*-*
उदगीर प्रतिनिधी -गणेश मुंडे
कोरोना आजार आता ग्रामीण भागात पसरत आहे.
उदगीर तालुक्यातील हंगरगा येथे कोरोनाचा रुग्ण आढळून आल्यामुळे गावात गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून सर्व प्रशासकीय यंत्रणा कार्यान्वित झाल्या आहेत
गावात संचारबंदी असून नागरिक प्रचंड तणावाखाली आहेत. यावेळी परिस्थिती चे गांभीर्य ओळखून लातूर जिल्हा परिषदचे अध्यक्ष यांनी हंगरगा येथे भेट दिली.या वेळी त्यांच्यासोबत उदगीर पं स चे माजी उपसभापती रामदास भाई बेंबडे,भाजप उदगीर शहराध्यक्ष उदयसिंह,गावचे सरपंच बाबुराव सोनकांबळे,उपसरपंच चंदरराव पाटील, अकबर साहेब पठाण, नानासाहेब माने, ग्रामसेवक सीतापे, पोलीस मारोती शिंदे,अंगणवाडी सेविका, अँटी कोरोना फोर्स यांना काळजी घेण्याच्या सूचना दिल्या. तसेच प्रशासन आपल्या सोबत आहे काळजी करू नका असा त्यांनी ग्रामस्थांना विश्वास ही दिला.