विजय हंचनाळे . नंदगाव प्रतिनिधी :
नंदगाव ( ता - करवीर ) येथे ग्रामपंचायत , कोरोना दक्षता समिती , व आरोग्य विभाग यांच्या वतीने परभणी येथून गावी परतलेल्या व चौदा दिवस संस्थात्मक क्वांराटाईन पूर्ण करून पंधराव्या दिवशी घरी जात असलेल्या श्री. मधूकर भिमराव कुराडे या युवकाचे कौतुक करत पुष्पवृष्टी करण्यात आली .
या युवकाने क्वांराटाईन काळात शाळेच्या आवारातील झाडांची स्वच्छता , त्यांना पाणी घालणे , शाळेतील वर्गांच्या खोल्यांची स्वच्छता , तसेच क्रिडागंण स्वच्छ केले . तो गावात आल्यावर सर्वप्रथम आपणहून संस्थात्मक क्वांरटाईन झाला होता. त्याने लोकांच्या मनातील क्वांरटाईन विषयी असणारी भिती काढून टाकण्याचे काम केले.
त्याच्या आदर्श वर्तणूकीमुळे
ग्रामपंचायत , कोरोना दक्षता समिती व आरोग्य विभागाकडून कुराडे यांचा सत्कार नारळ , फेटा , शाल , व हार घालून करण्यात आला व फुलांची उधळण केली . यावेळी सरपंच सौ . छाया मोहन कुंभार , तसेच माजी , जि .प . सदस्य . अनिल बाळासाहेब ढवण , ग्राम पंचायत सदस्य , विजय नलवडे , किशोर दिंडोर्ले , मारूती झांबरे , मोहन कुंभार , मदन चौगले , पोलिस पाटील स्नेहलता शशीकांत नरके , सामाजिक कार्यकर्ते . पांडूरंग जयसिंग नरके , संजय पाटील , शशीकांत नरके , तुकाराम रेडेकर , आरोग्य सेवक, रामदास मानतुटे . ग्रामसेवक , सुरेश हासुरे . तलाठी - वासंती पाटील , कोतवाल - विठ्ठल संकपाळ , ग्राम पंचायत शिपाई , शामराव शिंदे , सर्जेराव कुराडे हे यावेळी उपस्थित होते .