उदगीर प्रतिनिधी - गणेश मुंडे
उदगीर तालुक्यातील वाढवणा येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रास जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी अचानक भेट दिले असता त्यांच्या सोबत उदगीर पंचायत समिती चे माजी उपसभापती रामदास भाई बेंबडे,उदगीर भाजप शहराध्यक्ष उदयसिंह ठाकूर,उपसरपंच माऊली भांगे,रऊफ शेख,युवा मोर्चा चे विशाल रंगवाळ,विकास जाधव, भाजप अल्पसंख्यांक मोर्चा चे तालुका अध्यक्ष इर्शाद शेख आदी उपस्थित होते.सध्या देशभरात कोरोना या संसर्गजन्य आजाराने थैमान घातले असून पुणे मुंबई तसेच पर राज्यात कामासाठी असलेले नागरीक ग्रामीण भागात येत आहेत त्यामुळे कोरोणा हा आजार ग्रामीण भागात पोहोचला असल्याने नागरीकामध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.त्यामुळे जिल्हा परिषदेची आरोग्य यंत्रणा उत्तम पणे काम करत असुन आरोग्य यंत्रणा ही गोरगरीब, जनसामान्य लोकांसाठी असून ग्रामीण भागात चांगली सेवा दयावी,लोकांना वेळोवेळी चांगले उपचार द्यावेत व रुग्ण सेवेसाठी सतत तत्पर असावे असे निर्देश त्यांनी भेटी दरम्यान दिले.