कोल्हापूर प्रतिनिधी दिनांक 19/05/2020
मादळे ता. करवीर येधील इन्स्टिट्यूटनल क्वारंटाईन असलेल्या व्यक्तीचा कोरोना पॉझिटीव्ह असल्याचा
रिपोर्ट सायंकाळी प्राप्त झाला आहे. यामुळे मादळे आणि परिसराला सिल करण्यात आले आहे.
हा रुग्ण मोर्शी खुले कारागृह अमरावती येथील कैदी असुन तो दिनांक 12/05/2020 रोजी पॅरोलवर मुक्त झाला होता. तो दिनांक 13/05/2020 रोजी 23-00 वाजता मादळे येथे आला होता, त्यास रात्री शाळेमधे इन्स्टिट्यूटनल काॅरंन्टाईन केले होते. व त्याची दिनांक 14/05/2020 सीपीआर हाॅस्पीटल येथे मेडीकल करुन त्याचा स्वॅब घेतला होता त्याचा रिपोर्ट आज रोजी प्राप्त झाला आहे. त्यास अॅम्ब्युलन्स मधुन 23-15 वाजता सीपीआर हाॅस्पीटल येथे उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. त्याच्या संपर्कातील 17 लोकांची माहिती घेण्यात आली असून त्यांपैकी 16 लोकांना देखील इन्स्टिट्यूटनल काॅरंन्टाईन करण्यात आले आहे. या सर्वांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे.
दरम्यान तो कोठे फिरला होता आणि कोणाला भेटला होता याची माहिती एमआयडीसी पोलीस ठाणे यांच्याकडून घेतली जात आहे तर खबरदारीचा उपाय म्हणून आम्ही संबंधित रुग्णाच्या संपर्कातील लोकांची माहिती घेत आहोत असे शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्याचे स.पोलीस निरीक्षक किरण भोसले यांनी सांगितले.