सैनिक टाकळी प्रतिनिधी
राज्य शासनाने चालू शैक्षणिक वर्ष जूनमध्ये सुरू करायचे ठरवल्यास याबाबत शालेय स्तरावरती कोणकोणत्या उपाययोजना कराव्या लागणार आहेत याबाबत कोल्हापूर जिल्ह्याचे माध्यमिक उपशिक्षणाधिकारी बी एम किल्लेदार यांनी शिरोळ तालुक्यातील सर्व मुख्याध्यापकांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून चर्चा केली. शाळा सुरू करावयाचा झाल्यास शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या बाबतीत कोणती काळजी घ्यावयाची आहे या बाबतीत सविस्तर माहिती दिली . संपूर्ण शाळा स्वच्छ व निर्जंतुक करून सज्ज ठेवाव्यात याचबरोबर शाळेमध्ये सँनिटायझर वापर . विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था, शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या बाबतीत घ्यावयाची काळजी याविषयी सखोल मार्गदर्शन केले. व आढावा घेतला.