कोल्हापूर प्रतिनिधी
सलग दररोजचे वाढणारे कोरोना पॉझिटिव्ह यामुळे कोल्हापूर प्रशासनाची चिंता वाढली आहे. पालकमंत्री सतेज पाटील व जिल्हाधिकारी दौलत देसाई तसेच सर्व प्रशासन शर्थीचे प्रयत्न करुन कोरोनाला रोखण्यासाठी यशस्वी ठरत असतानाच रेड झोन मधून येणाऱ्यांचा लोंढा वाढला आहे. त्यामुळेच बाहेरून आलेल्यांमुळे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. मुळ कोल्हापूरातील रुग्ण संख्या नगण्य आहे.
दररोज किमान सहाशे वर गाड्या परजिल्हयातून कोल्हापूरात येतात, त्यातील चारशेहून अधिक मुंबईच्या असतात. यामुळे या सर्वांची आरोग्य तपासणी व क्वारंटाईन चा ताण पडत आहे, तसेच तपासणी अहवाल प्रलंबित रहात आहेत. यासाठी कोल्हापूर जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी कंटेनमेंट झोन व रेड झोन असणाऱ्या सर्व ठिकाणच्या पोलीस आयुक्त व मनपाच्या आयुक्तांना अशा ठिकाणच्या नागरिकांना कोल्हापूरला जाण्याची परवानगी देऊ नये तसेच ई पासेस देऊ नये अशी विनंती केली आहे.
जर अशा प्रकारे बाहेरुन येणारे रुग्ण संख्या कमी झाली तर कोल्हापूरातील नागरिकांना नक्कीच दिलासा मिळेल.