वाशिम प्रतिनिधी - रजनीकांत वानखेडे
यशदा पुणे आणि जलसाक्षरता अभियान वाशिम च्या अंतर्गत जलदूत रविंद्र इंगोले जलसाक्षरता अभियानाला अभिनव कल्पना देत आहे. मान्सून आणी त्याचा कालावधीत दिवसागणीक बदलत चालेला आहे.भुजलसाठा सुध्दा संपत येण्याचा मार्गावर आहे.परिस्थिती नुसार जागृत होणे काळाची गरज आहे.भुजलपातळी चिंताजनक म्हणजे अॅक्कीफर 72% खाली झाला आहे.दिवसागणीक पाण्याची मागणी वाढत आहे.आता वेळ आली आहे प्रत्येकाने जागृत जलसाक्षर होवून तसे आचारण करण्याची.पावसाच्या पाण्यावर आपण रेन वाॅटर हाॅवेस्टीग, विहीर व कुपनलीका पुनर्भरण इत्यादी उपाय करतो.याही पुढे जावून पावसाचे पाणी पाऊस चालु असतानांच आपल्या छतावरचे पाणी घराच्या टॅकी, साठवूनकीचे भांडे भरून त्याचा वापर त्या कालावधीत करायचा.माञ छतावर पावसाच्या आधी स्वच्छ व निरजंतूकीकरण करावे.हे पाणी वापरण्यास काहीच हरकत नाही.असे कल्याने या कालावधीत रोगराई सुध्दा होणार नाही आपण हेच पाणी गटाराने वाहू दीले शेवटी दूषीत पाणी भुजलात जाईल आणी तेच पाणी पिल्याने आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.पावसाच्या पाण्याची साठवून केल्यास त्या कालावधीत पाणी उपसण्यासाठी विद्यूत लागणार नाही व भुजलसाठा त्या कालावधी तेवढा तसाच राहून पुढे सुध्दा कामा येईल या साठी शासनाने , संस्थाने ग्रामपंचायत व नगरपंचायतने या विषयी जानीव जागृती करणे नितांत गरजेचे आहे.उदाहरण आज 2.5 मी.मी.पाऊस पडला मी माझ्या घरी 400 लीटर पाण्याची साठवण शमता आहे ती चार दीवस माझ्या कुटूबासाठी पुरते असे प्रत्येकांने करायला पाहीजे.पाणी पुरोठा योजना यांनी जागृती करून पाऊस आल्याव त्या दिवसा पुरता बंद करता यईल का याचा अभ्यास करायला पाहीजेत पावसाचे पाणी शुध्द, स्वच्छ व चविष्ट असते.पुर्वीच्या काळी ग्रामीण स्त्री पावसाच्या पाण्याची साठवून करायची आणी सळा सारवन भांडी धूण्यासाठी वापरायची.कारण पाणी विहीरीवरून शेंदून तीलाच आणावे लागत असे.याचावरून बडबडत गित सुध्दा आहे 'ये गं ये गं सरी माझे मडके भरी सरी आली धावून मडके गेले वाहून.'प्रत्येक गावाचा पाण्याचा ताळेबंद करायला पाहीजेत कोविळ 19 सारखे आजार असल्यास शहारामधील मंडळी खेड्यात आली आहे त्याची उर्मी गावासाठी काहीतरी करण्याची आहे.त्यानां आता जलसाक्षरतेचे नाॅलेज देणे गरजेचे आहे.पाण्यामुळेच गावाचा विकास होतो किंवा असे म्हणतात येईल ग्रामविकासाचा केंद्र बिंदू पाणी आहे.