पट्टणकोडोली :( साईनाथ आवटे)
लाॅकडाऊनचा फटका जसा विवाह समारंभास बसतोय तसाच तो त्यावर अवलंबून असणार्या कॅटरर्स आणि डेकोरेटर्स या व्यवसायकांनाही बसतोय पट्टणकोडोली मध्ये सध्या दहा ते बारा व्यवसाईक व त्यांच्या कडे कामाला असणार्या कामगाराच्या जगण्यावर देखील परिणाम झालाय त्याच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनवलाय.विवाह समारंभ म्हटल की प्रशस्त स्टेज सजवलेला मंडप आणि स्वादिष्ट जेवण अस सर्व साधारण चित्र पहायला मिळते . विवाह सोहळा पार पडतो आणि आलेले पाहूणे मंडळी उत्कृष्ट नियोजना बद्दल दोन्ही परिवाराचे अभिनंदन करतात.सर्व काही व्यवस्थित पार पडले. याचे समाधान दोन्ही परिवारास असते. मात्र हे सर्व नियोजन घडवून आणण्यासाठी लग्न समारंभात जे महत्वाचे घटक काम करत असतात ते म्हणजे कॅटरर्स आणि डेकोरेटर्स .आपल्याला मिळालेले काम चोखपणे पार पाडण्यासाठी त्यांना खुप मेहनत घ्यावी लागते. या दोन्ही व्यवसायावर अनेक कामगाराचा उदरनिर्वाह अवलंबूनअसतो.जर वर्षी फेब्रुवारी ते जून विवाहाचा सिजन असतो .या चार महिन्यामध्ये कामगाराना क्षणाची ही उसंथी नसते .जसा हा लग्नाचा सिजन तसा हा त्याच्या कमाईचा ही मानला जातो . या मात्र चित्र पुर्णतः वेगळ आहे. लग्नाचा सिजन सुरू झालाय मात्र लाॅकडाऊनमुळे सर्व टप्प आहे. फिजिकल सोसल डिस्टशिंग चे नियम काटेकोरपणे पाळायचे असलेमुळे अगदी कमी लोकांमध्ये आणि साध्या पद्धतीने लग्ने पार पडत आहेत.तर अनेक विवाह पुढे ढकलेले आहेत.त्यामुळे ऐन सिजन मध्ये कोरोनाच्या लाॅकडाऊनमुळे सर्व साहित्य धूळ खात पडलेल आहे.त्यामुळे यावर अवलंबून असलेले मालक व कामगार हवालदील झालेत .
व्यवसायासाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी काही नी बँकांकडून तर काही नी खासगी सावकाराकडून कर्ज घेतले आहेत अशांना
आर्थिक संकटातुन सावरण्यासाठी शासनाकडून मदत झाली पाहिजे नाहीतर या व्यवसायकांचे भविष्य अंधारात आणि असुरक्षित आहे.
- अशोक बाणदार
(अन्नपूर्णा कॅटरर्स आणि डेकोरेटर्स.पट्टण कोडोली.)