**
नंदुरबार - (प्रतिनिधी वैभव करवंदकर) ----- नंदुरबार जिल्ह्यातील कोरोना विषाणूचे संसर्ग झालेले 21 रुग्ण पॉझिटिव्ह होते. त्यापैकी 01 युवक व 01 वृद्धाच्या यापूर्वीच मृत्यू झाला होता असे 02 रुग्ण निधन झाले. उर्वरित 19 रुग्णांना आज 18 मे रोजी सायंकाळी 5.00 वाजता त्याचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देणार आहे. आयसोलेशन कक्षेत दाखल असलेल्या कोरोणा पॉझिटिव्ह रुग्णांना योग्य तो उपचार करण्यात आल्यानंतर अनेक बाधितांचे अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील नागरिकांनी यापुढे दक्षता म्हणून तोंडाला मास्क लावणे सोशल डीस्टेशनची पालन करणे अत्यंत गरजेचे आहे . कोरोणा विषाणू जग हादररलेले आहे. राज्यात दररोज रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. नंदुरबार जिल्ह्यात आजच्या घडीला सर्वच कोरोणा बाधीतांनी कोरोनावर विजय प्राप्त केला आहे. एकंदरीत नंदुरबार जिल्हा कोरोना मुक्त झाला आहे. तरीदेखील नंदुरबार जिल्ह्यातील नागरिकांनी शासनाने दिलेल्या नियमांचे तंतोतंत पालन करणे आवश्यक आहे. जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भारूड , जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित , आरोग्य पथकातील देवदूत व प्रशासनातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या उपाययोजनांमुळे तसेच नागरिकांनी दाखवलेल्या धैर्य संयमामुळे आज जिल्ह्यामध्ये आनंदाचे वातावरण आहे.