उंचगाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर येऊन करवीर तालुक्यातील शिवसैनिकांनी काहीही होवो संपूर्ण जनता यापुढेही मा.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहणार अशी जाहीर शपथ घेतली. जीव घेणाऱ्या कोरोनाचा मुकाबला सर्वजण करत असताना त्यासाठी सरकारला मदत करण्याऐवजी जीव घेणारे राजकारण भाजपचे नेते करत आहेत. त्यांच्यात आणि कोरोनामध्ये फरक काय? असा सवाल करवीर तालुकाप्रमुख राजू यादव यांनी केला.
यापुढे तुम्ही सत्तेसाठी असेच राजकारण करणार असाल तर छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र तुम्हाला कधीही माफ करणार नाही. तुम्ही काळे झेंडे दाखवा आम्ही तुम्हाला भगवे झेंडे दाखवु असा टोलाही शिवसैनिकांनी दिला. तुम्ही काळे झेंडे दाखवून डॉक्टर पोलीस प्रशासनाचा व जनतेचा अपमान करत आहात असे मत उपतालुकाप्रमुख , दीपक पाटील यांनी केले.यावेळी पोपट दांगट,विक्रम चौगुले, दीपक रेडेकर यांनीही मनोगत व्यक्त केले.
यावेळी करवीर तालुकाप्रमुख राजू यादव, उपतालुकाप्रमुख दीपक पाटील, उपतालुकाप्रमुख पोपट दांगट,युवा सेना तालुका प्रमुख संतोष चौगुले, विक्रम चौगुले, युवासेना उपजिल्हाप्रमुख सागर पाटील, विराग करी, गावप्रमुख दीपक रेडेकर, ग्रामपंचायत सदस्य महेश खांडेकर, विजय गुळवे,सागर गुळवे, सचिन गुरव, बंडा पाटील, बाळासाहेब नलवडे, सचिन नागटीळक, सागर नाकट, किरण शिंगे आदी उपस्थित होते.
फोटो; उचगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर शिवसैनिकांनी मुख्यमंत्री यांच्या समर्थानात भाजपला असे उत्तर दिले.