तंबाखूचा दुष्परिणाम चितारला गेला कुंचल्यातून, 31 मे हा दिवस जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो*.
उदगीर प्रतिनिधी:- *गणेश मुंडे*
तालुक्यातील कल्लूर येथील श्री पांडुरंग विद्यालयातील येथील कलाशिक्षक यांनी लॉकडाऊनचा सदुपयोग करीत समाजभान राखून कुंचल्यातून तंबाखू विरोधी दिनाबद्दल जनजागृती करणारी अनेक चित्रे रेखाटली आहेत. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
संपूर्ण विश्वात कोरोनामुळे मृत्यूचे तांडव सुरू आहे.खेडी,तांडा,वाडी, गाव,तालुका,शहर,सगळीकडे पोहचला हा कोरोना व्हायरस. कोरोना महामारी आजारावर आळा घालण्यासाठी ही शासनाने तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ (गुटखा,मावा, मशेरी,पानमसाला,सिगारेट,विडी,ई.) खाणे हे आरोग्याला घातक आहे. असे पदार्थ खाऊन सार्वजनिक ठिकाणी व रस्त्यावर अथवा परिसरात कुठेही थुंकल्यास कायद्याने बंदी घातली आहे.आजचा दिवस म्हणजे तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ सेवन करण्यापासून लोकांना रोखण्याचा दिवस आहे.यासाठी समाज प्रबोधनाची अत्यंत गरज आहे.
चंद्रदीप नादरगे ग्रामीण चित्रकार म्हणून प्रसिद्ध आहेत.वेगवेगळे सामाजिक आशय घेऊन अनेक चित्रे त्यांनी रेखाटली आहेत.आजचा दिवस म्हणजे तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ सेवन करण्यापासून लोकांना रोखण्याचा दिवस आहे.या अनुषंगाने पालकांना आपला मुलगा कोनत्याही व्यसनाच्या आहारी जाऊ देवू नये हे त्रिकाल सत्य आहे.परंतु आपणच घरी तंबाखू अथवा तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करत असाल तर येणाऱ्या काळात तुमचीच मुले तुमचं अनुकरण करून व्यसनाच्या आहारी जाऊ शकतात. यासाठी आजच सावधान व्हा...!
आणि आजच्या दिवसापासूनच तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन मी करणार नाही असा संकल्प सर्वांनीच करा.असा संकल्प केल्याने तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करून दिवसेंदिवस वाढत चाललेली ही संख्या हळूहळू घटत जाईल आणि आपल्याबरोबर इतरांचेही स्वास्थ्य निरोगी राहील.
*तंबाखूच्या व्यसनाचे दुष्परिणाम*
★तोंडामध्ये हळूहळू व्रण पडतात.
★व्रनाच्या मोठ मोठ्या जखमा होतात.काही दिवसांनी गाठी होतात.
★दवाखाना व औषध उपचार सुरु होतात.तोंडातील जखमा भरून आल्या नाहीत तर तोंडाचा कॅन्सर होतो.
★तंबाखू पोटात गेल्यावर पोटाच्या निरनिराळ्या तक्रारी सुरू होतात आणि तंबाखू सतत पोटात जात राहिल्याने अन्ननलिकेचा कर्करोग होऊ शकतो.★फुफुसचा त्रास होतो.★मूत्राशय व मूत्रपिंडाचे आजार होतात.★गर्भाशयाचा कर्करोगही होतो.★तंबाखूत असणाऱ्या निकोटिन मुळे मेंदूचे कार्य मंदावते.★मेंदूची विचार करण्याची क्षमता कमी होते.★औषध उपचाराने हा कर्करोग बरा होतो याची खात्री नाही.मोठमोठ्या शहरात तरुणांमध्ये फॅशन म्हणून धुम्रपाणाचे प्रमाण वाढले आहे.तंबाखू खाणे, सिगारेट-विडी ओढणे,तापकीर हुंगणे, दातांना मशेरी लावणे, चिलीम, हुक्का,चिरुट आशा पदार्थाचा वापर शहरी भागातील तरुण सर्रास करताना दिसतात.त्यामुळे धुम्रपणाचे प्रमाण वाढले आहे.तंबाखू ,दारू व अमली पदार्थ नशा उत्पन्न करतात.
त्यांचे सतत सेवन केल्याने व्यक्तीच्या
आरोग्याला धोखा निर्माण होतो.आणि अशा व्यसनामुळे शेवटी व्यक्तीचा प्राणही जाऊ शकतो.वाईट व्यसनांचे प्रत्येकाने दुष्परिणाम ध्यानात ठेवावे.
व अशा व्यसनापासून दूर रहावे.जर प्रत्येकाने स्वतःवर विश्वास आणि मनावर ताबा ठेऊनच तंबाखू व अमली पदार्थाचे सेवन बंद केले पाहिजे.म्हणतात ना आरोग्य संपत्ती हीच धन संपत्ती.आपले आरोग्य जपाल तर कुटुंबही सुरक्षित राहील.असे झाले तरच भारत तंबाखू व अमली पदार्थमुक्त होऊ शकतो.