हेरले / प्रतिनिधी
अमर थोरवत
हातकणंगले तालुक्यातील हेरले ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी राहूल शेटे यांची बिनविरोध निवड झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच आश्विनी संदीप चौगुले होत्या.
हेरले ग्रामपंचायतीवर माजी सभापती राजेश पाटील यांच्या स्वाभिमानी गाव विकास आघाडीची सत्ता आहे. सत्ता स्थापन झाले नंतर प्रथमतः विजय भोसले यांची उपसरपंच पदी निवड केली होती. त्यांनी गेली अडीच वर्षे उत्कृष्ट कार्य केले आहे. स्वाभिमानी गाव विकास आघाडी अंतर्गत ठरले प्रमाणे उपसरपंच पदाचा विजय भोसले यांनी राजीनामा दिल्याने उपसरपंचपद रिक्त झाले होते.
उपसरपंच पदाच्या निवडीसाठी शनिवारी सभेचे आयोजन केले होते. राहुल शेटे यांचा उपसरपंच पदासाठी एकच अर्ज दाखल झाल्याने ग्रामविकास अधिकारी संतोष चव्हाण यांनी त्यांची बिनविरोध निवड घोषीत केली. राहूल शेटे यांची बिनविरोध निवड झाल्याने मावळते उपसरपंच विजय भोसले यांनी त्यांचा सत्कार केला. अडीच वर्षे उपसरपंच विजय भोसले यांनी उत्कृष्ट कार्य केले बद्दल त्यांचा सरपंच आश्चिनी चौगुले व ग्रामपंचायत सदस्य मज्जीद लोखंडे यांनी सत्कार केला.
या सभेस ग्रामपंचायत सदस्य सतिश काशिद, मज्जीद लोखंडे, फरिद नायकवडी, विजय भोसले, सदस्या अपर्णा भोसले, आशा उलसार, विजया घेवारी, शोभा खोत, स्वरूपा पाटील, रिजवाना पेंढारी, मिनाताई कोळेकर , आरती कुरणे आदी सदस्य उपस्थित होते.