निगवे खालसा : प्रतिनिधी :-
निगवे खालसा गावामध्ये रात्रौ च्या वेळी २.३० ते ३.०० वाजताच्या सुमारास मोटार सायकल वरून एक तरुण मुंबईहून आपल्या घरी आल्याचे वृत्त समजताच संपूर्ण गावात एकच गोंधळ उडाला ग्रामपंचायत व आपत्ती व्यवस्थापन कमिटी यांची सर्वांचीच एकच धावपळ उडाली.
लोकांच्या मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. मुंबई कांदिवली हुन गावातील एक तरुण रात्रौ २.३० ते ३.०० वा. सुमारास अचानक गावात आला. रात्रौ च्या वेळी गावच्या स्टँड वरून त्याच्या बॅगा व त्याला वडील घेऊन जाताना त्याला काही जणांनी पाहिले त्याने आपण मुंबईहून येणार असल्याची ग्रामपंचायतीला कल्पना दिलेली नाही की कोणालाच थांगपत्ता लागू दिला नाही. मात्र सकाळी तो आल्याचे वृत्त गावात वाऱ्या सारखे सर्वत्र पसरले.
ग्रामपंचायतीचे सरपंच पांडुरंग महाडेश्वर, अशोक किल्लेदार, उपसरपंच चंदू कांबळे, पोलिस पाटील जयदीप किल्लेदार, प्रविण पाटील, दिनकर शिंत्रे, आपत्ती व्यवस्थापन कमिटी मधील संदीप पाटील, तुषार पाटील, बाजीराव पाटील, डी एस ढगे, दिलीप कोळी, विजय पाटील, जगदीश पाटील, कोतवाल गोरक्ष गुरव, क्लार्क जयवंत पाटील आरोग्य सेवक मुळीक आदी विचारणा करण्यासाठी घरी गेले असता सदर व्यक्तीने सरपंच व कमिटी शी हुज्जत घालन्यास सुरुवात केली. अखेर शेवटी इस्पूरली पोलिसांना बोलावण्यात आले त्यावेळी बिट अमलदार रफिक शेख कॉन्स्टेबल वाडकर यांच्या प्रयत्नाने त्यांना समजावून सर्व कुटुंबाला च संस्था क्वारंटाईन करण्यात आले.