उजळाईवाडी ता २२,
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर स्वतःच्या जीवाची पर्वा न करता , तुटपुंज्या मानधनावर काम करणाऱ्या आशा सेविका व अंगणवाडी सेविका यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करीत उजळाईवाडी येथील हनमंत कराडकर (सोनार) यांनी उजळाईवाडी तील सर्व आशा सेविका व अंगणवाडी सेविका यांना उन्हापासून संरक्षण करण्यासाठी होण्यासाठी टोप्यांचे वितरण केले तसेच गावाला कोरणा पासून मुक्त ठेवण्यासाठी रोज १०० हून अधिक कुटुंबियांचे सर्वे करणे आरोग्यविषयक तपासणी करणे बाहेरून आलेल्या लोकांची माहिती संकलित करणे व त्यांना होम होमकोरँटाईन करणे यासारखी आणि कामे उन्हातानात फिरुन करीत असल्याबद्दल त्यांच्या या कार्याचे विशेष कौतुक केले . अंगणवाडी सेविका सुनिता सातपुते , संगीता कोकाटे , ज्योती खामकर , प्रतिभा कांबळे
मदतनीस विमल डवरी ,कमल सुतार ,लता भोसले,सरीता गिरी ,आरोग्य सेविका रसिका लाड, आशा सेविका शर्मिला काशिद, सुरेखा बामणे, नंदा बागणे, सारिका परीट , पल्लवी लोहार इत्यादी उपस्थित होते.
फोटो
उजळाईवाडी येथे आशा सेविका व अंगणवाडी सेविका यांना टोप्यांचे वितरण करताना हनमंत कराडकर
(छायाचित्र महादेव वाघमोडे)