्छता केली . त्यांच्या या शाळेसाठी दिलेल्या कामाच्या योगदानामुळे गावातील तसेच परिसरातील ग्रामस्थांच्याकडून कौतुक होत आहे .
फोटो . शाळेच्या आवारातील स्वच्छता करताना , सखाराम जगताप , मधूकर कुऱ्हाडे , गजानन सुतार