केंद्र सरकारने कामगार कायद्यात बदल करून भांडवलदार धार्जिणे बदल केल्याच्या निषेधार्थ आज केंद्र सरकारच्या विरोधात सिटु अंतर्गत लाल बावटा बांधकाम कामगार संघटना व कोल्हापूर जिल्हा आशा व गटप्रवर्तक संघटनेच्या वतीने काळ्या फिती लावुन आंदोलन करण्यात आले.
सध्या जि कामगारावर हायर-फायर ही व्यवस्था लादण्यात येत आहे व त्यांना गुलामी पद्धतीमध्ये ढकलले जात आहे. कामगारांचे वेतन, आरोग्य सुरक्षा, सामाजिक सुरक्षा,मानवी प्रतिष्ठा या सर्वांवर हल्ला केला जात आहे. या निर्णयातून भारतीय कामगार वर्गाला ब्रिटिश कालीन परिस्थितीमध्ये ढकलण्यात येत आहे. कामगार संघटनांच्या वतीने या सर्व घडामोडींची दखल घेऊन या हल्ल्याच्या विरोधात 22 मे रोजी देशव्यापी निषेध दिन पाळण्यात आला .
या आंदोलनात, सिटू, आयटक,इंटक,हिंद मजदूर सभा, भारतीय कामगार सेना, श्रमिक एकता महासंघ,टी.यु.सी.सी, एआयुटीयुसी,सेवा एलपीएफ, आयसीसीटीयु,युटीयुसी या सर्व संघटना सहभागी झाल्या आहेत.या मागण्यांसाठी आज देशभरातील सर्व कामगार संघटनाच्या बरोबरच कागल तालुक्यामध्ये लाल बावटा बांधकाम कामगार संघटना तसेच कोल्हापूर जिल्हा आशा व गटप्रवर्तक युनियनेही काळ्या फीती लावुन सहभाग नोंदविला.
हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी संघटनेचे जिल्हा सचिव कॉ शिवाजी मगदूम, विक्रम खतकर, उज्ज्वला पाटील, मनिषा पाटील, मोहन गिरी, राजाराम आरडे, सुप्रिया गुदले, सारीका पाटील, विनायक सुतार, जोतिराम मोंगणे, संगिता कामते, यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले.