**,
▶️ रात्रीची ही मन हेलावून टाकणारी आमच्या समोरची चित्तथरारक घटना --कीशोर भडांगे तपोवन..
यावेळी रेस्क्यु टीमला सहकारी ट्रक वाल्यांच्या सांगण्यावरून नबी हसनखाॅ हे मुस्लिम समाजातील असल्याने त्यांनी रोजा धरला होता. हाच विषय जिवरक्षक दीपक सदाफळे पिंजर यांनी आपल्या मनाला लावुन घेतला. - ज्याचे नाही कोणी त्याचे आहो आंम्ही !! - भेदभाव कशाला माणसा माणसात रे !! हा ध्यास सैदव मनात ठेवणा-या या धेय्य वेडया जिवरक्षकाने शेवटी जीवघेण्या विहरीत उतरुन मृतदेह सुरक्षित काढुन बांधलाच.कारण मृतक नबी हसनखाॅ यांना रोजा असल्याने अन यावेळी रमजान महीना चालु असल्याने मृतदेहाला कोणत्याही परिस्थितीत सुरक्षित काढण्याचे टार्गेटच जिवरक्षक दीपक सदाफळे यांनी आपल्या समोर ठेवले. कारण घरच्यांना कीमान चेहरा तरी दीसावा हा उद्देश ठेवला कारण मृतदेह हा छाती पासुन व दोन्ही हात व पुर्णपणे चेहरा,डोके फ्रेश होते. बाकी सर्व आतडी पोट पाय तुटताट झालेले होते. यावेळी या मृतकाचा कोणीही वाली नव्हता उपस्थित लोक म्हणत होते बाॅडी तुटताट होते तर तुटुद्या शेवटी दबत असेल तर दबुद्या पण दीपकभाऊ बाॅडी जशी आहे तशी वर आणण्यासाठी आपला जिव धोक्यात घालुन खाली उतरुनका. विहीर खचलेली चेचीस वेगळे झाले आणी सिमेंट भरलेला टँक आत वेगळा झाला चेचीस क्रेनला पॅक केलेले आणी त्यातही चालु क्रेन यामध्ये खाली जाऊन बाॅडी बांधणे म्हणजे मृत्यूच्या दारात जाणे होईल. पण रेस्क्यु ऑपरेशन दरम्यान स्वता शिवाय कोणाचेही न आयकणारा हा माणुस शेवटी खाली गेलाच आणी चेचीस मध्ये अडकलेल्या मृतदेहाला
सेफ पोजिशनवर काढुन शेवटी मृतदेह बांधलाच.यावेळी उपस्थित पहाणारे अर्धे लोक घाबरुन बाजुला झाले होते...
▶️ सहा तासाच्या रेस्क्यु ऑपरेशन ला समृद्धी महामार्गाच्या जेंम्बो क्रेनच्या मदतीने पिंजर येथील संत गाडगेबाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाला रात्री दोन वाजता आले यश.
▶️ 19 मे 2020 रोजी दुपारची घटना.
▶️ घटनास्थळ -- नागपूर औरंगाबाद हायवे रोडवरील शेतातील विहीर तपोवन ता.कारंजा लाड जिल्हा वाशिम,...
▶️ मृतकाचे नाव -- नबी उर्फ राजन हसनखाॅ नजबुल हसनखाॅ वय अं.(50) रा.छोजकी विरकी पोष्ट.तीरकी बाजार, ठाणे सरघाटी जिल्हा गया (बिहार) असे असुन ते चंद्रपुर येथील एका लक्ष्मी ट्रान्स्पोर्ट ची गाडीवर असल्याचे समजते. एम-एच-34-बि.जी.9451* असल्याचे दीसुन आले. सदरहु हा ट्रँकर चंद्रपुर वरुन सिमेंट घेऊन समृद्धी महामार्गाच्या पेडगाव जिल्हा वाशिम येथील प्लाॅन्ट वर जात असल्याची माहिती आहे. विषेश अवघ्या दहाबारा किलोमीटर अंतरावर असलेल्या प्लांटवर पोहोचायची वेळ अन हा अपघात दुर्दैवाने झाला.
▶️ घटनाक्रम...... कारंजा लाड जिल्हा वाशिम जवळील तपोवन गावा नजीक नागपुर ते औरंगाबाद हायवेला लागुन असलेल्या एका शेतातील विहीरीत सीमेंट असलेला टँकर पडला आहे.यात ट्रकसह एकजण दबल्याची माहिती कारंजा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पो.नि.डीगांबर इंगळे साहेब यांनी पिंजर येथील संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांना काल माहिती देऊन तात्काळ सर्च ऑपरेशन राबविण्यासाठी पाचारण केले होते.19 मे च्या रात्री 8:30 पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे आणी सहकारी अंकुश सदाफळे,महेश साबळे, मयुर सळेदार,सुरज ठाकुर,मयुर कळसकार, ऋतीक सदाफळे, हे आपात्कालीन वाहनासह रेस्क्यु साहीत्यासह घटनास्थळी पोहचले होते. तेव्हा विहिरी मध्ये जवळपास 10-15 फुट खोल पाणी आणी त्यामध्ये सिमेंट ने भरलेला टँकर पडलेला होता. लगेच पो.नी.इंगळे यांच्या आदेशाने सर्च ऑपरेशन चालु केले. यावेळी समृद्धी महामार्गावरील भली मोठी क्रेन या ठिकाणी पोलीसांनी बोलावून ठेवली होती.लगेच पथकाचे दोन्ही सर्च लाईट लावुन रेस्क्यु टीम कामाला लागली आणी क्रेनच्या साहाय्याने टँकर वर ओढत असतांना चेचीस आणी सिमेंट भरलेला टँकर चा भाग वेगळा झाला पाण्यातुन चार फुट वर वढत असतांना समोरच्या पाट्यात मृतदेहाचा पाय अडकलेल्या अवस्थेत असतांना यामुळे मृतदेह तुटताट होण्याची अवस्था निर्माण झाली होती. कारण आधीच या अपघातात मृतदेह पोटातील सर्व आतडी बाहेर येऊन दोन्ही पाय तुटताट झालेले होते. म्हणून लगेच समय सुचकता दाखवत.पथक प्रमुख दीपक सदाफळे यांनी सेप्टी सीट बेल्ड बांधून रोप वे चा बेस तयार केला आणी विहरीत उतरुन मृतदेहाला सेप पोजीशन मध्ये रोपने बांधले यानंतर रोपच्या सहाय्याने क्रेनला कव्हरींग देत क्रेनद्वारे डायरेक्ट चेचीससह मृतदेह बाहेर काढला. यावेळी विशेष मदत समृद्धी महामार्गावरील चमुने दोन मोठी क्रेन एक जेसीबी, एक छोटी क्रेन आणल्याने मोठी मोलाची मदत मिळाली. तसेच महत्वाचे म्हणजे यावेळी कारंजा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पो.नि.डीगांबर इंगळे साहेब यांनी ही सर्व यंत्रणा आधीच बोलावून ठेवली होती.आणी स्वता ते रात्री दोन दोन वाजेपर्यंत घटनास्थळी आपल्या ताफ्यासह जातीने हजर होते यामध्ये स.पो.नी. निलेश शेंबडे साहेब, पो.काॅ.मदन सानप,पो.काॅ. विष्णु मुसळे, पो.काॅ.गणेश भोयर,पो.काॅ.संतोष इंगळे,यांनी मोलाचे सहकार्य दिले.जागेवर दोन वेळा चहा, पाणी, नाष्टा,सर्व सुविधा पुरविल्या.तसेच तपोवन येथील पथकाचे सहकारी मित्र कीशोर भडांगे आणी ट्रक मालकाचे मित्र कारंजा येथील देवांग लोढाया हे शेवट पर्यंत हजर होते.