Sunday 24 May 2020

mh9 NEWS

नंदगावातील ग्रामस्थांचा प्रामाणिकपणा - पैसे आणि महत्त्वाची कागदपत्रे असणारे पाकिट परत केले

नंदगाव प्रतिनिधी : 

खेबवडे ( ता - करवीर ) येथील श्री. शशीकांत मारूती कांबळे हे नंदगावमधून खेबवडे गावाकडे जात असताना नंदगाव येथे रेणूका मंदीर परिसराजवळून गाडीवरून जात असताना त्यांचे पैशाचे पाकीट रस्त्यावर पडले . घरी गेल्या वर  त्यांच्या लक्षात आले की महत्वाची कागदपत्रे व पैसे ठेवले असलेले पाकीट कुठेतरी हरवले  आहे . ते या घटनेमुळे खुप अस्वस्थ झाले .व परत मागे येवून शोधा शोध केली व रिकाम्या हाताने घरी परतले . पण घरी चिंतेत बसले असताना त्यांना  फोन आला . की तुमचे पैशाचे  पाकीट आम्हांला सापडले आहे . आणी ते येवून घेवून जा . तुमच्या डायरीतील नंबरावरून आम्ही फोन केला आहे असा त्यांना  फोन आला ,ते तात्काळ नंदगाव येथे आले नंदगावमधील आण्णा सांगावे , व अनिल भांडवले यांना रेणूका मंदिराकडे जात असताना ते पाकीट  सापडले होते . त्यामध्ये कांबळे यांची महत्वाची कागदपत्रे व पैसे होते . प्रामाणिक पणे सांगावे , व भांडवले या दोघांनी ते पाकीट परत केले . शशीकांत कांबळे यांनी पाकीट मधील रक्कम बक्षीस रुपी देवू केली पण  त्यांनी हे बक्षीस रक्कम  घेतली  नाही त्यांच्या या प्रामाणिकपणाचे कौतूक नंदगाव व परिसरातील ग्रामस्थांच्याकडून होत आहे .

mh9 NEWS

About mh9 NEWS

Author Description here.. Nulla sagittis convallis. Curabitur consequat. Quisque metus enim, venenatis fermentum, mollis in, porta et, nibh. Duis vulputate elit in elit. Mauris dictum libero id justo.

Subscribe to this Blog via Email :