वाशिम प्रतिनिधी रजनीकांत वानखेडे
कृषी क्षेत्रात महिलांच्या सहभागातून कृषी उत्पादनात वाढ अंतर्गत आज 26 मे रोजी वाशिम जिल्ह्यातील मालेगांव तालुक्यातील मौजे सोनाळा येथे बीजप्रक्रिया व उगवणशक्ती तपासणी बाबत प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणाचे वेळी कृषी सहाय्यक एन एम म्हेत्रे यांनी कृषी सखी बचत गट अध्यक्ष सचिव ग्राम संघ अध्यक्ष सचिव महिलांना बियाण्याची प्रतवारी,चाळणी, उगवण क्षमता चाचणी, बीजप्रक्रिया,बियाणे बद्दल, सोयाबीन उत्पादनात गंधकाचा वापर तसेच माती परीक्षण याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
सोयाबीन हे सरळ वाण असल्यामुळे सोयाबीनचे बियाणे दरवर्षी बदलण्याची गरज नाही. मागील वर्षीचे बियाणे यावर्षी वापरता येईल.त्यासाठी सदर बियाण्याची उगवणशक्ती घरच्याघरी तपासून व बिजप्रक्रिया केल्यानंतरच पेरणी करता वापरावे. बियाण्याची उगवणशक्ती ७० टक्क्यांपेक्षा कमी असल्यास बियाणे प्रमाण वाढवून पेरणी करावी, सोयाबीन जमिनीत 5 सेंटीमीटर पेक्षा जास्त खोलवर पेरल्या जाणार नाही याबाबत विशेष काळजी घेण्याची गरज असल्याबाबत त्यांनी माहिती दिली.
कोरोनाचे संकट आल्यामुळे महिला प्रशिक्षण सभा घेताना विशेष काळजी घेण्यात आली.सुरक्षित अंतर ठेवून,प्रत्येकाने तोंडाला मास्क बांधून महिला शेतकरी उपस्थिती लावली.
यावेळी सोयाबीन पिकाची लागवड करण्यापूर्वी
उगवणशक्ती तपासण्याची पद्धती सांगून प्रात्यक्षिक व शेतकऱ्यांना प्रात्यक्षिकाद्वारे बीजावर कशी प्रक्रिया करावी व त्यासाठी लागणारे साहित्य याची माहिती प्रात्यक्षिकाद्वारे दाखविले.माती तपासणीसाठी नमूना कसा घ्यावा व त्याचे महत्व काय याचे प्रात्यक्षिकासहीत कृषी सहायक एन.एम.म्हेत्रे यांनी माहिती दिली सदरच्या प्रशिक्षणास एमसीआरपी विजया पटोकर ,कृषी सखी रेखा खुरसडे ,पशु सखी पूजा कदम, सीआरपी मायावती वानखेडे, यशोधरा वानखेडे, संगीता पाचरणे, रेखा वानखेडे, सुनंदा पाचरणे, रेखा इडोळे, राधा काठोळे, प्रतिभा वानखेडे व आर इडोळे आदी उपस्थित होते