हिंदकेसरी मारूती माने यांच्या बद्दल आपल्याला
कुस्ती विषयी माहिती असेलच त्यांनी सामाजिक, राजकीय, क्रीडा क्षेत्रात मोठे नाव कमावले . त्यांचे क्रीडा क्षेत्रावर जसे प्रभुत्व होते तसे राजकीय क्षेत्रातही प्रभुत्व असल्याने भारतभर त्यांची ख्याती होती .
स्व .माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी त्यांना स्वकीय पक्षातील राजकीय नेत्यांना डावलून राज्यसभेत पाठवले होते. राजधानी दिल्ली येथील एका रस्त्याला त्यांचे नाव दिले गेले आहे. अशा अनेक बाबी त्यांच्या जीवनामध्ये घडलेल्या आहेत त्यांनी आपल्या खासदारकीच्या कारकिर्दीमध्ये सरकारी वेतन अथवा हयातभर पेन्शन देखील घेतलेली नाही . त्यांचा नातलग म्हणून मला अनेक वेळा त्यांच्या जीवनातील अनेक किस्से ऐकायला मिळाले त्यामधील त्यांचा एक किस्सा मी आपल्यासमवेत शेअर करत आहे .
प्रख्यात अभिनेत्री हेमा मालिनी यांनी गावातील हायस्कूलच्या बांधकामासाठी चॅरिटी शो मोफत केला होता . कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी स्वर्गीय हिंदकेसरी मारुती माने यांनी पब्लिकला शांत राहण्यासाठी आव्हान केले होते कोणताही अनुचित प्रकार करु नये असा दमच दिला होता. यावेळी भाऊंच्या शब्दांमध्ये किती वजन होते याची प्रचिती त्यावेळी हेमा मालिनी यांना आली. कार्यक्रम सुरू झाल्यानंतर लोक टाळ्या सुद्धा वाजवत नव्हते त्यामुळे कलाकार म्हणून हेमामालिनी यांनी स्वतःच्या कामगिरीविषयी शंका व्यक्त केली. त्यावेळी त्यांना खरी वस्तुस्थिती कळली .
हिंदकेसरी माने नेहमीच कलाकारांच्या बद्दल आदर बाळगत असत. कलाकार म्हणजे दैवत असून त्यांची आपण पूजा केली पाहिजे शिट्ट्या मारून दंगा करून त्यांचा अपमान करू नये असे त्यांना नेहमी वाटे. त्यांच्या सहवासातील सांगितलेल्या गोष्टी आजही तशाच आठवणीत आहेत
शब्दांकन
विनोद पाटील
सैनिक टाकळी