Saturday, 30 May 2020

mh9 NEWS

माझं कोल्हापूर माझा रोजगार - पालकमंत्री सतेज पाटील

कोल्हापूर प्रतिनिधी 

कोरोनामुळे जिल्ह्यातील एक लाखाहून अधिक परप्रांतीय कामगार हे काम सोडून गेले आहेत. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रात कामगार कसे मिळणार हा प्रश्न उद्योजकांसमोर निर्माण झालाय. तर अनेकांचे रोजगार गेल्यामुळे ते चिंतेत आहेत. हीच औद्योगिक क्षेत्रातील पोकळी भरून काढण्यासाठी आणि जिल्ह्यातील युवक युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी पालकमंत्री सतेज पाटील यांनी पुढाकार घेतलाय. त्यांनी माझं कोल्हापूर माझा रोजगार या अभियानातून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत आहेत. त्यासाठी नामदार पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व औद्योगिक संस्थांच्या प्रतिनिधींची व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेऊन माझं कोल्हापूर माझा रोजगार या अभियानाची घोषणा केली. 
उद्योगांना चालना देण्यासाठी आणि स्थानिक युवक युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी माझं कोल्हापूर माझा रोजगार ही संकल्पना घेऊन जिल्ह्यातील सर्व औद्योगिक संस्था आणि संघटनांची व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे ही बैठक घेतली. यावेळी पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष सतीश कोष्टी यांनी आगामी सहा महिन्यांचा विचार केला तर कामगार मिळणे अवघड होणार आहे.  इचलकरंजीतून 23 हजार कामगार परत गेले. जिल्ह्यात एक लाख कामगारांची गरज भासणार असल्याचे सांगितले. इचलकरंजी एअरजेट असोसिएशनचे सतिश पाटील आणि शटललेस असोसिएशनचे अनिल गोयल यांनी पालकमंत्री म्हणून आपण जे पाऊल उचलले आहे हे महत्वाचे असल्याचे सांगितले. तर राजगोंडा पाटील यांनी यामुळं नक्कीच उद्योजक उभारी घेतील असा विश्वास व्यक्त केला.  उद्योजक शामसुंदर मर्दा यांनी सध्या कापड बनविण्यात कामगारांचा मोठा तुटवडा भासतो. पुढील तीन वर्षात अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे इथल्या स्थानिक युवकांना प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करून दिला पाहिजे अशी सूचना केली. 
क्रीडाई कोल्हापूरचे अध्यक्ष विद्यानंद बेडेकर यांनी सध्या चार हजार कामगारांचा तुटवडा आम्हाला भासत आहे. त्यासाठी आम्ही आमच्या कन्स्ट्रक्शन क्षेत्रात कामगारांची नोंदणी करून घेत असल्याचे स्पष्ट केले. तर  राजीव पारीख यांनी बांधकाम कामगारांना आवश्यक असलेले सर्व फायदे मिळवून देणे गरजेचे आहे. सेन्ट्रीगं कामगार, प्लम्बर यांना प्रशिक्षण देऊन कामावर घेऊ त्यासाठी क्रीडाईतर्फे जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल अस सांगितले.  
हॉटेल मालकसंघाचे अध्यक्ष उज्वल नागेशकर यांनी आम्ही सेवा क्षेत्रात आहोत आम्हालाही पाच हजार कामगारांची गरज असल्याचे सांगितले. 
कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनचे प्रदीप व्हरांबळे आणि नितीन वाडीकर यांनी स्थानिक कामगारांकडून चांगल्या प्रकारे काम केले जात असल्याचे सांगितले. उद्योजक दिनेश बुधले यांनी सध्याच्या परिस्थितीच विचार करता येणाऱ्या कामगारांनी  त्यांची मानसिकता बदलून मिळेल त्या ठिकाणी नोकरी केली पाहिजे अस सांगितले. 
कागल पंचतारांकित एमआयडीसीचे गोरख माळी यांनी फौंड्री उद्योगाला चालना देण्यासाठी आम्हाला कौशल्यपूर्ण मनुष्यबळ पाहिजे त्यासाठी आम्ही कौशल्य विकास केंद्र उभारण्याचा प्रयत्न करतोय. कामगारांना प्रशिक्षण देऊन त्यांना नोकरी देण्यासाठी फाईव्ह स्टार एमआयडीसी इथं प्रयत्न करत आहोत असं सांगितलं. 
शिरोली एमआयडिसीचे अतुल पाटील आणि सुरेंद्र जैन यांनी सध्या कामगारांच्या मागणीचा प्रश्न निर्माण होतोय. त्यासाठी कुशल मनुष्यबळ तयार करणे गरजेचे असल्याचे सांगितले. 
गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चर असोसिएशनचे सचिन शिरगावकर यांनी आमच्या दोन्ही इंडस्ट्रीजमध्ये कामगारांची गरज असल्याचे सांगितले. 
