निगवे खालसा पुढारी वृत्तसेवा
येथून जवळच असलेल्या गिरगांव या गावात
कोरोनामुळे गावातील मुलाचे ठरलेले लग्न अडू नये यासाठी पुढाकार घेत सरपंचासह ग्रामपंचायतीने वर्हाडी होत वधू वरांवर अक्षता टाकल्या.मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा गावातील भैरवनाथ मंदिरात पार पडला.
गावातील संग्राम चव्हाण या युवकाचे लग्न गावातीलच शीतल पाटील या तरुणीशी ठरले होते.मात्र कोरोनामुळे हे लग्न नेमके कसे करायचे याची चिंता दोन्ही कुटुंबियांना होती.अखेर सरपंच संध्या पाटील यांनी पुढाकार घेतला ग्रामपंचायतीच्या वतीने लग्नासाठी काही निवडक लोकांना घेऊन हे लग्न करण्याचे ठरले.त्यानुसार इसपूरली पोलीस ठाण्याला आणि प्रशासनाला याची कल्पना देऊन गावातील मंदिरात हे लग्न करण्याचे निश्चित झाले.
आज सकाळी या लग्नासाठी मंदिरात तयारी सुरू करण्यात आली.मंदिर परिसरात सोशल डिस्टनसिंगचे चौकन आखून घेण्यात आले.त्यानुसार वर्हाडी मंडळींना तिथे उभारून कोरोना बाबत घालून दिलेल्या नियमांचे पालन करण्यात आले.दुपारच्या सुमारास वधू वरांवर अक्षतारोपन करण्यात आले.कोणताही बँड बाजा,गाजावाजा न करता कोरोणा दक्षता समितीच्या अध्यक्षतेखाली हे लग्न पार पडले. यावेळी गिरगाव ग्रामपंचायत सरपंच सौ संध्या पाटील, उपसरपंच योगिता चव्हाण, सदस्य पांडूरंग खेडकर,सुरेश पाटील, पांडुरंग पाटील,पोलीस पाटील उमेश लोहार, प्रमोद पाटील,रुपेश पाटील आदी उपस्थित होते