गांधीनगर, प्रतिनिधी
एस एम वाघमोडे
:चिंचवाड (ता. करवीर) येथील उपसरपंचपदी सौ. अश्विनी शितल पाटील यांची बिनविरोध निवड झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच सुदर्शन उपाध्ये होते.
माजी उपसरपंच बाबूराव कोळी यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त होते. आज या पदाच्या निवडीसाठी विशेष सभेचे आयोजन केले होते. या पदासाठी सौ. अश्विनी पाटील यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य प्रकाश पाटील, दादासाहेब पाटील, कुमार आंबी, प्रसाद सलगर, निखिल पोवार, सुरेखा पाटील, जमिला मुजावर, शकुंतला आंबी, सुमन जाधव, वंदना करुणासागर, ग्रामसेवक विजय माळी आदिंसह कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते.
----------