तर उद्योजक किरण पाटील यांनी स्थलांतरित कामगार परत येणार नाहीत. आता आपनालाच पाऊले उचलायला पाहिजेत, कोल्हापूरसाठी काहीतरी चांगले करण्यासाठी कार्यरत राहणे गरजेचे असल्याचे सांगितले. 
आर्किटेक्ट असोसिएशनचे अजय कोराने यांनी कुशल मनुष्यबळ मिळायला पाहिजे. लहान आणि मध्यम प्रकल्पांना चालना दिली पाहिजे अस मत मांडले. 
आयटी असोसिएशनचे शांताराम सुर्वे, स्नेहल बियानी आणि प्रसन्न कुलकर्णी यांनी कोल्हापूरमधले हजारहुन अधिक आयटीत काम करणारे कामगार हे कोल्हापूर सोडून बाहेर काम करत आहेत. आता या स्थानिक कामगारांना कोल्हापूरात नोकरीच्या संधी देता येतील. आता आयटी क्षेत्रात येत्या तीन वर्षांत 250 कोटींची गुंतवणूक होणार आहे. त्यामुळे सुमारे पंधरा हजार नोकऱ्या या क्षेत्रात उपलब्ध होतील असा विश्वास व्यक्त केला. 
कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे संजय शेटे यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांच्यामुळे गरजूंना नोकरी तर औद्योगिक क्षेत्राला आवश्यक कुशल मनुष्यबळही मिळणार असल्याचे संजय शेटे यांनी स्पष्ट केलं. 
सहाय्यक कामगार आयुक्त अनिल गुरव यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांनी स्थानिकांना नोकरीच्या संधी उपलब्ध करुन देण्याचे प्रयत्न करत आहेत. हे महत्वपूर्ण आहे. यासाठी कॅम्पस इंटरव्ह्यूव घेऊन निवड करण्यात येतील. कोल्हापूर लवकरात लवकर सुस्थितीत कसं येईल यासाठी प्रशिक्षण देऊन  नोकरीच्या संधी देणे उपयुक्त ठरणार असल्याचे सांगितले.  
आमदार ऋतुराज पाटील यांनी या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये औद्योगिक संस्थाच्या प्रतिनिधींनी आपले प्रश्न मांडले आहेत. कौशल्य विकास  शिक्षणावर भर दिलाय. या संकटातून बाहेर पडण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करणे गरजेचे असून लोकप्रतिनिधी म्हणून नक्कीच सकारात्मक प्रयत्न करू अशी ग्वाही दिली. 
आमदार चंद्रकांत जाधव यांनी कोरोनाच्या संकटाने अनेकांचे उद्योग बंद पडलेत. परप्रांतीय कामगार हे परत गेले आहेत. नामदार सतेज पाटील यांनी जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारून काम करत आहेत त्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. 
यानंतर पालकमंत्री सतेज पाटील यांनी आपण आता चांगली सुरवात केलीय. माझं कोल्हापूर माझा रोजगार ही संकल्पना घेऊन स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत. लवकरच जॉब फेअर घेऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार आहे.  युवकांना मार्गदर्शन करून त्यांना नोकरीमध्ये सामावून घेऊ. यामध्ये उद्योजकांनीही पुढाकार घेऊन प्रयत्न करावेत. असं आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केलं. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते माझं कोल्हापूर माझा रोजगार या अभियानाच्या लोगोचे अनावरण ऑनलाईन करण्यात आले. 
. पालकमंत्री सतेज पाटील

 माझं कोल्हापूर माझा रोजगार या अभियानाच्या माडण्यामातून ज्यांना नोकरी पाहिजे आहे त्यांनी ई मेल आणि व्हाट्स ऍपवर आपल्या नावाची नोंदणी करावी असं आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केलं. 

कोरोनाचे संकट जरी असलं तरी आता नोकरीच्या संधी आता स्थानिकांना मिळत आहेत. त्यामुळे कुशल आणि अकुशल अशा सर्वांनीच नोकरीच्या संधी आत्मसात कराव्यात असं आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केलं. यावेळी डी वाय पाटील शैक्षणिक प्रतिष्ठानचे विश्वस्त तेजस सतेज पाटील उपस्थित होते.

mh9 NEWS

About mh9 NEWS

Author Description here.. Nulla sagittis convallis. Curabitur consequat. Quisque metus enim, venenatis fermentum, mollis in, porta et, nibh. Duis vulputate elit in elit. Mauris dictum libero id justo.

Subscribe to this Blog via Email :